मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण का जगतो?

अवलिया · · काथ्याकूट
राम राम मंडळी नुकतेच दोन दिवसांपूर्वी कूणीतरी मला खरड करुन विचारले "आपण का जगतो?" यावर मी खूप विचार केला. खरं तर विचार करणं ही माझ्या कुवतीबाहेरची गोष्ट! पण कुवतीबाहेर आहे म्हणून करु नये असे थोडीच आहे. तर मी माझ्या परीने खूप विचार केला. (खुलासा - इथे विजुभाऊंच्या परीचा काही संबंध नाही) पण मला सुस्पष्ट असे उत्तर मिळाले नाही. म्हटले जरा मिपाकरांचा विचार घेउ ! म्हणून ह्या काथ्याकुटाचा प्रपंच !! (प्रपंच करावा नेटका - रामदासस्वामी) तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत?

वाचने 21034 वाचनखूण प्रतिक्रिया 95

संध्याकाळी पाणवठ्यावर जाता यावे म्हणुन. खरे सांगायचे तर ह्या प्रश्नावर मिपा सदस्य श्री. स्पा ह्यांच्याशिवाय अधिक अधिकारवाणीने कोणी बोलु शकेल असे वाटत नाही. त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे.

रणजित चितळे Mon, 01/17/2011 - 13:46
जन्म होतो जो आपल्या हातात नसतो. पुढे रासायनिक प्रक्रिया जो पर्यंत थांबत नाहित तो पर्यंत मरण येत नाही. मधला काळ मग समय विमोचनात घालवतो ज्या ला आपण जगणे म्हणतो.

गवि Mon, 01/17/2011 - 14:01
"जगतो म्हणजे काय ? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय "का जगतो?" हे सांगणं. नुसता विचारही करणं अवघड आहे. "साठी" आणि "मुळे" हे दोन गंमतीदार शब्द आहेत. पूर्ण विरुद्ध. कशासाठी जगतो की कशामुळे जगतो हे आधी ठरवलं पाहिजे. (म्हणजे, काहीतरी व्हायचे/करायचे म्हणून जगतो, की काहीतरी झाले/केले म्हणून जगतो..) गहन आहे विषय. (फिलॉसॉफिकल स्माईली)

छोटा डॉन Mon, 01/17/2011 - 14:04
>>तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत? जगण्याची 'खाज' आहे म्हणुन जगतो, जगणे 'आवडते' म्हणुन जगतो. बाकी ह्याशिवाय इतर कारणे देणे महत्वाचे वाटत नाही, असो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सहमत. डान्रावांसारखे आणि द्येसमुखांसारखे मित्र जोवर बीलं भरत आहेत तोवरच जगण्यात अर्थ आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि त्यातही जगण्याची परवानगी आहे किंवा अनुमती आहे म्हणूनही जगतो आहे. परवडत असतं पण परवानगी नसती तर काय केले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

परवडत असतं पण परवानगी नसती तर काय केले असते.
हे म्हणजे 'खाते आहे पण आयडी ब्लॉक' असे झाले असते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा Mon, 01/17/2011 - 16:14
हे म्हणजे 'खाते आहे पण आयडी ब्लॉक' असे झाले असते. मग डू आयडी घेऊन यावे लागले असते

मुलूखावेगळी Mon, 01/17/2011 - 15:01
जगने हे साध्य नाही साधन आहे. वेगवेगळ्या इच्छा, हेतु पुर्न कराय्चे. कधी आनन्द स्वतःला मिळवनयासाठी, तर कधी जवळच्याना देन्यासाठी आहे , कधी गरजा पुर्न करन्यासाठी, काही मिळवन्यासाठी, अनि कधी तरी वरुन बोलावने येत नाहित म्हनुन. मी म्हनाले ते अगदी खरे नसेल हि पन मला असे वाटते.

सुहास.. Mon, 01/17/2011 - 15:06
? नाना, अध्यात्मिक पातळीवरन विचारतो आहे की शास्त्रीय , वैश्विक की स्वार्थाने की परमार्थाने , सामाजिक की राजकीय ?

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन Mon, 01/17/2011 - 15:53
>>आपण म्हणजे कोण? :) अवलियाकाका, बोला आता. होऊन जाऊ द्या तुमचा आणि थत्तेचाचांचा सामना. बाकी नशिबाने मिळालेला असा 'हाफवॉली' थत्तेचाचा वाया घालवतील असे आम्हाला वाटत नाही ;) चर्चा वाचतो आहे. - (अवलियाकाका आणि थत्तेचाचांचा फॅन)छोटा डॉन

In reply to by नितिन थत्ते

अवलिया Mon, 01/17/2011 - 17:14
>>>आपण म्हणजे कोण? अतिशय उत्तम प्रश्न. आपण हा स्वतःला निर्देशित करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. स्वतः या अर्थाने जसा मी स्वतः बोललो. तू स्वतः बोलला. तो स्वतः बोलला. ती स्वतः बोलली. या वाक्यांमधे स्वतः याअर्थाने निर्देशित होणारे चैतन्य जे देहरुपाने कार्यमग्न असते ते आपण याअर्थाने अपेक्षित असुन सध्या आपण या शब्दाचा परिघ केवळ मानववंशापुरता मर्यादीत आहे. कारण इतर प्राणीवंश जे स्वतः या अंशाने प्रतिबिंबित होऊ शकतात परंतु भाषेच्या अभावामुळे त्यांच्या अनुभव/जाणीवांची कल्पना किमान मला तरी नाही. सबब आपण या शब्दाचा अर्थ प्रत्येक मानवी जीव असा घ्यावा.

मदनबाण Mon, 01/17/2011 - 16:25
मी प्रेमा साठी जगतो आणि जगण्यासाठी प्रेम करतो... ;) अवांतर :--- श्री श्री श्री अवलिया उर्फ नाना उर्फ नानुडी... आपल्याला सुस्पष्ट उत्तर मिळालेच आणि खात्री पटली तर आम्हालाही कळवा... कसे ? ;) (लव्हर बॉय) ;)

In reply to by सूर्यपुत्र

कवितानागेश Tue, 01/18/2011 - 18:05
पण आपण (!/?) मरत का नाही?! ;) अवांतरः 'आपण का जगतो' हा प्रश्न मुंग्याना पण पडत असेल का? त्यांची 'जगण्याची' धडपड माणसांइतकीच असते.

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः | सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता || या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर जाळते. याच अनुषंगाने "मी का जगतो?" आणि "मी का जगलो?" असा केवळ एका शब्दाच्या बदलाने प्रश्न स्वतःलाच विचारला तर माझ्यापुरते मी म्हणू शकेन की "मी अनुभव घेण्यासाठी जगतो". जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने ज्याचा त्याने आपल्या वाटेला आलेल्या खात्यावरील जमाखर्चाचा लेखाजोगा तपासून 'जगण्या' चे वल्हे कसे हाताळावे हे ठरवून आपले तारू अनुभवाच्या विशाल दर्यात न्यावे. या अखंड प्रवासातील संचित धन हेच त्याला जीवनाविषयी उभारी देण्यास कारणीभूत होत असल्याने ते मिळविण्यासाठी तरी त्याने "जगले" (च) पाहिजे; अन्यथा मानव आणि पशू यात फरकच राहणार नाही. निसर्गाने माझ्यासाठी H2O आणि O2 चा पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवला असला तरी त्यामुळे मी जगू शकेन हे खरे पण त्या जगण्याला जर 'जगणे' म्हणत असेल तर ते एखादी वनस्पतीही सहजगत्या करू शकते. पण 'जगण्याची तृष्णा' फार विलोभनीय आहे ही गोष्ट संतमंडळीही नाकारू शकत नाहीत. कोणतीही कारणमीमांसा द्या वा उपमा लावा....थोरांचे प्रेम, पत्नी प्रेम, अपत्य वात्सल्य, मित्र प्रेम...पण शेवटी उरते ते हेच सार की दिवसभराचे आपले सारे झगडणे अखेरीस जगण्याची उर्मी आणि त्याबद्दलची रत्तीभरही कमी न होणारी तृष्णा हेच होय. "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" हे दाखल्यापुरते ठीक आहे, पण या संज्ञेची रचना करणाराही जगण्याच्या तृष्णेपायी खाटल्यावरून हमखास उठला असणारच आणि मग त्याबाबतच्या शोधउत्खननाचीही गरज नाही इतके ते प्रखर आहे. नैराश्येपोटी आत्महत्येचे विचार मनी बाळगणारा रावसाहेब त्याच रात्री आमटीत आमसुल ज्यादा पडले म्हणून बायकोवर वस्स्कन ओरडतो, ते ह्याच कारणासाठी की जगण्यावरचे त्याचे प्रेम रत्तीभरही कमी झालेले नाही. 'कास्ट अवे' मधील फेडेक्सचा एक्झेक्युटिव्ह चक नोलँड चार वर्षे एकांतवासात त्या अज्ञात बेटावर अटळपणे राहतो...पण "जगतो"....आपण 'मेलेलो नाही म्हणून जगलो आहोत" असे चुकूनही त्याच्या मनी येत नाही. उलटपक्षी 'अरे, हा तर एक अनुभव आहे, जगण्याचा....आणि मी जगून दाखविनच, पाहतो कोण मला अडवे तो !" चक आणि बेटावरील त्याच्या कल्पनेतील सखा "विल्सन" हे जगण्याच्या अनुभवाचे प्रतीक आहेत. मनुष्यप्राण्यातील ही कट्टरतेचीच भावना आणि निसर्गाने जन्मजात दिलेली जगण्याची लालसा, ओढ यासाठी आणि ती सार्थअर्थाने भोगण्यासाठीच 'आपण जगतो' असे मी म्हणेन. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

अवलिया Mon, 01/17/2011 - 17:20
उत्तम प्रतिसाद. किंचित शंका जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने कंसातील वाक्य सध्यापुरते बाजुला ठेवु. जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता जन्मजात असते की भाषेच्या संवादामुळे/लेखनामुळे इतर मानवांच्या अनुभवाच्या /विचारांमुळे असे विचार मनात येतात हा प्रश्न आहे. कारण जर अशी क्षमता जन्मजात असेल तर प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला.

In reply to by अवलिया

गवि Mon, 01/17/2011 - 17:28
जन्मजात नसावी.. पण बुद्धिमत्ता हाच माणूसप्राण्याचा इतका अविभाज्य भाग आहे की ही विचारक्षमता किंवा इच्छा इतरांकडून (अ‍ॅक्वायर्ड) असते की बुद्धी विकसित होताना सोबत आपोआप पडणार्‍या प्रश्नांपैकी (स्वनिर्मित) तो प्रश्न आहे हे सांगणे कठीण. सर्वांनाच हे प्रश्न पडतात असं दिसतं.. इथे असलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी पडला असेल हे ते सांगू शकतील. जनरली पंधरावीस वर्षे वयादरम्यान पहिल्यांदा आणि तीव्रतेने पडतात असं वाटतं. म्हणजे त्या वयात मित्रांमधे चर्चा झडलेल्या आठवतात.

In reply to by अवलिया

स्वानन्द Mon, 01/17/2011 - 17:46
क्षमता असल्याशिवाय... आपण विचार करू शकणारच नाही! असं म्हणता येईल की तिचा वापर करण्यासाठी उपरोल्लिखित कारणे कारणीभूत होतात. पण या लेखनाची सुरूवात पण कुणीतरी पहिल्यांदा केली; ती तशी क्षमता असल्यामुळेच.

In reply to by अवलिया

अर्धवटराव Tue, 01/18/2011 - 04:25
>>प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला. हो. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. किंबहुना सर्व प्रश्नांचं मूळ कारण तेच असतं. ते प्रत्येकाला प्रत्येकवेळी प्रकर्षाने जाणवत नाहि हा भाग निराळा. अर्धवटराव

मला या प्रश्नाचे उत्तर माहित नाहीये. पण गेल्या काही दिवसापासून आमचे मित्र श्री. प.रा.-जी यांना "मी अजून जिवंत कसा?" असा प्रश्न स्वतःबद्दलच पडला आहे.

In reply to by निखिल देशपांडे

वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा खाण्यासाठी जगतोय.
काय ? जरा संपुर्ण वाक्यात लिहित जा. उगाच मनात नको नको ते विचार येतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वरील वाक्य असे वाचावे वर काही चांगले कारणे आले आहेत. आम्ही तर बुवा ,खाण्यासाठी जगतोय.

In reply to by निखिल देशपांडे

आत्मशून्य Mon, 01/17/2011 - 18:18
जर वर काही चांगली कारणे आली आहेत असे तूम्हाला वाटते आहे तर तूम्ही खाण्यासाठी जगताय असे सांगून तूमचे कारण चांगल्या कारणापासून वेगळे का करत आहात ?

In reply to by अवलिया

मूकवाचक Tue, 01/18/2011 - 20:38
मानवी प्रयत्न हा मनोव्यापारच आहे. In accordance with the prarabdha of each, the One whose function it is to ordain makes each to act. What will not happen will never happen, whatever effort one may put forth. And what will happen will not fail to happen, however much one may seek to prevent it. This is certain. - Ramana Maharishi

In reply to by अवलिया

"आपण का जगतो" यामधे किमान सगळ्या प्रतिसादक मिपाकरांचा समावेश आहे. मी का जगते याचं मला अपेक्षित असणारं उत्तर बिपिन कार्यकर्ते का जगतात असं त्यांना वाटतं किंवा अवलिया आयडीधारी व्यक्ती का जगते असं या व्यक्तीला वाटतं यापेक्षा वेगळं असू शकतं. तत्त्वज्ञान वगैरे सांगून 'मरत नाहीत म्हणून' सजीव जगतात आणि हे उत्तर सगळ्यांसाठी सारखंच आहे असंही सांगता येईल. पण तसं असेल तर मग सगळ्यांना हा प्रश्न विचारण्याचं कारण नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवलिया Wed, 01/19/2011 - 11:40
मी का जगते याचं मला अपेक्षित असणारं उत्तर बिपिन कार्यकर्ते का जगतात असं त्यांना वाटतं किंवा अवलिया आयडीधारी व्यक्ती का जगते असं या व्यक्तीला वाटतं यापेक्षा वेगळं असू शकतं. सहमत आहे. आणि म्हणूनच अशा विविध विचारांच्या मागे काही समान सुत्र सापडते का हे पहाण्याचा प्रयत्न चालू आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

"....अजून मेलो नाही म्हणून!..." ~ हे उत्तर मजेत [वा 'लाईट मूड' मध्ये] दिले असेल तर ठीक आहे, पण जर त्याला गंभीरतेची छ्टा असेल तर ही एक प्रकारची Cynic Attitude असून ती निर्माण होण्याचे कारण 'या जगात काहीही चांगले चालू नाही' अशी नैराश्याला जवळ करणारी स्थिती भोवताली आहे असे मानले जाते.....जी तुमच्या बाबतीत नसावी अशी खात्री आहे. मीही कधीकधी या गर्तेतून जात असतो पण अचानकच केव्हातरी 'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे...' ही धून कानी पडते आणि मन परत ताळ्यावर येऊन म्हणते 'अरे, आपण का जगतो याच्या उत्तरासाठी ताज्या गुलाबाची आठवण खूपच आल्हाददायी आहे...'. इन्द्रा

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया Tue, 01/18/2011 - 11:04
>>>अजून मेलो नाही म्हणून! गंभीरतेने उत्तर दिले आहे असे धरुन - मरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतांना तसेच अनेक जण आत्महत्येचे मार्ग चोखाळत असल्याचे दिसत असतांना जगण्याचा पर्यायच का निवडला जातो?

"....कारण जर अशी क्षमता जन्मजात असेल तर प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? ...." ~ स्वतः धागाकर्ते श्री.अवलिया, मी आणि इथे लहानमोठ्या प्रतिक्रिया दिलेल्या (तसेच केवळ वाचनमात्र असलेल्यांनी) सर्वाना हे मान्य व्हावे की हा विषय तसा गहन आणि तात्विक असल्याने यातील भाषाप्रयोग By default जडच असणार. कारण तत्वज्ञानाचे शास्त्र सोप्या भाषेत सांगण्यासाठी गाडगेबाबा किंवा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारखी समस्त समाजमनाला भावणारी भाषेची दैवी देणगी असणे गरजेचे आहे, जी सर्वांकडेच असेल असे नाही. त्यामुळे वरील प्रश्नाला उत्तर देताना माझ्यापुढे जी काही बंधने आहेत तीत प्रामुख्याने आहे ते सोप्या भाषेत त्याचे उत्तर देणे. तरीही मी प्रयत्न करतो...उत्तर बरोबर आहे किंवा सर्वमान्य व्हावे असा बिलकुल आग्रह नाही. कारण पु.ल.म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गार्डाची शिट्टी न्यारी, त्याचप्रमाणे मला जे भावते ते केवळ माझेच आहे इतपतच उत्तराचा भावार्थ. जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहताना हे आपण जरूर जाणतो की अगदी तासापूर्वी जन्माला आलेले बाळ रडू लागले की मातेला वा नर्सला कळते की त्याला 'भूक' लागली आहे. ते बालक शब्दरूपाने भूक शमविण्याची मागणी करू शकत नाही, पण त्यासाठी त्या वरच्या कारागिराने त्याच्या मेंदुत अशी काही जादू भरलेली आहे की ज्याचे कंपन त्या मागणीच्या आधारे मुखावाटे बाहेर पडते ज्याला आपण 'बाळाचे रडणे' म्हणतो. म्हणजेच एका अर्थाने तासापूर्वी जन्मलेल्या बाळाला पडलेला प्रश्न त्याने स्वतःच सोडविला आहे. ही जी आत्मजाणीव आहे त्यात मग पुढे वाढत्या वयोमानाने वस्तूंची, व्यक्तीची, निसर्गाची, समाजातील असमानतेची भर पडत जाते आणि प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तो स्वतःही प्रगल्भ होत जातो. हे सर्वांच्याच बाबतीत होत असेल का? हा Most Hypothetical प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर परत ज्याचे त्याने Individual Case म्हणून शोधायचे आहे. न्यूटनने झाडावरून खाली पडणारे सफरचंद पाहिले. त्यावेळी त्याच्याबरोबर जर अन्य मित्र असतील तर न्यूटनला त्यामुळे जो प्रश्न पडला तो त्यानाही पडला असेल का? तर याचे उत्तर अज्ञातात आहे. जगात अन्य ठिकाणीही सफरचंदसदृष्य फळे त्या क्षणाला पडली असतील पण संपूर्ण विश्वात फक्त न्यूटनचाच मेंदू कारणमीमांसेसाठी सजग झाला. म्हणजेच त्याचसमयी त्याच्यासमवेत शिकणार्‍या मुलामुलींच्या तुलनेत त्याच्याकडे अधिकची प्रगल्भता होती. त्याने पुढे केलेल्या अभ्यासाच्या भाषेने/संवादाने जगाने ते ऐकले...मान्यही केले. म्हणजेच याला दुसरीही अशी छटा आहे की न्यूटनचा शोध व अनुभव योग्य आहे इतपत मानण्याजोगी प्रगल्भता समाजाकडे आली. हेदेखील अनुभव तृष्णाशमनाचे एक उदाहरण. जगण्याच्या कारणासाठी माणसाने स्वतःशी जे नाते निर्माण केले आहे हे त्याचे स्वातंत्र्य आहे. "मी मनावर ताबा ठेवतो" असे म्हणून ताबा राहत नसतो कारण मनाला 'भटकायला' आवडते. पण परत जगण्याची आसच असे काही चक्र फिरविते की ते मुलूखगिरी करायला गेलेले मन सायंकाळी आपसूक परड्यात झापाखाली येऊन पडणार्‍या कोंबड्यासारखे शांत होते. हीदेखील निसर्गाने मानवाला दिलेली जन्मजात देणगी आहे...जिची कुठल्याही शासकीय दप्तरात नोंद झालेली नसते तर त्या देणगीच्या आधाराने ती ती व्यक्ती आपल्या वाट्याला आलेले पत्ते पटावर मांडून उद्याचे दान काय असेल याचा खरचटणार नाही असा लेखाजोखा मांडत. श्री.अवलिया विचारतात 'प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का?" ~ याला थेट उत्तर द्यायचे असेल तर 'होय' असेच असेल माझ्या दृष्टीने. पण हे सर्वच बेधडक कबूल करतील का? बहुधा नाही, कारण तर ही स्थितीगती अखेरीस मानवानेच निर्माण केली असल्याने प्रत्येकाच्या होय-नाहीला त्याच्यापुरतेच महत्व असते. जगण्याचे कारण वा प्रयोजनाची क्षमता जन्मजात का असेल याचा थोडा मागे जाऊन विचार केल्यास मला कर्ण आणि अश्वत्थामा यांचे उदाहरण आठवते. दोघांनाही लहानपणापासूनच त्यांच्या पालकांनी जी शिकवण दिली ती त्यानी स्वीकारली कारण तो स्वीकृतीचा गुण जन्मतःच त्यांच्या अंगी आला होता. त्यामुळे 'आमचे जगण्याचे कारण काय?" असा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला त्यावेळी त्यांच्याकडे उत्तर होते 'मित्रासाठी'...मग भले त्यानी केलेली कारणमीमांसा व्यासांना पटो वा ना पटो. दोघांनाही माहीत होतेच की त्या जगण्याच्या कारणाचा शेवट काय होईल. पण त्यांचापुरता तो प्रश्न आता प्रश्न राहिला नव्हता तर ते साध्य होते....जे त्यांनी पूर्ण केले. आजच्या काळातही 'मी का जगतो?' याचे रेखाटन व्यक्तीकडे असेल तर ते साध्य करण्यासाठी जी साधना हवी ती त्याच्याकडे जन्मजात असेलही...प्रश्न आहे तो त्याने शोधून काढण्याचा. इन्द्रा

सुधीर Mon, 01/17/2011 - 23:59
ईन्द्रा यांचा "अनुभवासाठी जगणे....!!" ह प्रतिसाद योग्य वाटतो. स्वप्नपूर्ती किंवा ध्येय्याचा पाठलाग करताना मिळणारा अनुभव, खाव्या लागणार् या खास्ता, त्यातून संपन्न होत जाणारं व्यक्तीगत ज्ञान, आणि सरतेशेवटी अर्थपूर्ण आयुष्य जगल्याचं "समाधान" ह्यासाठीच माणसानं जगावं.

अर्धवटराव Tue, 01/18/2011 - 06:52
आपण का जगतो? तर रंगमंचावर आपली ठरलेली भूमीका वठवण्याकरता.. (कलाकार) अर्धवटराव

नगरीनिरंजन Tue, 01/18/2011 - 08:49
अत्यंत अहंकारी प्रश्न! आपण जगतो म्हणजे यात आपण काही कृती केल्याचा जो आभास आहे तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. एकवेळ मरणे आपल्या हातात आहे पण जगणे आपल्या हातात नाही. केवळ आपले हृदय चालू आहे आणि रक्त आपल्या शरीरात खेळते आहे म्हणून आपण जिवंत आहोत. हृदय चालवण्यासाठी आपण स्वतः कोणतेही प्रयत्न करत नाही आणि करूनही काही उपयोग होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे वरती स्पा म्हणाला तसं जन्माला आलो म्हणून आणि कार्यकर्ते म्हणाले तसं अजून मेलो नाही म्हणून आपण जिवंत आहोत.

In reply to by नगरीनिरंजन

अवलिया Tue, 01/18/2011 - 11:09
म्हणजे तुम्ही रक्त/हृदय स्वतःपासून वेगळे मानता का? जर मानत असल्यास मग स्वतः म्हणजे नक्की काय? आणि मानत नसल्यास स्वप्रयत्नाने हृदयाचे ठोके कमी जास्त करता येतात असे काही मानतात त्यावर काय मत? तसेच स्वतःचीच जी गोष्ट जी शरीराकडून केली जाते तिला आपले प्रयत्न कारणीभुत नाही असे कसे म्हणता येते?

In reply to by अवलिया

नगरीनिरंजन Tue, 01/18/2011 - 14:53
रक्त आणि हृदयापासून मी वेगळा नाही पण फक्त रक्त आणि हृदय म्हणजेच मी नाही. 'मी ' म्हणजे शरीर, त्यातल्या सगळ्या रासायनिक क्रिया आणि ऊर्जा हे सगळं मिळून निर्माण होणारं जे काही आहे ते असं मला वाटतं. स्वप्रयत्नाने हृदयाचे ठोके कमी-जास्त करता येत असतील तर थांबवता आणि सुरु का करता येत नाहीत? मीपणाची भावना ही सुद्धा मेंदूतली एक रासायनिक प्रक्रिया आहे असे मला वाटते. बर्‍याच प्राण्यांमध्ये ती नसते. आपण म्हणतो की आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागतो पण या इच्छांची निर्मीती कशी होते ते आपल्याला माहिती नाही. काही ठराविक बाह्यसंवेदनांनी ठराविक इच्छा निर्माण केल्या जाऊ शकतात त्यामुळे आपल्या इच्छांवरही आपला ताबा असतो असेही म्हणणे अवघड आहे. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे एकापेक्षा जास्त अर्थांनी खरं असावं.

गुंडोपंत Tue, 01/18/2011 - 10:58
पूर्वसंचित कर्म जे असेल त्याप्रमाणे आपण जगतो. त्यातून सुटका नाही. का जगतो आणि किती, हे त्यावर अवलंबून.

In reply to by गुंडोपंत

अवलिया Tue, 01/18/2011 - 11:12
पूर्वसंचित कर्मावर मात कशी करता येते? जर मात करता येत नसेल तर मानवी प्रयत्न व्यर्थ मानावे का? मानवी प्रयत्न व्यर्थ नसतील तर पूर्वसंचित मानावे का?

In reply to by अवलिया

रणजित चितळे Tue, 01/18/2011 - 11:29
पूर्वसंचित कर्मावर मात कशी करता येते? कर्माचा विपाक करुन. तो कसा करायचा ह्या साठी लोकमान्यांनी लिहीलेले गीतारहस्य कर्मविपाक वाचावे. येथे दोन चार ओळीत नाही देता येणार. जर मात करता येत नसेल तर मानवी प्रयत्न व्यर्थ मानावे का? भोग भोगावेच लागतात. मानवी प्रयत्नांनी कर्म संचित कमी करु शकता. मानवी प्रयत्नांनी भोग भोगायची शक्ती येते. मानसिकतेत सुधार होतो. ... मानवी प्रयत्न व्यर्थ नसतील तर पूर्वसंचित मानावे का? पूर्व संचित मानणे न मानणे एखाद्याच्या मनाच्या घडणीवर अवलंबून आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कर्म बंधनातून मुक्त होण्या मधला एक टप्पा आहे. आपण कोठल्या काँशियस लेव्हल वर आहात ह्या वर अवलंबून आहे.

In reply to by रणजित चितळे

गुंडोपंत गुरुवार, 01/20/2011 - 03:36
रणजितराव, सुयोग्य आणि नेमके उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाची ओळख करून देणारी एक लेखमाला लिहावी अशी विनंती मी आपल्याला करत आहे.

In reply to by अवलिया

प्यारे१ Tue, 01/18/2011 - 12:12
हे' प्रश्न 'तुम्हा'ला खरंच पडलेय्त? की 'जगाच्या कल्याणा' च्या भूमिकेतून 'परिप्रश्नेन सेवया'....??? असो. पूर्वसंचित कर्मे भोगूनच संपवावी लागतात. 'खरे' संत आपल्याला असेच आचरण करुन दाखवतात (उदा. रामकृष्ण परमहंस) त्यांच्याकडे 'आमचे येथे प्रारब्ध अथवा संचित बदलून मिळेल' असा बोर्ड नसतो. अर्थातच त्यामुळे( जनरली) कमी अथवा अजिबात प्रसिद्धी नसलेल्या जागी आढळतात. तसेच ते बर्‍याचदा त्यांच्या 'क्लास'मधील दारिद्र्य रेषेखाली आढळतात. असो. आपणच केलेल्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असते. चांगले किंवा वाईट आपण ठरवतो. संचित आपल्या पर्यंत तथाकथित सुख अथवा दु:ख घेऊन येते. सुखी किंवा दु:खी होणे, न होणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते. पूर्वी आंब्याचे झाड लावले असेल तर आंब्याचे फळ मिळ्णार हा निसर्ग नियम आहे. (आंबा कुठला, कसा लावला, कशी मशागत केली,किती मोहोर आला, हवा पाणी कसे इ.इ. सगळा विचार करुन त्या त्या प्रकारचे फळ येईल पण फळ आंबा'च') बाभूळ लावली असेल तर काटे.....!!! आज केलेले कर्म उद्या संचित होणार असल्याने विहित कर्म करणे (जे आपल्या हातात आहे) हेच करणे उत्तम. बाकी आपण का जगतो....??? या प्रश्नाचे उत्तर को हं सारखेच. आत्मशोध घेणे.म्हणून आत्मा वा अरे श्रोतव्यो,.....

In reply to by प्यारे१

गवि Tue, 01/18/2011 - 12:42
पूर्वसंचित कर्मे भोगूनच संपवावी लागतात. आज केलेले कर्म उद्या संचित होणार असल्याने विहित कर्म करणे (जे आपल्या हातात आहे) हेच करणे उत्तम. ह्म्म.. परत एका सहस्रप्रतिक्रियासक्षम वादाची सुरुवात.. :) काहींना जे काही भोगावं लागतं त्याला त्यांचं पूर्वसंचित म्हणणं म्हणजे क्रूर चेष्टा आहे. अशा वेळी मग त्या व्यक्तीला "नेमकं काय घडलं होतं त्याच्या हातून? कधी ?" ते ऐकण्याचा किमान अधिकार असता तर किती बरं असं वाटतं. फाशी, जन्मठेप शिक्षा सुद्धा देताना आरोपपत्र वाचून दाखवले जाते. पण इथे काय ? .. सगळाच आनंद. आणि एकदा या जन्मीच्या जन्मतिथीपर्यंत काही थांग लागत नाही म्हटल्यावर "राज पिछले जनम का".. की मग बोलतीच बंद.. :) यंदा ज्यांना वाईटाचे फळ नाही मिळाले त्यांना पुढच्या जन्मी मिळेल..आणि आत्ता ज्यांनी काय वाईट केले हे सांगता येत नाही त्यांनी गतजन्मी केले असेल.. :) काय ते नेमकं माहीत नाही, उमजत नाही, कळत नाही म्हणून किती सोयीस्कर उत्तरं शोधून काढतो ना आपण ?

In reply to by गवि

प्यारे१ Tue, 01/18/2011 - 15:20
>>>>काय ते नेमकं माहीत नाही, उमजत नाही, कळत नाही म्हणून किती सोयीस्कर उत्तरं शोधून काढतो ना आपण ? गवि, नेमकं काय हे माहित करुन घ्यायचं ठरवलं तर अगदी तर्कशुद्ध उत्तरं मिळतात. ह्या तथाकथित सोयिस्कर उत्तराचा थोडा विचार करु. आंब्याचंच उदाहरण घेऊ. झाडाला आंबे येण्याचा कालावधी हा काही वर्षांचा. अगदी कच्च्या कैरीचा आंबा व्हायला देखील एखादा महिना पकडू शकतो ना आपण...??? मग कधीतरी पूर्वी केलेल्या कर्माचे फळ पक्व होण्यास वेळ लागला तर नवल काय....??? दुसरी गोष्ट म्हणजे आपण च लावलेलं आम्ब्याचं झाड कधी लावलं कुठं लावलं कशा प्रकारे वाढलं हे आपण जरी विसरलो ( डोक्यावर पडलो) तरी आंबे यायचे आणि गोडपणा द्यायचं थांबणार थोडीच आहे...??? फळ हे येणारच. हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो. अगदी तुम्ही म्हटल्या प्रमाणे 'राझ पीछ्ले .....' स्टाईल नाही तरी आणि कारणमीमांसा द्यायची म्हटले आणि सगळी लिस्ट (मला कशाची कसली शिक्षा मिळते आहे याची) समोर आली तर विचार करा की काय अपराधी पणाची भावना येईल..? मान्य करणार नाही आपण की हे सगळे आपणच केले म्हणून. उदा. एक गाडी आपण चालक, गाडी चालवताना अपघात. विस्मृती. काही वर्षांनी दुसरी गाडी चालवतोय. पोलिसांना आधीचा अपघात कळाला. शिक्षा देतीलच ना???? हा ही विचार बाजूला सोडा. माझ्या कानाने मला कमी ऐकू येते. का कमी ऐकू येते???? कारण मीमांसा करु का??? त्याने काय होईल??? संचित / प्रारब्ध मानले. त्रागा कमी झाला. दुसर्‍या कुणावर दोषारोप नाहीत, असूया ईर्ष्या, द्वेष, मत्सर नाही. ऑपरेशन करवणे हे कर्म. हे करताना मी चांगल्या डॉक्टरकडेच जाईन.त्यातही सक्सेस रेट किती असेल हे ठाऊक नसल्याने पुन्हा प्रारब्धावर भरवसा. नॉट अ बॅड डील ......

In reply to by प्यारे१

गवि Tue, 01/18/2011 - 15:29
हे ठीक.. पण म्हणजे माहीत नसल्याने मानले असेच झाले ना. पाप आहे, पुण्य आहे हे मानले+ या सर्वाची नोंद ठेवणारी यंत्रणा आहे हे मानले + गतजन्म मानला की मग सर्व सरळ सोपे आहे. आंब्याचे उदाहरण प्रस्तुत मुद्द्यासाठी फार फार ढोबळ वाटते. ..पण स्थूलमानाने एकूण मुद्दा पटला.

In reply to by गवि

प्यारे१ Tue, 01/18/2011 - 16:23
स्वतःचे काम १००% करत राहिल्यानंतरच हा 'हातचा' मानणे इष्ट ठरते. ( असेल हरी.... अजिबात नाही.) (असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे - तुकाराम, रेखा ( तळहातावरील रेषा)तितुकी पुसोन जाते हे तो प्रत्ययास येते मग डोळे झाकणी करावी काये निमित्त- रामदास) असे 'मानणे' आपण बर्‍याच ठिकाणी करतो.... गणीतात क्ष मानतोच की! औषध देणार्‍या़ डॉक्टरला :- मला या औषधाचे संपूर्ण रासायनिक समीकरण द्या मी स्वतः बघतो, करतो आणि मग मीच बनवलेले औषध घेऊन बरा होतो असे कुणी म्हटल्याचे ऐकिवात नाही..... तिथे 'रेडी टू यूज' वरच 'श्रद्धा' असते. कारण लवकरात लवकर बरे व्हायचे असते ना.... तिथे आपली 'के हेच्च ए ए जे' कुठे जाते....??? 'संतांनी, आम्ही अनुभव घेतलाय तुम्हाला सांगतो' असे म्हटले की आलेच बाहुं मध्ये स्फुरण.... ३०० -४००-१००० वर्षांपूर्वी होऊन गेलेले हे संत काय पैसे उकळणार असतात कोण जाणे....??? ३% च्या ऐवजी २ % मिळाले म्हणा एखाद वेळी हाय काय आन नाय काय ....!!!

स्पा Tue, 01/18/2011 - 11:16
"का जगतो" याचं सोप्पं उत्तर म्हणजे जन्माला आलो म्हणून.,..... आणि मरण येत नाही म्हणून.... अवलिया साहेब.. हे फायनल उत्तर आहे.. अजून आता वाद घालू नका

तेज्यायला हा मिपाकंटक नाना अजुन जिवंत आहे का? नान्या तु लेका मिपाचे वातावरण दुषित करायला जगतोस असे कोणीतरी सांगीतले होते ना मागच्यावेळी ?

विनायक प्रभू Tue, 01/18/2011 - 13:02
पराशी सहमत. पण परा अर्धी लाकडे पोचलेल्याला लेका का म्हणत असावा बरे?

ज्ञानेश... Tue, 01/18/2011 - 13:09
माझे कुतूहल शमलेले नाही, म्हणून मी जगतो आहे. इतरांबद्दल सांगू शकत नाही.

पैसा Tue, 01/18/2011 - 22:54
मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस वेगवेगळं देईल. प्रत्येकजण आपाआपले संस्कार, विचार, अनुभव जसे असतील, तसं उत्तर देईल. रामदास स्वामी किंवा शिवाजी महाराज यांचं जगण्याचं कारण वेगळं होतं, तर एखाद्या अय्याश नबाबाचं जगण्याचं कारण वेगळं असेल. कष्ट करून एखादी आई आपल्या बापाविना असलेल्या मुलाना वाढवते, तिचं जगण्याचं कारण तिच्यापुरतं तेवढच खरं आणि महत्त्वाच असेल. मी तर म्हणेन, "आपण का जगतो?" या प्रश्नाचा विचार करूच नये. शक्य तेवढं मस्त जगावं, चांगलं जगावं. जास्त विचार करत राहिलात तर खरे जगण्याचे क्षण वाळूसारखे हातातून निसटून जातील!

In reply to by पैसा

गवि Wed, 01/19/2011 - 11:54
पुन्हा तेच.. "साठी" आणि "मुळे" चा घोळ. "का जगतो ?" याचा अर्थ काहींनी "कशासाठी" जगतो, म्हणजे काय करण्यासाठी जगतो असा घेतला आहे. (खाण्यासाठी, राज्यस्थापनेसाठी, संगीतसाधनेसाठी) "कशामुळे" जगतो असाही अर्थ त्या "का ?" त आहे आणि तोच विचारणार्‍याला अभिप्रेत असावा. "व्हॉट कॉजेस लिव्हिंग" (किंवा "व्हॉट कॉजेस लाईफ"), ऐवजी आपण नेहमीच "व्हाय आय वाँट टू लिव्ह" असाच प्रश्नार्थ घेतो.. :)