✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपली तर काय.....

व — वपाडाव, Mon, 11/14/2011 - 14:19
आपली तर काय लायकीच नाय तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... .................तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय ! .................आपली तर काय.... तू अटलांटिक महा सागरातला "शार्क" आपण गटारातला अमीबा पण नाय ! आपली तर काय..... .................तू Rolls Royce ची कार .................आपण nano चा nut पण नाय! .................आपली तर काय.... तू I.I.T. ची इमारत आपण Z.P. च्या बाकावर पण बसलो नाय ! आपली तर काय.... .................तू तिरुपतीचं संस्थान .................आपण झाडाखालचा शेंदुर फासलेला दगड पण नाय! .................आपली तर काय..... तू ''मिसळपाव'' ची owner आपला तर तिथे एक thread पण नाय !! आपली तर काय लायकीच नाय.......... - Kale Pushpak (काळे पुष्पक) १४ नोव्हेंबर २०११

प्रतिक्रिया द्या
15054 वाचन

💬 प्रतिसाद (73)

हॅहॅहॅ....

किसन शिंदे
Mon, 11/14/2011 - 14:23 नवीन
=)) =)) =)) तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... हे तर भारीच. .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय ! .................आपली तर काय.... अनं हे तर त्याहूनही भारी!
  • Log in or register to post comments

जियो व.प्या जियो तु तर

पियुशा
Wed, 11/16/2011 - 10:31 नवीन
जियो व.प्या जियो ;) तु तर महान्..................कवी झालास रे ;) ऑटोग्राफ आत्ताच देउन टाक बर्र.................;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मज्जा... मस्त..

गवि
Mon, 11/14/2011 - 14:27 नवीन
मज्जा... मस्त..
  • Log in or register to post comments

मस्त!

मन१
Mon, 11/14/2011 - 14:38 नवीन
अशाच "टोन" मधली एक कविता http://belekar.blogspot.com/2009/05/blog-post.html इथे सापडेल. "च्यायला आपली लायकीच नव्हती " हे त्यातलं पालुपद आणि "आपली तर काय लायकीच नाय" हे तुमचं. दोन्ही फर्मास.
  • Log in or register to post comments

आवडल्या गेले आहे.

सूड
Mon, 11/14/2011 - 14:42 नवीन
आवडल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments

हम्म

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 11/14/2011 - 14:51 नवीन
वड्या लै भारी!! तुमचे काव्य वाचले आणि वाटले, आपली तर काय...
  • Log in or register to post comments

किसन, गवि, मन१, सुड व मिका या

वपाडाव
Mon, 11/14/2011 - 15:06 नवीन
किसन, गवि, मन१, सुड व मिका या सर्वांचे आभार......
  • Log in or register to post comments

छान आहे ! आवडेश

गणेशा
Mon, 11/14/2011 - 15:14 नवीन
छान आहे ! आवडेश
  • Log in or register to post comments

मस्त रे वड्या.

मदनबाण
Mon, 11/14/2011 - 15:15 नवीन
मस्त रे वड्या. ;)
  • Log in or register to post comments

मस्त (अवांतर : तू I.I.T. ची

मराठी_माणूस
Mon, 11/14/2011 - 15:16 नवीन
मस्त (अवांतर : तू I.I.T. ची इमारत ऐवजी तु संसदेची ईमारत कसे वाटते थोडेसे zp शि नाते सांगणारे)
  • Log in or register to post comments

धन्यवाद .....

वपाडाव
Mon, 11/14/2011 - 16:15 नवीन
अ‍ॅक्चुअली, साहेब तसं लिहिण्यास हरकत नाही.... पण IIT व झेड.पीच्या शाळा यांच्यातील तफावत दाखवायची आहे ना त्यात..... ते दोन्हीही आहेत सरकारचेच पण दोहोंत जमीन-अस्मानीचा फरक आहे....हे यातुन दाखवुन द्यायचे होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

कविता आवडली

अन्या दातार
Mon, 11/14/2011 - 15:19 नवीन
साक्षात्कार झालेला दिसतोय ;)
  • Log in or register to post comments

भारी रे दादा... एक तांत्रिक

धन्या
Mon, 11/14/2011 - 16:15 नवीन
भारी रे दादा... एक तांत्रिक चुक आहे. पण तेव्हढं चालतं. ;)
  • Log in or register to post comments

धन्यु...

वपाडाव
Mon, 11/14/2011 - 16:16 नवीन
धनाजीराव, मराठी माणुस, गणेशा, अन्या व मदनबाण यांचेही आभार...
  • Log in or register to post comments

जमलय !!!

फिझा
Mon, 11/14/2011 - 16:26 नवीन
जमलय !!! वडापाव !!! वपाडाव !!!
  • Log in or register to post comments

जमलय म्हणजे काय?

धन्या
Mon, 11/14/2011 - 17:11 नवीन
जमलय म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फिझा

जमलय म्हणजे काय? >> चवकशीतज्ञ

सुहास..
Mon, 11/14/2011 - 19:25 नवीन
जमलय म्हणजे काय? >> चवकशीतज्ञ ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

..

मी-सौरभ
Fri, 12/09/2011 - 18:56 नवीन
दही जमलं असावं बहुतेक आनी ते पण चांदीच्या भांड्यात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

काय रे?

पैसा
Mon, 11/14/2011 - 17:17 नवीन
मिसळपावची owner? तेवढं सोडलं तर मस्त! फक्त ही कोणा "पाशवी शक्ती"ला उद्देशून लिहिलेली कविता आहे हे समजलं, त्यामुळे माफ!!! ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद फिझा अन पैसातै......

वपाडाव
Mon, 11/14/2011 - 17:23 नवीन
तो फक्त एक दाखला आहे हो.... ही कविता पुर्वी मराठी कविता ऑर्कुटवर प्रकाशित केलेली होती... त्या अनुशंगाने लिहिले होते.... इथे मिसळपाव लिहिले... बाकी भावना त्याच..... आमच्या तुच्छतेचा अन तिच्या भव्यतेचा दाखला देणार्‍या.....
  • Log in or register to post comments

छान जमलीये.

दादा कोंडके
Mon, 11/14/2011 - 17:25 नवीन
आम्हाला काही म्हणायला जागाच ठेवली नाही की! :D
  • Log in or register to post comments

मस्त

स्मिता.
Mon, 11/14/2011 - 17:47 नवीन
मस्त जमलीये कविता. तू Rolls Royce ची कार .................आपण nano चा nut पण नाय! .................आपली तर काय.... हे सगळ्यात आवडलं.
  • Log in or register to post comments

धन्यु....

वपाडाव
Mon, 11/14/2011 - 17:51 नवीन
दादा अन स्मिता यांचे आभार.....
  • Log in or register to post comments

च्यायला ...

छोटा डॉन
Mon, 11/14/2011 - 18:10 नवीन
तू ''मिसळपाव'' ची owner आपला तर तिथे एक thread पण नाय !!
च्यामारी ... ह्या प्रकाराची आम्हाला खबरच नव्हती राव, काय भांजगड आहे नक्की ? ;) बाकी कविता छानच. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हा हा हा ... सहीच !!

सुहास झेले
Mon, 11/14/2011 - 18:15 नवीन
हा हा हा ... सहीच !!
  • Log in or register to post comments

छान !छान ! पण ...

वाहीदा
Mon, 11/14/2011 - 18:17 नवीन
हि ''मिसळपाव'' ची owner कोण रे ?? <<शोध-मोड ऑन> निलकांत ला बहिण आहे का ? :? बाय द वे वप्या, तुझे मिसळपाव वर बरेच थ्रेड आहेत हो अवांतर -- शोध-मोड ऑफ लवकर होणे नाही ;-)
  • Log in or register to post comments

= नथिंग क्रिप्टिक =

वपाडाव
Wed, 11/16/2011 - 09:25 नवीन
इथे बर्‍याच जणांचा गैरसमज होतो आहे..... मी काहीही क्रिप्टिक लिहिलेलं नाहीये.... आणी कुणालाही बळंच उद्देशुनही लिहिलं नाही.... फक्त उच्च-नीचतेची तफावत दाखवण्यासाठी म्हणुन तो दाखला दिला आहे..... त्यामुळे गैरसमज नसावा...... - (गोष्टी क्लियर करणारा) वपाडाव छोटा डॉन, वाहिदा अन सुहास झेले यांचेही आभार.......
  • Log in or register to post comments

नथिंग क्रिप्टिक ?

आत्मशून्य
Mon, 11/14/2011 - 19:16 नवीन
असं कसं ? सगळं कळल की हो लोकांना....
  • Log in or register to post comments

कवितेत दोन गोष्टींमधली तफावत

रेवती
Mon, 11/14/2011 - 19:22 नवीन
कवितेत दोन गोष्टींमधली तफावत चांगली दाखवली आहे. कविता आवडली फक्त "तू ''मिसळपाव'' ची owner" पाशी येऊन जरा अडतय.;)
  • Log in or register to post comments

मस्त !!

मोहनराव
Mon, 11/14/2011 - 19:23 नवीन
लई भारी वपाडाव!!
  • Log in or register to post comments

मस्त!!

पूनम ब
Mon, 11/14/2011 - 19:30 नवीन
एकदम मस्त !! :)
  • Log in or register to post comments

मस्त मस्त ....

जयवी
Mon, 11/14/2011 - 19:35 नवीन
मस्त मस्त .... :)
  • Log in or register to post comments

हा हा. ढकलपत्र ष्टाईल कविता.

नगरीनिरंजन
Mon, 11/14/2011 - 20:44 नवीन
हा हा. ढकलपत्र ष्टाईल कविता. गमतीदार.
  • Log in or register to post comments

भारी रे भाउ!

नावातकायआहे
Mon, 11/14/2011 - 22:49 नवीन
सही जमलेय!
  • Log in or register to post comments

भारी

Nile
Mon, 11/14/2011 - 23:04 नवीन
कविता आवडली. पण फार लहान वाटली. अजून दोनचार कडवी घालून अजून मजेदार करता येईल. तू काय सोनियाचा जावई आम्ही तर संघात पण नाय ;-)
  • Log in or register to post comments

मस्तच रे.....

वपाडाव
Tue, 11/15/2011 - 09:38 नवीन
नाइलने सांगितल्याप्रमाणे अजुन तुम्ही लोक एकेक कडवं प्रतिसादांत डकवत चला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे घे,

दादा कोंडके
Tue, 11/15/2011 - 15:09 नवीन
तू काय अ‍ॅप्पल चा आयफोन, आपण तर काय नोकिया ३३५० पन नाय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

३३१० मित्रा!

Nile
Wed, 11/16/2011 - 01:24 नवीन
३३१० रे. ३३५० नंतरचा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

व्हय व्हय!

दादा कोंडके
Wed, 11/16/2011 - 02:09 नवीन
वलकला! आक्षी बराबर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

भारी -

विदेश
Tue, 11/15/2011 - 00:32 नवीन
तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... षटकारानेच सुरुवात केली .. पुढे तर चौफेर फटकेबाजी ! मजा आली वाचताना .
  • Log in or register to post comments

प्रस्तूत कवितेवर प्रतिसाद

पाषाणभेद
Tue, 11/15/2011 - 01:41 नवीन
प्रस्तूत कवितेवर प्रतिसाद देण्याची आपली तर काय लायकीच नाय :-)
  • Log in or register to post comments

पाभे, विदेश, नाइल, ननि,

वपाडाव
Tue, 11/15/2011 - 09:40 नवीन
पाभे, विदेश, नाइल, ननि, नावातकाय, रेवतीजी, पुनम ब, मोहनराव, आत्मशुन्य, जयवी आपणा सर्वांचे आभार......
  • Log in or register to post comments

नतमस्तक....

प्रभाकर पेठकर
Tue, 11/15/2011 - 10:48 नवीन
तू कविवर्य एवढा मोठ्ठा आपली तर कुठे चारोळी पण नाय आपली तर काय......
  • Log in or register to post comments

व्वा

michmadhura
Tue, 11/15/2011 - 10:53 नवीन
मजा आली वाचताना. मस्त आहे कविता.
  • Log in or register to post comments

खी खी खी....

सोत्रि
Tue, 11/15/2011 - 10:55 नवीन
तू विशालकाय वडाचं झाड़, आपण लाजाळुचे पान पण नाय !
ह्याचा शब्दश: अर्थ घेतला आणि तुझा आकार आठवला, कसली चपखल बसतेय ही उपमा असे वाटून खदाखदा हसू आले. :lol: :) :lol: - ('पाताळविजयं'मधील राक्षसासारखा खदाखदा हसणारा) सोकाजी अवांतर: बाकी कविता मस्त जमलीय, फक्कड!
  • Log in or register to post comments

झक्क कविता

lakhu risbud
Tue, 11/15/2011 - 12:24 नवीन
झक्क कविता,वाचून तुला पण अशीच एखादी लायकी नसणारी भेटती का बघ. तू विशालकाय वडाचं झाड़, आपण लाजाळुचे पान पण नाय ! बाकी विशालकाय वडाच झाड ऐवजी एखाद्या शोभेच्या फुलाची उपमा कशी वाटते ?
  • Log in or register to post comments

मस्त रे वप्या. मजा आली

प्रचेतस
Tue, 11/15/2011 - 13:02 नवीन
मस्त रे वप्या. मजा आली वाचून. अजून अशा भन्नाट कविता येउंदेत.
  • Log in or register to post comments

हि ''मिसळपाव'' ची owner कोण

मृत्युन्जय
Tue, 11/15/2011 - 13:22 नवीन
हि ''मिसळपाव'' ची owner कोण रे ??
  • Log in or register to post comments

तू McD चा pizza बरोबरच आहे मक

किचेन
Tue, 11/15/2011 - 13:23 नवीन
तू McD चा pizza बरोबरच आहे मक डी = बर्गर +फ्रेंच फ्राईज +कोक पिझ्झा मिळतो का मक-डित. खर तर तुम्हि एव्ध सगळ लिहिलय आप्लि तर बोलायचि पण लायकि नाय? :(
  • Log in or register to post comments

हेच

स्मिता.
Tue, 11/15/2011 - 15:38 नवीन
हाच प्रश्न मलाही पडला होता बरं का वापाडाव! मॅक डी त पिझ्झा नाही ना मिळत... ते मॅकडीचा बर्गर किंवा डॉमिनोजचा पिझ्झा असं करा जमलं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा