मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरवी जिद्द

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
. सिमेंटच्या शेवाळल्या थरात.... मातीचा बोटभर तुकडा शोधून, उंच उंच जाणार्‍या इमारती मधल्या फुटभराच्या रोपट्या.... किती रे सुंदर दिसतोस! तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' जमिनीला घट्ट धरून ठेवणारी तुझी मुळं... आणि काळपट-करड्या पार्श्वभूमीवरच.. ते टोकाचं हसरं पिवळं फुल, म्हणजे सौंर्दयाचा कळस! आहा... ! डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून. बर आहे..., तू चित्रात आहेस!, असाच रहशिल कायम... असच राहील तुझ चैतन्यमयी हास्य, तुझ कोवळे पण.. तुझी हिरवी जिद्द! न जराठता , कोमेजता! ===================== स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८

वाचने 3433 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सहज Sat, 07/19/2008 - 19:00
बर आहे..., तू चित्रात आहेस!, असाच रहशिल कायम... चांगली कलाटणी... कविता आवडली.

In reply to by सहज

बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 19:08
स्वातीताई, सहजरावांशी सहमत आहे. कलाटणी काहीशी अनपेक्षित म्हणता येईल (देखाव्यातून काहीशी अपेक्षा होतीच कलाटणीची तरीही); पण आवडली. सिमेन्टचा शेवाळला थर आणि तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' हे विशेष वाटले. (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by सहज

केशवसुमार Sat, 07/19/2008 - 19:31
स्वातीताई, चांगली कलाटणी... कविता आवडली. (वाचक)केशवसुमार स्वगतः केश्या तु इथे प्रतिसाद द्यायच्या आधीच ताईंनी तुझा दुसरा प्रतिसाद वाचला सुध्दा.. :T जग फारच फास्ट झालयं नाही.. :W

ऋषिकेश Sun, 07/20/2008 - 15:17
वा छान कविता.. मांडणी आणि कलाटणी.. आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

धनंजय Mon, 07/21/2008 - 01:19
मांडणी आणि कलाटणी आवडली. चित्रात नसलेले खरेखरचे पिंपळाचे रोप इमारतीच्या भिंतीत उगवले की थोडेसे घाबरायला होते. ही चिवट रोपे भिंत फोडायला कमी करत नाहीत.