✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे.

भ
भिकापाटील यांनी
गुरुवार, 01/05/2012 - 10:09  ·  लेख
लेख
मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो, वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ.. तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते. माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते. घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे. घरात त्यामुळे नेहेम्मी तणावाचे वातावरण रहाते. संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. :( तशी ती एकदम चांगली आहे. तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22770 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

जाउद्या

पप्पु अंकल
गुरुवार, 01/05/2012 - 10:21 नवीन
सोडुन द्या ओ
  • Log in or register to post comments

बायकोला

पप्पु अंकल
Fri, 01/06/2012 - 10:08 नवीन
बायकोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पु अंकल

BSNL net कनेक्शन आहे का..?

मोदक
Sat, 01/07/2012 - 00:35 नवीन
जाउद्या सोडुन द्या ओ - प्रेषक पप्पु अंकल गुरुवार, 05/01/2012 - 10:21. बायकोला - प्रेषक पप्पु अंकल Fri, 06/01/2012 - 10:08. BSNL net कनेक्शन आहे का..? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पप्पु अंकल

आपुन

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 01/05/2012 - 10:23 नवीन
आपुन नक्की कोन म्हनायचं? ;)
  • Log in or register to post comments

"गविकाकांचा सल्ला" या सदरात

गवि
गुरुवार, 01/05/2012 - 10:29 नवीन
"गविकाकांचा सल्ला" या सदरात जोपर्यंत हा प्रश्न येत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर देणार नाही..
  • Log in or register to post comments

-१

दादा कोंडके
गुरुवार, 01/05/2012 - 11:03 नवीन
सल्ल्याची सदरं स्त्री नावानं चालवल्यास जास्त टीआरपी मिळतो असा आण्भव आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

असा आण्भव आहे

चिंतामणी
गुरुवार, 01/05/2012 - 17:20 नवीन
हे हे हे. इथेच "ताईचा सल्ला" किती गाजला होता तुला माहीत नाही का? वाचुन बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

घोर समस्या...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/05/2012 - 10:39 नवीन
लग्नाला किती वर्षे झाली? मुलं-बाळं आहेत का ह्यावर सल्ला अवलंबून आहे. नविन लग्न असेल आणि मुलं बाळं नसतील तर वेगळे होणे हा एकमेव मार्ग आहे. कारण, 'संशय' ह्या रोगावर औषध नाही. मुलं-बाळं असतील तर मात्र नवरा-बायकोच्या भूमिकेतून बाहेर पडून पालक बना. आहे त्याच विवाह बंधनात राहून समस्या सौम्य करण्याचा प्रयत्न करा. जसे की समुपदेशन. कारण मुलांना आई-वडील दोघेही हवे असतात. वागण्यात पारदर्शकता आणा. मोबाईलचे कॉल्स स्पिकरफोन वर घ्या. मेव्हणीला समस्या समजावून सांगून भेटणे-बोलणे टाळा.
  • Log in or register to post comments

अहो पण...

पिवळा डांबिस
Fri, 01/06/2012 - 01:24 नवीन
तशी ती एकदम चांगली आहे. आता काय करायचं? आली का पंचाईत? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

संशयकल्लोळ...सल्ला हवा

अन्या दातार
गुरुवार, 01/05/2012 - 10:54 नवीन
संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे. भिकापाटील's picture प्रेषक भिकापाटील गुरुवार, 05/01/2012 - 10:09 लेखकाचे प्रोफाईल | सर्व लेखन | खरडवही | संदेश पाठवा. कथा: ही तुमची कथा आहे हे समजू शकतो. ok कला: संशय असणे ही कला आहे का? प्रयोजन कळले नाही. नृत्य: संशयात तांडव नृत्य वगैरे होते का घरात? संगीत: तुम्हाला बायकोचा राग येत असेल कदाचित, पण तो संगीत या धोरणात बसत नाही. धोरण: हेही एकवेळ मान्य नाट्य: घरातील घडामोडी नाट्यमय आहेत वाटतं! प्रेमकाव्य: या धाग्यात काव्य ते कुठले?? तेही प्रेमकाव्य? :puzzled: मांडणी: संस्कृती वावर भाषा राहती जागा: याचा काय संबंध??? :puzzled: इतिहास: किती वर्षांपासून समस्या आहे हे तरी सांगा मग. नोकरी: बायकोकडे असलेली नोकरी का? शब्दार्थ: कुठल्या शब्दाचा अर्थ हवा? :puzzled: समाज जीवनमान राहणी राशी: त्यासंबंधीही मार्गदर्शन हवे आहे काय? रेखाटन: एकही चित्र का दिसत नाहीये? की आम्हीच कल्पायचे आहे? प्रकटन मत: मत मागवत आहात की देत आहात? लेख विचार: यात कुणी विचार करणे अपेक्षित आहे? शुभेच्छा: कुणी कुणाला दिल्या? सद्भावना: अभिनंदन: कशाबद्दल अभिनंदन? प्रतिसाद सल्ला अनुभव प्रश्नोत्तरे मदत माहिती प्रतिक्रिया आस्वाद: पब्लिकने तुमच्या प्रश्नाचा मिटक्या मारत आस्वाद घ्यायचाय का? धडा: ज्या गोष्टींचा अर्थाअर्थी तुमच्या धाग्याशी संबंध नाही, असे मांडणीप्रकार टाळा. (इतकीच प्रतिक्रिया देता आली असती, पण नंतर स्पष्टीकरणे देण्यापेक्षा आत्ताच क्लिअर केलेले बरे) मूळ धाग्यातील प्रश्नाबद्दलः मला कधीही सदर समस्या भेडसावली नसल्याने माझा पास!
  • Log in or register to post comments

जबर्या रिप्लाय

गणेशा
गुरुवार, 01/05/2012 - 15:25 नवीन
जबर्या रिप्लाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

तुमच्या पत्नीला असा संशय यावा

गवि
गुरुवार, 01/05/2012 - 10:55 नवीन
तुमच्या पत्नीला असा संशय यावा म्हणजे तुम्ही अजूनही चांगलेच चार्मिंग असल्याचा पुरावा आहे.. आमच्याकडे पत्नीने अस्मादिकांच्या एकूण ठेवणीवरुन आणि सहवासाने चांगलेच ओळखले (की जोखले) असल्याने "आपल्या पतीचे इतर कोण्या स्त्रीशी प्रकरण" ही शंका दुरुनही माझ्या पत्नीस येत नाही.. मी कधीकधी उलट संशय रुजवण्याचा प्रयत्न केला तरी कुत्सित हास्य पदरी पडते....
  • Log in or register to post comments

(No subject)

मराठी_माणूस
गुरुवार, 01/05/2012 - 11:06 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

..

सुहास झेले
गुरुवार, 01/05/2012 - 12:44 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ह्हा ह्हा ह्हा.....

मन१
गुरुवार, 01/05/2012 - 14:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

अनुराग
गुरुवार, 01/05/2012 - 17:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी बरेच प्रयोग करुन

विजुभाऊ
गुरुवार, 01/05/2012 - 20:56 नवीन
मी बरेच प्रयोग करुन पाहिलेत. बायकोला माझा संशय का येत नाही याचाच मला आता संशय घ्यायला लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवी अन तुम्ही --^--

पाषाणभेद
Fri, 01/06/2012 - 00:33 नवीन
गवी अन तुम्ही --^--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जीव द्या. हे असले धागे

मृत्युन्जय
गुरुवार, 01/05/2012 - 11:06 नवीन
जीव द्या. हे असले धागे मिपावर काढुन मिपाची बँडविड्थ कशाल फुकट घालवताय? आचरटपणाचा कळस झाला हा. जर तुम्ही जे काही लिहले ते खरे असेल तर तुम्ही मुर्ख आहात आणि मिपावर टाकताय म्हणजे महामुर्ख आहात. जर उगाच टाइमपास असेल (ज्याची शक्यता जास्त वाटते आहे खासकरुन लेखाचे विषय आणि वर्गीकरण बघता) तर आचरटपणाचा कळस झाला हा. सार्वजनिक संस्थळांवर लिहिताना आपण काय लिहितो आहोत कुठे लिहितो आहोत याचे भान असावे. मिपावर अजुनतरी अगोनी आंटी चे सदर सुरु झालेले नाही आहे. जर असले धागे काढुन आपण योग्य सल्ल्याची अथवा करमणुकीची अपेक्षा करत असाल तर आपण मिपाचा दुरुपयोग करत आहात एवढेच म्हणेन. 'बाकी आपण सूज्ञ आहातच '' असे म्हटले असते पण तसे वाटत नसल्यामुळे क्षमस्व.
  • Log in or register to post comments

...घ्या... घोटलात ना माझ्या

गवि
गुरुवार, 01/05/2012 - 11:08 नवीन
...घ्या... घोटलात ना माझ्या "गविकाकांचा सल्ला" या भावी सदराचा गळा.. ...?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मंद अर्थव्यवस्थेत हे असं

रेवती
Fri, 01/06/2012 - 01:02 नवीन
मंद अर्थव्यवस्थेत हे असं व्हायचच.;) माझं वधुवर सूचक मंडळ नाही का कांपिटीसनमुळं बंद पडलं. तरी अजून दोन चार बरी नातवंडं चौकशी (चौकश्या) करतात हो माझी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो तर!! मी आठवड्यातुन दोनदा

शिल्पा ब
Sat, 01/07/2012 - 11:53 नवीन
हो तर!! मी आठवड्यातुन दोनदा फोनवते ना रव्तीआज्जीला..हो की नै गं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 11:18 नवीन
मृत्युन्जय शी सहमत सं.मं. काही करेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सं.मं. काही करेल का?? जर

गणपा
गुरुवार, 01/05/2012 - 15:39 नवीन
सं.मं. काही करेल का??
जर तुमच्या मता प्रमाणे धागा दखलपात्र नाही तर फुका प्रतिसाद देऊन प्रोत्साहन का द्यावं.? इतके परीसाद आलेले पहाता मिपाकरांना बरेच दिवसांनी एक टीपी धागा मिळाला आहे असं वाटत. त्यांच हे सुख हिरावून घेऊ इच्छीत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

गणपा भौ

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 16:22 नवीन
तुझ्या मता विषयी अपार आदर आहे. तसेही धाग्यापेक्षाही सन्माननीय प्.रा. यांच्या प्रतिसादामुळे हा धागा असाच ठेवावा अशी नम्र विनंती आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

भले शाब्बास!

पिवळा डांबिस
Fri, 01/06/2012 - 00:58 नवीन
त्यांच हे सुख हिरावून घेऊ इच्छीत नाही. म्हनूनच आमाला हा गंपा लई आवाडतो!!!! जियो!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

जीव द्या. असं सांगू नका,

सूड
गुरुवार, 01/05/2012 - 23:08 नवीन
जीव द्या. असं सांगू नका, धाग्याचं वर्गीकरण बघता धागाकर्त्याचे काही संभाव्य धागे: >> ईथल्या लोकांच्या सांगण्यावरुन मी जीव दिला, माझ्या इच्छा अपूर्ण राह्यल्यात . पिंडाला कावळा शिवू नये म्हणून काय करु ? चित्रगुप्ताने अडवलंय, स्वर्गात सोय व्हावी म्हणून काय कराच्चं कोणी सांगेल का ? किंवा स्वर्गात आलोय, कोणत्या अप्सरेचे नृत्य पहावे ? किंवा माझी आर्टिस्ट अप्सरा ( सोबत ,अर्थातच मी ) किंवा मी जीव दिला खरा , बायको माझ्यासोबत सती गेली. कोणत्याही अप्सरेची जरा विचारपूस केली की बायको संशयाने बघते आता काय करु ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

त्याच्या आधी, आता जीव द्यायचा

कवितानागेश
Fri, 01/06/2012 - 10:30 नवीन
:D त्याच्या आधी, आता जीव द्यायचा तर ठरवलंय, ... पण आत्महत्येचा गुन्हा नोंदवला न जाता, सहज सोप्या, विनाकटकटीच्या हमखास यशाच्या मार्गानी, जीव कसा द्यावा याची चर्चा होईल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अहो भिकाजी, घेऊ द्या की तिला

सोत्रि
गुरुवार, 01/05/2012 - 11:21 नवीन
अहो भिकाजी, घेऊ द्या की तिला संशय. काहीतरी विरंगुळा नको माणसाला? त्यात त्या पडल्या बाईमाणूस :) आणि तुम्ही तरी एवढे सळो की पळो का होत आहात, नाही 'खाई त्याला खवखवे' ही म्हण सहज आठवली म्हणून विचारतोय. - (संशयी बायको नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

कै च्या कै.

किसन शिंदे
गुरुवार, 01/05/2012 - 11:28 नवीन
आज बायको संशय घेते म्हणून धागा काढलात उद्या बायकोच्या नकळत मेहूणीशी लपुनछपून कसे बोलता येईल? म्हणून धागा काढाल. तेज्यायला अति होतयं हे.
  • Log in or register to post comments

व्वा!!

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 13:49 नवीन
अँड्रॉइड वाले भा.सं. योग्य प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

भा.सं. हाहाहाहा लय भारी !!!

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/05/2012 - 15:47 नवीन
भा.सं.
हाहाहाहा लय भारी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

इतकेच काय, ती मला माझ्या

सुहास..
गुरुवार, 01/05/2012 - 11:30 नवीन
इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही >>>>
  • Log in or register to post comments

हाहाहा.... लैच भारी

सुहास झेले
गुरुवार, 01/05/2012 - 12:49 नवीन
हाहाहा.... लैच भारी :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहास..

चिंतामणी
Fri, 01/06/2012 - 01:46 नवीन
:bigsmile: :p :-p :tongue: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सोप्पय हो!!!

उदय के'सागर
गुरुवार, 01/05/2012 - 12:38 नवीन
तुम्हि हि तुमच्या पत्नि वर संशय घ्या... ति अगदि भाजीवाल्या/दुधवाल्याशी बोलत असेल तरी तिच्यावर संशय घेउन (कचाकचा) भांडा. तिलाहि तुमच्या भावाशि (नसेल तर मित्रांशि) बोलु देउ नका... असं केल्याने तुमच्या पत्नि हि मग एक धागा काढतिल मिपावर... (कदाचित त्याहि मग मिपाकरांच मनोरंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतिल) ... मग तुम्हि दोघेहि आपआपले असे हे 'सार्वजनीक' धागे उघडुन त्याच्या प्रतिक्रिया वाचा आणि तुमच्या 'व्ययक्तिक' अयुष्याचा काय तो निर्णय घ्या... नाहि का? .. अरे हाय काय नाय काय... सोप्पय हो.... असे 'सळोकीपळो ' नका होऊ....
  • Log in or register to post comments

लय भारी

किसन शिंदे
गुरुवार, 01/05/2012 - 12:54 नवीन
असं केल्याने तुमच्या पत्नि हि मग एक धागा काढतिल मिपावर... (कदाचित त्याहि मग मिपाकरांच मनोरंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतिल) ... मग तुम्हि दोघेहि आपआपले असे हे 'सार्वजनीक' धागे उघडुन त्याच्या प्रतिक्रिया वाचा आणि तुमच्या 'व्ययक्तिक' अयुष्याचा काय तो निर्णय घ्या... नाहि का? .. अरे हाय काय नाय काय... सोप्पय हो.... असे 'सळोकीपळो ' नका होऊ....
ह्यॅह्यॅ ह्यॅ =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

काय बोलावं.... ?

सुहास झेले
गुरुवार, 01/05/2012 - 13:00 नवीन
कथा कला नृत्य संगीत धोरण नाट्य प्रेमकाव्य मांडणी संस्कृती वावर भाषा राहती जागा इतिहास नोकरी शब्दार्थ समाज जीवनमान राहणी राशी रेखाटन प्रकटन मत लेख विचार शुभेच्छा सद्भावना अभिनंदन प्रतिसाद सल्ला अनुभव प्रश्नोत्तरे मदत माहिती प्रतिक्रिया आस्वाद हा धागा इतक्या सदरात मोडत असल्याने, प्रतिक्रिया देण्याची हिम्मत होत नाही..... चालू द्या पाटील :) अवांतर - सळोकीपळो, संशयकल्लोळ ह्या नावाने सदर ही सुरु करायला हरकत नाही ;)
  • Log in or register to post comments

संन्यास घ्या! अवांतरः 'मदत

कवितानागेश
गुरुवार, 01/05/2012 - 13:29 नवीन
संन्यास घ्या! ;) अवांतरः 'मदत हवी' म्हणून वेगळा विभाग सुरु करायला हवा. मलादेखिल फार फार हौस आहे मदत करायची!
  • Log in or register to post comments

धाग्याचा रोख पाहता हे असं

५० फक्त
गुरुवार, 01/05/2012 - 13:40 नवीन
धाग्याचा रोख पाहता हे असं वाचलं, संन्यास घ्या! अवांतरः 'मयत हवी' म्हणून वेगळा विभाग सुरु करायला हवा. मलादेखिल फार फार हौस आहे मयत करायची! अवांतर - घाबरु नका, मी देतो तुम्हाला सल्ला, इस. ११३२ ते १२२९- अवतार क्र, २३, इस १२९३ ते १३२३ अवतार क्र, २९, इस १४५६ ते १५९८ अवतार क्र, ४५, इस १७५६ ते १९२३ अवतार क्र. साडेबत्त्तेचाळीस, या सगळ्या अवतारात मला या प्रकाराचा त्रास झालाय, मी नक्की देतो तुम्हाला सल्ला, आज घरी गेलो की या सगळ्या अवतारातल्या डाय-यांचे पिडिएफ वाचुन पाहतो अन परवा दिवशी देतो सल्ल्ला. नाहीतर असं करता का ८ च्या कट्ट्याला २०४७८९७५५४५०८.९४५८०४ टेराबाईटची हार्ड डिस्क घेउन येता का ? तुम्हाला सगळे पिडिएफ कॉपी पेस्ट करुन देतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

_/\_

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 13:51 नवीन
लै भा हा री ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हे म्हणजे रोगापेक्षा औषध

विवेक मोडक
गुरुवार, 01/05/2012 - 13:53 नवीन
हे म्हणजे रोगापेक्षा औषध भयानक अशी परिस्थिती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मग

चिरोटा
गुरुवार, 01/05/2012 - 14:10 नवीन
मी काय करु?
ज्या स्त्रियांशी आपण बोलता- मेव्हणी,ऑफिसातल्यातील स्त्रिया वगैरे, त्या सर्वांविषयी बायकोकडे वाईट बोला. उ.दा. मेव्हणी अगदीच बावळट दिसते,ऑफिसातल्या स्त्रिया अगदीच बिनडोक आहेत वगैरे. बायको नॉर्मल होईल.
  • Log in or register to post comments

चुकीची थिअरी...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/05/2012 - 14:36 नवीन
बायको नॉर्मल होईल. फारच भाबडा प्रतिसाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

??

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/05/2012 - 14:42 नवीन
प्र. का. टा. आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

हा हा हा....सहीच

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/05/2012 - 23:34 नवीन
हा हा हा....सहीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

सरवांना दन्यवाद. आपला आभारी

भिकापाटील
गुरुवार, 01/05/2012 - 14:36 नवीन
सरवांना दन्यवाद. आपला आभारी आहे. @जेटाज्जी. संन्यास आता शक्य नाही. धन्यवाद. :) @चिरोटाकाका थेंन्क्स. हा सल्ला मोलाचा वाटतो. ह्याचा उपयोग करुन पाहतो. :) @पेठकरकाका. मला दोन अपत्ये आहेत. :) @गवि ,,, का लाजवताय म्हाराजा. मी एक साधासुधा कुटुंबवत्सल माणूस आहे. तुम्ही जसा चार्मिंग वगैरे म्हणत आहात तसा बिलकूल नाही. :D uravareet 50 fakt, pappu uncle, anyaa dataar, spa, kisanshinde, marathi_manus, misalalela kavyapremi yanan anek dhanyavaad. namaskar.
  • Log in or register to post comments

आयला गविंनी चार मिंग म्हणलं

५० फक्त
गुरुवार, 01/05/2012 - 14:42 नवीन
आयला गविंनी चार मिंग म्हणलं की लगेच त्यांना महाराजा आणि आम्ही जन्मोजन्मीची आयुष्यं खर्च करुन मिळालेली शिकवण देतो म्हणलं तर मराठी अभिव्यक्ती मराठीतुन व्यक्त करणा-या संस्थळावर आमचं नाव इंग्रजीमध्ये. अन्याय अन्याय अन्याय अन्याय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

@५० फक्तः कुठे बसताय

मनराव
गुरुवार, 01/05/2012 - 14:48 नवीन
@५० फक्तः कुठे बसताय उपोषणाला........??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

का उगी अरविंद केजरीवालच्या

५० फक्त
गुरुवार, 01/05/2012 - 15:01 नवीन
का उगी अरविंद केजरीवालच्या रोलमध्ये घुसताय ओ आयला, मला इथं कट्ट्याची स्वप्नं पड्त आहेत तर तुम्हाला उपोषणाचं सुचतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा