✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गीत

क — क्रान्ति, Tue, 04/26/2011 - 14:02
काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला इथूनवेचलं आणि पहिला प्रयत्न केला. जखमा फुलतील नव्याने, थरथरेल मन तृणपाते, भगव्याशा आभाळाचे क्षितिजाशी धुरकट नाते त्या कातरवेळी माझ्या वेदनेस कंठ फुटावा हुरहुरत्या सांजेला मी माळून पूरिया द्यावा! झाडांच्या पार तळाशी घनदाट स्मृतींचा मेळा काहूर जागवित याव्या अन् सांजफुलांच्या वेळा संध्येची गहिरी दु:खे गात्रांत भरून उरावी, मावळताना किरणांना कविता आतून स्फुरावी धूसरशा मेघांमधल्या शिल्पातुन सूर झरावे, मी ज्योतीसह थरथरता हे एकच गीत स्मरावे, "भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मज तुझी आठवण येते!"

प्रतिक्रिया द्या
2206 वाचन

💬 प्रतिसाद (8)

क्या बात..

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/26/2011 - 14:21 नवीन
क्या बात!! क्या बात!
त्या कातरवेळी माझ्या वेदनेस कंठ फुटावा हुरहुरत्या सांजेला मी माळून पूरिया द्यावा!
छानच प्रयत्न!! सुंदर!!
  • Log in or register to post comments

सुंदर रचना!

नगरीनिरंजन
Tue, 04/26/2011 - 14:45 नवीन
सुंदर रचना!
  • Log in or register to post comments

अप्रतिम .... झाडांच्या पार

गणेशा
Tue, 04/26/2011 - 16:07 नवीन
अप्रतिम .... झाडांच्या पार तळाशी घनदाट स्मृतींचा मेळा काहूर जागवित याव्या अन् सांजफुलांच्या वेळा संध्येची गहिरी दु:खे गात्रांत भरून उरावी, मावळताना किरणांना कविता आतून स्फुरावी विशेष आवडले ....
  • Log in or register to post comments

खल्लास!! जियो क्रांती!!! अफाट

प्राजु
Tue, 04/26/2011 - 19:22 नवीन
खल्लास!! जियो क्रांती!!! अफाट आहे कविता!
  • Log in or register to post comments

व्वाह!

स्पंदना
Wed, 04/27/2011 - 10:40 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments

दाद

श्रावण मोडक
गुरुवार, 04/28/2011 - 20:17 नवीन
दाद देण्याजोगाच प्रयत्न!
  • Log in or register to post comments

वा क्रांती! सुरेख! खूप सुरेख

यशोधरा
Fri, 04/29/2011 - 15:37 नवीन
वा क्रांती! सुरेख! खूप सुरेख लिहितेस तू.
  • Log in or register to post comments

क्रांतीतै, खुप सुंदर कविता!!!

मराठमोळा
Sun, 05/01/2011 - 13:01 नवीन
क्रांतीतै, खुप सुंदर कविता!!! आवडली.. :) स्वगत : ( मिपावर आजकाल लोकं काव्य विभाग उघडुन बघत नाहीत याला जबाबदार कोण? )
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा