(Sonar Of Thoughts)

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
5 Nov 2011 - 2:57 pm

Sonar of Thoughts !

जसे समुद्राची खोली सोनार नावाचे उपकरण शोधते तशी मनाची खोली आपले विचार शोधतात. म्हणून या फोटोला असे नाव दिले आहे. समोर अथांग समूद्र, काठावर मनाचा अथांग सागर आणि हे सगळं पाहायचं, अनुभवायचं सोडून बावळटपणे आपला फोटो काढणार्‍याकडे निर्विकार वृत्तीने पाहणारा हा बैल.

मी काढलेला एक फोटो, शेखाडीला*. याच्यावर काही ओळी लिहिता आल्या तर बघा. सगळ्यात उत्तम कवितेला एक छोटेसे बक्षीस (बाकी शुन्य हे पुस्तक**).....पुढच्या कट्याला...... अर्थात कमीत कमी १० लोकांनी लिहीले तर नाहीतर....नाही.

*हरीहरेश्वरहून दिवेआगरला (किंवा उलट) समुद्र किनार्‍यावरील रस्त्याने जाताना वाटेत हे शेखाडी गांव लागतं. ब्याण्णवच्या बॉम्ब स्फोटात वापरलेले आरडीएक्स याच किनार्‍यावर उतरले होते. कधी हरीहरेश्वरला किंवा दिवेआगरला गेलात तर या रस्त्याने नक्की जा. डोळ्याचे पारणे फीटेल.
** हे पुस्तक छान आहे (असं डान्राव म्हणतात ;) ) पुस्तक सध्या आउट ऑफ प्रिंट आहे. प्रिंटला गेले आहे असे गेले चार महिने अबक मधल्या पुस्तक दुकानदारांकडून ऐकतोय. त्यामुळे पुस्तक जर बाजारात आले तरच बक्षिस म्हणून देण्यात येईल. (डान्रावरावांकडे असलेली कॉपी वाचायला म्हणून आणून नंतर ती ढापून बक्षिस म्हणून दयायला आमचा जीव काही वर आलेला नाही.)

स्थिरचित्रआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

यकु's picture

5 Nov 2011 - 3:37 pm | यकु

छ्या:! जमलं नाही!

पत्रकारसाहेब, सार्‍याच गोष्टी परफेक्ट करायला आम्ही आमिर खान नाही. काही गोष्टी आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. ;)

काही गोष्टी आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. Wink

हॅ हॅ हॅ
करा ना..
उद्या कुणी ऊंटाच्या बुडख्याचा मुका घ्यायला उडी मारील आणि म्हणेल आम्ही हे आम्ही आमच्या आनंदासाठी करतो. ;-)
कसं जमायचं ?

(ह.घे.)

कसं जमायचं ?

हा उंट आणी मुका घेणार्‍याचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त आम खाव ना, गुठलिया कायको गिनताव.

मी म्हणालो पळा आता.. धन्या कुर्‍हाड घेऊन येतंय आता रक्त काढायला.. ;-)

रक्त काढायला*

शीव शीव शीव. आजच्या पीढीला कुठे काय बोलावं हेच कळत नाही.

* अधिक माहितीसाठी वपाडाव यांच्याशी संपर्क करा. त्यांच्या लॅपटॉपमध्ये रक्तचरीत्र सिनेमा आहे. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Nov 2011 - 6:04 pm | अत्रुप्त आत्मा

@-शीव शीव शीव. आजच्या पीढीला कुठे काय बोलावं हेच कळत नाही. ....

धनाजीराव परत पेटलेले दिसताय... आजची पिढी हो आजची पिढी,कोणाच्या निखाय्रावर कोणाची बिडी... ;-) असलं काहीतरी गीत लिवा अता... :-D

रामजोशी's picture

5 Nov 2011 - 5:50 pm | रामजोशी

आणंद !
कोण आम्ही काय पुसता
फोटो काढती वाकडे
ते धाकटे आम्ही थोरले
आणंदी आम्ही गे.

मिसळपाववर सगळ्यांसाठी खुले व्यासपीठ आहे आणि तुमचे कायम स्वागतंच आहे.

सहमत.

मिपा खुले व्यासपीठ असल्याने तुम्ही आणंदी आम्ही गे अशा शब्दांत वर्णन केलेला आनंदोत्सव इकडे सुरु करायचा की नाही असा काथ्याकुट जरी केलात तरी तुम्हाला कुणी कुणी काही बोलणार नाही.

प्रतिक्रिया हघेवेसांनल. :)

धना,
तु दिलेल्या लिंकवर येणारा एक मेगाबायटी एवंच जार्गनपूर्ण प्रतिसाद सहन करण्याची शक्ती मिळो अशी अ‍ॅडव्हान्स प्रार्थना. ;-)

रेवती's picture

11 Nov 2011 - 9:04 pm | रेवती

हा हा हा

विजुभाऊ's picture

24 Nov 2011 - 7:55 pm | विजुभाऊ

( पाडगावकर मोड ऑन )
एका होता बैल
कर म्हणाला माझी
चड्डी सैल
पोहत जाईन हजार मैल
गाठेन परी तीर पैल.
इस्ट कोस्टाला उभी असेल
शिंगाला शिंग घासेल
आणि थोडी लाजेल
माझ्या सवे भिजेल.
( पाडगावकर मोड ऑफ)

दत्ता काळे's picture

5 Nov 2011 - 3:43 pm | दत्ता काळे

वाकडेसाहेब पुस्तक मिळविण्यासाठी बर्‍याच अटी घातल्या आहेत बुवा तुम्ही. म्हणजे ,

१. कमीत कमी दहा लोकांनी लिहीले पाहीजे,
२.पुस्तक बाजारात यायला हवे,
३. पुस्तक पुढच्या कट्ट्याला मिळेल ( म्हणजे कट्टा व्हायला हवा ).

लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?

लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?

ते कुणी लिहिलंच तर पाहता येईल. आधीच कशाला डोक्याला शॉट दया ;)

'लिखाणाच्या दर्जाची पारख ( कारण उत्तम कवितेलाच बक्षिस असल्यामुळे ) कोण करणार ?'

सोपं आहे, सगळ्या कविंतांच्य प्रिंट काढायच्या त्याच बैलापुढं नेउन टाकायच्या जी कविता तो बैल खाणार नाही ती उत्तमा, हाकानाका.

मी-सौरभ's picture

5 Nov 2011 - 11:47 pm | मी-सौरभ

बैल नाही मिळालाच तर .....

मिपावरच्या वृषभ राशीच्या लोकांचा सल्ला घ्या ;)

प्रचेतस's picture

5 Nov 2011 - 5:12 pm | प्रचेतस

आमची प्रेरणा

आजही तू आली नाहीस
तूही त्या पहिल्या गायीसारखीच झाली आहेस, बेभरवशी.
चरण्याची सवय लावून गुडूप होऊन जातेस.

पण मग मी वाट पाहात राहतो,
तू येण्याआधीच्या इतर गायींची,
चरणार्‍या इतर बैलांची, वासरांची
वैताग आणणार्‍या शेणाच्या वासांची,
कारण मला माहित असते, कि या सर्वांनंतर,
तू येणार आहेस,
माझ्याबरोबर चरत राहून, माझ्या वाटेचा
चारा पण खाउन टाकणार आहेस.

आजही तू आली नाहीस,
मी मात्र रोजच्या प्रमाणे उद्याही येईन,
माझ्या वाटेचा चारा खायला.

गवि's picture

5 Nov 2011 - 5:17 pm | गवि

:)

धन्या's picture

5 Nov 2011 - 5:21 pm | धन्या

जबरदस्त वल्ली... लगे रहो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2011 - 11:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त.

-दिलीप बिरुटे

काय धनाजी राव आज बराच वेळ मोकळा दिसतोय

गवि's picture

5 Nov 2011 - 5:28 pm | गवि

या माडबनी झडकरि ये गायगडे..
हे वृषभवृषण पडले तुजवाचुनि कोरडे..
खच्चुनि लाव जोर प्रिये, तोड तुझा कासरा..
भेट माझी म्हणुनि उदरि घेऊनि जा वासरा..

यकु's picture

5 Nov 2011 - 5:29 pm | यकु

या माणसाच्या प्रतिभेला काही धरबंध नाही!!!
हात टेकले!!
=))
=))

धन्या's picture

5 Nov 2011 - 5:32 pm | धन्या

सलाम गविशेठ.

समुद्राच्या फेसाळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर दोन जीवांचे मिलन... आणि तेही केवळ दुसर्‍या जीवाच्या निर्मीतीच्या उदात्त भावनेनं... वासनारहीत... अहाहा...

श्रावण मोडक's picture

5 Nov 2011 - 5:57 pm | श्रावण मोडक

सहमतच!

गविंना मानाचा मुजरा......

चार पायाच्या बैलावर चारोळी लै भारी झाली आहे.

जे.पी.मॉर्गन's picture

11 Nov 2011 - 6:22 pm | जे.पी.मॉर्गन

कहर कहर....

"अछूत कन्या" मधले अशोक कुमार आणि देविकाराणी अनुक्रमे बैल आणि गाय होऊन ग विंच्या ओळी म्हणताहेत असं दृश्य ड्वाळ्यांसमोर हुबं र्‍हाइलं !

जे पी

प्रचेतस's picture

5 Nov 2011 - 5:30 pm | प्रचेतस

_/\__/\__/\_

प्रास's picture

10 Nov 2011 - 9:10 pm | प्रास

साष्टांग __/\__

:-)

राजघराणं's picture

5 Nov 2011 - 6:16 pm | राजघराणं

जबरा गवी साहेब

इष्टुर फाकडा's picture

5 Nov 2011 - 9:33 pm | इष्टुर फाकडा

गवि, यावरून एक परम अश्लील ब श्रेणीतली कविता आठवली...
प्रिये तुजवाचून मंद झाल्या तारका,
'जीव' झाला बारका..आणि झाल्या (वृषभ) वृषणाच्या खारका !!!

अतिशयच आक्षेपार्ह आहे...पण मोह अवरालाच नाही :)

वाहीदा's picture

10 Nov 2011 - 8:07 pm | वाहीदा

आम्ही ही नि:शब्द ! ___/\____

चतुरंग's picture

11 Nov 2011 - 7:59 pm | चतुरंग

कहरच आहेत ओळी!!
<=०()8=< (हा साष्टांग नमस्काराचा टॉप्/बॉट्म व्यू आहे! ;) )

-रंगा

वाहीदा's picture

11 Nov 2011 - 10:34 pm | वाहीदा

याला साष्टांग नमस्काराचा टॉप्/बॉट्म व्यू म्हणायचा का ?
वॉव , काय कल्पकता आहे !
तुम्हाला ही ___/\___अन सलाम !!

जयंत कुलकर्णी's picture

5 Nov 2011 - 5:38 pm | जयंत कुलकर्णी

:-) :-)

पैसा's picture

5 Nov 2011 - 5:59 pm | पैसा

कविता नको पण बक्षीस आवर!

एक करुण रसातली कविता लिहिणार होते, पण "बक्षीस" पाहताच या धाग्यावरून दुप्पट स्पीडने पळून जायचा विचार करते आहे...

कविता नको पण बक्षीस आवर!

तुम्ही पुस्तक वाचलेलं दिसतंय. :)
आम्हाला वाचायचं आहे परंतू पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे.

असो, तरीही तुम्ही कविता करु शकता. पुस्तक तसंही मिळण्याची शक्यता नाहीच. ;)

५० फक्त's picture

5 Nov 2011 - 7:32 pm | ५० फक्त

बैलाचे मनोगत.....

सागरतीरी एकदातरी मी असं करणार आहे
कॅमेरासमोर कुणाच्या तरी ताठ उभं राहणार आहे

वाळुतल्या खेकड्यांचे अन झाडावरच्या कावळ्यांचे
भरभरुन फोटो काढणा-या या वेड्या माणसांना
माझं मस्तवाल अन राजबिंडं रुप दाखवणार आहे
कॅमेरासमोर.....

आज तु आलास, मला बरं वाटलं
तुझ्या हातात कॅमेरा पाहुन का़ळीज भरुन आलं
काढ बिनधास्त फोटो आज मीच तुला घाबरणार आहे
कॅमेरासमोर....

जाता जाता एक कर माझा मित्र म्हणुन
त्या धनाच्या चंद्रिला हा फोटो दाखव दुरुन
उद्यापासुन मि त्याला सॉलिड खुन्नस देणार आहे
कॅमेरासमोर.......

अवांतर - माझी रास कोणत्याही कोनातुन वृषभ नाही.

मस्त जमलीये !!!

माझं मस्तवाल अन राजबिंडं रुप दाखवणार आहे

अगदी असाच वाटला मला तेव्हा तो. बालपण गायी, म्हशी आणि बैलांसोबतच गेलेले असल्यामुळे हा बैल अंगावर येईल की काय अशी भीती वाटण्याचा प्रश्नच नव्हता. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2011 - 11:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

-दिलीप बिरुटे

रिकामा बैल फोटोच्या कामी
फोटो काढण्याची shakkal nami
रंग सुंदर kalabhor
वयाने to आहे पोर
kavita कधी केली नाही
वाकड्यात कधी शिरलो नाही
आनंद अथांग sagaracha घेण्याला
नजर vedhate कुणी milel का जोडीला

tumhi kadhalela फोटो mala avadala
अनिल आपटे

कवितानागेश's picture

6 Nov 2011 - 3:24 pm | कवितानागेश

खरोखरच बक्षीस मिळणार आहे का?
मीच देते १० कविता लिहून! ;)

धन्या's picture

6 Nov 2011 - 4:59 pm | धन्या

हो... येत्या एक - दोन महिन्यात पुस्तक बाजारात उपलब्ध झालं तर नक्कीच. ;)

किशोरअहिरे's picture

10 Nov 2011 - 5:22 pm | किशोरअहिरे

"धनाजिराव वाकडे
हे काय करुन राहिले गडे
टाकता गुरा ढोरांचे फोटो वाकडे तिकडे
परत असे कराल तर पडतील गालावर जोडे
(Sonar Of Thoughts) म्हणुन कवीता करायला.. वाटलो का आम्ही येडे
आता जरा चांगले फोटो टाका ईकडे
मग मिळतील तुम्हाला गुलाब जामुन आणी पेढे"

त. टी.
कवीतेला हलकेच घ्यावे सहज सुचले म्हनुन लिहीले आहे..
नो ऑफेंस
जर लेखक आणी वाचकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी जिम्मेदार नाही :)

धनाजिराव वाकडे
हे काय करुन राहिले गडे

फोटो काढून र्‍हायलो ना बाप्पा.

टाकता गुरा ढोरांचे फोटो वाकडे तिकडे
परत असे कराल तर पडतील गालावर जोडे

तुमच्या भावना पोचल्या. अंमळ चुकलंच आमचं. एखादी अर्धवस्त्रा ललना किंवा गेला बाजार पाठमोरा जॉन अब्राहम यांचे फोटो टाकायला हवे होते.

(Sonar Of Thoughts) म्हणुन कवीता करायला.. वाटलो का आम्ही येडे

वाटायचं काय त्यात. हा प्रतिसाद ढळढळीत पुरावा आहे. :)

आता जरा चांगले फोटो टाका ईकडे
मग मिळतील तुम्हाला गुलाब जामुन आणी पेढे"

तुमची "चांगले" शब्दाची व्याख्या सांगा. आम्ही जरुर प्रयत्न करु. आणि हो आम्ही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यामूले आम्हाला तुमचे गुलाब जामून आणि पेढे नकोत. :)

जाता जाता, तुमची यत्ता कंची? ;)

किशोरअहिरे's picture

10 Nov 2011 - 9:25 pm | किशोरअहिरे

मी पहिल्यांदाच असले काहीतरी लिहीत आहे :)
सहज गमतीत सुचले म्हणुन लिहीले आहे..
लोभ असावा

गणेशा's picture

10 Nov 2011 - 7:20 pm | गणेशा

सर्वांनी छान लिहिले आहे..
आमचे परम मित्र वल्ली आनि ५० फक्त यांना आता कवीवर्य या उपाधीनेच संबोधण्यात यावे असे मनोमन वाटते आहे.

बाकी धना,
अरे तो फोटो काय दिसला नाय राव
त्यामुळे पास

मालक, तुमच्या हापिसातल्या नेटवर्कवाल्याना पकडून पोकळ बांबूचे फटके दया.

हा फोटो पिकासावर होस्ट केलेला नाही. फोटोबकेट म्हणून पोर्टल आहे.

हा फोटो पिकासावर होस्ट केलेला नाही. फोटोबकेट म्हणून पोर्टल आहे.

म्हणुनच मला सुद्धा दिसत नाही... :(
बहुतेक कंपन्यात फोटो अपलोडिंग साईट ब्यॅन केलेल्या असतात्,पण गुगल मात्र चालु असते...
पिकासा बॅन असले तरी त्यावरचे फोटु मात्र दिसतात बाँ.

वाहीदा's picture

12 Nov 2011 - 10:06 pm | वाहीदा

तुला फोटो दिसत नाही म्हणजे कम्माल आहे
असो,
अवांतर : तुला haifa weh(e)be कधी पासून आवडायला लागली म्हणजे तीची स्टाईल मारु डुप्लीकेट राखी सावंत पण तुझी चॉईस आहे तर ...(येथे कपाळावरील घाम पुसण्याची स्माईली समजावी)

तुला फोटो दिसत नाही म्हणजे कम्माल आहे
त्यात कमाल ती काय ? अजुन माझ्याकडे मि.इंडियाचा चष्मा आला नाहीये ! त्यामुळे बॅन असलेल्या साईटी दिसणे अंमळ कठीणच आहे हो... ;)

तुला haifa weh(e)be कधी पासून आवडायला लागली म्हणजे तीची स्टाईल मारु डुप्लीकेट राखी सावंत पण तुझी चॉईस आहे तर ...(येथे कपाळावरील घाम पुसण्याची स्माईली समजावी)

मला हायफा वाहेबी आवडण्या पेक्षा तीचे गाणे आवडले, तिचे मी पाहिलेले पहिले गाणे होते:--- Mosh Adra Astana त्यानंतर Salem Halak" (Give Yourself Up) हे आवडले होते.त्यात आता लिंक मधे अडकवलेले गाण्याची भर पडली...
बाकी तिची तुलना राखी सावंतशी ? छ्या ! काहीतरीच काय ! ;)
बाकी yalla habibi हे गाणं ऐक जरा... ;)
आणि चॉईसचं म्हणशील तर सध्या पुर्वी भावे (poorvi bhave). ;)

मित्रा, तु एक काम कर...जेव्हा Accenture मध्ये जॉइन होशील ना तेव्हाच मिसळपाव उघड...
कदाचित तिथं तरी तुला फटु दिसतील....

नगरीनिरंजन's picture

11 Nov 2011 - 12:52 pm | नगरीनिरंजन

कुछ जम्या नही. मजा आली नाही. धनाजीरावांकडून अपेक्षा जास्त आहेत.

फोटोतरी जरा आकर्षक लावायचा ना राव.

किती पाहू वाट समुद्राच्या तटी
कधी होई भेटी, तुझी माझी.||१||
मनी येई शंका जरी असे लघु
आवडे का राघू, दुसर्‍यांचा.||२||
वर निळे स्काय, खालती वॉटर
आवडे पिटर, का गं तुला.||३||
दृष्टी झाली क्षीण, जग हे कनिंग
डोळा येई भिंग, आता माझ्या.||४||

पैसा's picture

11 Nov 2011 - 11:38 pm | पैसा

कविता जमली बर्का! पण बक्षीस खरंच मिळणार आहे का ते आधी विचार! नाहीतर तुझे कष्ट फुकटच!

रेवती's picture

11 Nov 2011 - 11:49 pm | रेवती

अगं आता ७ झाल्यात. अजून ३ आल्या की निक्काल आहे ना स्पर्धेचा!;)

कविता झक्कास जमलीये बरं का रेवतीआज्जी.

बाकी तुम्ही कविता मोजत आहात हे वाचून अंमळ मौज वाटली. :)

असो. दहा कविता झाल्या की त्यातली एक चांगली कविता निवडून नक्की बक्षिस देण्यात येईल. अर्थात ते पुस्तक "बाकी शुन्य" नसेल. पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे तर देणार कुठून. ;)

एक कल्पना सुचलीये. विजेत्यालाच पुस्तक कुठलं हवं हे विचारलं तर? :)

चेतन सुभाष गुगळे's picture

12 Nov 2011 - 4:58 pm | चेतन सुभाष गुगळे

<< विजेत्यालाच पुस्तक कुठलं हवं हे विचारलं तर? >>

आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?

आणि विजेत्यानं शांताराम किंवा चित्रमय स्वगत मागितलं तर?

हाच तर तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. तसं नसतं तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता.

वयाची पहिली तेविस वर्ष पैसा कधी दिसलाच नाही. आणि चोविसाव्या वर्षापासून इतका पैसा मिळू लागला की आमच्या दृष्टीने तो पैशाचा पाउस आहे. गरज पडल्यास आणि शक्य असल्यास आम्ही अ‍ॅमेझॉन डॉट कॉमकडून इंटरनॅशनल शिपिंग करुन पुस्तक मागवू. त्याची काळजी तुम्हास नसावी. :)

तुम्ही जर मला पैला लंबर दिलात तर मी अगदी स्वस्तातलं पुस्तक मागीन याची खात्री बाळगा.
उदा. ११ विविध कोशिंबीरी, खोबर्‍याच्या चटणीचे ५ प्रकार इ.

हाहा... तशीही तुमची कविता या स्पर्धेत विजेतेपदाची प्रमुख दावेदार आहेच की. ;)

पैसा's picture

12 Nov 2011 - 4:39 pm | पैसा

फक्त दहा कविता व्हायला पाहिजेत या उदात्त हेतूने ही कविता पाडलेली आहे. "जिथे सागरा" या गाण्याबरोबर साम्य आढळल्यास मी जबाबदार नाही.

जिथे वाळूला सागर मिळतो,
तिथे तुझी मी वाट पहातो||

गोठ्यात सरकी पेंड खाऊन
लोकांच्या शेतात रोज चरून
रस्त्यात धावून, माती उडवून मी,
दावे गळ्यातील फेकून येतो ||

बघुनी नभीची चंद्रकोर ती
कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती
कुत्र्यांना पळवूनी, बैलांशी झुंजूनी
गायींच्या कळपाला साद घालतो||

रेवती's picture

12 Nov 2011 - 9:47 pm | रेवती

बघुनी नभीची चंद्रकोर ती
कुत्र्याना भुंकाया येते स्फूर्ती
ख्या ख्या ख्या
मूळ गाण्यात बघुनी नभीची चंद्रकोर ती हे किती सोज्वळ आवाजात म्हटलय, त्यानंतर कुत्रांचा सदर्भ म्हणजे......

धन्या's picture

12 Nov 2011 - 9:53 pm | धन्या

खरंच... पैसातैंची कल्पना भारीच आहे...

रेवती आज्जी... दहा कविता झाल्या की सांगा बरं :)

रेवती's picture

13 Nov 2011 - 4:12 am | रेवती

सांगते सांगते.
जिंकायचं म्हटलं की एवढे कष्ट आलेच ना!
काहीही झालं तरी 'फोडणी करण्याचे साडेतीन प्रकार' हे पाकृ पुस्तक हवंच आहे मला.

प्रीत-मोहर's picture

13 Nov 2011 - 1:03 pm | प्रीत-मोहर

अजुन दोन कविता येउद्यात !!!

मोहनराव's picture

13 Nov 2011 - 4:00 pm | मोहनराव

मी कधीच कविता केल्या नाहीत, पण धनाजीरावांचा धागा पाहुन राहवले नाही.
जमली आहे का ते सांगा. तुम्हीहि बदल सुचवु शकता!!
चाल- हम्मा हम्मा (बॉम्बे सिनेमा)

हम्मा हम्मा

तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली
अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली ||धृ||
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा

हि पहिली भेट आपली, तुझ्यावर जीव जडला
अरे प्रियतमा मी तुझ्यावर, माझा जीव उधळला
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा

काळीभोर तगडी जवानी, तुला मिळाली सखया
तुझे रुपडे हे बघून मी तर घायाळ झाले सखया
शेपटी झोकदार तुझी शिंगे धारदार तुझी
हरपून गेले मी तुझ्यावर राया
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा

तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली
अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा

शेखाडी गावचा नयनरम्य हा किनारा
तुला पाहून मी विसरले दिलबरा
मालक आणाया गेलाय चारा
दावण सोडून मी आलेय भराभरा
म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा
चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हे हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा

तु दिसलास मला समुद्र किनाऱ्यावरी, माझी झोप उडाली
अन गळ्यातली घंटा माझी किण किण वाजू लागली
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा
हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा हम्मा

(नवखा कवी) मोहन.

पैसा's picture

13 Nov 2011 - 4:38 pm | पैसा

ते राया, दिलबरा वगैरे भारी आवडलं!

धन्या's picture

13 Nov 2011 - 4:50 pm | धन्या

जबरा कविता...

मालक आणाया गेलाय चारा
दावण सोडून मी आलेय भराभरा
म्हणून सोडून तुझा हा रागीट तोरा
चल आपण होऊन जाऊ नौ दो ग्यारा

लय भारी मोहनराव !!!

मोहनराव's picture

13 Nov 2011 - 4:57 pm | मोहनराव

धन्यवाद धनाजीराव व पैसातै!!

दीप्स's picture

22 Nov 2011 - 11:25 am | दीप्स

साष्टांग -------- /\ --------

तुमच्या हम्मा हम्माला !!

रेवती's picture

16 Nov 2011 - 7:22 pm | रेवती

कुणीतरी एकच कविता लिहा की.
त्याशिवाय स्पर्धेचा निकाल लागू शकत नाही.

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Nov 2011 - 9:06 pm | चेतन सुभाष गुगळे

रेवतीजी,

तुमच्या वरील आवाहनास अनुसरून केवळ स्पर्धेचा निकाल लागावा या उद्देशाने माझ्या मनात आल्या तशा काही ओळी इथे मांडत आहे.

तुला माझ्याविषयी नेमकं काय वाटतं तेच मला समजत नाही.
माझ्या प्रियेला तू माता म्हणतोस मग मला पिता का मानत नाही?
माझ्या वाटचं दूध पळवून मला शेतात राबायला लावतोस,
आणि वर्षातून एक दिवस मला सूटी देऊन माझी पुजा करतोस.
बिनडोक कष्ट करणार्‍यालाही माझीच उपमा देतोस आणि
ऐतं खात बसून राहणार्‍यालाही बैलोबा म्हणतोस हे कोडं काही सुटत नाही.
बरं मला डोकं नाही असं मानतोस
तर जिथे बुद्धी पणाला लागते तिथे माझा पुतळा लावुन सट्टा तरी कसा काय खेळतोस?
काय असेल ते असो पण मला रिकामा बसव रे कधी तरी
कारण त्याशिवाय तुला कोणी अतिशहाणा जाणत नाही.

मला वाटते मी स्पर्धेसाठी आवश्यक ती तांत्रिक गरज पूर्ण केली आहे.

धन्यवाद गुगळेसाहेब!

आता धनाजी वाकडे या जरा इकडे
लावा निक्काल धाग्याचा.
धाग्याचा बै धाग्याचा.
पुरस्कार द्या लाखमोलाचा.;)

धन्यवाद मंडळी.

गमती गमतीत सुरु केलेल्या या धाग्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लवकरच परीक्षक शोधून निकाल लावण्यात येईल.
आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे विजेत्यास त्याला हवे ते पुस्तक बक्षिस देण्यात येईल. :)

मी-सौरभ's picture

18 Nov 2011 - 10:04 am | मी-सौरभ

याच धाग्यावर कौल घेता का?

ज्याला सर्वात जास्त मतं तो विजेता!!

कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या कविता बघता एखादा नवखा कवीच परीक्षक व्हायला तयार होईल अशी खात्री वाटत आहे ;)

कवितेची प्रेरणा आणि पाडलेल्या कविता बघता एखादा नवखा कवीच परीक्षक व्हायला तयार होईल अशी खात्री वाटत आहे

घोडं इथंच अडलं आहे साहेब. :)
दोन चार नावं नजरेसमोर आहेत पण ते तयार होतील की नाही याबाबत शंका आहे.

आणि जे आमच्या दोस्तीखातर तयार झाले असते त्या सार्‍यांनी या धाग्यावर कविता पाडल्या आहेत. त्यामुळे ती ही शक्यता उरली नाही . ;)

असो. काहीतरी मार्ग निघेलच.

ओ साहेब, ते आजकाल एसएमएस ची फ्याशन आलिये तसं काही कर्ता का?
आम्हाला किती दिवस बक्षिसाच्या आशेला लावणार. हे प्रकरण संपवून दुसरा फोटू टाका राव!

मोहनराव's picture

19 Nov 2011 - 4:09 pm | मोहनराव

आणखी किती वेळ लावणार धनाजीराव?

रेवती's picture

19 Nov 2011 - 7:17 pm | रेवती

सहमत.
फसवणूक! घोर फसवणूक होतिये स्पर्धकांची!;)

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2011 - 8:59 am | जयंत कुलकर्णी

मी परिक्षक म्हणून काम केले तर चालेल का ? विडंबनात्मक परीक्षण करतो.
:-)

रेवती's picture

21 Nov 2011 - 9:30 am | रेवती

जरूर!
काय म्हणता ध.वा.?
जयंतराव आपणहून आलेत म्हणजे मानधनाचा प्रश्न नाही.;)
कृपया निकाल जाहीर करून मला विजेती घोषित करावं अशी विनंती करते.;)

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2011 - 4:26 pm | जयंत कुलकर्णी

तरीपण वाकडेसो उदार मनाने मला त्याच पुस्तकाची एक प्रत बहाल करतील अशी आशा करतो :-)

धन्या's picture

21 Nov 2011 - 10:29 pm | धन्या

तुम्ही हे काम कराल तर सोन्याहून पिवळं होईल काका. :)

जो कुणी विजेता तुम्ही निवडाल त्या विजेत्याला (आणि तुम्हालाही - मानधन म्हणून ;) ) त्याला हवे ते पुस्तक बक्षिस म्हणून देण्यात येईल. :)

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 9:42 am | अन्या दातार

>>विडंबनात्मक परीक्षण करतो

ते ठिक आहे; पण नंतर परीक्षणाचे कोणी विडंबन केले नाही म्हणजे मिळवले ;)

जयंत कुलकर्णी's picture

21 Nov 2011 - 4:41 pm | जयंत कुलकर्णी

चालेल ! त्याचेही विडंबन करण्याची क्षमता मी बाळगून आहे..... :-)

@ वाकडेसो, गंमत केली आहे हे कृ ल घे.

मी-सौरभ's picture

21 Nov 2011 - 5:42 pm | मी-सौरभ

ज कु तुमच्यासारख्या शिनेर माणसाने हे काम करणे पटत नाही...

मा. श्री. अन्या दातार यांना ही काम देता येइल का???

सोत्रि's picture

21 Nov 2011 - 10:55 pm | सोत्रि

बरं, नेमके काय झाले निकालाचे?
रेवती आज्जी, तुम्हालाच पुस्तक मिळाले का?

- (मनाची खोली तपासण्यासाठी Sonar शोधणारा) सोकाजी

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 11:10 pm | अन्या दातार

इथे अजुन परीक्षक फिक्स (म्हणजे ठरलेला) नाही, अन तुम्हाला निकालाचे डोहाळे लागलेत ;)

(सबुरीने घेणारा) अन्या