✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१/४)

प
पाषाणभेद यांनी
Tue, 03/08/2011 - 12:04  ·  लेख
लेख
तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१/४)
पाषाणभेद सचिन बोरसे सहर्ष सादर करीत आहे, तुफान विनोदी धमाल वगनाट्य - वैरी भेदला वाटंवरचा अर्थात देश प्रेमाला पुरत नाही. प्रमुख भुमीका: राजा, राणी, राजपुत्र, प्रधान, हवालदार, शिपाई, राजपुत्री, कोतवाल, दिवाणजी, हुजर्‍या, हवालदार, भालदार, चोपदार, दासी, नर्तीका, विदुषक, सोंगाड्या आदी. लेखक, कवी: शाहीर पाषाणभेद सचिन बोरसे दिग्दर्शनः xxx संगीतः xxx कलाकार: xxx, xxx, xxx, xxx, xxx, xxx, (पडदा उघडतो तेव्हा शाहीर गण सुरू करतात.) -------------------------
गण (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| ------------------------ सोबती: वा वा शाहीर, गण तर लई फसकलास झाला. आक्षी आदर्श झाला बघा. मन लई परसन्न झालं. आता परंपरेनुसार गणानंतर गौळण बी झ्याक होवूंद्या. पब्लीक कसं खुष व्हाया पायजेल. आसं खुष, आसं खुष की त्येंनी सगळे घोटाळे, महागाई, प्रेटोल दरवाढ, भारनियमन, मुख्यमंत्री बदलाबदली समदं विसरायला पायजे, काय? शाहीरः आसं म्हनता. मंग होवून जावूदे! (ढोलकीचा ताल सुरू होतो अन त्या ठेक्यावर डोक्यावर माठ घेतल्याच्या आव आणत मावशी येते.) क्रमश: पुढचा भाग: तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२/४) - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११
  • तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२)
  • तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -३/४)
  • तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (अंतिम भाग -४/४)

Book traversal links for तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग१/४)

  • तुफान विनोदी धमाल वगनाट्य - देश प्रेमाला पुरत नाही (भाग -२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नृत्य
नाट्य
संगीत
कविता
प्रेमकाव्य
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3642 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

शाहिर .. गण तर लय झ्याक

गणेशा
Tue, 03/08/2011 - 13:36 नवीन
शाहिर .. गण तर लय झ्याक झालाय.. आता गवळणी ची वाट पाहत आहे .. होउन जाउदे ....
  • Log in or register to post comments

धमाल विनोदी ? आहो कास्ट पाहुन

टारझन
Tue, 03/08/2011 - 13:49 नवीन
धमाल विनोदी ? आहो कास्ट पाहुन तर ट्रिपल एक्स वाटतंय हे पाभे जी :) -एक्स्वायभेद
  • Log in or register to post comments

दफोराव लवकरच पुढचा भाग येऊ

पिंगू
Tue, 03/08/2011 - 16:09 नवीन
दफोराव लवकरच पुढचा भाग येऊ द्या..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा