✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ढाकचा बहिरी - एक अनुभव (भाग २)

ध
धमाल मुलगा यांनी
Fri, 05/23/2008 - 18:19  ·  लेख
लेख

Book traversal links for ढाकचा बहिरी - एक अनुभव (भाग २)

  • ‹ ढाकचा बहिरी - एक अनुभव.
  • Up
  • ढाकचा बहिरी - एक अनुभव. (भाग ३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14751 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

मंडळी, पुढच

धमाल मुलगा
Fri, 05/23/2008 - 18:22 नवीन
मंडळी, पुढचा भाग- 'परतीचा प्रवास' वेळेअभावी आत्ता नाही देता येत. माफ करा. शक्य तितक्या लवकर पुढचा भाग लिहिनच. जरा विलम्ब झाला तरी राग धरु नये ही विनंती! आपला, ध मा ल.
  • Log in or register to post comments

अफाट...

प्रभाकर पेठकर
Fri, 05/23/2008 - 23:17 नवीन
वर्णन आणि फोटो अफाट आहेत. मस्त लिहीले आहे असेच चालू दे. पुढचा भाग- 'परतीचा प्रवास' वेळेअभावी आत्ता नाही देता येत. माफ करा. अरे! एवढे अपराधी वाटण्यासारखे काय आहे? व्यवस्थित भाग पाडलेले आहेत. वर्णन लांबत चालले तरी पाल्हाळीक अजिबात नाही. मनाची पकड घेणारे आहे. 'क्रमशः' चा बाऊ नको. लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

असेच म्हणतो

बेसनलाडू
Sat, 05/24/2008 - 09:16 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सुरेख..

स्वाती दिनेश
Fri, 05/23/2008 - 18:25 नवीन
सुरेख वर्णन! दोन्ही भाग आत्ताच वाचले,पुढे तुम्ही लोकं कसे उतरलात? सूर्यास्त कसा वाटला? याची उत्सुकता आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

अरे व्वा !!!!!

मदनबाण
Fri, 05/23/2008 - 18:30 नवीन
दोन्ही भाग वाचले,,,मस्त लिहले आहे..... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे..... मदनदा.....
  • Log in or register to post comments

मस्त लिहील

ऋचा
Fri, 05/23/2008 - 18:33 नवीन
मस्त लिहील आहेस रे धम्या!!!
  • Log in or register to post comments

बेष्ट.........

विजुभाऊ
Fri, 05/23/2008 - 18:40 नवीन
मस्त लिहितोस की रे धमु.......एकदम बैठकीत फड रंगवुन सांगितलेस बेष्ट.........
  • Log in or register to post comments

वा !! क्या

विदुषक
Fri, 05/23/2008 - 18:40 नवीन
वा !! क्या बात है .......... झकास मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

शरुबाबा
Fri, 05/23/2008 - 18:46 नवीन
दोन्ही भाग वाचले,,,मस्त लिहले आहे..... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.....
  • Log in or register to post comments

अमेझिंग

आनंदयात्री
Fri, 05/23/2008 - 18:55 नवीन
सिंपली अमेझिंग यार ! धम्या प्रचंड सुंदर लिहलं आहेस !! पहिल्या भागापेक्षा सरस. च्चायला फोटो नसतांना पण सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले एकदम व्हिडीओच म्हण ना. पहिल्यांदा सुरु झालेला प्रवास, उन, तुमची मस्ती, नंतर भिजलेले अंग चोरुन खोपच्यात बसलेले अन अर्धभिजल्या सिगारेटी फुंकणारे, कम्मो धावत आली तेव्हा टरकलेले, ध्येय गाठल्यावर गहिवरुन आलेला धम्या, उतरतांना अक्षरशः वाटणारी भिती .. सगळे सगळे आंखोके सामने .. बॉस्स. लै लै मस्त लिहलस. :) एक पार्टी तुला आपल्याकडुन :) >>..."ओय खोतियों...उथ्थे वेख्खो...सनसेट्ट! क्माल है यार...सिंपली अमेझिंग उत्कंठा फुटुन जिव जाणार आता सोम्मार पर्यंत. - धमालयात्री :)
  • Log in or register to post comments

झक्कासच धमु..

वरदा
Fri, 05/23/2008 - 19:06 नवीन
कसला सॉलिड चढ आहे.....मस्तच वर्णन केलयस.....बिचारा नंतर १५ दिवस केळ्याचं नाव सुद्धा नको वाटत असेल ना तुला...
  • Log in or register to post comments

मस्त

ध्रुव
Fri, 05/23/2008 - 19:15 नवीन
ढाकचा ट्रेक म्हणजे भारीच अनुभव असतो... मस्त जमलेत दोन्ही भाग. -- ध्रुव
  • Log in or register to post comments

सह्ही फोटो..

प्राजु
Fri, 05/23/2008 - 19:24 नवीन
वर्णन रोमहर्षक... सह्ह्ह्ह्ह्ही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगदी असच

मन
Fri, 05/23/2008 - 19:25 नवीन
आम्ही पण फिरलोय. धमाल केलिये. अगदी म्हणजे, शद्बानही फरक नाही.(फक्त पात्रांची नावं वेगळी, तपशील तोच.) (पण असं ,डोळ्यासमोर चित्र उभं राहील असं आम्हाला नाही लिहिता आलं.) एकदम त्याच काळात गेलं मन. ....की दरी पाहून गरगरायला व्हायचं, मग एकमेकांच्या जवळ जवळ राहून चढायला लागलो...डोळे फिरले की एकानं दुसर्‍याला आधार द्यायचा, आणि बॅलन्स करायला तिसर्‍यानं टेकू लावायचा. कधी खाचेतून हात निसटायचा, कधी पायाखालचा दगड सुटून दरीत गडगडत जायचा...मिनिटभर नुसत्या हातावर सगळा भार टाकून लोंबकळत रहावं लागायचं. लगेच घरच्या सगळ्यांचे चेहरे नजरेसमोर फिरायला लागायचे, मनोमन आईबापाची माफी मागून पुढच्या जन्मी भेटू असं मनातल्या मनात म्हणायचो. हे आणि आता खाली उतरायला हवं हे लक्षात आल्यावर "आयचा घो रे! संत्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं" असं एक पन्नास वेळा तरी म्हणून झालं असेल. कसंबसं जीव मुठीत धरुन् उतरायला सुरुवात केली. चढणं सोपं एकवेळ, पण उतरणं? सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या. अगदी अगदी नेमकं हेच अनुभवलय. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

धमाल

झकासराव
Fri, 05/23/2008 - 19:27 नवीन
लिहिलस रे. दोन्ही भाग वाचले. भिकार्‍यासारखे ७-७.५ रु :)) ह्या भागात देखील फर्मास लिहिल आहेस. फोटो बघुन हा ट्रेक मी कधी आयुष्यात करेन अस वाटत नाय रे बाबा. :) अवांतर : तो कम्मोचा पळत येण्याच्या सीन वरुन एक आठवल. भीमाशंकरला गेलो होतो. जंगलात घुसलो. (मारुती मंदीराच्या बाजुने) कुठुन कुठे पोचलो काय कळाल नाही पण कडे आणि दर्‍या बघुन मन समाधान झाल. परतीची वाट लक्षात येइना. मग पाण्याने केलेल्या वाटेने येत होतो. (आम्ही हिवाळ्यात गेलो होतो.) तुमच्या कम्मोसारखाच आमचाहि एक दोस्त. अन्या. मी सगळ्यात पुढे, एक ढिगारा असलेला दोस्त माझ्या मागे, त्या मागे आमची कम्मो, आणि त्याच्या मागे अजुन दोन जण असे चाललो होतो. पायाखाली पाहिल तर पडलेली पानं, काटक्या, खडकांची झीज होउन झालेले गुळगुळीत छोटे मोठे गोटे हे सगळे आणि उताराचा रस्ता म्हणून संभाळुन चालत होतो. इतक्यात मागुन धडाधड आवाज आला म्हणून माग बघतोय तोच माझ्या मागचा ढिगारा असलेला दोस्त माझ्या पायात जमिनीशी जमेल तसा शुन्य अंशाचा कोन करुन पसरलेला. काय घडल हे कळायला काही सेकंद लागले. मग कळाल (मागच्या दोघानी सांगितल) ह्या अन्याने अचानक पळत जावुन ह्या ढीगाला धक्का दिला?? झाल आम्ही अन्याकडे पाहिल तर त्याने बावळट ध्यान करुन सांगितल की त्याला पाठीला कायतरी चावल म्हणुन घाबरुन तो पळत सुटला आणि तोल आवरत नव्हता म्हणून त्याने ढिगाला धरुन थांबण्याचा प्रयत्न केला होता. :)) एक बर झाल त्या धिगाला जास्त लागल नाही नायतर त्या रत्याने आम्हा चौघांवर त्या ढिगाला उचलुन घेवुन जायची कामगिरी पडली असती तर मग झालच. :) आम्ही त्या अन्याची पार खेचली परतीच्या अख्ख्या वाटेवर. बाकी आम्ही सगळे शहरात राहणारे तो एकटाच गावी राहिलेला असुन देखील एवढा घाबरला म्हणून तर जरा जास्तच. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

जबरा

मिसळ
Fri, 05/23/2008 - 19:45 नवीन
वर्णन केले आहेस. अगदी डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहिला. लगे रहो. पु. भा.प्र.
  • Log in or register to post comments

फुल्टूच रे!

चतुरंग
Fri, 05/23/2008 - 20:08 नवीन
परत एकदा ढाकचा बहिरी सफर मनातल्या मनात झाली. त्या वरच्या गुहेतून अख्खा मावळ एका नजरेत निरखता येतो. वारा तर असा भणाण असतो की दोरी बांधून सोडला तर अख्खा माणूसच पतंगासारखा उडेल! ;) कडा चढताना 'पोटात गोळा येणे', 'आईचे दूध आठवणे' असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात आणि वरुन खाली उतरताना तर 'तोंडाला कोरड पडणे', 'जिवाचा थरकाप होणे' अशांची दोस्ती होते! ;) (धमाला, असले लिखाण एका दमात संपावे असे वाटते, इथे क्रमशः म्हणजे एकदम कडेलोट होतो रे! ~X( चतुरंग
  • Log in or register to post comments

एक नंबर

पुष्कर
Fri, 05/23/2008 - 20:56 नवीन
तुझे फोटो पाहून ढाकच्या आठवणी जाग्या झाल्या. ढाकच्या कड्यावर मध्यभागी आल्यावर फाटते (चढताना पेक्षा उतरताना जास्त), तेव्हा त्या बहीरीचा पुजारी एका हातात पाण्याचा कॅन आणि दुसर्‍या हातानी खांद्यावर बळीचा बोकड धरून ठेवलेला अश्या अवस्थेत झपाझप कुठल्या-कुठल्या कपारीत पायांची बोटं रोवत बघता बघता निघून जातो. त्याचा हा रोजचाच कार्यक्रम. कार्तिक स्वामींच्या देवळांप्रमाणे बहीरीच्या गुहेतही मुलींना प्रवेश नाही, त्यामुळे मुलींना कडा चढताना पाहिलं तर तो ओरडतो(तो म्हणजे पुजारी. बहीरी किंवा कार्तिकस्वामी नव्हे). असो. लोकांना नको तिथे आपलं नाव लिहून ठेवण्याची घाणेरडी सवय आहे. एक कडा चढला म्हणजे काय अगदी पराक्रम केला असं वाटतं! ज्यांनी आपल्या आयुष्यात शेकड्यांनी किल्ले लढवले, त्यांनी सुद्धा अश्या कुठल्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं नाही...
  • Log in or register to post comments

मस्त रे

संदीप चित्रे
Fri, 05/23/2008 - 23:19 नवीन
धमु ... मस्त लिहिलंयस रे ... च्यायला असले ट्रेक 'माझ्या चहाचा कप' नाही !!! ----- अवांतरः तू सुहास शिरवळकरांचा फॅन आहेस का ? -----
  • Log in or register to post comments

धम्या,

शितल
Fri, 05/23/2008 - 23:38 नवीन
मस्त छान वर्णन केल॑स, बाप रे फोटो पाहुनच कळते की काय हिम॑त केलीत तुम्ही, मानल॑ बॉ तुम्हाला.
  • Log in or register to post comments

च्यायला

भडकमकर मास्तर
Sat, 05/24/2008 - 00:11 नवीन
च्यायला फार छान... एकदम जमलंय वर्णन... ... :H ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धमाल्या...

विसोबा खेचर
Sat, 05/24/2008 - 05:58 नवीन
धमाल्या लेख अन् चित्रं दोन्हीही सहीच! एकदम चित्तथरारक ट्रेक झालेला दिसतोय परंतु तेवढाच तो एन्जॉयही केलेला दिसतोय तुम्ही लोकांनी! :) सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या. मस्त लेखनशैली! :) लेका धमाल्या, तुझा लेख वाचून आमच्याही कॉलेज जीवनातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! साला आता आपण एक लई सुदृढ बालक आहोत परंतु कधी काळी कॉलेजलाईफ मध्ये असताना १९८४ ते ८८ च्या काळात काही गडकिल्ले आम्हीही अगदी मनमुराद हिंडलो आहोत बरं का! :) असो, अजूनही लेखन येऊ द्या! आपला, (हरिश्चंद्रगड प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त रे

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 05/24/2008 - 12:21 नवीन
मस्त रे ! धमु धमाल केली आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments

बाप रे !

पद्मश्री चित्रे
Sat, 05/24/2008 - 12:45 नवीन
वाचुन नि गडाचे फोटो पाहुन च भीती वाटते... सुरेख लिहिल आहे.. अगदी डोळ्यासमोर चित्र उभ केलं आहेस. असेच छान ट्रेक करा..(पण जपुन).. आणि आम्हाला पण सफर घडवुन आणा.....
  • Log in or register to post comments

मस्त!

चित्रा
Sat, 05/24/2008 - 21:44 नवीन
मस्त मजा केलेली दिसते आहे. चित्रदर्शी वर्णन.
  • Log in or register to post comments

मस्त रे कांबळे!

शिंगाड्या
Sun, 05/25/2008 - 14:06 नवीन
मस्त रे कांबळे!! :-) एकदम सही.. आमच्या लोहगड ,कोराइगडाच्या मोहिमेची आठवण झाली.. (आता थोडासाच उरलेला मावळा )शिंगाड्या
  • Log in or register to post comments

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/25/2008 - 18:20 नवीन
धमाल, वर्णन आणि फोटो लै भारी !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!!!

धमाल मुलगा
Tue, 05/27/2008 - 14:49 नवीन
हा ही भाग आपण आवडीनं वाचलात. आनंद वाटला. :) असाच लोभ ठेवा मंडळी! पेठकरकाका, धीर दिल्याबद्द्ल आभारी आहे. :) आंद्या, पार्टीचा बेत कधीये मग? ;) चतुरंगराव,
वारा तर असा भणाण असतो की दोरी बांधून सोडला तर अख्खा माणूसच पतंगासारखा उडेल
अगदी खरं बुवा ! पुष्कर,
लोकांना नको तिथे आपलं नाव लिहून ठेवण्याची घाणेरडी सवय आहे. एक कडा चढला म्हणजे काय अगदी पराक्रम केला असं वाटतं! ज्यांनी आपल्या आयुष्यात शेकड्यांनी किल्ले लढवले, त्यांनी सुद्धा अश्या कुठल्या ठिकाणी आपलं नाव कोरलेलं नाही...
लाज वाटते साल्यांची.... खुद्द छत्रपतींचं कुठं नाव नसतं आणि हे आशिक साले नावं काय, बदाम काय, गाड्यांचे नंबर काय...च्छ्या: ! बाकी, मध्यभागी आल्यावर मात्र आपल्याच फोटोभोवती चंदनाचा हार दिसायला लागतो हे मात्र १०००००% खरं यार. संदीपभौ,
च्यायला असले ट्रेक 'माझ्या चहाचा कप' नाही !!!
एकदा चलाच मग! जर कम्मो येऊ शकतो तर कोणिही येऊ शकतो :)
अवांतरः तू सुहास शिरवळकरांचा फॅन आहेस का ?
आयला, कसं ओळखलंत हो? फ्यान म्हणजे डायरेक्ट 'पीएसपीओ' हाय आपण :) एक 'हाय ओल्ड फ्रेंड्स' सोडलं तर बाकी सगळी वाचून झालीएत...कित्येकदा :) झकासराव, लय भारी मजा की! लिहा ना तुमचा भिमाशंकरचा अनुभव :) आवडेल वाचायला. तात्याबा, मग तुमची हरिश्चंद्रगडाची गोष्ट कधी सांगणार आम्हाला? शिंगाड्या, येऊद्या ना तुमचेही अनुभव :)
(आता थोडासाच उरलेला मावळा )शिंगाड्या
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा