उप-वास स्पेशलः-साबुदाणा खिचडी....
लेखनविषय:
काव्यरस
ह्या कवितेच (आ)जन्मस्थळ म्हणजे आमचा धंदा-भिक्षुकी उर्फ भटजीगिरी...विशेषतः श्रावण ते (नाकी)नवरात्र या कालावधीत आंम्हा भटजींवर या खिचडीचा जो मारा होतो,त्या---होय...होय..त्याच वेदनेतुन ही कविता प्रसवली आहे...म्हणजे हीचं आमच काही वैर नाही,पण,''त्रास होतो हो हीचा(म्हणजे खिचडीचा ;-))''...असं प्रामाणीक पणे सांगूनही,,,नाही नाही गुरुजी आंम्हाला बंरं वाटावं म्हणुन खा...खा...खा...अंसं काखा वर करुन ठ्ठो ठ्ठो ठ्ठो करत कस्टमर सॉरी सॉरी यजमान मागे लागतात...आणी आंम्हाला कारणं देता देता पळता भुई थोडी होते,,,एरवी ही बया आंम्हाला अवडत नाही असं कुठाय?मी तर माझ्या या मुळातल्या प्राणप्रीय परंतु अतीपरीचयात अवज्ञा झालेल्या या खिचडीला पहीली सलामी एका श्लोकाच्या ओळीच्या विडंबनातूनच दिली होती-म्हणजे,,, ''विश्वाधारं गगन सद्रुशं मेघवर्णं शुभांगम'' असं आहे की नाई,त्याला ''साबुदाणं रबर सद्रुशं श्वेतवर्णं च्युईंगम''...असं मी चावलं होतं ;-)...असो अता जास्त च्यावच्याव न करता उरलेलं कवीतेवर सोडतो---तर श्रोतेहो खिचडी करीता वाहातो,ही शब्दांची खिचडी....................(ही आमची पारंपारीक-गुरुजी/यजमान म्याच आहे.)
यजमानांनी विचारलं-उपास...?
जरा खिचडी देऊ का?
चपला घालतच म्हणालो
त्या पेक्षा मी येऊ का?
का हो?तुंम्ही गुरुजी..
आणी खिचडीला भिता?
अहो,वाचायला फार सोपी
ही पचायला अवघड गीता
अहो,मस्त दही टाका
मजबुत दाबून हाणा..
म्हणजे नंतर सहा तास
पोटात गोळे आणा?
जुने गुरुजी मजबुत खायचे...
एक/दोन प्लेट?...विसरा
पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का
खाण्यापलीकडे...दुसरा?
पूर्वीचे गुरुजी कामं करुन
पराती करायचे फस्त
अहो,जुना स्कुटरचा काळ तो
एव्हरेज पेक्षा इंधन जास्त
जाउ दे गुरुजी आता..
राग विसरा..हट्ट सोडा
कालची खिचडी पचायला
आधी आणा १ सोडा
अशा तह्रेनी आंम्ही यजमानांचा
१प्लेट अपराध पोटात घातला
पण नंतर दिवसभर...
तो आमच्या पोटात उतला
श्रावणाचा संपत सोमवार
आंम्ही या खिचडीवर सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला..... :-)
वाचने
24255
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
कविता आवडली. आम्च्य गुरूजींना
In reply to कविता आवडली. आम्च्य गुरूजींना by सविता
मसाला दूध /केळी
जबरदस्त
हा हा हा
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
मेनफोर्स....
पहिलं कडवं वाचलं आणी एकदम
गुर्जी-यजमान
धन्यवाद
प्र.का.
साबुदाणं रबरसदृशं .. हे
हाहा अतिशय विनोदी. पहीलं कडवं
हाहाहा
लय भारी भटजीबुवा... कधी चुकुन
In reply to लय भारी भटजीबुवा... कधी चुकुन by धन्या
ह्हा ह्हा ह्हा... धनाजीराव ,नका हो असं...
मस्त
'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे
In reply to 'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे by सूड
अहो वडे काय?....
In reply to 'साबुदाणं रबर सद्रुशं....' हे by सूड
सुड, तुझा वड्यावर फारच जीव
In reply to सुड, तुझा वड्यावर फारच जीव by अन्या दातार
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा
In reply to सुड, तुझा वड्यावर फारच जीव by अन्या दातार
साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा
In reply to साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा by गवि
खिक्क् फणसाचे वडे !!
In reply to खिक्क् फणसाचे वडे !! by सूड
हसायला काय झालं? शिकून घे ते
In reply to हसायला काय झालं? शिकून घे ते by रेवती
बरं बरं !!
In reply to बरं बरं !! by सूड
:)
इश्श्य......... उभ्या
मस्त हो!
In reply to मस्त हो! by पैसा
धन्यु हो...
असं काय म्हणता हो
In reply to असं काय म्हणता हो by रेवती
ह्हा ह्हा ह्हा...असो.... अहो रेवतीताई... ते आवडीनी वगैरे....
In reply to ह्हा ह्हा ह्हा...असो.... अहो रेवतीताई... ते आवडीनी वगैरे.... by अत्रुप्त आत्मा
चालेल. हा मेन्युही चांगलाच
सह्ही!
In reply to सह्ही! by साती
काय मेन्यु ठेवू ?
In reply to काय मेन्यु ठेवू ? by अत्रुप्त आत्मा
आमंत्रण
In reply to आमंत्रण by साती
संदेश आवडतात का खायला?
बुवा, शिंगाड्याच्या पिठात
In reply to बुवा, शिंगाड्याच्या पिठात by ५० फक्त
हरी मिर्चीचे पराठे.......
मस्त. बहुतेक या मुळेच
भन्नाट
आयला, मस्त कविता!!
भन्नाट
सर्वांना........धन्यवाद.
आवरा
जावे त्याच्या वंशा तेंव्हा
In reply to जावे त्याच्या वंशा तेंव्हा by स्पंदना
अपर्णा अक्षय धन्यवाद
कविता भारीच. मला वाटल रेसिपी
गुर्जी.. दंडवत स्विकारा,
In reply to गुर्जी.. दंडवत स्विकारा, by अर्धवट
यम-जान ..ह्हाह्हाह्हा
दिवेकरांना शलुट ठोकत
In reply to दिवेकरांना शलुट ठोकत by वपाडाव
वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे
In reply to वपाडाव हा जयपालचा डुआयडी आहे by अर्धवट
नसावा.. ठाणे पुरेपूर
In reply to दिवेकरांना शलुट ठोकत by वपाडाव
वपाडाव यांच्या...
गुरूजी आमचे दंडवत आहे
हाहाहा.. आता कळलं!
सर्व प्रतिसादकांसी पुन्हा
In reply to सर्व प्रतिसादकांसी पुन्हा by अत्रुप्त आत्मा
रेवाक्कांच्या खफ. वरिल
In reply to रेवाक्कांच्या खफ. वरिल by अत्रुप्त आत्मा
खिचडीबरोबर ताक हवेच तेव्हा ते
In reply to खिचडीबरोबर ताक हवेच तेव्हा ते by प्रचेतस
भांड्याबरोबर सायही यायला
In reply to भांड्याबरोबर सायही यायला by किसन शिंदे
होय
In reply to भांड्याबरोबर सायही यायला by किसन शिंदे
साय?
In reply to साय? by टवाळ कार्टा
तुला साय माहीत नाही?
In reply to रेवाक्कांच्या खफ. वरिल by अत्रुप्त आत्मा
छाण तळलात साबुदाणा, सगळ्यांनी
कविता वर काढल्याबद्दल धन्यवाद
:)मस्तं!