मिपा ट्रेंड्स
नमस्कार मंडळी,
डिस्क्लेमरः यात कुणाचीही थट्टा किंवा टर उडवण्याचा मानस नाही. केवळ गम्मत किंवा विनोदी अर्थाने हा लेख समजुन घ्यावा अशी अपेक्षा. (आजकाल डिस्क्लेमर टाकल्याशिवाय मिपावर काहीही लिहायंच म्हणजे पंचाईत होऊन बसते ;) )
माझा वेळ जात नाही म्हणून मी आजकाल काहीबाही लिहित असतो असा कुणाचा समज झालेला असेल तर तो समज निव्वळ खरा आहे. ;) हा धागा काथ्याकुटात लिहावा की साहित्यात असा पेच उभा होता, जनातल्या आणि मनातल्या विचारांचा आणि नव्या ट्रेंड्स चा आढावा घेण्याचा हा प्रयत्न म्हणून जनातलं मनातलं मधे लिहिला.
मिपा किंवा एकुण मराठी आंतरजालावर म्हणा, (तसे माझे ईतर विहिरी, डबके, महासागर, तलाव यांवर फारसं किंवा जाणंच मुळात नाही) काही ट्रेंड्स बघावयास मिळतात. हे ट्रेंड्स थोडक्यात खालीलप्रमाणे. ;)
कंपूबाजी
वैदीक काळापासून "कलयुग आला आहे" याप्रमाणे "कंपूबाजी केली जाते" असे गळे काढण्याचा ट्रेंड आहे. हे बर्यापैकी खरंही आहे. अहो माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा कसा राहणार? मोठमोठाल्या कंपनीत सुद्धा गटबाजीनेच प्रमोशन होतात. म्हणून कम्पूबाजीला तुम्ही टाळू शकत नाही हे खरे आहे. त्यामुळे नवख्या लोकांची गोची होते हे कबूल. काही पळून जातात तर काही टिकतात, टिकणारे आंतरजालाबरोबर आयुष्यातही बरंच काही शिकतात. काही कंपू हे नवख्या लोकांवर हल्ला करतात कारण ते बर्यापैकी सेफ असतं. काही कंपू सभासद हे त्यांच्या कंपू सभासदांचेच लेख वाचतात किंवा त्यावर प्रतिक्रिया देतात. कोणत्याही कंपूत नसलात (हे अवघड आहे) तर मात्र कधी कधी चांगले लेख मागे राहुन जातात. नवख्या लोकांचा आणि नवकवींचा एक अघोषित कंपू असतो, त्यांचे लेख/कविता वाचणारे/प्रतिसाद देणारे तेच असतात आणि काही अंशी प्रामाणिक प्रतिसादक.
नवखे/न्युबीज्
हे सभासद फारच गोंधळलेले किंवा संभ्रमात असतात. ईतिहास माहिती नसल्याने काय प्रतिसाद द्यावा/लिहावे हे यांना समजतच नाही. कानात वारं घुसलेल्या वासरासारखं हे एकावर एक धागे काढत बसतात. सुरुवातीला काही मिपाकर प्रोत्साहन देतात पण त्याचा अर्थ चुकीचा काढून हे प्रत्येक बॉल सिक्सर मारायसाठीच आहे असे समजून बर्याचदा शुन्यावर ऑट होतात आणि मग टीममधून बाहेर फेकले जातात, चिडतात, कंपूबाजीच्या नावने किंवा संपादकांची कंप्लेंट करत फिरतात तर काही नविन कपडे घालून पुन्हा येतात. नवख्या लोकांसाठी आधी अभ्यास करुन डिफेंसीव कसे खळता येईल आनि चातकासारखी प्रतिसादांची वाट न पहाणे याचा विचार करणे फायदेशीर ठरु शकते. खरडवही, व्यनी यातून ओळखी वाढवाव्यात.
जुनी खोडे
यांना मराठी आंतरजालाचा पुर्वेपारपासून चालत आलेला ईतिहास माहित असतो, खरं तर ईतिहास घडवणारे हेच. पण कधी कधी आंतरजाल आपल्याच मालकीचे आहे असा गैरसमज करुन बसतात किंवा वेळेप्रमाणे/ नव्या प्रशासनाप्रमाणे बदलायला यांना उशीर होतो. मग कधी धाग्यांना पंख लागतात तर कधी प्रतिसादांना. भारताच्या पॉलिटीक्स प्रमाणे हे पण कधी कधी पार्टी बदलतात तर काही स्वतःची नविन पार्टी सुरु करतात, दुसर्या पार्टीच्या सदस्यांना त्यांच्यात सामील करुन घेण्यासाठी आमिषही कदाचित दाखवले जात असावे. सर्व साधारण सदस्य मग सगळ्याच पार्टीचे मेंबरं होतात.. जस्ट टु प्ले सेफ. यात बरेचसे असेही असतात की एकाच पार्टीशी एकनिष्ठ रहातात कारण ते तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना खर्या अर्थाने पॉलिटीक्समधे रस नसतो. काही सदस्यांचे मराठी आंतरजालाशी निगडीत राहण्याचे कारण हे कायमच खर्या अर्थाने तेच रहाते - मायमराठीशी नाते जोडुन रहाणे, वाचनातून आनंद मिळवणे.
विचारजंत
विचारजंत कधीही कुणालाही होऊ शकतात. वेळोवेळी गोळी घेणे गरजेचे असते आनी ती गोळी वेळ आली की बरोब्बर मिळते देखील. मानवी स्वभाव आहे तो. कधी खेळकर, खोडकर, कधी एकदम सिरिअस. त्यामुळे एखाद्यास विचारजंत झाले असतील आणि तो तत्वज्ञान प्रसवत असेल तर खुशाल ते करु द्यावं. एक फेज असतो तो.. सरतो. पण काही लोकांचा आजार गोळी घेऊन देखील जात नाही. मग ते प्रत्येक लेख/प्रतिसाद यांचा नीट अभ्यास करुन त्यावर लेखातल्या/प्रतिसादतल्या विचारांशी विरुद्ध मते मांडायचा प्रयत्न करु लागतो. म्हणजे तुम्ही म्हणालात की मिरची तिखट असते तर त्यावर हे लोक्स मिरची तिखट नसुन सापेक्षरित्या तुलना केल्याने ती तुम्हाला तिखट वाटते, अन्यथा ती गोड असते असे काहीसे म्हणतीत.
यांच्या मागे फॅन्स किंवा सहमतीची मेंढरं अपेक्षित असतात कारण त्यांना लेखांवर प्रतिसाद नोंदवायचे असतात (परतफेड होईल म्हनून) म्हणून विचार न करता बाडीस होतात.
वाचक/प्रतिसादक
हा वर्ग फार मोठा आहे. वाचनमात्र असलेल्या लोकांना एखादी मेस लावलेली असेल तर आज जे बनवलय तेच खाण्यावाचून जसा पर्याय नसतो तसा जे लिहिलय ते वाचण्याशिवाय गत्यंतर नसते. प्रतिसादक मात्र बर्याच प्रकारचे असतात. काही लोकं अतिशय प्रामाणिक असतात. ते कधीही तिरकस प्रतिसाद देत नाहीत, केवळ प्रोत्साहनपर "छान", "आवडले" असे प्रतिसाद देऊन मोकळे होतात तर काही केवळ टाईमपास करणारे अस्तात, काड्या टाकून पॉपकॉर्न घेऊन बसतात. बर्याचदा आयुष्यातील टेंशन किंवा फ्रस्टेशन काढण्यासाठीदेखील प्रतिसाद दिलेले असतात. म्हणजे कितीही प्रामाणिकपणे लेख किंवा एखादी प्रतिक्रिया असेल तर त्यावर आगपाखड कशी करता येईल असे हे प्रतिसाद असतात, काड्या टाकणार्यांसाठी हे फार मोठे गिर्हाईक असते.
असो... टंकाळा आल्याने उरलेले अध्याय जमल्यास पुढील भागात.. :)
आपला,
मराठमोळा
वाचने
11411
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
एकदम अचूक निरीक्षण. हहपुवा
लगे रहो ममोभाय!!
लेख वाचुन मी तर एकदम ऑट बाबा
हाहाहा. तरीही बरेच ट्रेंड्स
छान. आवडले.
संपादक महोदय, मराठमोळा
In reply to संपादक महोदय, मराठमोळा by जोयबोय
नविन दालनाची
उरलेल्या अध्यायांच्या प्रतिक्षेत.
सुप्रसिद्ध अध्याय फेम आणि
अध्याय पहिला परंपरांचा,लिहू
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
_/|\_ भारी
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
झाक जमलय...
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
म्हणवितात अत्रुप्त आत्मा पण
In reply to म्हणवितात अत्रुप्त आत्मा पण by बॅटमॅन
(No subject)
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
मानलं तुम्हाला गुरूजी
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
बहूत मस्त
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
बोला....तुंड-लिकाला वरून
In reply to अध्याय पहिला परंपरांचा,लिहू by अत्रुप्त आत्मा
जबहर्या............
ममो फटके बाजी आवडली
"वाचनमात्र असलेल्या लोकांना
टंकाळा करु नका, पुढचा अध्याय
In reply to टंकाळा करु नका, पुढचा अध्याय by मोहनराव
+१
In reply to टंकाळा करु नका, पुढचा अध्याय by मोहनराव
हेच म्हणतो मी टंकाळा हा शब्द
छे सगळा धागा वाचला, विनोदी
छान लेख. (मिपाचा मेसकरी
सगळ्या .....
हात फारच आखडता घेतला आहे असे
हाहा. छान चाललंय. माझ्याच या
In reply to हाहा. छान चाललंय. माझ्याच या by अन्या दातार
झैरात झैरात
In reply to झैरात झैरात by प्रास
=))
कुठली वर्गवारी...
बर !
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
@बुवा, तुमच्या मिपावार्ता का
सच्चा मिपाकर
आमच्या कंपूत प्रवेश घेताना घ्यायची शपथ...
In reply to आमच्या कंपूत प्रवेश घेताना घ्यायची शपथ... by श्रीरंग_जोशी
कंपुच्या आत कंपुबाजी केली
In reply to कंपुच्या आत कंपुबाजी केली by ५० फक्त
रच्याकने ?
In reply to रच्याकने ? by श्रीरंग_जोशी
रच्याकने
In reply to रच्याकने by सुनील
धन्यवाद!
In reply to कंपुच्या आत कंपुबाजी केली by ५० फक्त
बाय डेफिनिशन कंपूबाजी ही
In reply to बाय डेफिनिशन कंपूबाजी ही by बॅटमॅन
कंपूबाजीची शिकवणी??
In reply to कंपूबाजीची शिकवणी?? by श्रीरंग_जोशी
रच्याक, बाडीस वगैरे,..
In reply to कंपूबाजीची शिकवणी?? by श्रीरंग_जोशी
अहो पाण्यात पडला की पोहणे येऊ
In reply to अहो पाण्यात पडला की पोहणे येऊ by बॅटमॅन
तेच करतोय सध्या...
In reply to तेच करतोय सध्या... by श्रीरंग_जोशी
मिपा झरा वगैरे नाही वाटला कधी
In reply to मिपा झरा वगैरे नाही वाटला कधी by ५० फक्त
भापो... :-)
सहीच!!
हम्म.... आज मिपाच्या मेसमध्ये
In reply to हम्म.... आज मिपाच्या मेसमध्ये by रेवती
हो आता आज्या सैंपाक करीनात,
In reply to हो आता आज्या सैंपाक करीनात, by सूड
काल केलं होतं कुळथाचं पिठलं
हॅ हॅ हॅ...
मान्यवरांना जुनी खोडे म्हंटल्याबद्दल निषेध!!
In reply to मान्यवरांना जुनी खोडे म्हंटल्याबद्दल निषेध!! by श्रीरंग_जोशी
हाहाहा... ज्येष्ठ म्हणजे
In reply to हाहाहा... ज्येष्ठ म्हणजे by मराठमोळा
आंतरजालीय वय!!
In reply to आंतरजालीय वय!! by श्रीरंग_जोशी
>>मिपावरील सेवाज्येष्ठता व
हं अजुन बरीच मंडळी बाकी आहेत
भरपुर