गझल
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा काल स्वप्नात आली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल
कशी कोरडी मी, जरी वाहते
तुझ्या आठवांच्या पखाली गझल?
नसे वेगळे रूप माझे-तिचे,
मला वारशाने मिळाली गझल
"जरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!
नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल
वाचने
6909
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मस्त
क्रांती, सुरेख गझल! खूप
In reply to क्रांती, सुरेख गझल! खूप by यशोधरा
सुरेख गझल
छान आहे.. गझल मध्ये प्रत्येक
In reply to छान आहे.. गझल मध्ये प्रत्येक by गणेशा
स्वतंत्र अस्तित्व कुठे जपलं
In reply to स्वतंत्र अस्तित्व कुठे जपलं by यशोधरा
संदेश मध्ये सांगतो, मुळ
In reply to संदेश मध्ये सांगतो, मुळ by गणेशा
हो चालेल, सांगा. मला तरी सर्व
In reply to हो चालेल, सांगा. मला तरी सर्व by यशोधरा
तुम्ही बरोबर सांगितले ..
वा! सुरेख!!
मस्त.
In reply to मस्त. by कवितानागेश
+१
आवडली
व्वा, मस्तं जमली अहे गझल.
गझल
अप्रतिम!! प्रत्येक शेर.. एकदम
सुन्दर काव्य!
जुळे प्रेम एका
सु रे ख! कल्पना आणि शब्द सहज