जुन्या पुण्यातला-जुना बाजार
पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार...
ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे. माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे हा बाजार जुना म्हणजे अगदी ब्रिटिशकालिन आमदानी पासुनचा आहे. त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. इथे आजही सगळ्या जुन्याच वस्तू मिळतात का हो..?,तर नाही, गरीब जनतेची सोय पाहाणारे कपड्यांचे/भांड्यांचे/चादरी/ब्लँकेटांचे/गृहोपयोगी वस्तुंचे ही स्टॉल्स इथे आहेत..पण ते काळाची गरज म्हणुन...!,जुन्या बाजाराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे अगदी शिवकालापासुन ते त्या आधी नंतरच्याही कालातली जुनी नाणी, भांडी,अडकित्ते,देवाची पुजेची उपकरणी,तलवारिंच्या मुठी(आणी तुंम्ही खात्रीचं गिर्हाइक वाटलात,तर पाती सुद्धा
) दुर्बिणी,होकायंत्रे,लाँगप्ले रेकॉर्ड्स,त्याचे प्लेअर्स,कासवछाप-किसण्या,पानाचे डबे,गाड्या,जुने पितळी वस्तरे,चुनाळ्या ,पितळ्या/तांब्याची भांडी अश्या असंख्य आणी नाना प्रकारच्या वस्तू इथे कित्येक वर्ष अव्याहत पणे विकल्या जात आहेत..
माझी या बाजाराशी ओळख अगदी लहानपणापासुनची(इयत्ता ७वी) आहे...आंम्ही रविवारी घरातुन सकाळी हादडुन झालं की ज्यादिवशी ५रु अ-खंड मिळतील,(तेही आपल्याला पाहुण्यांनी दिल्यानंतर आईनी(च),''दे रे इकडे अत्ता..!'' असं करुन कधितरी काढुन घेतलेले) म्हणजे तसे-परत मिळतील तेंव्हा मी २:५०रुपये- ५तास दरानी भाड्याची छोटी सायकल घेऊन आम्च्या ग्यांगमधिल येतिल त्या मित्रांसह जुन्याबाजारात कुच करायचो..अता त्यावेळी आमचं प्रमुख आकर्षण इथे ते काय होतं..?,तर इथे मिळणारे ऊल्हास नगरमेड हेडफोन आणी मुख्य म्हणजे इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स,सोनी,बिलबेर्ड आदी कंपन्यांच्या अत्यंत महाग असलेल्या,जॅक्सन,फिल कॉलिन्स,पेट्शॉप बॉइज,बोनी एम या कलाकार/ग्रुपच्या,,,वापरलेल्या किंवा चोरुन आलेल्या क्यासेटी तिथे,तेंव्हा सुद्धा पंधरा ते पस्तीस रुपयांना मिळायच्या...(दुकानात जाऊन नव्यांच्या किमती ऐकणं सुद्ध तेंव्हा परवडायचं नाही,तर विकत घेऊन त्यातली गाणी कोण ऐकणार...?)
वस्तुतः या कॅसेटही दरवेळी आंम्ही घ्यायचोच असे नाही,पण तिथे फिरायला सुद्धा एक वेगळीच मजा वाटायची...इथे एक बरं आहे,तुंम्ही मालाची कितिही चौकशी केली,हाताळला तरी कोणिही वसकन..ठेवाss असं म्हणुन अंगावर येत नाही,अर्थात हाही काही अगदी पूर्ण सद्गुण नसुन ते एक प्रकारचं,गिर्हाइकाला वस्तूच्या प्रेमात-पडू द्यायचं कौशल्य आहे,हे तिथे मुरलेल्या गिर्हाइकाला कळुन येतच...! इथे खरेदी करताना काही गोष्टी गाडीबरोबर पार्क करुन आत शिरावं लागतं,नाहितर भल्या-भल्या गिर्हाइकांच्या हा बाजार अंगाशी आल्याशिवाय रहात नाही...!आपल्याला खरेदीतलं खूपच कळतं,हा भाव असला तर इथले व्यपारी ते दोन मिनिटात हेरुन आपला भावच करतात. बारगेनिंग हवं तितकं करा पण इरेस पडलात,तर तुम्हाला ती वस्तू अख्या बाजार समोर इज्जत घेऊन तो विक्रेता फुकट सुद्ध अंगावर मारायला कमी करत नाही. हां...अता गिर्हाईकी चलाखी हवी तेवढी करता येते..म्हणजे एखादी वस्तू अवडली तर आधी चेहेर्यावर 'फार अवडल्याचा' भाव आणणं,नंतर किमतीत उतरवुन...शेवटी ''येताना घेतो...'' असं म्हणुन,फार लांब न जात,त्या विक्रेत्याला दिसेल अश्या तसल्याच वस्तू विकणार्या दुसर्या स्टॉल समोर जाऊन उभं रहाणं,मग तो आपल्याला लांबुन हाक मारतो,मग ''आलोच'', असं खुणावत,,,जरावेळानी जाऊन,''बघा दादा आपण लास्ट मंजे लास्ट पाचशे देऊ''..असं एखाद वाक्य फेकणं, हे सगळं जमलं तर साधारण अपेक्षित भावात वस्तू हाती लागते. अर्थात यापेक्षाही रोखठोक डायरेक सेटलमेंट सारखे पर्याय वापरता येतात...पण सगळा गिर्हाइकी भावुकपणा दूर ठेऊन...!
त्यामुळेच मला, 'अगदी तय्यारातल्या तयार अट्टल गिर्हाइक' असं म्हणवणारा कुणी भेटला,तर मी त्याला हे च्यायलेंज अगदी बिन दिक्कत देऊ शकतो- हा बाजार उठवुन दाखवा...! आपण मानलं तुम्हाला...! 
१)अता त्यावेळचं कॅसेटयुग संपत आलं असलं,तरी इथे अजुनही केसेट्स,टेप,वॉकमन्स आदी तुरळक प्रमाणात दिसतातच...!


२)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...!



३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची...


४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू...



५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! 

६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज...
७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ...




८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...!
)
९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ...












१०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! 

११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! 

प्रतिक्रिया
मस्त !!!
जुन्या बाजाराची सचित्र ओळख आवडली. एखादया रविवारी जाऊया राव तिकडे.
मस्त
मी पण गेलोय, ते खूप वस्ताद आहेत. एक गॉगल आवडला होता मला, त्याची किंमत २०० रुपये अशी सांगितली गेली. मी म्ह्टल की ह्यात जनरल ने मुंबईला जाऊन येऊन कुठून तरी तो गॉगल ५० मध्ये पैदा करेन तरी मीच फायद्यात असेन असं म्हटल्यावर तो मला ७० ला मिळाला. अजून वापरतो आहे,७ महिने होऊन गेले या गोष्टीला. मुर्खासारखे काहीजण सारसबागेत दिवाळीपहाट असल्यासारखे लवकर उठून तिथे जातात तसे जाऊ नये, कारण नुकतीच दुकान लागलेली असतात आणि बोहोनी चांगली व्हावी ह्या हेतून ते पडेल भाव शक्यतो देत नाहीत. ४ वाजता जावे, आणि इस्ट इंडिया कंपनीची नाणी म्हणून जी काही खपवतात त्याबद्दल शंका आहे, इस्ट इंडिया कंपनी हनुमान , दत्ताची नाणी कश्याला छापेल ?
---------------------------------------------------------------------------------------
You only live once, but if you do it right, once is enough.
.(मेली भलतीच गोंडस होती,पण
.(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...!



भारी बाजार आहे. मला जुन्या पुराण्या वस्तू आवडतात.
पुण्यात आल्यावर नक्की फिरुन येऊ या बाजारात.
आता पुढच्या वेळी गेलात तर माझं एक काम कराल का? रुंदीला दीड इंची आणि लांबीला साडेतीन फूट असलेलं फक्त म्यान (बाकदार) मिळतंय का बघा प्लीज.
च्यायला म्यानं कोण तयार करतात ते कितीतरी दिवस झाले शोधतोय, सापडत नाहीय.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
@रुंदीला दीड इंची आणि लांबीला
@रुंदीला दीड इंची आणि लांबीला साडेतीन फूट असलेलं फक्त म्यान (बाकदार) मिळतंय का बघा प्लीज.>>> लै वेळा मिळवणार...यक्कूशेठ...! मिळाली या महिन्यात तर मे मधे येताना घेऊनच येइन...
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
व्वा, भारीच आहे मग बाजार.
व्वा, भारीच आहे मग बाजार.
थँक्स थँक्स थँक्स !!!
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
>>>रुंदीला दीड इंची आणि
>>>रुंदीला दीड इंची आणि लांबीला साडेतीन फूट असलेलं
मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की माझ्याकडं तलवार आहे घाबरुन असा असं काही आहे???
__________________________________________________________________
येर्हवी सर्वांच्या हृदयदेशी| मी अमुका आहे ऐसी | जी वृत्ती स्फुरे अहर्निशी| ती वस्तु गा मी||
>>>मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की
>>>मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की माझ्याकडं तलवार आहे घाबरुन असा असं काही आहे???
--- मूळ शस्त्र आमच्या बापजाद्यांचं होतं ते आमच्याकडं आलं आहे
पण त्यावर म्यान नाहीय.
आणि ते फक्त साडेतीन फूटच असल्यानं इथून बसल्या बसल्या लांबवर बसलेल्या कुणाचा जीव घेऊ शकत नाही
हैदराबाद संस्थान खालसा झालं तेव्हा पांडे-पटवार्यांकडं असलेल्या शस्त्रांची जप्ती सुरु झाली तेव्हा पणजोबांनी बंदूक इमानदारीत सरकारकडं जमा केली. पण तेव्हाची परिस्थिती पहाता तलवार जवळ ठेवणं पणजोबांना आवश्यक वाटलं होतं म्हणे.
मग त्यांनी हे शस्त्र काही दिवस शेतातल्या विविक्षीत जागी नंगेच्या नंगे खुपसून ठेवायला लावले. त्यात म्यान कुठेतरी गहाळ झाले. तलवार कधीतरी परत घरी आली पुढे कधीतरी माझ्या हातात आली.
आता भानगड अशी आहे की ती जमा कुठे करायची आणि पोलीस खात्याची लचांडं मागं लाऊन कुणी घ्यायची?
मी औरंगाबादच्या संग्रहालयात विचारलं की तुम्ही पत्र द्या माझ्याकडे असा असा माणूस तलवार भेट म्हणून द्यायला सोबत घेऊन येणार आहे, पोलीसांनी मध्येच त्याला आत टाकण्याची कृपा करु नये. तर ते म्हणे नाही! तुम्ही आमच्या कागदाच्या हवाल्यावर ट्रकभरुन शस्त्रे दुसरीकडेच पाठवली तर?
पुन्हा ती तलवार पिढीजाद असल्यानं तिच्यात भावना गुंतणे वगैरे प्रकरण आहेच. तिच्यावर पणजोबांचं फारसीमध्ये नाव वगैरे कोरलेलं आहे आणि एवढी वर्षे झालीत तरी तिची धार कमी व्हायला तयार नाही, म्हणून मला तर ती फारच आवडते. गावाकडे गेलो कधीमधी तर चार हात मारुन बघतो
वातावरण गारठलं की थोडासा गंज येतो तिच्यावर म्हणून म्यान पाहिजेच. सध्या तलम कपड्यात ठेवलीय.
बाकी अशी शस्त्रं आमच्या गावातल्या जुन्या वाड्यावाड्याच्या ढासळणार्या भिंतीतून निघतातच.
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
'माझं' लक्ष गेलं म्हणून हा
'माझं' लक्ष गेलं म्हणून हा एवढा इतिहास समजला....
ह्या अ आ ला अशी सूक्ष्म निरीक्षण शक्ती नाही हो! त्याचं आपलं नुस्तं खाण्यापिण्यात लक्ष.
- मी आणि मीच २२/७ चा- आपलं १२ गावचं पाणी इ.इ.- प्यारे
__________________________________________________________________
येर्हवी सर्वांच्या हृदयदेशी| मी अमुका आहे ऐसी | जी वृत्ती स्फुरे अहर्निशी| ती वस्तु गा मी||
हे कोण बोलले...बोला...?
@दंगा करायला ख व, ख फ आणि व्यनि आहेत. तेवढं पथ्य पाळाच. :-O
@ह्या अ आ ला अशी सूक्ष्म निरीक्षण शक्ती नाही हो! >>> हमने अपनी सू.नि. शक्ति से ही आपको अभी पकडा है...
और... ये उप्पर के बारे मे आपका क्या खयाल है..?
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका
यक्कू,
ठराविक आकाराचे म्यान हवे असेल तर जोधपुर ला बनवून मिळेल....कोल्हापूर ला पण मिळू शकेल-चौकशी करा !
पिढीजात तलवार असेल तर स्वताकडेच ठेवा संग्रहालयात ठेवण्यापेक्षा...भावना गुंतलेल्या असतात खरे आहे,
आणि बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका,वीररसात जुनी तलवार फिरवल्यास ती म्यान करताना तलवारीला रक्त लावावे लागते.
आणि तलवार बाळगणारे लोक पोलिसांना घाबरत नाहीत
- मालोजीराव
>>>>>ठराविक आकाराचे म्यान हवे
>>>>>ठराविक आकाराचे म्यान हवे असेल तर जोधपुर ला बनवून मिळेल....कोल्हापूर ला पण मिळू शकेल-चौकशी करा !
--- ओक्के! कधी संधी आली तर निश्चित चौकशी करेन.
>>>>>पिढीजात तलवार असेल तर स्वताकडेच ठेवा संग्रहालयात ठेवण्यापेक्षा...भावना गुंतलेल्या असतात खरे आहे,
---- हो ना, च्यायला भावनेचा प्रश्न असूनही मी एवढ्या उत्साहानं विचारलं त्या संग्रहालय वाल्यांना तर ते भलतेच काहीतरी बोलू लागले, म्हटलं गेलात तेल लावत
>>>>>आणि बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका,वीररसात जुनी तलवार फिरवल्यास ती म्यान करताना तलवारीला रक्त लावावे लागते.
---- मी रक्तबिक्त लावत नाय ब्वॉ.. आमच्या गावात एक गुरखा होता. त्याला 'कुकरी दिखाव ना' म्हटलं की तो म्हणायचा 'नै, बाहर निकाला तो उसकू खून पिलाना पडता है'.. च्यायला भानगडच असते.. पण मी खून बिन काही लावत नाही. काढतोच कधीतरी सटी सहा महिन्याला बाहेर. खून न दिल्याने ती तलवार नाराज होत नसेल अशी अपेक्षा
>>>>> आणि तलवार बाळगणारे लोक पोलिसांना घाबरत नाहीत
---- हॅहॅहॅ
-------------------------------------------------------
अम्बर बरसै धरती भीजे, यहु जानैं सब कोई।
धरती बरसे अम्बर भीजे, बूझे बिरला कोई।
वेगळी दुनिया...
वेगळीच दुनिया आहे. आधी कधी पाहिली नव्हती.
पितळी खलबत्ते दिसत आहेत. चक्कर टाकायला हवी.
फोटो आवडले. त्यातल्या कितीतरी
फोटो आवडले.
त्यातल्या कितीतरी वस्तू म्युझियममध्ये असायला हव्यात इतक्या जुन्या वाटताहेत.
इथल्या खरेद्यांचे आणि विक्रेत्यांचेही
नमुनेदार किस्सेही असतील तुमच्या गाठीशी तर तेही येऊ द्यात.
-----------------------------------------------
मिपाने मला काय दिले?!!
-----------------------------------------------
धन्यवाद!! इतके सगळे फोटो
धन्यवाद!! इतके सगळे फोटो टाकल्या बद्दल.
कारण आत्तापर्यंत अतीशय गल्लीच्छ भाग म्हणुनच ओळखत होते मी याला....पण आत गेल्यावर इतक्या चांगल्या वस्तु मिळत असतील तर एकदा चक्कर टाकलीच पहीजे.
@@@~~~@@@~~~@@@~~~@@@~~~@@@
+१
खरय!मी पण कधी या बाजारात गेले नाही.सुंदर फोटो बघुन आता चक्कर टाकायलाच हवी....धन्यवाद!!
मस्त!
भटजीबुवा, एका वेगळ्याच आणि माहिती नसलेल्या बाजाराची ओळख आवडली.
आधी फुलांच्या बाजाराची आणि आता जुन्या बाजाराची ओळख करून देवून एका अर्थाने पुण्याचीच एक वेगळी ओळख करून देत आहात... आवडतंय.
अनेक जुन्या आणि सुंदर वस्तू तिथे दिसत आहेत पण त्यांची किंमत काय असेल हे जाणून घ्यावसं वाटत नाहीये
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
मस्त हो!
तुमच्या जुन्या जमान्यातल्या बर्याच वस्तू दिसताहेत. त्या पितळी वस्तूंमधे माझा जीव अडकलाय. काय किंमती असतात हो?
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥
@त्या पितळी वस्तूंमधे माझा
@त्या पितळी वस्तूंमधे माझा जीव अडकलाय. काय किंमती असतात हो?>>> २०० रुपाया पासुन ५हजार,,,१०हजारापर्यंत
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
अधिक काय बोलू, तुमच्याबरोबरच
अधिक काय बोलू, तुमच्याबरोबरच आज सगळं पाहिलय हे.
बुवा एकेक दुकानांचे फोटो काढत पितळी वस्तूंसमोर त्यातही अडकित्यांसमोर अंमळ जास्तच थबकत होते. मी मात्र जिथे नाणी असतील तिथे बराच वेळ थांबत होतो. बर्याच ठिकाणी प्राचीन नाणी दिसली. मुघलकालीन नाण्यांचे जास्तच दिसले. बर्याच ठिकआणी शोधाशोध केल्यावर काही ठिकाणी तांब्याची सातवाहनकालीन नाणी बघितली. हत्ती आणि अस्पष्टसे दिसणारे उज्जैन चिन्ह असे छाप असणारी. पण लगेच घेतली मात्र नाहीत. आता पुढच्या फेर्यांमध्ये अजून धुंडाळून मगच घेतली जातील.
--------------------------------------------------------------
ऊर्ध्वासः पिबति जलं यथा यथा विरलाङगुलिश्चिरं पथिकः |
प्रपापालिकापि तथा तथा धारां तनुकामपि तनुकरोति ||
कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या
कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत भरायचा (सध्या माहित नाही). रेकॉर्ड प्लेयर, जुने व्हॉल्ववाले रेडीओ याची बर्यापैकी व्हरायटी दिसायची. चाकू-गुप्त्या वगैरे 'खास' लोकांसाठी
पितळी वस्तू कधी दिसल्या नाहीत तिथे.
खरंच, या जागा माणसांचे निरीक्षण करण्यासाठी अगदी योग्य असतात. कोण कसे गोत्यात आणायचा प्रयत्न करतो, कोण दुकानदाराशी कसा भाव करतो हे बघण्या-ऐकण्यासारखे तसेच शिकण्यासारखे असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand
@या जागा माणसांचे निरीक्षण
@या जागा माणसांचे निरीक्षण करण्यासाठी अगदी योग्य असतात. कोण कसे गोत्यात आणायचा प्रयत्न करतो, कोण दुकानदाराशी कसा भाव करतो हे बघण्या-ऐकण्यासारखे तसेच शिकण्यासारखे असते. >>> हां....अशी गुणग्राहकता हवी
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
मस्त ओळख !
आम्ही या बाजारात दर महिन्यातून एकदा चक्कर मारायचो आर्मीतल्या जुन्या पाठपिशव्या शोधायला. भटकंतीसाठी उपयोगी अजूनही बर्याच गोष्टी शोधायला मजा यायची. हमरस्ता सोडून आतमध्ये या सगळ्या वस्तू मिळायच्या. तिथे आम्ही सगळ्यात जास्त शोधलेली आणि सापडलेली वस्तू म्हणजे जुना पितळी पाणी तापवायचा बंब
या बम्बावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. एखाद्या पेशवेकालीन मात्तब्बर असामीचा तो बंब असावा असे आम्ही समजून आहोत 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हकुना मटाटा !!!
आम्ही या बाजारात दर
आम्ही या बाजारात दर महिन्यातून एकदा चक्कर मारायचो आर्मीतल्या जुन्या पाठपिशव्या शोधायला. >>
+१
मी या जुन्या बाजारातील शुज , शाळेत - कॉलेजला खेळताना वापरले आहेत.
सुहास
शंभर प्रतिसादात काड्या सारायच्या, अधून मधून सतत कण्हत राह्यचे आणि वर्षा दोन वर्षातून एखाद्या लेखात आव ऋषिमुनींचा आणायचा असले लोक आमच्या ही डोक्यात जातात. (सही-सौजन्य : बिरूटेसर )
अ.आ. जी... छान लेख!..
अ.आ. जी... छान लेख!..
अॅन्टीक वस्तू , पितळी दिवे, रणगाडा आणि स्पेशली जुनी नाणी पाहून मन भरून आले!!!!!
छान वाटले! 
आम्हाला आमच्या वरिष्ठांकडुन अद्यापही या एरियात एकटे जायला बन्दी घातल्या गेली आहे.
(पण तरीही आम्ही या जन्मी २ दा येथे लपून छपून - केवळ कुतुहलापोटी गेलेलो आहोत 
)
इथल्या पाकिटमारांची भीति आमच्या मनी अजूनही खोलवर रुजल्या गेली आहे.

कहत कबीरा सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी..
महादेवको छोड दिया और पूजवा जाय भवानी!!!
आर्मीतल्या पाठपिशव्या
आर्मीतल्या पाठपिशव्यांची अधीक माहिती आहे का..?
कंफर्ट / कुशनींग कसे असते आणि(नव्या / जुन्या कसल्याही) कुठे मिळतील..? जुन्या बाजारात शोधेनच.
सध्या PEAK ची ४५ लीटरची सॅक वापरत आहे.. ४५ लीटर क्षमता असूनही लहान पडत आहे.
एकदा पुणे स्टेशनवर ITBP च्या जवानाला थांबवून त्याच्या सॅक बद्दल विचारले होते, पण त्याच्याकडे फारशी माहिती नव्हती. त्याच्या सॅकला एक AK 47 / AK 56 लटकत असल्याने जास्ती चिकीत्सा करून बघता आली नाही.
त्याच्या सॅकला एक AK 47 / AK
त्याच्या सॅकला एक AK 47 / AK 56 लटकत असल्याने जास्ती चिकीत्सा करून बघता आली नाही.
हो हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी मलाही होता कि मोठ्या पिशव्या कुठून घ्याव्यात. आम्हाला कॅम्प मध्ये एक शिवून देणारा मिळाला होता, त्याच्या कडून पट्टीवाल्या पाच पिशव्या शिवून घेतल्या होत्या साधारण ६० लिटर च्या असतील त्या. त्या दुकानवाल्याचा बाजार उठला असे वर्षभरापूर्वी ऐकायला मिळाले.
सध्या तरी हाताशी काही माहिती नाही. इथे Jack Wolfskin च्या खतरनाक पिशव्या पाहण्यात आल्या, पण किमतीही तश्याच आहेत.
असो, काही कळले तर व्यनी करेन.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हकुना मटाटा !!!
Jack Wolfskin
हा ब्रॅंड युरोपातला लै फेमस ब्रॅंड आहे. यांच्या फिरण्यासाठी / भटक्या जमातीसाठी बर्याच अॅक्सेसेरीज आहेत.
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
फ्फक्कड लेख.
पुण्यात ईतके वेळा येवून हे असले काही माहिती नव्हते.
माहिती मस्तच.
- तर्री
Humor is the absence of terror, and terror the absence of humor.
वरील फोटू लेख पाहून एक
वरील फोटू लेख पाहून एक गमतीदार माहिती आठवली. ती माझ्या सासूबाईंनी सांगितली आहे. त्यांच्या मैत्रिणीचे भले मोठे घर आहे आणि मैत्रिणीच्या नवर्याला जुन्याबाजारातून वस्तू आणायचे वेड आहे. चांगल्या स्थितीतील शीतकपाटे, मिक्सर्स, वॉशिंग मशिने विकत आणून तीनही मुलांच्या नव्या संसाराला भेट म्हणून दिले पण नव्या सुनांना कसे आवडणार? आता त्या वस्तू अडगळीत पडल्यात. त्याआधी एकदा चांगले मिळाले म्हणून पन्नास पाट आणले आणि अडगळीच्या खोलीत रंगवून/वाळवून ठेवून दिले. काही दिवसांनी विमानाचा तुटका पंख ट्रकमध्ये घालून आणला आणि पाटांसमोर ठेवून दिला. मुलांच्या लग्नकार्यात तरी पाट वापरू म्हणताना पुढे असलेल्या इतर भरपूर पसार्याने ते न वापरता सरळ बाहेरून विकत आणावे लागले होते.
मला माहीत असलेला गमतीदार किस्सा..
मला माहीत असलेला गमतीदार किस्सा..
एकाच्या चारचाकीची गाडीची एकच व्हील कॅप रस्त्यात कुठेतरी पडली - हरवली.. आता एकासाठी इतर तीन बदली करायचे म्हणजे आतबट्ट्यातला व्यवहार, म्हणून मग तो तसली व्हील कॅप शोधायला जुन्या बाजारात गेला.
दुकानासमोर गाडी लावली.. दुकानदाराला लांबून व्हील कॅप चे डीझाईन दाखवले. दुकानदाराने आर्धा तास थांबवून घेतले आणि तसलीच एक चकाचक व्हील कॅप आणून दिली.
हा हिरो खूष होवून घरी आला.. नंतर कळाले.. दुसर्या साईड्ची एक कॅप गायब आहे. :-O
दुकानदाराने त्याच्याच गाडीची पलीकडची कॅप उडवली.. पॉलीश करून यालाच विकली.
@दुकानदाराने त्याच्याच गाडीची
@दुकानदाराने त्याच्याच गाडीची पलीकडची कॅप उडवली..>>>
खपल्या गेलो आहे...
@पॉलीश करून यालाच विकली.>>>
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
मस्त. मला कुंकवाचे करंडे, अन
मस्त. मला कुंकवाचे करंडे, अन हळदी- कुंकु- अक्षदा ठेवतात तो चकतीचा डबा आवडला. अडकीत्ते पण मस्त आहेत. बरोबर माहीतगार असेल तर अशा ठीकाणी खरेदी करुन एखादी अनमोल वस्तु पदरात पडु शकते.
मीसुद्धा इथे इस्टेट सेल मधे वगैरे जाउन काही जुनं छान मिळतं का पहात असते. वस्तु असतात पण खुपदा किंमत खुपच लावलेली असते..अन आपल्याला माहीती नसल्याने नेमका भावही करता येत नाही. असो.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
खत्रुड
एकदम खत्रुड आहे. आवडले आपल्याला...... पितळी वस्तु तर खल्लास एकदम........ पण किमती सुद्धा भारी आहेत.......... बरच्या/कट्यारी घेण्यासाठी चार आकडी रुपये घेउन यायला पाहिजे.
असो........
फोटो आवडले.....
You don't win silver, you only lose gold.
उत्तम बाजार आहे, पण प्रचंड
उत्तम बाजार आहे, पण प्रचंड सावधगिरी लागते, पितळेच्या सगळ्याच वस्तु जुन्या नसतात, त्यातल्या जुन्या कोणत्या आणि नविन कोणत्या हे समजणे गरजेचे. तसेच वर रोहितने म्हणल्याप्रमाणे नाण्यांचे असते तसे.
तसं हल्ली हा जुना बाजार फार कमी झाला आहे, तिथं, व्यायामाची साधनं, बॅगा, बुट असलंच बरंच जास्त असतं. याचबरोबर याच्या समोर असणारा जुन्या फर्निचरचा बाजार सुद्धा चांगला आहे. भावनिक गुंतवणुक नसेल तर १ बिएचकेचं सगळं फर्निचर ५००००/- मध्ये सहज येतं. अगदी चकचकित करुन घरापर्यंत.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
आजच्या दिवसात चांगले असे खूप कांही चुकवले आहे..
आजच्या दिवसात चांगले असे खूप कांही चुकवले आहे याची जास्त जाणीव होत आहे तुमचे दोघांचे लेख वाचून..
चोर बाजार.
होस्टेलच्या दिवसांत हा चोरबाजार काय वाट्टेल ते देऊन जाई.
१४ रुपयांत मिळाला म्हणून हँडल मारण्याचा एक मिक्सर ब्लेंडर आणून फ्रूट ज्य्यूस केलेले.
लोखंडी 'टो' असलेले हंटर्स.
घडीचा स्टोव्ह.
मजबूत रॅकसॅक. खरं तर ट्रेकिंगचं सगळं सामान.
त्या काळात 'हिटलॉन' तिथेच मिळालेलं पहिल्यांदा.
होस्टेलच्या बेडमधले ढेकूण मारण्यासाठी तिथूनच स्टो-रिपेर वाल्यांचा तो स्पेशल स्टो आणलेला विकत मग पलंगाचे कोपरे लाल होईपर्यंत तापवलेले..
अॅण्टिक्स व्यतिरिक्त रोज उपयोगी वस्तूही भरपूर मिळतात तिथे.
__________________________
एक गोपाळ असतो. तो आनंदी असतो!
जुनी आठवण वगैरे ठीक आहे पण
जुनी आठवण वगैरे ठीक आहे पण काळानुरुप स्थळ/ स्वरूप बदलणे गरजेचे आहे. रस्त्याचा एक भाग व्यापून केवळ बकालपणा वाढवत आहे हा जुना बाजार. विकत वगैरे घ्यायला कधी गेलो नाही पण रस्ता व्यापून असल्याने आणि एकंदर स्वरूप खरंतर किळसवाणं असल्यानं त्याबाजुला जावसं वाटत नाही.
पण त्यामुळेच वस्तूंचं वैविध्य पाहून कुतूहल वाटलं.
@रस्त्याचा एक भाग व्यापून
@रस्त्याचा एक भाग व्यापून केवळ बकालपणा वाढवत आहे हा जुना बाजार. >>> गेले हो,ते दिवस...! अता त्यांना नव्या नियमात-बसवलय... रस्त्याचा फक्त फुटपाथ कडेचा,थोडा रस्त्याचा भागच त्यांना मिळतो... कालही तसेच बसलेले होते... त्यामुळे ट्रॅफिक सुरळीत चालले होते.
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
नियमात बसवलय म्हणून कयदेशीर
नियमात बसवलय म्हणून कयदेशीर होउ शकतो.. पण बकालपणा जात नाही ना !!
@पण बकालपणा जात नाही ना !!
@पण बकालपणा जात नाही ना !! >>> ही अपेक्षा तुंम्ही त्यांच्याकडुन करता कशाला...? त्या वर्गाचा सामाजिक स्तर पहा...आणी मग अपेक्षा करा
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
+१
सहमत आहे.
मी स्वत: आत्म्याबरोबर तिथे त्या दिवशी फिरलोय. दुकाने जरी फूटपाथवर, रस्त्यावर असली तरी बकालपणा असा कुठेही दिसला नाही.
--------------------------------------------------------------
ऊर्ध्वासः पिबति जलं यथा यथा विरलाङगुलिश्चिरं पथिकः |
प्रपापालिकापि तथा तथा धारां तनुकामपि तनुकरोति ||
रस्ता हा वहातुकीसाठी असतो.
रस्ता हा वहातुकीसाठी असतो. फूटपाथ पादचार्यांसाठी.. तिथे दुकान थाटणे हाच बकालपणा.
आणि सामाजिक स्तर खालचा आहे म्हणून बकालपणा चालू द्यावा ??? त्यांच्याकडून असच रस्त्यावर व्यवसाय करायची अपेक्षा ठेवायची ??
@रस्ता हा वहातुकीसाठी असतो.
@रस्ता हा वहातुकीसाठी असतो. फूटपाथ पादचार्यांसाठी.. >>> ओ.... तुमचा रस्ता नंतर आलाय..जुना बाजार लै जुना आहे...माहितीये का..?
@तिथे दुकान थाटणे हाच बकालपणा. >>> यालाच जर तुंम्ही बकाल्पणा म्हणता,तर नाईलाज कशाला म्हणता तेही सांगा
@आणि सामाजिक स्तर खालचा आहे म्हणून बकालपणा चालू द्यावा ??? >>> अहो,महाशय. तो बकालपणा नाहीच आहे,त्यामुळे तुमचा प्रश्नच गैरलागू आहे.
@त्यांच्याकडून असच रस्त्यावर व्यवसाय करायची अपेक्षा ठेवायची ?? >>> तुम्ही अपेक्षा बिपेक्षा ठेऊ नका हो...त्यांचा हक्क आहे तो... त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते बोला... कळू द्या तुमचे विचार एकदा.त्यांना तिथनं हकुन दिल्यावर त्यांनी कुठे जायचं तेही बोला...
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
अहो बाजार "लै जुना" आहे,
अहो बाजार "लै जुना" आहे, त्यात अँटीक वस्तू असतात या गोष्टींचा अभिमान बाळगा पण रस्त्यावर भरतो याचं पण समर्थन??
त्यांना हाकलून द्या वगैरे कोण म्हणतय ?? पण काळानुसार बदलणे आवश्यक असते. एखाद्या मंडई/ संकुलात भरला हा बाजार तर जास्त चांगला नाही का दिसणार??
पूर्वी रस्त्यावर भरायचा, तेव्हा ठीक होतं.. तेव्हाची वाहतुकीची गरज तेवढीच होती..
बरं चोर बाजार आहे हा याबद्दलही अभिमान बाळगणार का??
"लै जुना" आहे म्हणून त्यानी चोरी केली तरी .. व्वा किती छान जुने चोर आहेत !!
@अहो बाजार "लै जुना" आहे,
@अहो बाजार "लै जुना" आहे, त्यात अँटीक वस्तू असतात या गोष्टींचा अभिमान बाळगा पण रस्त्यावर भरतो याचं पण समर्थन?? >>> अहो..समर्थन कुठाय हे..? वस्तुस्थिती आहे ती... ती आंम्ही सांगितली..इतकच...!
@त्यांना हाकलून द्या वगैरे कोण म्हणतय ?? पण काळानुसार बदलणे आवश्यक असते. >>> हा बदल त्यांना तर हवाच आहे...पण नगरपालिका दाद लागू देइल तर ना..!
@ एखाद्या मंडई/ संकुलात भरला हा बाजार तर जास्त चांगला नाही का दिसणार?? >>> असं आपल्याला वाटतं...आणी आंम्हालाही...फक्त सरकारी रेट्यातुन गरिबांची कामं खर्या अर्थी होण्याचा सु-दिन उगवणे गरजेचे आहे,ते होत नाही ना..?
@पूर्वी रस्त्यावर भरायचा, तेव्हा ठीक होतं.. तेव्हाची वाहतुकीची गरज तेवढीच होती.. >>> अताही वहातुकिची कोंडी टाळुनच बाजार चालतो आहे...
@बरं चोर बाजार आहे हा याबद्दलही अभिमान बाळगणार का?? >>> आंम्ही कुठं बाळगला अभिमान..? उगीच नाही ते आरोप करु नका हो महाशय...
@"लै जुना" आहे म्हणून त्यानी चोरी केली तरी .. व्वा किती छान जुने चोर आहेत !! >>> काय हो..? तुंम्हाला स्वतःला या बाजाराची माहिती किती आहे हो..? काहि माहिती नसताना असली बेजबाबदार वक्तव्य करता...म्हणुन विचारतोय. तो चोरांचा बाजार नाहिये...तिथे जुन्या वस्तूंबरोबरच चोरिचा मालही विकायला येतो,इतकच सत्य आहे...(व्यापारी तो माल विकत घेतात,चोरच तिथले व्यापारी नाहित.) आहे ते चुकिचच आहे..पण चालू जगरहाटीचा तो एक भाग आहे. हे समजुन घ्यायला हवं की नको?. त्याचं समर्थन मी केलेलं नाही...फक्त दखल घेतलेली आहे,हे जरा समजुन घ्या.
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
रस्ता हा वहातुकीसाठी असतो.
याला मी समर्थन समजलो.. वस्तुस्थिती सांगणे नाही..
बाकी तुम्हाला या बाजाराच्या वाईट बाजू दाखवल्याचं तर फारच वाईट वाटलेले दिसतेय
वाटलं चोरीच्या वस्तू विकणं तरी खटकेल..
असो ते तरी चुकीचं वाटतय ना.
@याला मी समर्थन समजलो..
@याला मी समर्थन समजलो.. वस्तुस्थिती सांगणे नाही.. >>> होतो गैरसमज कधी कधी...असो..!
@बाकी तुम्हाला या बाजाराच्या वाईट बाजू दाखवल्याचं तर फारच वाईट वाटलेले दिसतेय >>> मुळ्ळीच नाही...!
@वाटलं चोरीच्या वस्तू विकणं तरी खटकेल.. >>>खटकतं की...पण असं खटकलेलं सांगणं हे या लेखाच्या संदर्भात बसत नाही, हा लेख म्हणजे पुणे शहराच्या एका भागाचा ओळख वृतांत आहे..तपासणी शिबिर नव्हे... आणी खटकुन काय उपयोग नुस्तं..? यावरचे उपाय योजणं आपल्या हाती आहे का..?
@असो ते तरी चुकीचं वाटतय ना.>>> चुकिचं वाटणारच की..! चुकच आहे ते..! फक्त या चुक बरोबरची काळजी मी या लेखात वहावी,असं मला वाटत नाही..
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
खर आहे.पण जुना बाजार हि
खर आहे.पण जुना बाजार हि अलिबाबाची गुहा आहे.वरून वाटत नाही पण आतमध्ये गेलात तर काय काय सापडेल त्याची कल्पनाही करू शकणार नाही.आणि बुधवार -रविवार ते शिस्तीत रस्त्याच्या एका बाजूला बसलेले असतात.अर्धा रस्ता रहदारीसाठी मोकळा असतो.मी कधी जुना बाजार भरलाय म्हणून खूप ट्राफिक झालाय अस बघितलं नाहीये.
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
@मी कधी जुना बाजार भरलाय
@मी कधी जुना बाजार भरलाय म्हणून खूप ट्राफिक झालाय अस बघितलं नाहीये. >>> अगं किच्चु तै...आधी एक साइड पूर्ण बंद असायची आणी ट्रॅफिक जॅम पण व्हायचं... तु म्हणतेस तो नवा बदल गेल्या काही महिन्यातला आहे...
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
महिने नहि वर्ष.
महिने नहि वर्ष.
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
झकास!
मस्त फोटू हो, भटजीबुवा. एकदा फेरी मारायला हवी.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त!
जुन्या वस्तूंचे फोटो आवडले...
आता पुढल्या वेळेस तुलाच घेऊन गेलं पाहिजे तिथे!
माहितगार असलेला बरा...
छान
मस्त चक्कर घडवून आणलीत!!!
खास
चायला अफाट आहे हो हा बाजार ...
आवर्जून यायला हव...
वो अडकित्तोने तो जान हि लेली
***************************************
- मन्या फेणे
बर्याचदा गेलोय इथे पण
बर्याचदा गेलोय इथे पण गाभार्यात गेलो नाही... म्हणुन बरंच मिस केलेलं दिसतंय... अजुन एक वेळ जाउन येतो...
= फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो =
एक ठसठसणारी आठवण
१९७० ला अकरावी झाल्याच्या निमिताने मला माझी आयुष्यतली पहिली फुलप्यांट मिळाली. त्या एका प्यांटवरच आठवडा काढावा लागे. रविवारी
धुवायची. दुसरी नवी घेणे दुरापास्त . कारण फी भरण्याला प्राधान्य. असाच मग जुन्या बाजाराची माहिती मिळाली. काही लोक याला चोर बाजार
ही म्हणतात.एका जागी जुने कपडे विकणारा बसला होता. एकदाची एक प्यांट पसंत केली. पनास सांगितले.. मला विसातच परवडत होती. ( मिसळ
हा प्रकार अर्ध्या रूपयाला मिळत असे ) सौदा फिसकटला. पुरते एक वर्ष एकच वापरली. ही परिस्थीती असताना एकाद्या मुलीवर इंप्रेशन पडण्याचा
प्रश्नच येत नसे. आपल्याला जुनी वापरलेली प्यांट वापरायची वेळ आली होती. हे आठवले की आजही अस्वस्थ व्हायला होते. बाकी ही जागा
निरखणे हा एक रोमान्स आहे. फक्त उन्ह उतरले असताना जावा.
बाकी अट्रुप्ट आटमा याणी ताकलेले फोतो पाहून दोले ट्रुप्ट जाले. ढ्ण्यवॉड !
------------------------------स्वाक्षरी आरंभ------------------------------------------------
आपल्याला अक्कल नाही हे समजणे हे आपल्याला अक्कल येउ लागल्याचे पहिले लक्षण आहे ! !
गुर्जी कधी नेताय बाजारला? ते
गुर्जी कधी नेताय बाजारला? ते माश्याचे कुलुप, पितळी बैलगाडी आणि आडकिते आणि दुर्बिणी लैच आवडल्यात बघा आपल्याला पण साले बार्गेनिंग जमत नाही. तुम्ही तयारीचे दिसाताय त्यातले. तुमच्याबरोबरच येतो खरेदीला.
********************************************
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
अरे व्वा !!!! इथल्या काही
अरे व्वा !!!!
इथल्या काही वस्तु उदा. बैलगाडी ,घोडागाडी प्रचन्ड आवडली गेली आहे
पियुशा......
http://lovelypiyu.blogspot.com
मस्त आहे एक्दम
कधी मिळाला चानस तर नक्की येइन.
एका फोटोत स्वातंत्र्यदेवतेचा पितळी बॉट्ल ओपनर पाहून मौज वाटली.
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
अ आ.आपला 'स्मायल्या' नी
अ आ.
आपला 'स्मायल्या' नी '...' (अल्मोस्ट)विरहीत लेख जास्त आवडला.
छान माहिती आणि फोटो.
>>>त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. हे वाक्य विशेष भावलं.
अ-अवांतरः असेच मुद्देसूद नी विशेष म्हणजे बांधेसूद लिहीलेत तर जास्त बरे.
मिसळपाववर जास्तीत जास्त 'असंच' चांगलं वाचू या ना आपण सगळेच.
दंगा करायला ख व, ख फ आणि व्यनि आहेत. तेवढं पथ्य पाळाच.
__________________________________________________________________
येर्हवी सर्वांच्या हृदयदेशी| मी अमुका आहे ऐसी | जी वृत्ती स्फुरे अहर्निशी| ती वस्तु गा मी||
असेच म्हण्तो.
>>>आपला 'स्मायल्या' नी '...' (अल्मोस्ट)विरहीत लेख जास्त आवडला.
(अजून भर घालतो) आणि नेहमीची वाट सोडून नवीन विषय निवडलेला आवडला.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
थोडे सांभाळुन खरेदी करा....
बरोबर कुणी माहितगार असल्याशिवाय खरेदी करु नका...
मला ग्रामोफोन इथेच मिळाला..पण ओळख असल्याने चांगला निघाला....
बाकी हे अत्रुप्त आत्मे मस्त आहेत....कुठे , कुठे भटकतात.....मस्त फोटो काढतात्...आणि माहिती पण देतात..
धन्यवाद हो अत्रुप्त आत्मे साहेब....
सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी"====
अत्रुप्त आत्मा साहेब, मस्त लेख व भारी पुणे...
अत्रुप्त आत्मा साहेब, मस्त लेख व भारी पुणे...
आताही पुण्याला आलो कि बुधवारी जुन्या बाजारात एक फेरी असतेच.
तसही पुणे म्हंजे आमच सगळ्यात आवडिच ठिकाण ...
कलेजेचा टुकडा म्हणा हव तर...
पण पुणे ते पुणेच निव्वळ लाजवाब..
अत्रुप्त आत्मा साहेब एका सुंदर लेखासाठि तुमचे मनापासुन आभार
निश
मस्त
भटजीबुवा....
नव्या पुण्यातल्या जुन्या बाजाराची सैर मस्त करुन दिलीत
छान सचित्र लेख आवड्ला. जुन्या
छान सचित्र लेख आवड्ला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. (वडिलांचा हात धरुन बाजारात फिरणे वगैरे)
त्या पितळेच्या वस्तू विशेष आवडल्या... मत्स्य कुलूप, कासव कुलूप, बैलगाडी, घोडागाडी, अडकीत्ते...
जुन्या बाजाराची सैर घडवून आणल्याबद्द्ल धन्यवाद.
=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=!=
" I'm not a HANDSOME guy, but I can give my HAND-TO-SOME one who needs help. Beauty is in heart, not in face." ----- Dr. A. P. J. Abdul Kalam.
पुन्हा एकदा आपला आसमंत उघड्या
पुन्हा एकदा आपला आसमंत उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील मनाने टिपण्याचं उत्तम उदाहरण.
पुन्हा एकदा धन्यवाद..
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
मिलिटरीच्या हॅवरसॅक्स,
मिलिटरीच्या हॅवरसॅक्स, टेन्ट्स अशा गोष्टी घेतल्या होत्या फार पूर्वी..
मुंबईच्या एका मित्राला जुन्या ट्रायुम्फला बसू शकेल असा एक पार्ट मिळाला होता. त्यासाठी तीन बुधवार आअणि तीन रविवार घालवले होते..
पण फोटो बघून पुन्हा आठवण जागी झाली.
तळाला स्टड्स असलेले स्पोर्ट्स शूजसुद्धा मस्त मिळायचे.
एम.जी.
झकास फोटो अन ऊत्तम ओळख
झकास फोटो अन ऊत्तम ओळख ..
होस्टेल डेज च्या सुरुवातीला , कुणीतरी सांगितले कि इथुन काहि घेउ नकोस .. चोरिचा माल असतो .. पोलिस मागे येतील .. तर आधी खरेच वाटले .. पण मग नंतर बर्याच फेर्या झाल्या .. अर्थात घेणे कमी अन घासाघीस जास्ती ..
भटजीबुवा,
एका मनोहर विश्वाची उत्तम सचित्र ओळख करून दिलेली आहे.
जुन्या बाजारातील वस्तू बघून पारणं फिटलंय. कधी तरी जरूर तिथे भटकायला आवडेल.
आपला अत्यंत आभारी आहे.
इत्यलम्
:davie: प्रास :davie:
लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड
ड्यांबिसपणा आहे....
हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही.
तुमचा अखास अॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.
--मनोबा
"The last Christian died on the cross".
@पण तिथं हाकेच्या अंतरावर
@पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. >>> ठिक आहे,पुढल्यावेळी योग्य अंतरावरुन हाक-मारली जाइल.
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
ड्यांबिसपणा आहे....
हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही.
तुमचा अखास अॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.
--मनोबा
"The last Christian died on the cross".
मस्तच...
पितळी वस्तू आम्हालाही प्रचंड आवडतात, पण महागही असतात ब्वॉ..
मस्त बाजार.. तृप्त केलंत, आत्मारामा..
चिगो..
|| कौन कहता है, के आसमां में सुराख नही होता?
इक पत्थर तो तबियत से उछालों , यारों ||
इथे मिळणारी इस्त इंडिया
इथे मिळणारी इस्त इंडिया कंपनीची नाणी एकदम बोगस असतात. ती अगदी १८३५ सालची असली तरी त्यावर यू के असे लिहिलेले असते. १८५७ च्या अगोदर मुघल सरकाराची नाणी कंपनी सरकार काढीत असे पण त्यावेळेस इंग्लंडचा युके झालेला नव्हता . मुघलकालीन नाणी मात्र भरपूर मिळतात. पेशवेकालीन नाणी मात्र फारशी दिसत नाहीत.
अवांतरः तुघलकाने काढलेल्या चाम्ड्याच्या नाण्यापैकी एखाद्या नाण्याबद्दल काही म्हैती मिळेल का?
धन्यवाद..
धन्यवाद..साहेब
झकास फोटो अन ऊत्तम ओळख ..
कसब्यात असताना बर्याच वेळा चक्कर टाकलेली आहे,आजकाल त्या शुज वगेरे विकणार्या लोकानी बाजाराची बरीच जागा व्यापली आहे.
@ अन्या दातार :कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत भरायचा (सध्या माहित नाही). रेकॉर्ड प्लेयर, जुने व्हॉल्ववाले रेडीओ याची बर्यापैकी व्हरायटी दिसायची...............
...............साहेबा आमच्या सोलापुरात देखील पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत असा बाजार भरतो दर मन्गलवारी.(आज ही)
अवातर : च्यायला काल बाजारात चक्कर टाकायला हवी होती राव... काही खास नाही तरी मिपा ची दोन अमुल्य रत्ने "याची
डोळा" पहायला मिळाले असते.
नि३
मस्त !
बाजाराची सफर आवडली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
मी कसबा पेठेतली,आमच्या
मी कसबा पेठेतली,आमच्या घरापासून काही अंतरावरच जुना बाजार आहे.आजोबा, बाबा,काका हे वेळ घालवायला तिथे चक्कर मारत असत,त्यांच्याबरोबर आम्हीही असायचोच.
माझ्या पणजोबांनी माझ्या बाबांना खेळण्यासाठी जुन्या बाजारातून काही पितळेची खेळणी आणली होती.ती हि तिथल्याच एका पितळी पेटीतून.त्यात काही पितळेच्या वाघ,सिंह,हत्ती असे अनेक प्राणी,पक्षी होते.नंतर मात्र ती पेटी माळ्यावर गेली.आई,बाबा,आजी,आजोबा नेहमी त्या खेलण्यान्बद्दल बोलत असत,पण ती खेळणी कुठे आहेत हे कोणलाच माहित नव्हत.आम्हाला मात्र ती बघण्याची खूप इच्छा होती.ती खेळणी शोधण्यासाठी आईने कित्येकवेळा पूर्ण वाडा स्वच्छ केला.अचानक एक दिवस आईने माळा साफ करायला घेतला तेव्हा ती पेटी सापडली.त्या सर्व मूर्ती अंत्यंत आकर्षक,सुबक आणि वजनदार आहेत. त्यात गौरींचे आकर्षक पितळेचे दोन मुखवटेही होते.तेव्हापासून आमच्या घरी गौरी बसतात
-----------------------------------------------------------------------------------------------
सुखि संसाराची सोपी वाटचाल!
अ.आ. च्या creativity ला सलाम.
अ.आ. च्या creativity ला सलाम. असाच एक बाजार नाशिकला बालाजी मंदिराजवळ (कापडपेठ) आहे. पण ती पिढीजात दुकाने आहेत. शिवाय ते लोक रस्त्यावर विक्री करत नाहीत.जुनी नाणी गंगेवर बसणाऱ्या वैदू लोकांकडे अनेक प्रकारची मिळतात. पण जास्त माहिती नसल्याने कधी घेतली नाही. भद्रकाली मार्केट जवळ नळ बाजारापासून ते दूध बाजारापर्यंत जुन्या वस्तू अनेक मिळतात.पण इतक्या वेगवेगळ्या वस्तू नाही भेटत. पितळेच्या अनेक वस्तू सायान्ताराचा साबुदाणा वडा खाता खाता दृष्टीस पडल्या आहेत. पण त्याचे फोटो काढून अशी सुंदर माहिती देवून संकलन करण्याची बुद्धी आम्हाला देवाने देऊ नये याची खंत वाटते. आणि अशी बुद्धी असणार्या लोकांचे अतृप्त आत्मे जगात अजून वावरत आहेत याचा आनंद !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
"To confront a mind that radically alters our perception of the world is one of life's most unsettling yet liberating experiences."
लेख लाईकला........ वापरलेले
लेख लाईकला........
वापरलेले टुल्स..ड्रील्स, गाईंडींग व्हील्स व मशीन पारट्स मिळण्याचे हमहास ठिकाण म्हणे जुना बाजार..
अनेक वेळा माल खरेदी केला आहे..मजा येते हिंडताना बाजारात...
माल कमी भावात खरेदी करणे पण एक शास्त्र व कला आहे..
लय भारी हा सचित्र लेख पाहून
लय भारी
हा सचित्र लेख पाहून मला एकदम मुंबईच्या चोर बाजाराची आठवण आली.
ह्या लेखामुळे अनेक पुणेकर ह्या बाजारात बाजारहाट करतील ह्यात शंका नाही.
आपले आमच्या पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
जबरी !!
भारी हय राव. कधी कधी अशा बाजाराच्या बाजुनं जाणं होतं पण त्यामध्ये असणारी गंमत बघायची द्रुष्टी नसते. आपल्या लिखाणामुळे वेगळ्या नजरेने बघता येइल. छान.
सुधीर मुतालीक, नाशिक
सायबा मस्त बाजार दाखवलात
(मेली भलतीच गोंडस होती,पण किंमत ऐकल्यावर मी ही आडवा पडलो...! जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा म्हणजे इतर अंदाज बांधता येतील कारण वडीलां करिता अडकित्ता घेऊ म्हणत होतो
रघु सावंत
@जरा त्या गोंडस बाटलीची किंमत
@जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा >>> ''अवो..जादा नाय घेनार...फक्त ७०० रुपे द्या... '' ---इति विक्रेता..
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
यक्कू क्रूरसिंह
सायबा यक्कू क्रूरसिंग ही शस्त्रे तुम्ची स्वत:ची आहेत जमा करायची जरुर नाही. आमच्याही घरी आहेत अशी शस्त्रे म्हणजे तलवार,खंजीर,व इतर
रघु सावंत
मस्त...
बाजारात फिरुन यायला मजा आली.
स्वाती
माहितीपूर्ण धागा ! मला
माहितीपूर्ण धागा !

मला देवांना ओवाळायची पंचारती फार फार आवडली !
कधी त्या भागात येण झालं तर मी नक्कीच ती घेईन !
फोटो मस्तच आहेत...
मदनबाण.....
Life is what happens while you are busy making other plans.
John Lennon
धाग्यावर येऊन गेलेल्या
धाग्यावर येऊन गेलेल्या सर्वांचे धन्यवाद... हा धागा अनेकांना विशेषत्वानी अवडला...तसे संदेशही अनेकांनी पाठवले,त्यामुळे पुण्यातल्या अश्याच काही जुन्या-[हयात असलेल्या] वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देण्याचे मनाने घेतले आहे... जसे अठवत जाइल,तसे भेट देऊन वृत्तांत टाकणार आहे.
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
जरूर फोनवा..
वीकांत असेल आणि वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा...
@वल्ली व माझी सोबत चालणार
@वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा... >>> चालणार असेल'' चा तीव्र णिषेध :evil:...चालणार असेल काय..? हवीच आहे... जाताना कळवले जाणारच आहे...
०===०===०===०===०===०===०===०===०===०
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
Pages