लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ऑफीसात, माझ्या क्युबिकलच्या समोर एक क्युब आहे जेथे कोणीतरी जॉन नावाचे साधारण ५० शीचे गृहस्थ संगणकावर काम करत असतात. मला त्यांचे आडनावदेखील माहीत नाही.
मी जरा उशीरा आले तर जॉन कामात गर्क झालेले आढळतात पण मी जर लवकर आले तर हे गृहस्थ कधी त्यांच्या जागेवर येऊन कामाला लागतात हे कळतसुद्धा नाही. यांचाआवाज चढलेला मी कधीच ऐकला नाही. मृदू पण एकप्रकारचा धाक असलेला आवाज मला तरी वाटतो.
लोकांचा बराच राबता यांचेकडे असतो. बहुसंख्य लोक हे नवीन किंवा जॉनपेक्षा खूप ज्युनिअर वाटतात. ते या सर्वांना सूचना देतात, बरेचदा अपडेटस मागतात. मात्र यांचेकडे लोक आले की माझं मिपा-मिपा काही काळापुरता बंद होतं. कारण बोलण्याच्या मधल्या पॉझमध्ये काही लोक क्वचित माझ्या स्क्रीनकडे पहाताना मला आढळले आहेत. सो आय गेट बस्टेड्!! : ( हा एक प्रकारचा माझ्याकरता न्युइसन्स आहे खरा.
मात्र स्वतःजॉन कधीच माझ्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. चुकूनही माझा स्क्रीन पहाण्याचा प्रयत्न करत नाहीत वगैरे वगैरे.
मला खूपदा वाटतं त्यांच्याशी ओळख करून घ्यावी कारण त्यांच्या वयामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात आलेला भारदस्त आश्वासकपणा तसेच "दुसर्याच्या कामात ढवळाढवळ न करण्याची" त्यांची वृत्ती.
अर्थात मी स्वतः होऊन ओळख करणार नाही कारण ... कारणच नाही. पण त्यांच्याबद्दल खूप कुतूहल आहे. म्हणजे त्यांचा हुद्दा, कामाचे स्वरूप, त्यांना मी शेजारी म्हणून कशी वाटते आदि गोष्टींबद्दल.
पण २ रेषा समांतर जातात त्या एकमेकींना कधीच छेदत नाहीत तद्वत आमची कोणत्याही प्रकल्पात गाठ पडणार नाहीही. पण कुतूहल मात्र राहील.
या जागी अन्य कोणीही स्त्री अथवा पुरुष, भारतिय अथवा परदेशी असता तर मी ओळख करून घेतली असती का? या जरतर ला अर्थ नाही पण नसती असच वाटतं आहे. हा ऑफीसच्या फोर्मल आणि रूक्ष वातावरणाचा परीणाम म्हणता येईल.
प्रतिक्रिया
तुमची वरची प्रसिध्द स्मायली पाठवून द्या ना जॉन्ड्रावना! ;-)
हाकानाका!
:)
स्त्री अथवा पुरुष, भारतिय अथवा परदेशी असता तर मी ओळख करून घेतली असती का? या जरतर ला अर्थ नाही
अस्सं कस्सं गं! परदेश्याचे माहित नाही पण भारतीय बाई असती तर घेतली असतीस असं वाटतं.
कदाचित असती पण सांगता येत नाही रेवती.
अगं माझ्या स्क्रीन कडे बघणारी ती भारतीय मुलगीच होती. मला अस्सा राग आला ना. Blatantly she was looking at my screen. मी तिच्याकडे पहातेय आणि हीचं लक्ष माझ्या स्क्रीनवर काय आहे तिकडे. मॅनरलेस कुठची. :( आणि मुख्य म्हणजे मी मिपा खेळत होते :) त्यामुळे मला ते फार झोंबलं.
सविस्तर प्रतिसादासाठी जागा आरक्षित.
सविस्तर प्रतिसादाच्या जागेस बूच मारून ठेवणेत आले आहे. :)
अमेरिकेत स्त्रीने स्वतः येवून ओळख करुन दिली तर ते मॅनर्सना धरुन नाही का? भारतात त्याचे अनेक अर्थ काढले जावू शकतात. कंपनीत किती जॉन आहेत हे Address book मधून काढू शकता. मग समोरच्या क्युबिकल मधला जॉन कोण ते ही काढता येईल. मेल पाठवता येईल त्यांना.(कंपनीत कोणी नवी जॉईन झाली की हाच मार्ग अनुसरला जातो.)
चिरोटा आपल्या प्रतिसादाबदाल आभारी आहे. मार्ग तर आहे की मी "हाय मिस्टर जॉन. माय नेम इज सो अँड सो..." म्हणून कधीही ओळख करून घेऊ शकते मला नीट मांडता आले नसेल मला हे मांडायचे होते की - बरेचदा आपल्या जवळून काही व्यक्ती जातात आणि त्या सुसंस्क्रुत आहेत हे आपल्याला जाणवते. तशी त्यांची ओळख करून घ्यायची फारशी गरजही नसते आणि आपण मग उगाचच कच खातो. पण या लोकांचे सुसंस्क्रुतपण मनात घर करून बसते.
आय वूद रादर स्टे विदिन माय लिमिटस अँड नॉट अॅप्रोच हिम. गरज काय????? हाच प्रश्न मी स्वतःला विचारते. आणि मला उत्तर सापडत नाही. पण कुतूहल वाटायचं ते वाटतच राहतं. ही काहीशी द्विधा मनस्थिती मला वर्णन करायची होती. पण माझ्या मर्यादा!!!
फारच विचार करता बुवा तुम्ही शुचिताई तुम्ही. जॉन्राव कामात नाहीत ना असं पाहायचं आणि त्यांच्या क्युबिकलमध्ये जाऊन म्हणायचं, "हेल्लो जॉन, हावारयू? आयॅम शुचि. आय वर्क ऑन सो अँड सो प्रोजेक्ट"... हाय काय आन नाय काय :)
"मेन आर फ्रॉम...." मध्ये का कुठेतरी मी वाचलं होतच की पुरुष तातडीने असेल नसेल त्या समस्येवर तोडगा सुचवतात याउलट बायका नीट ऐकून घेतात :)
अरेरे... आमची "तो आणि ती" या "मेन आर फ्रॉम...." च्या मराठी भाषांतराची पारायणे वायाच गेली म्हणायची.
...त्याचा येळकोट राहीना मुळ स्वभाव जाईना म्हणतात ते काही खोटं नाही :(
शुचिताई तुमचं चालू दया निवांत. आम्ही आपलं तोंडघशी पडण्यापेक्षा आता गप्प बसतो :D
समस्येवर तोडगा सुचवणं हे पुरूषांचच काम आहे शुचि ताई!
वर शुचिताईंनी अधोरेखीत करत म्हटलंय तसं "नसेल त्या" समस्येवर सुद्धा का?
वर शुचिताईंनी अधोरेखीत करत म्हटलंय तसं "नसेल त्या" समस्येवर सुद्धा का?मी स्पष्टपणे समस्येवर असं लिहिलं आहे.. 'नसेल त्या समस्येवर' असं नाही. ;)
परंतू तुम्ही ज्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद दिला आहात त्यामध्ये शुचिताईंनी "कुठेतरी मी वाचलं होतच की पुरुष तातडीने असेल नसेल त्या समस्येवर तोडगा सुचवतात याउलट बायका नीट ऐकून घेतात" असं लिहिलंय...
त्यामुळे तुमचा "समस्येवर" हा शब्दही "असेल नसेल त्या समस्येवर" असाच गृहीत धरायला हवा ना ;)
त्यामुळे तुमचा "समस्येवर" हा शब्दही "असेल नसेल त्या समस्येवर" असाच गृहीत धरायला हवा ना.हो हो.. ते स्वातंत्र्य तुम्हाला घटनेने दिले आहेच! ;)
त्यामुळे तुमचा "समस्येवर" हा शब्दही "असेल नसेल त्या समस्येवर" असाच गृहीत धरायला हवा ना.हो हो.. ते स्वातंत्र्य तुम्हाला घटनेने दिले आहेच! ;)
हो हो.. ते स्वातंत्र्य तुम्हाला घटनेने दिले आहेच! Winkजसे येता जाता टंकण्याचे स्वातंत्र्य मिपाने आपणाला दिले आहे तसेच तेही..... हाकानाका ;)
संधी मिळेल तिथे टंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ;)
>>याउलट बायका नीट ऐकून घेतात
हॅ हॅ हॅ .. अन मग ? विसरुन जातात !!
हघ्यावेसांनल. :)
मेन आर फ्रॉम...." मध्ये का कुठेतरी मी वाचलं होतच की पुरुष तातडीने असेल नसेल त्या समस्येवर तोडगा सुचवतात याउलट बायका नीट ऐकून घेतातअसली पुस्तकं वाचत जाऊ नका हो काकू! ;-)
चाळलं होतं.
शुचिताई, असं गोरंमोरं होऊन "चाळलं होतं" असं म्हणण्याइतकं नक्कीच वाईट नाही ते पुस्तक :)
जळ्ळी मेली ती मेन आर फ्रॉम मार्स अन चिकन सूप छाप अन १०१ उपायवाली पुस्तकं.
संसारात पडल्यावर दोनेक दिवसात होळी होते सगळ्या थियरीजची.
हे असे दोन ओळीत लिहिलेले चालणार नाही. लेखमाला किंवा किमान एक अख्खा लेख तरी पाहिजे, या विषयावर, तुमच्या कडून. काय म्हणता मंडळी ??
कापसाला भाव मिळालाच पाहिजे.....
लेखमाला कसली मागताय. मला लग्न कसंबसंतरी टिकवायचंय.. ;)
कंपनीत किती जॉन आहेत हे Address book मधून काढू शकता
आताच सहज गंमत म्हणून पाहिले, शेकड्याने निघाले!
कंपनीत कोणी नवी जॉईन झाली की हाच मार्ग अनुसरला जातो
बरं बरं!
बाकी शुचीताई, हे जॉनराव कधीमधी कॉफी घेण्यासाठी जात असतीलच. तेव्हा (तुम्हाला कॉफी हवी असो वा नसो) तुम्हीही निघा आणि ओळख करून घ्या, कसे? तत्पूर्वी तुमच्या गावची फूटबॉल/बास्केट्बॉल टीम कुठली हे लक्षात घेऊन ठेवा.
बाकी शुचीताई, हे जॉनराव कधीमधी कॉफी घेण्यासाठी जात असतीलच. तेव्हा (तुम्हाला कॉफी हवी असो वा नसो) तुम्हीही निघा आणि ओळख करून घ्या
अरे.. हे काय हे.. टिप्ससारखे वाटते आहे आता सर्वांचे लिखाण..
:)
तसं नव्हे गवि. आता जॉनच्या ऐवजी जोआना असती, तर आम्ही जे केले असते ते सांगतोय!
ह्य ह्य ह्य..
५० वर्षांची जोआना असती तरी.. ? ;)
जॉन नावाचे साधारण ५० शीचे गृहस्थ संगणकावर काम करत असतात.
...
वीस ते पन्नास या संख्यांचा वयनिदर्शक म्हणून लेखनात वापर करताना त्यातील स जाऊन श येतो. म्हणजे विशी, तिशी, चाळीशी, पन्नाशी.
५० शीचे गॄहस्थ हे वाचताना चमत्कारिक वाटते. :)
सॉरी :)
या गोष्टीत इतका विचार करण्याजोगं काय आहे? आणि तेही अमेरिकेत? जिथे लोकांना एकमेकांशी संवाद साधायला काहीही कारण लागत नाही.
एकमेकांशी काडीची ओळख नसणार्या लोकांकडून मी पुढील संवाद/ कॉम्प्लिमेंट्स ऐकल्या आहेत.
१. आज दिवस काय सुरेख आहे. बाहेर मस्त हवा पडली आहे.
२. आज तुमचा शर्ट/ ड्रेस/ नेकलेस फार सुरेख आहे. तुम्हाला शोभून दिसतो आहे.
३. आह! मी आज इतकी आनंदी आहे. आज शुक्रवार ना!!
४. शुभ सोमवार सकाळ! (हॅप्पी मन्डे मॉर्निंग)
५. बाय जॉन! हॅव अ गुड इवनिंग
अशाप्रकारचे संवाद मीही अनेकांशी साधले आहेत. त्यासाठी कसलीही ओळख लागत नाही आणि मुद्दाम ओळख काढल्यासारखेही वाटणार नाही.
प्रियाली मला हे लहान संवाद खरच शिकायचे आहेत. मला खूप हिय्या करावा लागतो - एखादी कॉम्प्लिमेन्ट द्यायला. आणि ऐनवेळी मला खूप अवघडल्यासारखं होईल असं वाटतं. ह्म्म .... खरं आहे यात इतका विचार करण्याजोगं तर नाहीच आणि हे सॉफ्ट्स्किल्स असलेच पाहीजेत. पण .... :(
आपण बहिर्मुख व्यक्ती असाल त्यामुळे हे सहजसाध्य असावे. याउलट मला हे अवघड जाते. आणि याचा परिणाम म्हणजे मी या विषयांवरचे लेख वाचत बसते :( .... असो!!!
अर्थात जन्मल्या जन्मल्या कोणी बहिर्मुख नसते हेदेखील खरे आहे. प्रयत्न करावाच लागतो.
मला हे लहान संवाद खरच शिकायचे आहेत.अहो शिकण्यासारखं काहीच नाही त्यात. आपल्याला लहानपणापासून अनोळखी व्यक्तींशी सहसा बोलायचं नाही असं मनावर बिंबवलेलं असतं त्यामुळे ऑकवर्ड वाटतं. बाकी नाही. काळावेळेचे भान ठेऊन बिंधास्त बोलायला लागा. अमेरिकनांना तर याची सवय असते, त्यामुळे त्यांना काय वाटेल हा प्रश्नच येत नाही :)
प्रियाली मला हे लहान संवाद खरच शिकायचे आहेत.
संवाद शिकावेच लागत नाहीत. तुम्ही फक्तं तुम्हाला एलीवेटर, ऑफिस, पार्क, कॉफीशॉपमधे भेटणार्या व्यक्तीला 'हाय्-हॅलो' म्हणा... पुढचे संवाद आपोआप घडतात.
बाकीच्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यात शिकण्यासारखं काही नाही. मी फारशी बहिर्मुखही नाही. उलट, आपण बरं आणि आपलं काम बरं असाच खाक्या असतो परंतु जर एखाद्याची ओळख काढून घ्यावीशी वाटत असेल (तेही सहसा त्या व्यक्तीशी काम असेल तरच ओळख काढणे होते) तर संवाद काढावाच लागतो शोधून.
संवाद साधणे अवघड जात असेल तर सुरूवातीला समोर येणार्या निदान काही व्यक्तींना स्वतःहून हाय म्हणायला किंवा किमान त्यांच्याकडे बघून हसायचा प्रयत्न करा. अमेरिकेत अशा गोष्टींचा कसलाही अर्थ काढला जात नाही, उलट खूप चांगले समजले जाते. तुम्ही हसलात किंवा हाय म्हणालात तर ९०% वेळेस दुसरी व्यक्तीच आपोआप बोलायला सुरूवात करेल.
दुसरे म्हणजे स्वतःच्या आळशीपणावर (जनरल म्हणतोय. तुमच्याबद्दल नव्हे :) ) किंवा किरकोळ सवयींवर विनोद/कॉमेण्ट करणे हा एक खूप सोपा आईसब्रेकर आहे अमेरिकेत.
शुची, तुम्ही फक्तं त्यांच्याशीच बोलत नाही की इतर क्युब्जमधल्या लोकांशीही बोलत नाही?
माझा स्वतःचा अनुभव सांगायचा तर मी अश्या लोकांना हटकून 'हाय- हॅलो' करतो. आता 'अश्या' म्हणजे बर्यापैकी रिझर्व्ड लोकांना. आमच्या प्रॉजेक्टवर ओनरच्या टीम मधेही एक असेच वयस्कर व्यक्ती आहेत. ते सुद्धा मिटींगमधे काम असेल तेव्हाच आणि नेमकं तेवढच बोलतात, बाकी वेळेला ऐकुन घेतात. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट आहेच शिवाय नेमकं तेच बोलून अगदी सहज सोपा मार्ग ते बर्याच वेळेला सुचवतात. त्यांचा अनुभव आणि हुद्दा दोन्ही खूप मोठा आहे. मी मिटींगकरता लवकर पोचलेलो असलो आणि ते हजर असले तर ते मला स्वतःहून कधीही 'हाय' बोलले नाहीत. परंतू मी मात्र अश्यावेळी मुद्दाम त्यांच्याशी बोलतो, उगाच उकरुन काहीतरी विषय काढतो. त्यांना ते कितपत आवडतं ते माहीत नाही, पण बर्याचवेळा काही विषयांवर त्यांचा त्याकडॅ बघण्याचा दृष्टीकोण कसा आहे ते कळतं. कळत नकळत आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. तुमच्या बाबतीत तर ही व्यक्ती तुमच्या शेजारीच बसते आहे. तुमचा आणि त्यांचा कधीही संबध येणार नसला तरी एका चांगल्या व्यक्तीशी ओळख झाली म्हणून तुम्हालाच बरे वाटेल की!
अनामिक,
मी प्रकल्पातील वक्तींव्यतिरीक्त कोणाही व्यक्तीशी बोलत नाही. मला अजून एका माणसाने (भारतिय) त्याच्या कुटुंबाचा लावलेला एक देखणा फोटो आवडतो पण मी हे त्याला सांगत नाही. इतकच काय माझ्या २ रूममेटस आपसांत बोलतात आणि मी संगणकात डोकं खुपसून बसते. मला हे जरा अॅबनॉर्मल वाटू लागलं आहे हे वास्तव आहे.
कोणी मला लहान संवादातून होणारे फायदे विस्कटून सांगेल काय? कारण तोटेच जास्त दिसतात मला. आपलं सुरक्षित एकलकोंडेपणाचं कवच टाकून कोणाकडे जायचं म्हणजे दुखापत (इगो, मानसिक, शाब्दिक) होण्याची शकयता तेवढी जास्त. फायदे काय? जर हे अवांतर होत असेल तर क्षमस्व पण काही लोक तरी माझ्यासारखा विचार करणारे असतील. त्यांना फायदा होइल. मला होइलच.
आजकाल संगणकामुळे स्व-कोषात जाऊन बसनं इतकं सोप्पं झालं आहे. ईझी वे मे नॉट बी राईट ऑलवेज हे कळतं पण सवय लागून गेली आहे.
लहान संवादातून फायदा होतोच असं काही नाही. तुम्हाला काय तोटे दिसतात, मलातरी त्यात तोटेही दिसत नाहीत. दुखापत ही कुणाच्या खूप जवळ गेलं की होऊ शकते. (बर्याच वेळेला आपण भारतीय एका घोळक्याने एकत्र येतो. सुरवातीला सगळं कसं छान असतं... मग हळू हळू एखाद्या व्यक्तीच्या मागे त्याच्या बद्द्ल बरंवाईट गॉसीप सुरु होतं. ह्याचा शेवट माणसं दुरावण्यात होतो. असं माझं सर्व साधारण निरि़क्षण आहे. पण हे सगळं कुणातही आणि खूप जवळ गेलं की होतं). तुम्ही इकडे कुणा सहकार्याशी ओळख जरी वाढवली तरी ते तुमच्याशी पर्सनल स्पेस राखूनच संबंध वाढवतात. ही ओळख तुम्हाला पुढे किती वाढवायची हे तुम्ही ठरवायचं असतं. येता जात चार दोन शब्दं कुणाशी बोलल्याने दुखापत होत नाही किंवा होईल असे वाटत नाही. उलट चारचौघांच्या फॉर्मल भेटीतही तुम्हाला ओळख नसताना मोकळेपणाने बोलता येईल.
खरं आहे आपलं म्हणणं. मला स्पष्टीकरण देण्यासाठी, जो वेळ , उर्जा खर्च केलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि तसेही अनेक धन्यवाद.
प्रयत्न करते.
(१) नॉनजजमेंटल राहण्याचा
(२) लहान संवादातून दिवस आनंदी बनविण्याचा
(३) स्वकेंद्रित न राहण्याचा
:)
शुचितै...
आपण आपली पत्रिका युयुत्सुंना का नाही दाखवत ??
म्हण्जे तेच तुम्हाला सांगतील की कोणत्या अमावस्येला तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणे उपयुक्त ठरेल...
तसेच त्यांच्याशी कधीही संवाद साधणे खरेच तुमच्या फायद्याचे आहे अथवा नाही...
या बिनडोक मिपाकरांच्या नादी लागुन त्यांचे काही ऐकण्याची गल्लत करु नका...
बाकी, तुम्ही सुज्ञ आहातच.. काय करावे काय नाही हे आमच्यासारख्यने सांगणे न लगे...
ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.
>>आपण आपली पत्रिका युयुत्सुंना का नाही दाखवत ??
म्हण्जे तेच तुम्हाला सांगतील की कोणत्या अमावस्येला तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणे उपयुक्त ठरेल...
आँ? अमावास्येला युयुत्सुंशी संवाद साधायचा?
म्हण्जे तेच तुम्हाला सांगतील की कोणत्या अमावस्येला तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणे उपयुक्त ठरेल...अधोरेखिताचा अर्थ जान्रावांकडे बोट दाखवतोय चाचा.....
आँ? अमावास्येला युयुत्सुंशी संवाद साधायचा?याच प्रश्नाला थोडे काट-छाट करुन... आँ ? युयुत्सुंशी संवाद (का वाद) साधायचा?
या कॉम्प्लिमेंट खेरीज सदरहू घटना/व्यक्ती/परीस्थितीच्या अनूशंगाने मिपाकरांकडून आणी काही माहीती/मार्गदर्शन/सल्ला यांची अपेक्षा आपल्याला आत्ता आहे काय ? असल्यास संकोच न ठेवता सांगा.... विचारपूर्वक प्रतिसाद दिल्या जाइल.
फार विचार करु नये बुवा माणसाने. अंतर्मुख आणि एकलकोंडे असण्यात वाईट काय? मुळात कसंही असलं तर त्यात चांगलं वाईट काय? आपला स्वभाव आपल्या अनुभवांवरून आणि संवेदनशीलतेवरून ठरतो. तसा तो ठरू द्यावा. बदलला तर बदलू द्यावा. फायद्या-तोट्यासाठी उगाच इच्छा नसताना जनसंपर्क वाढवणे वगैरे मला पटत नाही. शिवाय ठरवून काही करायला गेलं की त्यात कृत्रिमपणा येतो ते वेगळंच.
शुचि,
मीही आधी तुमच्यासारखीच एकलकोंडी होते. अतिशय कमी बोलणारी, अनोळखी लोकांसमोर तोंडसुद्धा न उघडणारी. लहानपणी सुट्टीत आजोळी जायचे तेव्हा एकटीच एका खोलीत जाउन पुस्तक वाचत बसायचे. माझ्या मामी सारख्या ओरडायच्या की काय भुतासारखी एकटीच बसतेस? तेव्हा फारसं मनावर घेतलं नाही, पण आता माझ्या नणदेचा मुलगा माझ्या घरी आल्यावर पुस्तकात तोंड घालून बसतो तेव्हा समजतं की त्या का चिडायच्या ते. तेव्हा त्यांचं ऐकायला पाहिजे होतं असं वाटतं. आजी-आजोबा, मामा-मामी, मामेभावंडं यांच्याबरोबर वेळ घालवायला पाहिजे होता. कालांतराने आम्ही मोठे झालो आणि आजोळी जाणं कमी झालं. आता परदेशात येउन झाला तर वर्षभरात एखादा फोन होतो.
पुढे शाळेत बाकावर असलेली मैत्रीण अतिशय बडबडी होती. तिच्यामुळे बहुतेक मीही बोलायला लागले.
तरी तुम्हाला पडलाय तसा प्रश्न अजूनही कधी कधी पडतो. विचार सुरु असतो बोलू की नये. पण मग वाटतं की स्वतः सुरुवात करण्यात काही नुकसान नाही. फार तर समोरची व्यक्ती नीट उत्तर देणार नाही. पण पुढे वाईट तर वाटणार नाही की मी प्रयत्न केला नाही. समजा तुम्ही सुट्टीवर गेलात आणि परत येईपर्यंत या जॉनने जॉब बदलला तर? कदाचित तुम्हाला रुखरुख लागेल. त्यामुळे एकदा प्रयत्न करायला तरी हरकत नसावी.
हं....