✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गझल

क — क्रान्ति, गुरुवार, 03/31/2011 - 16:03
पुन्हा काल स्वप्नात आली गझल खुले पापणी अन् उडाली गझल कशी कोरडी मी, जरी वाहते तुझ्या आठवांच्या पखाली गझल? नसे वेगळे रूप माझे-तिचे, मला वारशाने मिळाली गझल "जरा एकटे वाटते, शब्द दे तुझे सोबतीला" म्हणाली गझल जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये, क्षणार्धात माझीच झाली गझल! नको या प्रवासात थांबा कुठे, सवे आज माझ्या निघाली गझल

प्रतिक्रिया द्या
6894 वाचन

💬 प्रतिसाद (18)

मस्त

कच्ची कैरी
गुरुवार, 03/31/2011 - 16:55 नवीन
व्वा मस्तच आहे तुमची गझल म्हणजेच तुम्ही :)
  • Log in or register to post comments

क्रांती, सुरेख गझल! खूप

यशोधरा
गुरुवार, 03/31/2011 - 16:57 नवीन
क्रांती, सुरेख गझल! खूप आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख गझल

चित्रा
Wed, 04/06/2011 - 18:25 नवीन
क्रांतिताई पुन्हा लिहू लागल्या याचा फार आनंद झाला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान आहे.. गझल मध्ये प्रत्येक

गणेशा
गुरुवार, 03/31/2011 - 17:03 नवीन
छान आहे.. गझल मध्ये प्रत्येक शेराचे एक वेगळे स्वतंत्र अस्तित्व असते .. ते जपले गेल्यास जास्त मज्जा येईल.. - क्षमस्व
  • Log in or register to post comments

स्वतंत्र अस्तित्व कुठे जपलं

यशोधरा
गुरुवार, 03/31/2011 - 17:07 नवीन
स्वतंत्र अस्तित्व कुठे जपलं गेलेलं नाहीये असं वाटत? समजावून घेण्यासाठी प्रश्न विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

संदेश मध्ये सांगतो, मुळ

गणेशा
गुरुवार, 03/31/2011 - 17:35 नवीन
संदेश मध्ये सांगतो, मुळ कवयत्रीला कींवा त्यांच्या कवितेला नावे ठेवणाचा प्रयत्न नव्हता.. आणि त्यांनी तसा बदल करुन अजुन छान गझल द्यावी असा उद्देश होता. तरीही येथे मत सांगितल्यास ते माझे वयक्तीक मत इतरांना/कवयत्रीला न पटल्यास वाद नको म्हनुन स्वतंत्र बोलतो ..आणि तसे ही तेच बरोबरच आहे असा आग्रह माझा नाही. सांगतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो चालेल, सांगा. मला तरी सर्व

यशोधरा
गुरुवार, 03/31/2011 - 17:46 नवीन
हो चालेल, सांगा. मला तरी सर्व शेर स्वतंत्र पाहिले तरी ( द्विपदी म्हणून) वा एकत्रही उत्तम जमलेत असं वाटलं. तुमचे मतही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तुम्ही बरोबर सांगितले ..

गणेशा
गुरुवार, 03/31/2011 - 20:56 नवीन
तुम्ही बरोबर सांगितले .. वाचली पुन्हा धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा! सुरेख!!

मेघवेडा
गुरुवार, 03/31/2011 - 17:28 नवीन
वा! सुरेख!!
  • Log in or register to post comments

मस्त.

कवितानागेश
गुरुवार, 03/31/2011 - 17:31 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 03/31/2011 - 18:28 नवीन
गझल आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आवडली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/31/2011 - 20:01 नवीन
गझल आवडली. पुन्हा काल स्वप्नात आली गझल खुले पापणी अन् उडाली गझल मस्तच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

व्वा, मस्तं जमली अहे गझल.

अनामिक
गुरुवार, 03/31/2011 - 20:53 नवीन
व्वा, मस्तं जमली अहे गझल. आवडली.
  • Log in or register to post comments

गझल

भवानी तीर्थंकर
गुरुवार, 03/31/2011 - 22:24 नवीन
गझलच शब्द मागतेय... वा!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!! प्रत्येक शेर.. एकदम

प्राजु
गुरुवार, 03/31/2011 - 22:34 नवीन
अप्रतिम!! प्रत्येक शेर.. एकदम खणखणीत! नको या प्रवासात थांबा कुठे, सवे आज माझ्या निघाली गझल हॅट्स ऑफ!
  • Log in or register to post comments

सुन्दर काव्य!

दीपा माने
गुरुवार, 03/31/2011 - 23:37 नवीन
क्रांती, तुमची काव्यरचना/गझल मनाला भिडली. असेच काव्यातून आनंद देत रहा.
  • Log in or register to post comments

जुळे प्रेम एका

मदनबाण
Fri, 04/01/2011 - 09:24 नवीन
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये, क्षणार्धात माझीच झाली गझल! अप्रतिम... :)
  • Log in or register to post comments

सु रे ख! कल्पना आणि शब्द सहज

उत्खनक
Mon, 12/23/2019 - 19:16 नवीन
सु रे ख! कल्पना आणि शब्द सहज येऊन भिडतात.. ती गझल! रचना फार फार आवडली!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा