✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नकार

स — स्पंदना, Tue, 04/17/2012 - 16:42
नकार तू, तू मला जन्म दे तुझ्या शिवाय कोण झेलेल हा प्रसव कल्लोळ? अन तुझ्याशिवाय कोण करेल हा अट्टाहास? म्हणूनच तू मला जन्म दे अग त्या मूळेच तर तू महान ठरतेस पण कृपा करून तू माझ्या पोटी नको येऊ. तू तू माझी भगिनी हो माझ्या दिवाळ्या, रक्षाबन्धन हीं सारी तुझ्या शिवाय कशी सजतील? नाही तू माझी भगिनी हो तुझ्याशिवाय पहाटेची ती सुगंधी तेल माझ्या अंगाला कशी लागतील? अन रक्षाबन्धनाचा रंगीत धागा कपाळावरच्या नामासह मी कसा मिरवेन? नाही तुला झालच पाहिजे माझी भगिनी पण कृपा करून तू माझ्या पोटी नको येऊ. तू तू माझी साथीदारीण हो अग , निसर्गाचा नियमच आहे हा माझ्या पालवी फुटलेल्या मनाला विहारायला तुझी तनुलताच तर हवी मला तुझ्या शरीराच्या गंधान वेडावतो मी माझा आत्मा समाजाची सारी बन्धन झुगारून तुझ्याशी एकरूप होऊ पाहतोय दे दे मला , तुझी साथ दे या अडखळणाऱ्या श्वासांना एक लय दे हो, स्वाधीन हो माझ्या अन शांतव माझ्या तनामनाची आग पण कृपा करून तू माझ्या पोटी नको येऊ तू तू देव्हारी रहा तुझ रणरागिणी रूप माझ संकट हरू दे तुझ लक्ष्मिच पाउल माझ घरदार उजळू दे तुझ्या वीणेच्या झन्कारे माझा ज्ञानदीप तेवू दे तुझ्या प्रसन्न रूपाने माझ मस्तक लवू दे पण तू देव्हारीच रहा कृपा करून माझ्या पोटी नको येऊ काय? काय म्हणतेस? आधुनिक समाजाचा वारस मी? हो मी आधुनिक समाजाचा वारसच तुला ठणकावून सांगतोय कृपा करून माझ्या पोटी नको येऊ नाहीतर पूर्वापार 'दुधपिलाई' सोडून मी हीं आधुनिक शस्त्रे वापरीन पण तुला नष्ट करेन. म्हणून, म्हणूनच सांगतोय कृपा करून माझ्या पोटी नको येऊ. __/\__ अपर्णा

प्रतिक्रिया द्या
3895 वाचन

💬 प्रतिसाद (19)

अप्रतिम

अन्नू
Tue, 04/17/2012 - 17:00 नवीन
कवितेचा मध्य गाभा आणि त्याच्या मेंदवाला झिणझिण्या आणणार्‍या संवेदना आवडल्या, विचार करायला लावणारी कविता आहे. :)
  • Log in or register to post comments

आवडली

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/17/2012 - 17:06 नवीन
आशयघन कविता छान जमली आहे. सध्याच्या कुत्र्याचे पाय मांजराला आणि मांजराचे कुत्र्याला जोडून मिपावरती आदळणार्‍या कवितांच्या अंधारात ही तारक मस्त सुखावून गेली.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Tue, 04/17/2012 - 17:10 नवीन
अगदी असेच म्हणतो.. सुंदर आशयघन कविता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+२

प्रचेतस
Tue, 04/17/2012 - 17:45 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+३

मूकवाचक
Wed, 04/18/2012 - 09:35 नवीन
सुंदर, आशयघन कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

प्यारे१
Tue, 04/17/2012 - 17:09 नवीन
:(
  • Log in or register to post comments

आवडली.

रेवती
Tue, 04/17/2012 - 17:24 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त कविता अपर्णातै

प्रीत-मोहर
Tue, 04/17/2012 - 17:29 नवीन
मस्त कविता अपर्णातै :)
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट!

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/17/2012 - 18:36 नवीन
उत्कृष्ट रचना!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

पैसा
Tue, 04/17/2012 - 20:27 नवीन
कविता आवडलीच. पण अजूनही हे चालू आहे हा विचार फार अस्वस्थ करतो....
  • Log in or register to post comments

खरं तर.. असो... सध्या फक्त हे

मराठमोळा
Tue, 04/17/2012 - 21:24 नवीन
खरं तर.. असो... सध्या फक्त हे घ्या _/\_०_ वीकांताला नक्कीच भेटु :)
  • Log in or register to post comments

सुन्न

चौकटराजा
Wed, 04/18/2012 - 07:10 नवीन
वाचून सुन्न्न झालो आई हवी, बहिण हवी, पत्नी हवी मग मुलगी का नको ? असा जगावेगळा हट्ट काय कामाचा ? ही एक सरकारी जाहिरात आहे. आमच्या गावात ती भिंतीवर रंगविली आहे. पण कवितेचा बाजच काही वेगळा , धारदार असतो. कविता जमली आहेच पण कशाला हो अस्वथ करता आम्हाला ?.दोन मुलींचा बाप असूनही मी त्यांच्या सहवासाचा आनंद मिळवितो आहे.
  • Log in or register to post comments

बापरे

अमृत
Wed, 04/18/2012 - 11:41 नवीन
अतिशय मार्मीक आणि सटीक. अमृत
  • Log in or register to post comments

सुंदर

sneharani
Wed, 04/18/2012 - 11:54 नवीन
सुंदर कविता...पण सुन्नता आणणारी!!
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Wed, 04/18/2012 - 12:09 नवीन
कविता आवडली. प्रभावी आहे.
  • Log in or register to post comments

एकदम आर्त !!!!!! मनाला

पियुशा
Wed, 04/18/2012 - 16:44 नवीन
एकदम आर्त !!!!!! मनाला हेलावुन टाकणारी
  • Log in or register to post comments

एकदम आर्त !!!!!! मनाला

पियुशा
Wed, 04/18/2012 - 16:45 नवीन
एकदम आर्त !!!!!! मनाला हेलावुन टाकणारी
  • Log in or register to post comments

जबरी. भेदक.

गवि
Wed, 04/18/2012 - 16:56 नवीन
जबरी. भेदक.
  • Log in or register to post comments

नकार

ajay wankhede
Mon, 06/11/2012 - 22:10 नवीन
तू माझ्या पोटी नको येऊ.. अतिशय विदारक चित्रण.... आवडलि कविता.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा