सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
24 Oct 2007 - 9:42 am | विकास
किंवा खालील दुवा
http://youtube.com/watch?v=F3iUIlUMXWM
24 Oct 2007 - 11:11 am | नंदन
विकासराव, दुव्याबद्दल धन्यवाद. वाढ वेळ म्हणजे नक्की काय, हे कोणी सांगू शकेल का?
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
24 Oct 2007 - 11:14 am | प्रमोद देव
असे असावे.
24 Oct 2007 - 11:20 am | नंदन
उशीर हा अर्थ चपखल बसतो आहे, पण त्याचा असा वापर प्रथमच ऐकला. अर्थात, गदिमांची शब्दाची निवड ही नेहमीच्या वापरात घासून-घासून अर्थ हरवलेल्या शब्दांपेक्षा निराळीच असते, त्याचे हे अजून एक उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद, प्रमोदकाका.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
24 Oct 2007 - 11:04 pm | राजे (not verified)
येथे उशीरच चपखल बसतो.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
24 Oct 2007 - 8:07 pm | वाटाड्या...
मला mp3 हवी होती...कुणाकडे असल्यास देऊ शकाल काय? सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
मुकुल
24 Oct 2007 - 11:23 pm | विसोबा खेचर
सध्या गाणं शिकत आहे, गुरुजीनी आणायला सांगितलय....
आपण गाणं शिकताय ये वाचून आनंद वाटला. कुणाकडे शिकताय?
तात्या.
29 Oct 2007 - 2:31 am | वाटाड्या...
इथे detroit आमचे मंगरुळकर म्हणुन गुरुजी आहेत तात्या...
१. बिलावल,
२. भुप,
३. यमन..चालु आहे...
वरिल गाणं भुपात आहे..म्हणुन हव होत...mp3 आसेल तर फारच मदत होइल..
29 Oct 2007 - 2:42 am | वाटाड्या...
आत्यानन्द झाला....मिळाली...mp3...