✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही दुवे...... आज एवढेच

ज
ज्ञानव यांनी
Sat, 08/31/2013 - 22:28  ·  लेख
लेख
१) टंकलेखन आणि संगीत हे मिश्रण भुवया उंचावणारे आहे. आज मी इथे एक लिंक देतो आहे ज्यात एक मोठ्या सिम्फनीने टंकलेखकाचा वापर संगीत तयार करण्यासाठी केला. अनेक वेळा मी यु ट्युबवर काही गंमतीशीर पाहायला मिळेल म्हणून मुशाफिरी करत असतो (गमतीशीर पण सभ्यही!!) त्यात मला हा ऑर्केस्ट्रा पाहायला मिळाला आणि तो मला आवडला त्यातल्या मुझिक पीस तसेच वाजवणारे आणि typist (!!!???)ह्या दोघांचेही एक्स्प्रेशन्स फारच छान वाटतात. एके काळी मला आठवतंय टंकलेखक आणि शिवणाचे मशीन दोघांनी अनेकांच्या संसाराला आर्थिक हातभार लावला. संगणक आल्यावर ती कागदावरची नादमय टक टक बंद झाली आणि संगणकाचे "गुपचूप" काम सुरु झाले. तरीही कालपरवा पर्यंत धडधडणाऱ्या ह्या टंकलेखकानमध्येही संगीत शोधण्याचे काम कुणीतरी अज्ञात व्यक्तीने केले आहे जे माझ्यासाठी त्या मशीनला दिलेली एक मानवंदना आहे. कदाचित माझे वर्णन जरा अति वाटेल पण ज्याला नाद कळतो त्याला एकदातरी पाहायला हे नक्कीच आवडेल. हा ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी इथे क्लिक करा. (मुळ पानावर जाण्याआधी एक जाहिरात येते जी आपण स्क्रीनच्या उजव्या हाताला वर skip ad ह्यावर क्लिक केल्यावर जाते आणि मुख्य पेजवर घेऊन जाते तर जाहिरात आहे म्हणून एका चांगल्या अनुभवाला मुकु नये म्हणून....) २) कधी कधी चुकून किंवा कुणी खोडसाळपणे आपली एखादी महत्वाची file संगणकावरून गायब करतो तर अश्या गायब होणार्या फाइल्स पुन्हा मिळविण्यासाठी एक उपयुक्त सोफ्टवेर इथे क्लीक केल्यावर मिळू शकेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी

प्रतिक्रिया द्या
6671 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

छान आहे!

काकाकाकू
Sat, 08/31/2013 - 23:42 नवीन
यावरनं व्हिक्टर बोर्ग आठवला! माहिती नसला तर या लिंकने सुरूवात करा. youtube वर ढिगभर व्हिडिओज मिळतील. आणि ads.fly पेक्षा हि डायरेक्ट लिंकच द्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ज्ञानव
Sun, 09/01/2013 - 07:14 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.मी जरा भीत भीतच हे दुवे द्यायला सुरवात केली कारण जे मला आवडते ते इतरांना आवडेलच असे नसते तरीही सगळ्यांनी दखल घेतली त्याबाबत सगळ्यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकाकाकू

बिंधास्त लिहा...

मुक्त विहारि
Sun, 09/01/2013 - 09:37 नवीन
घाबरू नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा