विलासराव देशमूख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले.

मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.

विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले.

विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले.

१९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्‍यापैकी प्रभावित केल्याचे आठवते.

काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्‍याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे,

दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते.

विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

आताच आय बी एन - लोकमत वर बातमी ऐकतोय.
वागळे सांगतायत , विलासरावांना यकृताचा त्रास होतोय अन त्यामुळे खायलाही त्रास होतो म्हणे.
वागळे बहुधा लापशी / खिमट घेउन लवकरच चेन्नै ला पोहोचतील.

अरे बाप रे... ! असं झालं होय? smiley

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो.

मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं बद्दल आत्मियता आहे.त्या मुळे माझा पास.... smileyigsmile:

@मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं बद्दल आत्मियता आहे.>>>

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

दिल्लीत साजूक तुपाचा रतीब चालू ठेवला की आपण आपली गुरे कशीही हकावीत - कुणाच्याही कुरणात चारावीत हे ओळखलेला व निर्ढावलेला राजकारणी मृत्यु शय्येवर आहे म्हणून सभ्य संकेतानुसार एवढेच !

विलास रावाना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !

- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.

सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर ह्या प्रतिसादाशी एकदम सहमत.

-(संयत) सोकाजी

शेतकरयांचे तळतळाट !
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अनेक गोर गरीब शेतकरयांच्या जमीनी हड़प करून त्याना दिलीप सानंदा अन त्यांच्या कुटुंबियांनी अनेकांना देशोधडीला लावले..त्यातील एका शेतकरयाने आत्मह्त्या केली; त्याच्या कुटुंबियांनी पुढे पोलिस तक्रार केली...सर्व सोंगे झाली..सानंदा हे विलासरावांचे निकटवर्तीय..अन हद्द झाली - त्यावेळी मुख्यमंत्री असणारया विलासरावांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारयाना पत्र लिहून आदेश दिला की, तुम्ही सानंदावर कारवाई करू नका ... कारवाईचा फार्स लांबला...पुढे एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याने हे प्रकरण उकरुन काढले..सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला गेला.. त्यात विलासराव दोषी आढळले..कोर्टाने त्यांच्यावर कठोर ताशेरे ओढले..टिका झाली...किरकोळ बोम्ब झाली..पण विलासराव जैसे थे - केसाचा कोम्बडा,खुनशी हास्य अन सोबतीला खुर्चीची ऊब !...उलट हा १० लाख रुपयाचा दंड महाराष्ट्र शासनाने जनतेच्या पैशाच्या तिजोरीतुन भरला....शेतकरी फासावर - विलासराव खुर्चितच - जनतेचा पैसा दंडासाठी ! हा हरामखोरी अन निर्लज्जतेचा कळस होता !!!!
पण त्या शेतकरयांचे तळतळाट विलासरावांना लागले नसतील काय ?
त्याचेच तर हे फळ नसेल काय ?

विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले !

विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे.

फक्त विलासरावांच्याच बाबतीत हे असं ऐकुन बाकी राजकारण्यांनासुद्धा असंच कैतरी होउन हा प्रश्न एकदाचा मिटावा असं वाटतंय.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

अगदी मिपा स्टाइल कोण विलास-राव अस लिहिण्यासाठी आलो होतो पण नंतर आठवाल की त्याना मी नवीन पास-पोर्ट वरळी येथे टोकेन यंत्रणा बसवली तेंव्हा प्रत्यक्षयात भेटलो होतो आणि मीच पाहील टोकण त्याना प्रिंट करून दिल होत , टोकण प्रिंट होण्यासाठी जरा वेळ लागला तेंव्हा पटकन मिळण्यासाठी अजुन पैसे लागतील का असा टोला मारला होता.
(ह्या निमित्ताने अस्मदिक आज-तक वर झलक्‍याण्याची जाहिरात करून घेतो)

बाकी राजकारण्याविषयी मला फारशी आत्मियता नाही , एक गेला की त्याची जागा दुसरा घेतो आणि शोषण चालूच राहत....

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.

माझी पिसाळलेला हत्ती,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल.

खरंच?

- पांथस्थ
| पाकृ : कुकींग विथ हार्ट | अनुदिनी: रानातील प्रकाश... | छायाचित्रे: फ्लिकर |

आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही.

खरंय, ह्या वेदनेतून त्यांची लवकरात लवकर कायमची सुटका कर देवा! smiley

(कावळा) दादा

__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.

माझी पिसाळलेला हत्ती,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

>>विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.

लोक जगातून गेलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा वाईट साईट बोलतात. तर जिवंत असलेल्याची काय कथा.

लोक जगातून गेलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा वाईट साईट बोलतात. तर जिवंत असलेल्याची काय कथा.

smiley

हीच मंडळी भारतीय संस्कृतीवरदेखिल गफ्फा हाणताना दिसतात. तेव्हा गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हीच भारतीय संस्कृती असावी. काय? smiley

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अहो विलासराव अजून गेले नाहीत...गेल्यानंतर कदाचित चांगले म्हणतील त्याना...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I MAY NOT AGREE WHAT YOU SAY ,BUT I SHALL DEFEND TO MY DEATH YOUR RIGHT TO SAY IT.
- वॉल्टेअर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ज्यांनी अनेकांचे संसार उध्वस्त केले अशा लोकांच्या मग आरत्या गायच्या काय?

अर्धवटराव

-रेडि टु थिंक

केलेली पापं याच जन्मात फेडावी लागतात म्हणे....

अवांतर - राजकारणी हजारो कोटींची मालमत्ता कशी जमवतात याचा विचार करत आहे.

---------------
धनंजय बोरगांवकर

जमवलेल्या हजारो कोटींचं काय करतात हा अजुन एक प्रश्न....निवडणुका जिंकायला प्रत्येकवेळी एवढे लागत नसावेत हा एक अंदाज.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

जमवलेल्या हजारो कोटींचं काय करतात याचे उत्तर कदाचित ते जमवल्यावरच(त्या स्तरावर गेल्यावर) मिळत असेल. साधे उदा. लहान असताना १०० रुपये कसे खर्च होऊ शकतात असे वाटायचे, कॉलेजात असताना महिना १५,००० पेक्षा जास्त पगार घेऊन काय करायचं असे वाटायचे आणि आता कळतेय च्यायला ३०-४० लाख रुपयेदेखील कसे अपुरे पडू शकतात ते.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

मित्रा... असले कसले महगडे शौक म्हणायचे तुझे कि ३० - ४० लाख अपुने पडावेत smiley

अर्धवटराव

-रेडि टु थिंक

हॅ हॅ हॅ... घर घर लागली की होते हो तसे smiley

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

घर घर = २ घर
याला म्हणतात हौस मौज smiley

अर्धवटराव

-रेडि टु थिंक

डुप्रकाटाआ

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

कसे पडतात अपुरे?

__________________________
एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!

अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे. नियतीच काय तो न्यायनिवाडा करेल अशी आशा आहे.

अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे.

नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.

माझी पिसाळलेला हत्ती,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते.

मी प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल लिहिलेले नसून फक्त विलासरावांच्या आयुष्याबद्दल लिहिलेले आहे. पाप-पुण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीत पूर्वापार चालत आली आहे त्याला अनुषंगुन ते वाक्य आहे. असो.

||नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.||
यावर सहमत..

सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक राज्यकर्त्यांनी धाग्यावरचे प्रतिसाद वाचावेत अशी इच्छा.. कितीही धनलाभ झाला तरी जनमानसात वाईट राजकारणी म्हणून आपली कशी प्रतिमा होऊ शकते.. इतकी खालावलेली प्रतिमा की इतर कोणालाही अशा नाजुक आरोग्यस्थितीच्या वेळी लोक शुभआरोग्य चिंततील पण आपल्याला तेवढेही लाभणार नाही याची भयंकर जाणीव होऊन आधीच कारभारपद्धतीत काही सुधारणा झाली तर?

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

प्रचंड अनुमोदन
बाकी आता विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो .. उपयोगी पडेल smiley

***************************************

- मन्या फेणे

कल्पनाविलास चांगला आहे.

' कामातुराणां न भयं न लज्जा ...'मध्ये 'काम' म्हणजे फक्त कामेचकामेअसं नाही तर इच्छा/वासना असा देखील अर्थ आहे म्हणतात. त्यामुळे हे (सुभाषित किंवा जे असेल ते) इकडे देखील लागू होतेच... smiley

________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!

बाकी आता च विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो

१९७९ साली जयप्रकाश नारायण जसलोक हॉस्पिटलमध्ये डायालिसिसवर होते. त्यावेळी ते 'गेल्याच्या' अफवा सारख्या पसरत असल्याने काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते. एकदा अफवा खरी मानून एका इंग्रजी दैनिकाने लेख छापलाही! नंतर माफी मागितली.(काही दिवसांनी जे.पी. खरेच गेल्याने मग लेख थोडासा बदल करून छापला).

tan(α)

डीएनए वर्तमानपत्राने काल अशीच बातमी विलासरावांची छापली.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I MAY NOT AGREE WHAT YOU SAY ,BUT I SHALL DEFEND TO MY DEATH YOUR RIGHT TO SAY IT.
- वॉल्टेअर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते
प्रत्येक वर्तमानपत्र "संभाव्य" व्यक्तींबाबत असे लेख तयारच ठेवते. मिपावरील ह्या क्षेत्रातील जाणकार योग्य काय ते सांगतीलच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले!

लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गाने जातो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले!

लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गानेच जातो.

दादा... अहो उलट मला वाटतं की मिपावरचे प्रतिसाद हेच जनमानसातल्या प्रतिमेच्या जास्त जवळ जातात. इथे विशिष्ट नेत्याच्या बालेकिल्ला मतदारसंघात असलेला कोणताही लाभार्थी / पीडित नागरिकगट एकत्र आलेला नाही.. अत्यंत वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवरुन दिलेले अत्यंत व्यक्तिगत मताला दर्शवणारे प्रतिसाद आहेत हे.

उलट निवडणुकीच्या मार्गाने आलेल्या निकालात जनमानसातील नैतिक प्रतिमा ठरत नसून मुत्सद्दीपणाची / ताकदीची परीक्षा होते.

बारामती, सांगली, लातूर, अमेठी अशा कोणत्याकोणत्या एरियातल्या लिमिटेड लोकांना प्रचंड उपकृत करुन आणि त्यांच्यावर उपकारसदृश छाप ठेवून तिथे निवडणुकीत उभे राहून हुकमी विजय मिळवणं याला "देशविदेशातल्या भारतीयांच्या जनमानसातली प्रतिमा" म्हणणं पटत नाही. मी ज्या ज्या गावात राहिलो आहे तिथे हे पाहिलं आहे की तिथे हमखास निवडून येणार्‍या नेत्यांचा भ्रष्टपणा तिथले लोक जोखूनच होते. फक्त ते लाभार्थी ठरत असल्याने, कसा का असेना, माझ्या एरियातला आहे म्हणून माझ्या एरियाकडे खास लक्ष देईलच असं म्हणून त्याला मत देणारेच बरेच असतात..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

फेसबुकी विचारवंतांची भूमिका smiley

टीम अण्णादेखिल हेच म्हणत होती smiley

चालू द्या...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आमीच लै भारी असं म्हणायचं नाहीये..तुमच्या मतावर फक्त माझं मत दिलं इतकंच. माझ्या मतात दुराग्रह दिसत असला (इथे किंवा आणखी इतर धाग्यांवरही कुठे) तर आमी भारी किंवा आमची लाल असं म्हणता येईल.

पण आता तुम्ही एकदम मत बनवलेलं दिसतंय. तेव्हा ते जाऊ दे.

बाकी या धाग्यावर अनेकांनी सिरियसली आजारी असलेल्या नेत्याला शुभेच्छा न देता (शुभेच्छा न देणंही एकवेळ ठीकच) स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे त्याला अधिक त्रास व्हावा किंवा जे होतं आहे ते योग्यच आहे असं म्हणणं कुठेतरी वाईट वाटलं.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं !

बाकी देशमुख किंवा त्यासारखा इतर कोणी नेता आजारातुन बरा झाल्यावर काय दिवे लावणार आहे ? कोणाचं भलं करणार आहे - स्वतः अन स्वत:च्या पिलावळीशिवाय?

ह्या असल्या विचारांमुळेच मुंबई प्रकरण पुन्हा झालंय अन होतंच राहील एवढं नक्की.

चालु द्या.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा झाली आहे असा सिद्ध गुन्हेगार, उदा. कसाब याला लवकर फाशी द्यावी अश्याच मताचा मी आहे पण त्याच्याही बाबतीत ही प्रवृत्ती संपवायची असा न्याय करण्यासाठी त्याचा मृत्यू योग्य वेळेत घडवून आणावा असा भाव पाहिजे. त्याला मारण्याच्या विविध पद्धती किंवा तो मृत्यू घडत असताना त्याचा तमाशा पाहणं हे कितीही समाधानकारक वाटत असलं तरी चांगलं नव्हे असं मलातरी वाटतं. अशाने आपणही कसाबच्या दुसर्‍या टोकाला पोचतो.

इथे एक नेता मरणोन्मुख आहे अशा वेळी मी कसाबची तुलना या केसशी करत नाहीये, पण अगदी तसं असलं तरी आपण न्यायबुद्धीने वागावं सूडबुद्धीने नाही हे मला पटलं आहे. मी इथेच पूर्वी एका लेखात सूडबुद्धीला कायदेशीर मान्यता का नसावी? असा प्रश्न विचारला होता. गुन्ह्याचे जे बळी आहेत त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच शिक्षा ठरवण्याचा हक्क असावा असं माझं मत होतं. पण नंतर विचारा अंती ते बदललं. सुडातून काही संपत नाही. कोणाला सोडून द्यावं किंवा माफ करावं असं अजिबात नव्हे पण हत्याही केवळ न्यायनिवाडा म्हणूनच केली पाहिजे.

"विलासराव मरेनात का. जितके हाल होतील तितके चांगलेच.." वगैरे प्रकारच्या वक्तव्यांनी अस्वस्थ वाटलं आणि सर्वांनाच वाटावं अशी इच्छा आहे. याला फेसबुकी म्हणायचं की विचारवंत / जंत वगैरे हा व्यक्तिगत पर्स्पेक्टिव्ह झाला.

पण तुम्ही म्हणता आहात की :

सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं !

त्यामुळे असोच.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत...
पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्‍हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार

घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलं

असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत...

समोर कोण आहे ते पाहून न्यायाची पद्धत /न्यायबुद्धी बदलायची हा विचार व्याख्येतच बाधित होणारा आहे. "सब्जेक्टिव्ह न्याय" असूच शकत नाही.

पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्‍हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार

घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलं

घोरीला पकडून पहिल्यावेळीच मारायला हवं होतं. सोडलं ही चूक, सोडलं हाच अन्याय झाला. न्याय नव्हे. "सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे.

अशा वेळी घोरी आजारी पडला आहे तर त्याला सडत तसाच मरु द्यावा की त्याला तहानभुकेने मारावा अशा प्रकारे दिशा असली तर त्याला सूड म्हणता येईल. न्याय नव्हे. त्या वेळच्या लोक आणि राजमान्य पद्धतीने फाशी किंवा अन्य प्रकारे एक्झेक्युशन करायला हवं. हे त्या वृत्तीच्या प्रीव्हेन्शनसाठी आहे.

असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !

अगदी मान्य..
इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव. इतिहास रानटी आहे तर आपणही रानटी होऊ. रानटीच रानटीला संपवू शकतो.. हो ना?
शक्ती वापरुन फक्त रानटीपणा संपवून आपली दिशा माणूसपणाकडे ठेवू असं नव्हे. ज्याला संपवायचं असं नियमांनुसार ठरलं आहे त्याला संपवण्याच्याही पद्धती व्यक्तिगत नसाव्यात..

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव.

एवढं होउनही फक्त वरचंच वाक्य अधोरेखीत होतंय दुसरं काही नाही.

"सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे.
कोण न्याय देणार हो?

डोकं फोडुन घेण्याची स्मायली द्या हो सरपंच !

धन्यवाद.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे?
इथे हळहळणार्‍या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?

--मनोबा
"The last Christian died on the cross".

मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे?
इथे हळहळणार्‍या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?

काय म्हणतील कल्पना नाही रे. पण अशा वेळी त्यांनी किंवा कोणीही काय "म्हणू नये" याविषयीची इच्छा आणि अपेक्षा मात्र आहे.

-----------------स्वाक्षरी सुरु--------------

छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..

मी क्लीन ट्रॅप झालेलो आहे.
मुद्दा समजला. मान्य.

--मनोबा
"The last Christian died on the cross".

@ सुनिल

आमीच लै भारी!!!

आपले मत जर एखाद्याला पटले नाही आणि तसे त्याने नमुद केले तर काय बिघडले. यात आम्हीच लै भारी हे तरी कुठे जाणवले नाही..
मात्र आमच्या मुद्याच्या उलट तुम्ही लिहिता आणि ते ही वाईट शब्द न वापरता तर तुम्ही फेसबुकी विचारवंत असे म्हणणे पटले नाही...

-
शब्दमेघ .. एक मुक्त.. स्वैर.. स्वछंदी जीवन
"पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल , पण लयलुट करायची ती सुगंधाचीच "

१००% सहमत.

अनादि मी, अनंत मी, अवध्य मी.

जास्त दारू पिऊन यकृत बिघडते म्हणतात. पण जास्त पैसा खाल्लयाने पण यकृत बिघडते हे माहीत नव्हते!

त्यांच्या यकृताने सुद्धा घोटाळा केला !!!

|| मी फक्त निमित्तमात्र आहे ||

@यकृताने सुद्धा घोटाळा केला !!!

०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे. http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

कोणी तिरस्करणीय असू दे वा प्रातस्मरणीय असू दे. त्याच्या अंतकाळी वाईट लिहिणे, हे आपल्याच संस्कृतीचे प्रदर्शन करते.

स्वाक्षरी: लता आणि आशा यांचा आवाज, हा माझ्या जगण्याचा श्वास आहे.

अगदी अगदी ! हेच आम्हाला सगळ्या राजकारण्यांविषयी अन त्यांचे पाहुणे जे की श्री. श्री. कसाब साहेब, श्री. अफजल गुरु साहेब, ब्रिगेडी साहेब इ. बद्दल वाटतं हेच फक्त नमुद करु इच्छीते.

पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा हीच इश्वरचरणी प्रार्थना.

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा

---------------------------------------------------------------------------------------
You only live once, but if you do it right, once is enough.

>>>>कोणी तिरस्करणीय असू दे वा प्रातस्मरणीय असू दे. त्याच्या अंतकाळी वाईट लिहिणे, हे आपल्याच संस्कृतीचे प्रदर्शन करते.

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
*******खेड्यावरच येड .. *******

'कुठे जाशी भोगा..आलो तुझ्या मागा' अशी कायशी म्हण आहे ती आठवली !! त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण महाराष्ट्राला फलदायी होवो.

...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे! smiley

त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण महाराष्ट्राला फलदायी होवो
म्हणुनच दुष्काळ ?

।। हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।। सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।।

विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना (मला असे वाटत नसतानाही) करणे हे मला चुकीचे वाटते. कोणताही माणूस (मग तो विलासराव देशमुखांसारखा भ्रष्टाचारी का असेना?) लवकर मरो असेही म्हणावेसे वाटत नाही.
शेवटी देवाशी एकाच प्रार्थना.... त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागो.

You don't win silver, you only lose gold.

समजा तुम्ही केलीत प्रार्थना, अन झालेत ते बरे. तर कोर्टासमोर काय ते इथेच अन अत्ताच 'फेडायला' उभे रहावे लागेल ना? त्यात काय चूक?
शेवटी त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागायचे असेल तर हा जन्म जरा प्रोलाँग व्हावा अशी इच्छा करणेच बरोबर नाही काय?

(तटस्थ, म्हणून आनंदी) गोपाळ

__________________________
एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!

विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना .
विलास रावां बद्द्ल लो़कात इतका राग असेल अस वाटल नव्हत.

विलास रावां बद्द्ल लो़कात इतका राग असेल अस वाटल नव्हत.
smileysmiley

'भवतु सब्ब मंगलम'

या विलासराव तुमचीच धाग्यावर वाट पाहत होतो

smileysmileysmiley

ज्याना कुणाला वाईट वाटले त्यानी आप आपल्या आयुष्यातील एक- दोन महिने विलासरावाना मिळावे अशी देवा जवळ प्रार्थना करावी असे मला वाटते.

वेताळ

१/२ महिने जास्त होतील राव.ह्यांना* पण घरदार आहे.

*ज्याना कुणाला वाईट वाटले

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

बाकी त्यांचा रितेश किडनी लिव्हर द्यायला तयार आहे. ज्यांना कंत्राटे, प्रमोशने, बदल्या, जागा, नोकर्‍या, टोल नाके, पदे, पारितोषिके, सत्कार, परदेश प्रवास, ई. ई. त्यांच्याकडून मिळाले आहे, ते महिने देतात का बघा.

..........................................................................
♥ मेरी प्यारी पत्नी smiley........सासको खिलाये चटनी smiley

प्रकृतीला थोडा उतार पडलाय म्हणे..

__________________________
एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!

हाथी चले बाजार...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

विलासरावांचे वय ६७ वर्षे आहे. थोडक्या आजोबा टाईप! त्यात आयुष्यभरात केलेल्या कुकर्मांची फळे सुद्धा या जन्मीच भोगावी लागतील. तेव्हा जनतेने त्यांची बाजु घेण्यात किंवा त्यांच्या कुकर्मांचा पाढा वाचण्यात काही फायदा नाहिए!

स्वैर परी
http://reportinglifelive.blogspot.com/

छान !

सात जन्माचा उपाशी --

छान. पण आनंद फार काळ टिकणार नाही असं वाटतंय.
सध्या तरी विलासची प्रकॄती स्थिर आहे अशीच बातमी आहे.
जितका त्रास होईल तेवढं बरंच आहे.

I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous

+१.

मरेनात तेच्यायला . तेवढाच काव्यात्मक (आणि बव्हंशी फोल) न्याय.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

विलास ....भोग विलास ....सुधार .....कल्पनाविलास..... भोगमुख ....वि-देश वि-मुख .....शेवट..... वरासलावि-विमुख!
मरेना का तिकडे ?

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले !

शंभरी भरण्या आधी काही दिवस (अगदी दोन दिवस सुध्दा चालतील) गजा आड काढावेत ही सदिच्छा

विलासरावाच्या मरणावर टपलेली एव्हडी लोकं बघून आनंद वाटला. आता एक शिवी देउनच घेतो,

विलासरावाच्या बैलाला........ हो! smiley

__________________________________________________________________________________
"And it never ceases to amaze me how many individuals feel their own ability to grasp a topic is a clear indication that anyone else can grasp it"
-Unknown author!

नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्य्कर्त्यांना विलासरावांसाठी एका यकृताची तातडीनं सोय करायला सांगितलं आहे अशी बातमी वाचली. नुकत्याच निवर्तलेल्या मनुष्याच्या शरिरातून चांगलं यकृत असेल तर काढून घेउन वापरता येतं म्हणे.

पुष्करिणी

नरेंद्र मोदी झिंदाबाद !!! (नाय...... त्यांनी काहीही केलं की त्यांचं कौतुक करायचं असतं म्हणून झिंदाबाद)

हो ना! काँग्रेसवाल्यांचं कोण्णी म्हणुन कौतुक करत नै बै ! काय तरी लोकं असतात नै ?

***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/

थत्ते चाचा ,
जाउन आलात का चेन्नै ला?
कधी आहे म्हणे ऑपरेशन ?
वागळे होते ना तिथेच , खिमट भरवायला ?

तुमच्याकडे पाहिले ना, की का कोणास ठावूक पण मला कायम बॅ. गाडगिळांची आठवण येते. smiley

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

कोणते गाडगीळ ?

न. वि. गाडगीळ की विठ्ठलराव की अनंतराव की आणखी कोणी गाडगीळ?

पराला न. वि. गाडगीळ किंवा विठ्ठलराव गाडगीळ आठवायची शक्यता कमीच आहे

थत्तेसाहेब, पराला एवढा अंडरएस्टिमेट करू नका. तुम्हाला माहित नाहीये तो काय प्रकार आहे ते. smiley

बिपिन कार्यकर्ते

प्रश्नच नाही, कौतुकास्पद वर्तन करणार्‍याचं कौतुक करावंच.

पुष्करिणी

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन

:: वि़कास ::

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन
श्रद्धांजली smiley

'आदर्श' नेता हरपला.

tan(α)

नंतर नाही म्हणणार्‍या त्या मृत ड्रायव्हरच्या(ज्याची किडनी,यक्कृत लावणार होते) नातेवाईकांचा तीव्र निशेध.

झाले मनासारखे ???

आपली ती संस्कृती नाही म्हणुन श्रद्धांजली.

मोदींचा सौम्य धिक्कार. एक यकृत नाय देवु शकले.
बरं असो. ते पल्याडचे होते त्यांना दोष देवुन काय उपयोग.पण अल्याडच्यांनी काय @#$% घेतले.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

Pages