Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रन्गराव on Tue, 10/12/2010 - 22:52
काही कारणान रजा टाकून दोन दिवस घरी जावं लागला होत. परत आल्यावर मेल बॉक्स उघडून बघितल तर अभिनंदनाच्या मेल्सचा पावूस पड्ला होता! कारण code complete was announced! मी- "बनिया मैने जो बग फाईल किया तो वोह किसने फिक्स किया?" बनिया -" किसीने भी नहि." मी - "तो फिर code complete announce कैसे हुआ?" बनिया- "मॅनेजर ने कहा है- coding and testing will go ahead simultaneously!" मला आता राग आला होता! "What nonsense?" तेवढ्यात गीता मध्ये कड्मडली- " अरे इतका चिडायला काय झालाय? त्याचा काय आहे- हा प्रोजेक्ट जर लवकर संपवला तर पुढे मोठा प्रोजे़क्ट आपल्या टीमला मिळणार आहे. त्याने आपल्या सगळ्यांचाच फायदा होइल. असा मॅनेजर न सांगितला आहे. आणि आपण टेस्टींग आणि डेव्हलप्मेंट पूर्ण करनारच आहोत." बनिया -" सही तो बोल रही है वोह. finally it helps to pay our bills!" ते ऐकून काय करायचा ते सुधरल नाही. सरांना भेटायला गेलो. सर " Rangraao, good that you are back. I need to tell you something. I have resigned yesterday! " अजून एक धक्का! त्यानी राजीनामा का दिला हे विचारायची गरज नव्हती. आज दिवस इतका वाईट का चालला होता माहित नव्हत! मी -"thats very unfortunate.!" सर- " But you dont need to worry. You can still try to change things around you. wish you all the best." तिथून निघून आलो. त्यानंतर एक महिना होत आला होता. त्यात performance rating झाला. आणि appraisal ही झाला. मला मॅनेजर म्हणाला " You have got very strong rating from the architect. Hence we give you five percent hike! Company has great expectations from you. If you change your attitude, you can go places. " मी-"Thats fine." सगळ्यात जास्त हाईक बनियाला मिळाली होती- ८%. बनिया म्हणाला " यार मुझे बहोत कम मिला है तुम्हे तो औरभी कम बुरा नहि लग रहा है तुम्हे". माझा उत्तर गितान देवून टाकल-" इतना सब होने के बाद भी उसको हाईक मिली यही बहोत है!" त्यानंतर गिताचा नंबर आला. गीताला फक्त ३% दिली होती. ती बरच उशिरा जॉईन झाली होति. आणि थोड्या कमी पगारातपण. तिला जॉईन होताना सांगितला होता लवकरच तुझ अप्रे़जल होइल तेंव्हा सॅलरी अ‍ॅडजस्ट होईल. आणि आता तिला सांगितला गेल होत- " चार महिन्यात तुमचा performance judge करन शक्य नव्हता तरीही तुम्हाला proportionate hike दिली आहे". ती बरीच नाराज होती. दुसर्या दिवशी सरांचा शेवट्चा दिवस होता. त्यांचा फेअरवेल झाला. आणि आमचा अमेरिकन बॉस ही आला होता. सगळयाना मीटींगमध्ये बोलवलो होत. मी ती मिटींग सोडून सरांबरोबर कॉफी प्यायला खाली गेलो. थोडा वेळ बोलण झाल. आणि सर निघून गेले! त्याना गेट पर्यंत सोडून परत आलो. पून्हा जावून कॅफेमध्ये बसलो. आणि गेल्या एक महिन्यात काय काय झाला ह्याचा विचार करू लागलो. राग वाढत चालला होता. हातान कप टेबलावर गोलगोल फिरवत बसलो होतो. तो पर्यंत आमची पूर्ण टीम खाली आली होती. बनिया म्हणाला "तुझे एक अहम खबर सुनानी है! " सगळे लोक त्या टेबलावर बसले. " आज क्या हुआ पता है. उस अमरिकनने बता दिया -" I'm very happy that this product is getting completed three months ahead of schedule, And we are going to save 200 thousand dollars of the allocated money. This all is possible because of your hardwork and efficient management .. और इसलिये उसे सिनियर मॅनेजर बनाया जा रहा है." आज जिग्सॉ पझल सुटावा तसा सगळ चित्र पूर्ण झाला होत. मॅनेजर्ची सहा महिन्यात प्रोजेक्ट संपवायची धडपड. बाहेर बूम असतानाही सगळ्यांनाच कमी मिळालेली हाईक. तेवढ्यात गीता म्हणाली -" लोक इतके अप्रमाणिक कसे असू शकतात?" मी कप तसाच फिरवत बोलून गेलो- "आज आठवला का प्रामाणिकपणा. दोन महिन्याभरापूर्वी मोठा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी खोटा code complete announce झाला होता तेंव्हा कुठ गहान ठेवला होतात तुमचा ईमान-धर्म?" एक क्षणभर शांतता पसरली. त्या खर्खर करत फिरनार्या कपच्या आवाजामध्ये कसला तरी वेगळा आवाज मिक्स झाला होता. कप थांबवला. हूंदक्याचा अवाज येत होता. वर पाहिल. गिताच्या डोळ्यातून गंगा जमूना वाहू लागल्या होत्या. तोंडावर रूमाल ठेवून ती पळत निघून गेली.
  • Log in or register to post comments
  • 10850 views

Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा १२ : फसवलं पण कुणी कुणाला?

  • ‹ कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
  • Up
  • जुनाच विषय... वाहनांच्या मागिल पाट्या..... ›

प्रतिक्रिया

Submitted by रन्गराव on Tue, 10/12/2010 - 22:55

Permalink

मागील भाग

वर नीट लिंक टाकने जमला नाही म्हणून इथ लिहित आहे. http://www.misalpav.com/node/14540 http://www.misalpav.com/node/14560 http://www.misalpav.com/node/14575 http://www.misalpav.com/node/14584 http://www.misalpav.com/node/14592 http://www.misalpav.com/node/14623 http://www.misalpav.com/node/14625 http://www.misalpav.com/node/14706 http://misalpav.com/node/14839 http://misalpav.com/node/14852 http://misalpav.com/node/14873
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 10/12/2010 - 23:01

Permalink

मी तरी वेळेआधी पूर्ण झालेला

मी तरी वेळेआधी पूर्ण झालेला प्रकल्प अजून तरी पाहीलेला नाही आहे. वेळेआधी काम पूर्ण करायचा अजून एक तोटा हा असतो की नंतर बगस हे येतातच आणि तेव्हा कोणीही हा ठपका ठेऊ शकतं की तुम्ही घिसाडघाई केलीत, कशाला वेळेआधी पूर्ण करायचा शहाणपणा केलात? Why were you not thorough? ___ असो, तुमचा अनुभव वेगळा दिसतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Tue, 10/12/2010 - 23:11

In reply to मी तरी वेळेआधी पूर्ण झालेला by शुचि

Permalink

काम तर व्यवस्थित पूर्ण झालच

काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच! ह्यात अमेरिकनही गप्प बसनार होते कारण भारतात काम पाठवल तर ते लवकर आणि स्वस्तात होत हे सिद्धा होणार होत. काही चूकिच्या निर्णायामुळ कंपनीची अर्थिक नुक्सान झाला होत. कमी वेळात फायदा दाखवन्यचा एक उपाय म्हनून वर झालेला रामायण घडल. त्यात आमच्या मॅनेजर ने चांगलाच हात मारला. हे सगळे लोक सामील असल्यांमुळे सर काही करू शकले नाहित.
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Wed, 10/13/2010 - 10:15

Permalink

कहानी पुरी फिल्मी है... पण

कहानी पुरी फिल्मी है... पण प्रत्यक्षात घडणे अगदीच अशक्य नाहीये......
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Wed, 10/13/2010 - 11:28

In reply to कहानी पुरी फिल्मी है... पण by सविता

Permalink

१०० % सहमत..

रन्गरावांच्या लेखमालेचे पहिले ३-४ भाग वाचले, पण नंतर नंतर वाचायचं सोडून दिले.. सगळ्या लेखांचे सार एकच.. रन्गरावाने कशी जिरवली !! पार फिल्मी आहे बुवा.. चालू द्या...
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Wed, 10/13/2010 - 11:37

In reply to १०० % सहमत.. by अनिल २७

Permalink

अनिल राव मग तर हा भाग नीट

अनिल राव मग तर हा भाग नीट वाचाच तुम्ही. ह्यात नेहमी वेडा दिसणार्या मॅनेजरन सगळ्यांना वेडा बनवला आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/13/2010 - 10:34

Permalink

प्रतिसाद - भाग १०४

आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या लोकांसाठी लिहीलेली तद्दन फिल्मी कहाणी! तरीही वाचायचा प्रयत्न केला पण (अ)शुद्धलेखन आणि हजारभर भाषांच्या मिश्रणामुळे दोन-चार ओळींतच धागा सोडून दिला आणि प्रतिसाद वाचले. तिथेही हीच ऐटीतली कंपूबाजी दिसली. सर्व प्रतिसादकांनी ह. घेणे (क्रमशः)
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Wed, 10/13/2010 - 11:06

In reply to प्रतिसाद - भाग १०४ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या

>>आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या लोकांसाठी लिहीलेली तद्दन फिल्मी कहाणी! तरीही वाचायचा प्रयत्न केला फार उपकार झाले आपले! >>पण (अ)शुद्धलेखन आणि हजारभर भाषांच्या मिश्रणामुळे दोन-चार ओळींतच धागा सोडून दिला पहिल आणि तिसर वाक्य जरी अति शुद्ध भाषेत लिहिल असला तरी विसंगत आहे ह्याचा भान राहिलेल नाहि आपल्याला. दोन चार वाक्यात निष्कर्श काढून आपण आपला नाव सार्थकी लावला आहे. अपसंती किंवा अमान्यता ह्याआधी बर्याच जणानी दर्शवला. पण त्याला विचार, अनुभव अशी कारण दिली होते. ही आपली म. न.से. गिरी मिपावर नवीनच दिसली! आपण हे हळू घ्या किंवा ज्याच्या पाहीजे त्याच्या नावाने शिमगा करा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/13/2010 - 11:33

In reply to >>आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या by रन्गराव

Permalink

अभ्यास कमी पडतो आहे

ही आपली म. न.से. गिरी मिपावर नवीनच दिसली!
आपण हे आधी पाहिलं नव्हतंत याचा अर्थ एवढाच की आपला अभ्यास कमी पडतो आहे, बाकी काही नाही. अवांतरः अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 10/13/2010 - 11:41

In reply to अभ्यास कमी पडतो आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अदितीशी सहमत आहे.

अदितीशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 10/13/2010 - 13:44

In reply to अभ्यास कमी पडतो आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

काय ग अदिती, एक तर लोकांच्या

काय ग अदिती, एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट चाट विंडो' मध्ये घुसतेस आणि वर त्यांच्याच चुका काढतेस होय ?
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!
अतिशय सुंदर वाक्य. पण ह्या वाक्यात थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता तर जे आयटी मध्ये नाहीत त्यांना देखील वरिल वाक्यांचा अर्थ पटकन लक्षात आला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Wed, 10/13/2010 - 13:54

In reply to काय ग अदिती, एक तर लोकांच्या by परिकथेतील राजकुमार

Permalink

शार्दुलविक्रिडित?

आयटी वाल्यांचा वाङमय थोडा कच्च असल्यामुळे वरील शब्दाचा अर्थ समजला नाही. तरी स्पष्टीकरण द्यावे ही नम्र विनंती!
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 10/13/2010 - 22:18

In reply to शार्दुलविक्रिडित? by रन्गराव

Permalink

रन्गराव घाबरू नका, परासाहेब

रन्गराव घाबरू नका, परासाहेब तुम्हाला शार्दुलविक्रीडीत चा अर्थ तर सांगतीलच पण मराठी संकेतस्थळांवर कसे लिहावे याचा परिपाठ घालून देताना वरील वाक्याचे (काम तर व्यवस्थित.... पाठवायची सोय असतेच) शुद्ध आणि सहजसोप्या मराठीत भाषांतर पण सांगतील. (वाक्याचा शेवट शार्दुलविक्रीडीत ने कसा करायचा हे जाणण्यास उत्सुक असलेला) वि. मे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/13/2010 - 22:20

In reply to रन्गराव घाबरू नका, परासाहेब by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

>> (वाक्याचा शेवट

>> (वाक्याचा शेवट शार्दुलविक्रीडीत ने कसा करायचा हे जाणण्यास उत्सुक असलेला) वि. मे. << जसं काही वाक्यात शुद्ध किंवा कोमल गंधार कसा लावायचा हे समजलंच आहे! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Wed, 10/13/2010 - 23:53

In reply to >> (वाक्याचा शेवट by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

जसं काही वाक्यात शुद्ध किंवा

जसं काही वाक्यात शुद्ध किंवा कोमल गंधार कसा लावायचा हे समजलंच आहे! हे लै म्हणजे लै भारी.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 10/14/2010 - 00:25

In reply to >> (वाक्याचा शेवट by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

खरे तर तेही नाही कळले, पण

खरे तर तेही नाही कळले, पण मुद्दलातले शुद्ध किंवा कोमल गंधार म्हणजे काय हेच माहित नसल्याने तो वाक्यात कसा लावायचा हे कळण्याची शक्यता शून्य. संगीतातले काहीही कळत नाही हो. मी तर बरेच दिवस यमन हा यमक चा भाऊ आहे असे समजत होतो. शार्दुलविक्रीडीत वगैरे भानगडी म्हणजे काय हे माहित असल्याने निदान तेवढे कळू शकते. (परीकथेतील राज्यात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत) वि. मे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 10/14/2010 - 17:21

In reply to खरे तर तेही नाही कळले, पण by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

(परीकथेतील राज्यात सूर्योदय

(परीकथेतील राज्यात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत) वि. मे.
आमच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नाही हो वि. मे. :) बाकी राहिला प्रश्न तुमच्या शंकांचा तर आता त्या तुम्हाला सूर्योदय दिसला की मग सोडवु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on गुरुवार, 10/14/2010 - 17:32

In reply to (परीकथेतील राज्यात सूर्योदय by परिकथेतील राजकुमार

Permalink

?

परा भाऊ आपण संयम दाखवताय आणि कुणीतरी उगाच आपल्यावर पाळत ठेवून आहे. "किसीकी दुखती रग का सवाल है" अशी शंका यायला लागली आहे आता ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on गुरुवार, 10/14/2010 - 17:33

In reply to (परीकथेतील राज्यात सूर्योदय by परिकथेतील राजकुमार

Permalink

?

परा भाऊ आपण संयम दाखवताय आणि कुणीतरी उगाच आपल्यावर पाळत ठेवून आहे. "किसीकी दुखती रग का सवाल है" अशी शंका यायला लागली आहे आता ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/14/2010 - 17:23

In reply to खरे तर तेही नाही कळले, पण by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

=)) =)) आवरा आता!

=)) =)) आवरा आता!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 10/14/2010 - 17:26

In reply to =)) =)) आवरा आता! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

=)) =)) आवरा आता! एक बार जो

=)) =)) आवरा आता!
एक बार जो मुझे 'पेमेंट' मिल जाता है तो फिर मै अपने आपको भी नही आवरता.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/14/2010 - 17:37

In reply to =)) =)) आवरा आता! एक बार जो by परिकथेतील राजकुमार

Permalink

हुडुत्त

मी तुझ्याशी नव्हते बोलत, मी विमेंशी बोलत होते. का त्यांनाही दिलंय पेमेंट?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 10/14/2010 - 17:40

In reply to हुडुत्त by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अयोग्य ठिकाणी विचारला गेलेला

अयोग्य ठिकाणी विचारला गेलेला अयोग्य प्रश्न !
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 10/14/2010 - 22:12

In reply to अयोग्य ठिकाणी विचारला गेलेला by परिकथेतील राजकुमार

Permalink

उगाच विषय भरकटतो आहे. ते

उगाच विषय भरकटतो आहे. ते शार्दुलविक्रीडीत वगैरे सगळे सोडा हो भाऊ. त्या वाक्याच्या मराठी भाषांतराचे तेवढे सांगा. मला खरच उत्सुकता आहे. कसे आहे की, अशुद्ध लिहिले अशी टीका करणे सोपे असते पर्यायी शुद्ध वाक्य सांगा. विशेषत: टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल. आधीच खूप अवांतर झाले असल्यामुळे या मुद्द्यावर हा शेवटचा प्रतिसाद :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/14/2010 - 22:29

In reply to उगाच विषय भरकटतो आहे. ते by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

बिटामधला वेळ कसा काय असतो?

बिटामधला वेळ कसा काय असतो? मला बिटातली जीवनसत्त्व माहित होती. ;-)
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!
काम पूर्ण झालं नव्हतं. दिखावा करायचा -> देखावा निर्माण करायचा नव्हता. टाईम -> वेळ त्यातून अनेक ठिकाणी, विशेषतः क्रियापदांंच्या रूपात मात्रा वगळली आहे आणि त्याजागी अनुस्वारही नाहीयेत. एकदा-दोनदा झालं ठीक आहे, पण किती वेळा हे खडे येणार? >> टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल. << टेस्टींग मधला टाईम -> चाचणी काळ पॅच -> सुधारणा हे शब्द सहज सुचले आहेत आणि सुधरण्यासारखेही वाटतात. बीटाला मराठीत बीट म्हणतात; पण बीटा (व्हर्जन)ला तात्पुरतं असा शब्द वापरता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/13/2010 - 14:08

In reply to काय ग अदिती, एक तर लोकांच्या by परिकथेतील राजकुमार

Permalink

एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट

एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट चाट विंडो' मध्ये घुसतेस आणि वर त्यांच्याच चुका काढतेस होय ?
Image removed. चुकून चूक झाली, पुन्हा नाही असं होणार शक्तीमान!
.. थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता ...
पराला हलकटशिरोमणी या किताबाने मी आज सन्मानित करत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 10/13/2010 - 11:02

Permalink

वा!

छान रंगराव, मस्त कथा!! खरी असल्यास आश्चर्य नाही. असं होताना बघितलंय मी, एखाद वेळेस भागीदार सुद्धा व्हावं लागलंय :( ज्यांनी नाही बघितलंय त्यांना अविश्वसनीय वाटणे साहजीकच आहे :) परंतू या पेक्षाही बरंच जास्त राजकारण(अर्थकारण) चालतं वरच्या पातळीवर ज्यात दोन्ही बाजूंचे अधिकारी/प्रबंधक (ग्राहक आणि सेवादाता) सामील असतात. येउद्यात आणखीही असेच कॉर्पोरेट अनुभव. बाकी तुम्ही नशिबवान पहिल्याच नोकरीत अतिशय महत्त्वाचा आणि पुढे उपयोग होईल असा अनुभव मिळाला :) [अवांतरः शेवटी ग्राहक काय आणि सेवादाता काय दोन्ही बाजूला माणसेच असतात आणि प्रत्येकाच्या काही गरजा, काही मर्यादा असतात. काहींना नोकरी वाचवायची असते तर काहींना बढती मिळवायची असते तर काहींना स्वतःचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. ]
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Wed, 10/13/2010 - 11:10

In reply to वा! by समंजस

Permalink

>>[अवांतरः शेवटी ग्राहक काय

>>[अवांतरः शेवटी ग्राहक काय आणि सेवादाता काय दोन्ही बाजूला माणसेच असतात आणि प्रत्येकाच्या काही गरजा, काही मर्यादा असतात. काहींना नोकरी वाचवायची असते तर काहींना बढती मिळवायची असते तर काहींना स्वतःचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. ] हे खूप छान लिहलत आपण! जीवनाच सार दोन वाक्यात! मानल तुम्हाला! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Wed, 10/13/2010 - 11:35

In reply to >>[अवांतरः शेवटी ग्राहक काय by रन्गराव

Permalink

या वाक्यांत जीवनाचे सार आहे ?

या वाक्यांत जीवनाचे सार आहे ? कुठेय ?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल २७ on Wed, 10/13/2010 - 11:25

Permalink

परत एकदा .. रन्गराव - दी

परत एकदा .. रन्गराव - दी सुपरहीरो..! आवाज नाय पाहिजे.. नारायणमूर्तींनंतर आम्हीच !
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 10/13/2010 - 11:46

Permalink

सहमत. आमच्या कुंपणीत आयटीवाले

सहमत. आमच्या कुंपणीत आयटीवाले अ‍ॅप्रेझल न झाल्यामुळे पेटलेले पाहीले आहेत. पेटण्याची परिसीमा म्हणजे रेटिंग येताच रिझाईन करणे. :) रडणारे आयटीवाले मी कधीच पाहीलेले नाहीत. असो. आमच्या एका मित्राने टपरीवर सिगारेट ओढताना तिथे सिगारेट ओढायला आलेल्या आमच्या मॅनेजरला त्याने (मॅनेजरने) भाषण द्यायला सुरुवात केल्यावर "तू मॅनेजर आहेस म्हणून मी तुला कधीच तू माद**द आहेस असे म्हणणार नाही पण म्हणून तू नसशील ही शक्यताही नाकारता येत नाही" असे बोलता बोलता कसलेतरी उदाहरण म्हणून सजमावले होते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Wed, 10/13/2010 - 12:38

In reply to सहमत. आमच्या कुंपणीत आयटीवाले by llपुण्याचे पेशवेll

Permalink

लयी भारी पण

पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण एक बोंब हाय! नाव पुण्याचे पेशवे पण लिवलय कोल्हपूरच्या छत्रपतिंसारख. काय भानगड्स!? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 10/13/2010 - 14:13

In reply to लयी भारी पण by रन्गराव

Permalink

पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण

पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण एक बोंब हाय! नाव पुण्याचे पेशवे पण लिवलय कोल्हपूरच्या छत्रपतिंसारख. काय भानगड्स!?
ऑ ? पुप्या घसरगुंडीवर बसुन प्रतिसाद टंकलास का काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 10/13/2010 - 19:04

In reply to पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण by परिकथेतील राजकुमार

Permalink

तपशीलात थोडी चूक होतेय परा.

तपशीलात थोडी चूक होतेय परा. पायथ्याशी म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 10/13/2010 - 19:06

In reply to तपशीलात थोडी चूक होतेय परा. by नगरीनिरंजन

Permalink

तपशीलात थोडी चूक होतेय परा.

तपशीलात थोडी चूक होतेय परा. पायथ्याशी म्हणायचंय का तुम्हाला?
बहुदा चूक असु शकते. कारण मी दोन्ही पोझिशन्सबद्दल ऐकले होते. जास्ती लोकांनी वरची पोझिशन सांगितली होती म्हणुन मी तीच ग्राह्य धरली येवढेच ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अडगळ on Wed, 10/13/2010 - 20:43

In reply to तपशीलात थोडी चूक होतेय परा. by परिकथेतील राजकुमार

Permalink

अवांतर

जेम्स लेन आठवला. त्यानं म्हणे काही ऐकिव गप्पा , अफवा लिहील्या आहेत त्याच्या पुस्तकात.
  • Log in or register to post comments

Submitted by रन्गराव on Wed, 10/13/2010 - 21:05

In reply to तपशीलात थोडी चूक होतेय परा. by परिकथेतील राजकुमार

Permalink

लेख होऊन जावू द्या एक

परा आणि नगरी निरंजन इथ ह्याविषयी लेख लिहिण्यास आपल्या इतक समर्थ कोणी नाही. होऊन जावू द्या एक एक ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com