मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माळरान अन् ते दोघे!! -- ६

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
माळरान अन् ते दोघे!! -- ५ आता पावसाळा सुरु झालाय हिरव झाड खूपच घनदाट झालंय . आता त्याला फळ धरायला लागली आहेत त्याच्या फुलांनी आता रक्तवर्ण घेतलाय हि लाल-हिरवी रंगसंगती खूप खुलून दिसतेय माळरानावर . . अन त्याच्या पार्श्वभूमीवर वठलेल्या झाडाच्या काळ्याभोर फांद्या . गोंडस बाळाला काजळटीट लावतात ना अगदी तश्याच . आजच्या धो धो पावसात वठलेले झाड आकंठ भिजले होते . त्याच्या कोरड्या जगण्यात हाच काय तो थोडासा ओलावा . पण त्याची भीती वेगळीच जर चुकून या वर्षावामुळे.... एखादी पालवी फुटलीच . तर.... त्या चैतन्याला . कोरड्या सहानभूतीशिवाय ते काय देऊ शकणार होते? (क्रमशः) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१३/१०/२०११)

वाचने 2223 वाचनखूण प्रतिक्रिया 6