गाजर हलवा पाय (Pie)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
23 Jan 2012 - 7:07 am

आपण गाजर हलवा नेहमीच आवडीने खातो आणी हिवाळ्यात तर घरोघरी हमखास बनवला जातो :)
मी विचार केला नेहमीचा हलवा बनवून सर्व्ह करण्यापेक्षा त्यात काहीतरी वेगळेपण असले पाहिजे म्हणून हा छोटासा बदल :) चला तर मग सुरुवातीपासून सुरु करुयात ;)

साहित्य:
१ किलो गाजरे सालं काढून किसून घेणे
१ मग भरून गरम दूध
३/४ -१ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
३-४ टेस्पून खवा (घरी केलेला ताजा खवा वापरावा किंवा साय, मिल्क पावडर वापरली तरी चालेल )
४ टेस्पून साजुक तुप
सू़का-मेवा
१ टीस्पून वेलचीपूड
९-१० मॅकविटीज (मारी) बिस्कीटे
५० मिली फ्रेश क्रीम

.

पाकृ:

एका भांड्यात २ टेस्पून साजुक तुप गरम करून त्यात गाजराचा कीस परतून घ्यावा.

.

गाजराचा कीस चांगला परतला गेला की त्यात थोडे-थोडे करुन दूध घालावे व सतत परतत राहावे.

.

दूध पूर्ण आटले की त्यात खवा घालावा . सतत परतून मिश्रण घट्ट होऊ लागेल.

.

मिश्रण सुकत आले की त्यात साखर घालावी. साखर विरघळल्यावर मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत रहावे.

.

हलवा साधारण सुकत आला की वरून २ टेस्पून साजुकतुप सोडावे म्हणजे हलव्याला चकाकी येते व हलवा खमंग लागतो.

.

त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा व वेलचीपूड घालावी . हलवा थोडा पातळ असेल,पूर्ण गार झाला की एकसंध होईल.

.

गाजर हलवा तयार आहे. तुम्ही असाच किंवा व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर सर्व्ह करु शकता :)

.

अब आ गया ट्विस्ट ;)

फ्रेश क्रीम थोडं व्हॅनिला एसेन्स व थोडी साखर घालून व्हिप करुन घेणे.
आपल्याला पाय बनवायचा आहे त्यासाठी मारी बिस्कीटांचे तुकडे करावे व एका झिपलॉक बॅगमधे ठेवून त्यावर लाटणे फिरवून चुरा करावा.

.

तयार चुर्‍यात वितळलेले बटर घालून सगळ्या चुर्‍याला नीट चोळून घ्यावे.

.

आता तुमच्याकडे जर स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर तुम्ही तो वापरु शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी पेस्ट्री कटरचा वापर करत आहे. (तसेही मला Individually सर्व्ह करायला सोपे पडले :) )

पेस्ट्री कटरमध्ये बिस्कीटांचा चुरा नीट दाबून पसरावा.

.

त्यावर तयार गाजर हलव्याचा थर पसरावा. (गाजर हलवा पूर्ण गार झालेला हवे)

.

त्यावर व्हिप केले क्रीम पसरावे व पिस्त्याचे काप लावावे. फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावे अर्धा-एक तास.
सर्व्ह करतेवेळी सुरी कडेने फिरवून अलगद पेस्ट्री कटर काढावे.

.

तुमचे डेजर्ट खाण्यासाठी तयार आहे :)

.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Jan 2012 - 7:13 am | तुषार काळभोर

...

कौशी's picture

23 Jan 2012 - 7:19 am | कौशी

छानच आयडीया आहे. आवडली.

मराठमोळा's picture

23 Jan 2012 - 8:07 am | मराठमोळा

खल्लास... सुपर्ब!!!!

बाकी शिर्षक वाचून अंमळ हसायला आले.. :) गाजर हलवा पाय.

सानिकास्वप्निल's picture

23 Jan 2012 - 8:55 am | सानिकास्वप्निल

तुम्ही सांगितल्यानतंर मला ही शिर्षक वाचून हसु आले :)
गणपाभौंच्या ह्या धाग्याची आठवण झाली

शेवटचा फोटू बघून वारलो.....

प्राजु's picture

23 Jan 2012 - 9:37 am | प्राजु

मस्त आयडीया आहे.. एकदम आवडली!! सह्ही!!

करेनच!! सोपंही आहे... नक्की करेन.

पर्नल नेने मराठे's picture

23 Jan 2012 - 11:37 am | पर्नल नेने मराठे

मस्त आयडीया आहे.. एकदम आवडली!! सह्ही!!

करेनच असे नाही !! सोपंही आहे... नक्की करेनच असे नाही ;).

- (आळशी) चुचु

सुहास झेले's picture

23 Jan 2012 - 10:31 am | सुहास झेले

खत्री रेसिपी..... प्रचंड आवडली :) :)

प्रभाकर पेठकर's picture

23 Jan 2012 - 11:41 am | प्रभाकर पेठकर

गाजर हलवा-पाय फ्युजन आवडले. नक्कीच करून पाहिन. अभिनंदन.

भन्नाट पाकृ...... सही आहे.... :)

सुरेख.
आयडियेची कल्पना भारी आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jan 2012 - 12:42 pm | अत्रुप्त आत्मा

नंबर झालीये डिश....

चला आता आज कमीत कमी तय्यार गाजर हलवा खाणे तरी आलेच...

जाई.'s picture

23 Jan 2012 - 12:43 pm | जाई.

शेवटचा फोटो भारी
तुझ्या कल्पकतेला सलाम :)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jan 2012 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

सानिकातैंचा आयडी काही दिवस ब्लॉक का करत नाहीत? ;)

उगा इकडे आमची जळजळ.

चिंतामणी's picture

23 Jan 2012 - 4:43 pm | चिंतामणी

दरवेळी नवीन नवीन प्रतिक्रीया कश्या देणार????? :~ :-~ :puzzled:

चिंतामणी's picture

23 Jan 2012 - 4:43 pm | चिंतामणी

दरवेळी नवीन नवीन प्रतिक्रीया कश्या देणार????? :~ :-~ :puzzled:

स्मिता.'s picture

23 Jan 2012 - 1:54 pm | स्मिता.

सानिकाबाई, तुमच्या उत्साहाला आणि कल्पनाशक्तीला सादर प्रणाम!!

बाकी काही बोलायची गरज नाहीच.

अरे उचला रे मला.. कुठुन शब्द पैदा करु या रेशिपीसाठी...

- (विचारमग्न) पिंगू

सुहास..'s picture

23 Jan 2012 - 3:37 pm | सुहास..

पायाचा फोटु पाठविणे ;)

कपिलमुनी's picture

23 Jan 2012 - 3:43 pm | कपिलमुनी

अफाट कल्पनाशक्ती..
शतशः प्रणाम !

धनुअमिता's picture

23 Jan 2012 - 3:47 pm | धनुअमिता

मस्त पाककृती आहे.

नक्की करुन बघेन.

अवांतर : ह्या रेसिपी मध्ये चमच्यांची खुप आठवण आली.

उदय के'सागर's picture

23 Jan 2012 - 3:54 pm | उदय के'सागर

सानिकाताई, काय बोलु..... 'हॅट्स ऑफ'

(गाजर हलवा विशेष आवडत नाहि पण ह्या कृती नुसार केल्याने आवडण्याची शक्यता आहे, लवकरच करुन बघेन :) )

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jan 2012 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार

गाजर हलवा विशेष आवडत नाहि

हिंदी शिणीमात हिरो व्हायची संधी गेली म्हणायची.

बाकी.. खीर आवडते का हो तुम्हाला ?

स्मिता.'s picture

23 Jan 2012 - 7:14 pm | स्मिता.

मला गाजराचा हलवा खूप आवडतो... तसेच आलू, कोबी, मुळा, इ. चे पराठे आवडतात. मला मिळेल शिणुमात हिरोईन व्हायची संधी?

उदय के'सागर's picture

25 Jan 2012 - 10:22 am | उदय के'सागर

हा हा हा :D एक नंबर....

पण शिणुमात होरोईन होण्यासाठी, हिरोईन ला ते अवडुन चालत नाहि... ते हिरोईन ला बनवता आले पहिजे (हिरो ला प्रेमाने म्हणायला "आज मैने तुम्हारे लिये 'गाजरका हलवा/आलू/ गोबी/ मुली का पराठा' बनाया हैं!").
आवडण्याची 'एलिजीबीलीटी' होरो ची असते ... यु नो - सो कॉल्ड भारतीय (बॉलीवुड) संस्कृती :P ...

पियुशा's picture

23 Jan 2012 - 4:19 pm | पियुशा

मस्त गो ,यम्मी..............:)
गाजर हलवा अगदी फेवरेट आहे माझा :)

प्यारे१'s picture

23 Jan 2012 - 4:25 pm | प्यारे१

अतिब्येक्कार......!

(हे विशेषण आहे. जोरात ओरडून उच्चारा. ;) )

मेघवेडा's picture

23 Jan 2012 - 4:55 pm | मेघवेडा

__/\__

अत्यंत आवडल्या गेले आहे! बेष्टच!

५० फक्त's picture

23 Jan 2012 - 6:10 pm | ५० फक्त

मुडदा पडला गेला आहे, त्या कढईभर गाजराच्या किसावर तो पिवळाधमक तुपाचा चमचा कसला किल्लर आहे, बाकी काही बोलायची सोयच नाही,

स्वप्निलभौ, तुमाला धीर धरवतो कसा ओ फोटो काढायला, का ते शेतात बैलाच्या तोंडाला जाळी बांधुन खुरपणी का काय करतात तसं असतं तुमच्याकडं,

प्यारे१'s picture

24 Jan 2012 - 9:39 am | प्यारे१

>>>शेतात बैलाच्या तोंडाला जाळी बांधुन

सौ ५० फक्त काहीतरी पदार्थ बनवत आहेत आणि ५० फक्त स्वाईन फ्ल्यूच्या वेळची जाळी तोंडाला बांधून चुळबूळ करीत बसले आहेत असे चित्र डोळ्यापुढे आले. ;)
कढईत हात घालायला 'विवक्षित कारणां'मुळं बंदी असल्याचं गोपनीय सूत्रांकडून समजतं. ;)

मुक्त विहारि's picture

23 Jan 2012 - 6:18 pm | मुक्त विहारि

सिनेमात इतक्यावेळा "गाजर हलवा आणि मुळ्याचे परोठे" बघितले आहेत की, ते फक्त कलाकारान्चेच अन्न आहे असे वाटत होते.....पण "गाजर हलवा " अधिक मजेशिर करण्यात पण एक वेगळीच कला आहे....

खरेच पाक "शास्त्र " हे कधि कधि "कले" कडे पण झुकते.....

स्वाती२'s picture

23 Jan 2012 - 6:35 pm | स्वाती२

अगं काय भन्नाट आयडिया!

स्वाती दिनेश's picture

23 Jan 2012 - 8:40 pm | स्वाती दिनेश

मस्त, मस्तच एकदम!
स्वाती

विशाखा राऊत's picture

23 Jan 2012 - 8:43 pm | विशाखा राऊत

धन्य आहेस

सानिके, का असं वागतेस?
आता गाजर हलवा करणे आले.
बाकी शेवटचा फोटू म्हणजे कॅटरिना!

गणेशा's picture

23 Jan 2012 - 9:54 pm | गणेशा

अप्रतिम

अन्नू's picture

24 Jan 2012 - 12:24 am | अन्नू

सानिकाजी का... ? का.. असे पदार्थ दाख्वुन आमचे आत्मे तळमळवता तुंम्ही?
नाही नाही सहन होत हे आता! बघवत नाही हो शेवटच्या फोटुक्कडे

( त्या फोटुमुळेच तर पाच पाच मिनिटाला हे पान उघडतोय! ;) )

न्हाय यीसरायला यायचा ह्यो पदार्थ आता-
"गाजराचा हलवा पाय !!" ;)

चित्रा's picture

24 Jan 2012 - 1:22 am | चित्रा

ट्विस्ट भलतीच छान.

सविता००१'s picture

24 Jan 2012 - 1:16 pm | सविता००१

बेक्कार रेशिपी हाये :)
सानिका, काय चालवलं आहेस तू? आता मला करायलाच लागणार आहे गाजर हलवा पाय ;)

इन्दुसुता's picture

25 Jan 2012 - 6:34 am | इन्दुसुता

विन्ट्रेश्टींग हो... तुम्ही आधी दिलेल्या काही पाककृती करुन पाहिल्यात आणि त्या चांगल्या झाल्या होत्या त्यामुळे ही पाकृ पण करून बघेन ( तुम्ही दिलीत म्हणून, एरवी मी फ्युजनच्या भानगडीत अजिबात पडले नसते... ) :)

मदनबाण's picture

25 Jan 2012 - 7:52 am | मदनबाण

खल्लास ! :)

विसोबा खेचर's picture

25 Jan 2012 - 10:39 am | विसोबा खेचर

!!!!!!!!!

jaypal's picture

25 Jan 2012 - 12:52 pm | jaypal

carot

दिपक's picture

25 Jan 2012 - 2:41 pm | दिपक

सानिकास्वप्निल's picture

25 Jan 2012 - 5:52 pm | सानिकास्वप्निल

धन्यवाद सगळ्यांना पाकृ आवडल्याबद्दल :)

ओ सानिकातै, तुम्ही कुठे असता हो? मी येऊ का हे असले प्रकार खायला तुमच्याकडे?

मीनल's picture

26 Jan 2012 - 5:44 am | मीनल

त्या गणपा ला आणि हिला पण कुणीतरी धोपटूनकाढा रे !ऊत आणला आहे दोघांनी!
रेसिपी बाकी टी. ओ .पी!!!!

पैसा's picture

26 Jan 2012 - 8:39 am | पैसा

कोणीतरी एक प्रोग्राम तयार करा रे. या काही लोकांचे धागे आले की "छान" "अप्रतिम" "मेलो" अशा प्रतिक्रिया धागा न उघडताच दिल्या जातील असा. रोज तेच काय लिहायचं?

प्राजक्ता पवार's picture

26 Jan 2012 - 9:06 pm | प्राजक्ता पवार

गाजर हलव्याच्या पाकृला दिलेला ट्विस्ट खुप आवडला :)