बोट किंवा बस लागणे
आपल्यातील बर्याच लोकांना बोट किंवा बस लागते. म्हणजे काय होतं?
बोट किंवा बस एका जागी उभी असते तेंव्हा काहीच होत नाही पण ती जेंव्हा हलू लागते तेंव्हा थोड्यावेळाने चक्कर येते. पोटात ढवळून येते आणि उलटीची भावना होते किंवा उलटी होते.
हे असे का होते याचे मूळ आपल्या कानाच्या आत असते कानाच्या आत अर्ध वर्तुळाकृती नलिका, utricle आणि saccule (पिशवी) हे तीन अवयव असतात. या अर्ध वर्तुळाकृतीनलिका तीन मितीत (थ्री डाय मेन्शन) आपल्या मेंदूची परिस्थिती काय आहे याची मेंदूला सतत माहिती देत असतात. याच बरोबर तेथे हे नंतरचे दोन अवयव मेंदूला आपल्या डोक्याची स्थिती गुरुत्वाकर्षण च्या तुलनेत कुठे आहे आणि सरळ वेगाने जाताना कुठे आहे ते दर्शवते.अर्ध वर्तुळाकृती नलिका मेंदूची स्थिती डोके तिन्ही मितीमध्ये वळवल्या मुळे कुठे आहे ते मेंदूला कळवत असते.थोडक्यात हे तीन अवयव मेंदूला डोक्याची स्थिती स्थिर अवस्थेत( STEADY STATE) , सरळ रेषेत त्वरण(LINEAR ACCELERATION) झाल्यावर आणी वर्तुळाकृती त्वरण(ROTATIONAL ACCELERATION) झाल्यावर काय आहे ते सतत कळवत असतात.
ज्यावेळेला आपले डोके सतत वळत असते (जसे घाटामध्ये एस टी ने गेल्यावर) तेंव्हा त्या नलीकेतील द्रव पदार्थ स्थिर स्थितीतून सतत गतिमान स्थितीत गेल्यामुळे आपण बस मधून उतरल्यावर सुद्धा आपले डोके गरगरते आहे अशी भावना होते. हीच परिस्थिती जेंव्हा आपला वाहन चालक सारखा गचके घेत (सतत वेगाने पुढे जाणे आणी एकदम ब्रेक लावून थांबवणे)चालवत असतो तेंव्हा होते.
एकदा आपल्या कानातील वरील अवयवात असलेला द्रव गतिमान झाला कि तो बराच वेळ आपल्याला आपले डोके हलत आहे अशी जाणीव करीत राहतो. दुर्दैवाने या हालचालीचे केंद्र मेंदूच्या खालच्या भागात जेथे आहे त्याच्या शेजारीच उलटीचे केंद्र असते.
या उलटीच्या केंद्र शेजारी एक रासायनिक पृथक्करण विभाग(CHEMORECEPTOR TRIGGER ZONE किंवा CTZ ) असतो.
जर विषबाधा झाली तर विष रक्तात मिसळून मेंदूकडे येते आणी ते विष या CTZला उत्तेजित करते. हा CTZ उलटीच्या केंद्राला संदेश पाठवून उलटी करून आणतो त्यामुळे जठरात आलेले विष हे उलटीच्या वाटेने बाहेर फेकले जाते. याच कारणामुळे काही औषधे घेतल्यावर आपल्याला उलटीसारखी भावना किंवा शिसारी( NAUSEA) आणतात. गरोदर पणाच्या पहिल्या तीन महिन्यात संप्रेरकांची रक्तातील पातळी एकदम वाढल्यामुळे हाच परिणाम होऊन गरोदर स्त्री ला ओकारीची भावना किंवा ओकारी होते.
ज्यावेळेला आतल्या कानाच्या केंद्राला संवेदना जास्त प्रमाणात येतात तेंव्हा त्या ओसंडून बाजूच्या केंद्रांना पण उत्तेजित करतात यामुळे आपल्याला शिसारी( NAUSEA) येते आणी उलटी पण येते.हीच परिस्थिती आपण एस्सेल वर्ल्ड ला चक्राकार फिरणाऱ्या पाळण्यात बसलो तरी येते.
कोणतीच हालचाल न करता जर या आतल्या कानाला विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर बसल्या जागी आपल्याला गरगरते, चक्कर येते आणी उलट्या येतात. याला VERTIGO म्हणतात.
डीझेल ची वाहने यांचे चक्राकार त्वरण जास्त असते( TORQUE) त्यामुळे या वाहनांच्या इंजिनचे RPM पेट्रोल च्या वाहनांच्या RPM पेक्षा कमी असतात आणी पेट्रोलच्या वाहनांचा TORQUE कमी असतो त्यामुळे डिझेलची वाहने कमी वेगात पटकन वेग घेतात पण त्यांचा सतत गियर बदलावा लागतो त्यामुळे डिझेलची वाहने जास्त गचके देत चालतात.त्यात आपल्याकडे चालकांचे प्रशिक्षण हा एक संशोधनाचा विषय आहे). शिवाय डिझेलच्या वाहनाचे हादरे पेट्रोलच्या वाहनांपेक्षा कितीतरी जास्त असतात.डीझेल वाहनाचा धूर हा एका विशिष्ट वासाचा असतो त्यामुळे आपल्याला ट्रक किंवा एस टी च्या धुराचा वास आला तरी डचमळल्याची भावना होते ( याशिवाय आपल्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेत स्वच्छता हा एक ऐच्छिक विषय असल्याने त्याबद्दल न बोलणे बरे) त्यातून घाटात जाताना शेजारचे मुल ओकत असेल तर आपली अवस्था अजून बिकट होते)
ज्यांना ज्याना एस टी / बोट लागते त्यांनी याचा चांगलाच( किंवा वाईट) अनुभव घेतलेला आहे.
पहिली गोष्ट म्हणजे असे काही लोकांना होते आणि काही लोकांना होत नाही असे का?
काही लोकांचे वरील अवयव अति संवेदना शील असतात त्यांना नुसते टीव्ही वर हलणारे जहाज पाहून सुद्धा डचमळल्याची भावना होते. याविरुद्ध मी विक्रांत मध्ये असताना आम्ही जुलै महिन्याच्या सरावानंतर मुंबई बंदरात परत येत होतो तेंव्हा बर्याच लोकांची अवस्था कठीण होती. असेच बाहेर पाहत असताना एक मच्छिमार आपल्या बारक्या होडक्याच्या डोलकाठी च्या टोकावर असलेल्या एका फळकुटावर बसून दोन्ही हात सुटे सोडून विडी ओढत बसला होता आणि त्याच दहा फुटाचे होडके कमीत कमी ५-६ फुट वर खाली होत होते. आणि त्याला कोणताही त्रास किंवा दुखः नव्हते हे दुसरे टोक.
हा भाग सवयीने होतो कारण तुमचा मेंदू काही वर्षांनी अशा हालचालींना सरावतो. यामुळेच लहान मुलांना बस फार पटकन लागते आणि मोठ्या माणसाना नाही.
सवय तर पटकन होत नाही. आता यावर उपाय काय ?
बोटीचा पुढचा भाग जास्त हलतो म्हणजे जास्त वर खाली (pitching) होतो तेंव्हा बोटीच्या मागच्या भागात बसणे त्यातून बोटीचा वरचा मजला जास्त डावी उजवीकडे( rolling) होतो म्हणून सर्वात खालच्या मजल्यावर बसणे. याविरुद्ध बसमध्ये पुढचे चाक आणि मागचे चाक याच्या मध्ये बसलात तर तरफेच्या आतल्या भागात बसल्याप्रमाणे आपली हालचाल वर खाली आणि वळणाच्या रस्त्यावर डावी उजवीकडे कमी होईल. याशिवाय बोटीत बसल्यावर आपली नजर जर आपण लांबवर क्षितिजाकडे ठेवली तर आपले हलणे क्षितिजाच्या मानाने कमी असल्यासारखे वाटल्याने आपल्याला डचमळल्याची भावना कमी होईल. यासेच एस टी मध्ये बाहेर क्षितिजाकडे पाहत राहिलात तर डचमळल्याची भावना कमी होईल. आतमध्ये खाली पहिले तर फार लवकर चक्कर आल्यासारखे वाटते तेंव्हा ते टाळावे.ज्यांना बस किंवा बोट लागते त्यांनी प्रवास सुरु करण्याच्या अर्धा तास अगोदर अवोमीन( avomin) हि गोळी घ्यावी. पोट शक्यतो रिकामे ठेवावे याचे कारण अन्न असले तर ते पचवण्यासाठी जठरात आम्ल तयार होते आणि जर उलटी झाली तर त्यातून हे अन्न आणि आम्ल बाहेर पडते. याशिवाय उलटीचा ऐवज जास्त असल्याने ती थांबवून ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे कठीण जाते. दुध तर मुळीच पिऊ नये कारण पोटातील आम्लाने त्याचे दही बनते आणि उलटीला अत्यंत घाणेरडा वास येतो.( एस टी मध्ये हमखास कोणीतरी मुलाला दूध पाजून आणलेले असते आणि त्याने उलटी केली तर तो वास आजूबाजूच्या लोकांना खूप वेळ त्रास देत राहतो)
जर रोज आपल्याला प्रवास करणे आवश्यक आहे आणि रोज औषध घेऊ नये असे वाटत असेल तर किसलेल्या आल्यात लिंबाचा रस साखर मीठ आणि थोडेसे सैंधव आणि पादेलोण करून फ्रीज मध्ये ठेवावे. आल्याचा रस हा या मेंदूतील केंद्राला स्थिर करतो असे डॉक्टर शरदिनी डहाणुकर यांच्या गटाने मुंबईत के इ एम रुग्णालयात केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
यात मूळ घटक "आले" हा आहे आणि आल्याचा कीस हा जास्त गुणकारी आहे मिक्सर मध्ये आले फिरवून त्याचे बारीक वाटण करण्यापेक्षा कीस जास्त उपयुक्त असतो. शुद्ध आल्याने तोंड कोरडे पडते. लिंबाचा रस साखर आणि मीठ( सैधव आणि पादेलोण) यांनी आल्याच्या गुणधर्मात वाढ होते त्या पदार्थाला चव येते आणि तोंडाला पाणी सुटून तोंडाचा कोरडेपणा कमी होतो.
याच कारणास्तव एस टी स्टेण्ड वर आलेपाक मिळत असावा. त्याचा प्रयोग करून पहा.
खरं तर हा उपाय गरोदर स्त्रियांनी जरूर करून पाहावा असा आहे. ( माझ्या बर्याच रुग्ण स्त्रियांनी त्यांना खूप चांगला फायदा झाल्याचे मला आवर्जून सांगितले).
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्वानुभवाचे बोल
अनावश्यक धागा
धागा अनावश्यक नाही.
पुढच्यावेळी आल्याचा वापर करून
आल्याचा रस हा या मेंदूतील
चांगली माहिती
धन्यवाद ह्या माहितीबद्दल..
चांगले विश्लेषण.
डोळे मिटून फायदा
धन्यवाद.
हा प्रयोग
धन्यवाद !
.
नेसल ड्रॉप्स.
ऑट्रिव्हिन नेसल ड्रॉप्स
एक शंका
शक्यता
आपणहून औषधोपचार करण्याबाबत
डायमॉक्स ही गोळी एकदा काही
+१
कधीतरी एकदा कारणपरत्वे
वाचा
अरे देवा...
इकॉर्टीन.
खूप खूप धन्यवाद. आता शोधून
'इकॉर्टीन' (की 'इप्कॉर्टीन'
कॉर्टिकोस्टिरॉइड्स सुद्धा
मी काय वेगळे सांगितले आहे?
मान्य आहे.
विमानामधे कान दुखणे
माहीतीपूर्ण
सहमत
आम्लपित्त आणि बस लागणे हे दोन
दोन वेगळे विकार
.
जांभई दिली की सुटतो प्रॉब्लेम
.
.
विमानात मात्र कान दुखणे फार
अरेच्च्या वर डॉ साहेबांनी
एक शंका.
कानातला मळ हा बहिर्कर्णात
Ear wax melts many a 'fauji' dreamकेवळ कानातल्या मळामुळे कोणाला वैद्यकीय तपासणीत बाद करत नाहीत... बर्याचदा अशा वेळेस फाटलेला कानाचा पडदा अथवा इतर काही महत्वाचे कारण असते.आपल्या माहिती करीता.
नमस्कार साहेब!
गैरसमज होतो आहे.
प्रथम नाक चिमटीत पकडून आणि
मला वाटते तुम्ही माझा
जर वरच्या प्रयत्नाने फरक पडला नाही (विशेषतः खोकला, पडसे असेल) तर मात्र खूप बळजबरी करू नये ! कानाच्या पडद्याला दुखापत होउ शकते.अतिरेक सगळीकडेच मारक ठरतो... अगदी चांगल्या गोष्टींचा सुद्धा. अतिरेकाने नुकसान झाले म्हणुन दुसरे टोक पकडणेही विरुद्ध दिशेने केलेला अतिरेक होय !कानावर दाब
हा ब्लॉग जरूर वाचावा ..
माहितीपूर्ण धागा.