देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)
लेखनप्रकार
मागील लेखापुढे.....
१९६५ च्या पहिल्या पाक युद्धात माणेकशॉ पूर्व विभागाचे सेनानी होते आणि पश्चिम विभाग मिळवित चाललेल्या विजयामुळे आनंदित झालेल्या राजकारण्यांनी पूर्व पाकिस्तानवर आताच ताबा मिळवावा अशी भूमिका घेतली, तिला माणेकशॉनी विरोध केला कारण ते जाणत होते की, पूर्व पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याला सामोरे जातील ते हतबल असलेले सर्वसाधारण नागरिकच कारण तिथे पाकचे सैन्य भारतीय तोफांच्या भडिमारासमोर त्यांनाच उभे करणार हे सॅम जाणून होते. ही चाल शहाणपणाची ठरली. पण म्हणून लष्कर निवांत राहिले असे नाही तर तो काळ आपल्याकडून व्यूहरचनेसाठी फार उपयुक्त ठरला. दरम्यान १९६२ च्या चीन युद्धात आलेली नामुष्कीही या विजयामुळे मागे पडली आणि अमेरिकेला भारताच्या वाढत्या लष्करी ताकदीची नोंद घेणे भाग पडले. हिंदी महासागरात त्यांचे नौदल तैनात होणार या बातम्या पसरताच रशिया भारताचा एक मित्र म्हणून तात्काळ पुढे आला. हे पुढील काळासाठी फार चांगले ठरणार होते....झालेही तसेच. ढाक्क्यातील शेख मुजिबर रेहमानच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे रावळपिंडी अस्वस्थ होऊ लागली तेव्हा आज ना उद्या परत दुसर्या युध्दाचा भडका उडणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नव्हती तसेच श्रीमती इंदिरा गांधी पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणार हेही उघड होते. अशावेळी रावळपिंडी वॉशिंग्टनचे बोट धरून युनोत कांगावा करणार हे तज्ज्ञांनी ओळखले असल्याने तिथे 'व्हेटो' चा वापर करून भारताविरूद्ध कोणतीही कारवाई करायला लागणार नाही हे पाहण्यासाठी अमेरिकेच्या तोडीसतोड ताकदवार रशिया आपला मित्र असणे फार आवश्यक होते. ती एक यशस्वी राजनैतिक चाल होती. तोपर्यंत इकडे १९७१ साल उजाडेपर्यंत भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानाच्या आजुबाजूच्या सर्व ठाण्यावर करडी नजर ठेवून युध्द झालेच तर त्याची यशस्वीरित्याच सांगता करण्याच्या उद्देशानेच लढले जाईल याची सिद्धता केली. सॅमचा हा विश्वास सर्वार्थाने सार्थ ठरला. पुढे १९६९ मध्ये जनरल कुमारमंगलम यांच्या जागी पूर्व विभागाचे लेफ्ट.जनरल सॅम माणेकशॉ यांची 'भारतीय सैन्यदलाचे जनरल' झाले त्यावेळी पुढील यशस्वी कारकिर्दीची लक्षणे तिथेच दिसली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आखल्या गेलेल्या मोहिमेचे नेतृत्व ले.जनरल जगजितसिंग अरोरा यांनी केले...भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानच्या ले.जनरल 'टायगर' नियाझीने १६ डिसेम्बर १९७१ रोजी ९०,००० सैन्यासह गुडघे टेकले, शरणागती पत्करली....'आम्ही हरलो' म्हणून त्या ऐतिहासिक कागदपत्रावर सही केली आणि 'बांगला देश' ची निर्मिती झाली.....आणि देशभरात 'जनरल सॅम माणेकशॉ' हे घराघरातील नाव झाले. सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील तर ते ताईतच बनले. दिल्लीतच नव्हे तर शांती काळात त्यांना विविध नागरी समारंभांची निमंत्रणे येऊ लागली. शेवटी 'युध्दस्य कथः रम्य' या वचनानुसार सॅमबहादूर काय बोलतात, प्रत्यक्ष कसे दिसतात हे पाहण्यासाठी नागरी लोक गर्दी करत. कोल्हापुरात २२ फेब्रुवारी १९७२ मध्ये ते आले होते व करवीरच्या ताराराणीच्या अश्वारूढ पुतळ्याचे त्यांच्या हस्ते [राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठ आवारात] अनावरण झाले तर त्याच दिवशी संध्याकाळी भव्य अशा खासबाग कुस्ती मैदानात गर्दीने फुलून गेलेल्या कोल्हापुरकरांसमोर "जनरल" च्या गणवेशात ~ त्यावेळी ते फिल्ड मार्शल झाले नव्हते ~ त्यांची जाहीर सभा झाली. त्या सभेला हजर असलेल्या काही लोकांना तसेच ताराराणी विद्यापीठाच्या काही संचालकांना/पदाधिकार्यांना मी भेटलो आहे. या लोकांनी दोन्ही कार्यक्रमांच्या तसेच जनरलसाहेब आणि त्यांच्या आदराचे स्थान असलेल्या ले.जनरल एस.पी.पी.थोरातसाहेब यांच्या बंगल्यावर झालेल्या दिलखुलास भेटीचेही वर्णन केले. पण दुर्दैवाने या सातआठांपैकी एकाकडेही त्या समारंभाचा एखादाही फोटो नाही. 'कमला कॉलेज' मध्येही मुद्दाम गेलो होतो [जिथे 'ताराराणीचा पुतळा अनावरण समारंभ झाला] व त्यांच्या जुन्या दप्तरात १९७२ च्या माणेकशॉ भेटीचे काही फोटो मिळतात का याची चौकशी केली. पण तिथेही "कशाला?", "आता इतके जुने फोटो कुठे मिळणार?" अशी उदास चेहर्यांनी दिलेली उत्तरे ऐकली. (त्यावेळी इथून 'सकाळ' प्रकाशीत होत नव्हते, अन्यथा त्यांच्या लायब्ररीत अशा कार्यक्रमाचे फोटो आवर्जून दिले जातात याचा अनुभव आहे...असो थोडेसे मूळ विषयापासून दूर झालो.).
सर्वसाधारण भारतीयच नव्हे तर १९७२ मध्ये बॉलिवूडने 'फिल्मफेअर' च्या वार्षिक पारितोषिक समारंभाला प्रमुख पाहुणे या नात्याने 'जनरल सॅम माणेकशॉ' यांना आदरपूर्वक निमंत्रण दिले आणि मुंबईत झालेल्या त्या कार्यक्रमात राजेश खन्नाने अत्यंत आनंदाने त्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जनरलसाहेबांच्या हस्ते स्वीकारला. दोघेही त्या काळात देशाच्या गळ्यातील ताईत बनले होते. फिल्मफेअरच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ते एकमेव वर्ष असे आहे की जिथे भारतीय सैन्यदलाच्या सर्वोच्च अधिकार्यांने कलाकारांना ट्रॉफीज दिल्या.
या लखलखत्या सेवेची कदर देशाने त्यांना 'सैन्यदलातील पहिले फिल्ड मार्शल' हा फार मोठा बहुमान प्रदान केला त्यावेळी त्यांची अॅक्टीव्ह मिलिटरी सर्व्हीस फक्त १३ दिवसांची राहिली होती. विशेष म्हणजे हा बहुमान स्वीकारतानाही सॅमसाहेबांच्या मनात आपल्या सैन्याचा आणि कर्तबगार अधिकार्यांचाच विचार होता. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'खरं तर पराक्रम केला तो जग्गीने [ले.जनरल जगजितसिंग अरोरा] आणि मार्शलचे बॅटन मात्र माझ्या हातात आले.' केवळ आपल्याच सैनिकांचे अन् अधिकार्यांचे प्रेम त्यांनी मिळविले असे नाही तर त्यांच्या लक्षणीय अशा दोन कृतीमुळे ते भारतीय लष्करी अधिकार्यांत आणि दुसर्या बाजुला पाकिस्तान सैन्यातदेखील (युद्धानंतर...) तितकेच लोकप्रिय झाले. ते प्रसंग >
१. दिल्लीत आणि त्यानंतर सार्या देशात बातमी धडकली की, 'ढाक्क्यात पाक सैन्याने भारतीय लष्करापुढे अखेर शरणागती पत्करली आणि उद्या त्यांच्यातर्फे ले.जन.नियाझी शरणागती पत्रकावर सही करणार - शरणागतीचाही एक सोहळा असतो...प्रथम शरण आलेला अधिकारी त्या सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेश करतात, त्यानंतर विजयी झालेल्या देशाचा लष्कराधिकारी तिथे येतो. तो आलेल्या क्षणी पराभूत अधिकार्याकडून त्याना सल्यूट दिला जातो, जो तसाच स्वीकारला जातो. कागद्पत्रे तयार असतातच, त्यातील फक्त शेवटचा पॅरा मोठ्याने वाचला जातो, त्यावर संमतीदर्शक अशी शरण आलेल्याने सही करणे; नंतर उजव्या खांद्यावरील लेनयार्ड {एक अधिकार पदाचे चिन्ह असलेली सुंभाची रस्सी} काढून 'आपण लष्करी अधिकार्याचे पद सोडत आहे' अशी कबुली व नंतर तिसरी महत्वाची कृती म्हणजे त्या अधिकार्याने - इथे ले.जन.नियाझी - आपले वैयक्तिक पिस्तूल नळीकडे धरून त्याची मूठ विजयी झालेल्या सैन्याच्या अधिकार्याकडे द्यायचे असते. इतके झाल्यानंतर 'आपण तुमची शरणागती स्वीकारली,," अशा आशयाचे पत्र विजयी जनरलकडून प्रदान केले जाते आणि हा सोहळा संपतो ~~~ पण जगातील जवळपास सर्व सैन्यात एक गोष्ट कटाक्षाने पाळतात ती म्हणजे या तीन घटनेंचे फोटो काढले जात नाहीत.....शरण आलेल्या शत्रूची कोणत्याही परिस्थितीत मानहानी करू नये हाच यामागील उदात्त हेतू असतो.
....तर असा सोहळा निश्चित झाल्यानंतर आर्मी हेडक्वार्टर्सतर्फे जनरल माणेकशॉ यांच्या ढाक्क्याला जाण्याची तयारी सुरू झाली. पण ती त्या क्षणीच सॅमनी थांबविली. कारण सांगितले : "मी तेथे आता गेलो तर सार्या सैन्याचे व नागरी वस्तीचे लक्ष माझ्याकडे जाईल आणि जेन.जगजीतसिंग आणि त्यांच्या तुकड्यांनी जो पराक्रम केला आहे त्याला दुय्यम स्थान प्राप्त होईल. त्यामुळे शरणागतीचे सर्व सोपस्कार केवळ जग्गीच पाहील..." हे ढाक्यात समजल्यावर सर्वच अधिकारी सॅमबहादूर यांच्या या दाद देण्याच्या क्रियेला पाहून हरखून गेले.
२. दुसरा प्रसंग >
ले.जन.नियाझी यांनी शरणागती पत्करली, तो कार्यक्रमही आटोपला मग मात्र दुसर्याच दिवशी 'बांगला देश' ची निर्मिती झाली. त्या कार्यक्रमाला हजर राहणे आणि आपल्या विजयी वीरांना भेटणे यासाठी जनरल माणेकशॉ विमानाने कलकत्याला रवाना झाले. ते येणार म्हणून साहजिकच सैन्य दलात जल्लोष उडाला. डमडम विमानतळावर त्यांचे राजेशाही थाटात स्वागत, अर्थातच, झाले. डाक्याकडे त्यांना नेण्यासाठी एका खास 'मर्सिडीज' कारची तेथील कमांडर्सनी व्यवस्था केली होती. ती कार पाहत असताना जनरलसाहेबांना काही शंका आली व थोडी चौकशी केली असता त्या अधिकार्यांने मोठ्या रूबाबात उत्तर दिले, "ही आम्ही पाकच्या जनरलची जिंकलेली गाडी आहे, जी तुमच्या सेवेत आता आणत आहोत..." त्या क्षणाला माणेकशॉ संतापाने फुलून गेले. शत्रू असला तरी तो जनरल आहे आणि मी या कारमध्ये बसणे म्हणजे त्याची एक प्रकारची मानहानी आहे, हे त्यांनी तिथल्यातिथे त्या अधिकार्यांच्या गटाला सुनावले व पुढील कार्यक्रमासाठी तिथे एक क्षणही न थांबता विमानतळावर हजर असलेल्या मिलिटरी व्हॅनमधे बसून डाक्याकडे कूच केले. इतकेच नव्हे तर त्या युद्धात जे पाकिस्तानी अधिकारी मृत्युमुखी पडले त्यांच्या शवपेटीकाही त्यांच्या त्यांच्या "रॅन्क" नुसार त्यांनी करवून घेतल्या व त्या दर्जानेच त्या शवपेटीका लाहोरला रवाना करण्यात आल्या. जनरलसाहेबांच्या या दिलदारपणाच्या बातम्या पुढे रावळपिंडी आणि कराचीमध्येही गेल्या आणि तिथल्या सैन्यांने माणेकशॉना मनोमनी सलाम केला. पुढे १९७२ मध्ये ते पाकिस्तानला सैन्य कराराच्या काही कमानिमित्य गेले तर त्यांना तेथील सेनेने आणि सर्वदलीय अधिकार्यांनी दिलेली मानवंदना सर्वांना चकीत करून गेली होती.
देशभरात त्यांचे ज्या ज्या माध्यमाद्वारे फोटो झळकले होते ते कायम त्यांच्या हसर्या छबीचेच. कमालीचा आत्मविश्वास हा त्यांचा स्थायीभाव होता तर वाणी ही त्यांची मन जिंकण्याचे साधन होते. स्वभाव दिलखुलास असल्याने साध्या सैनिकापासून इंदिरा गांधीपर्यन्त सर्वांशी 'अरे तुरे, अगंतुगं' च नाते. पंडित नेहरूंच्या जवळकीमुळे इंदिरा गांधी यांची ओळख अगदी घरच्यासारखी होती. (इंदिराजी त्यांच्यापेक्षा ३-४ वर्षांनी लहान होत्या) त्यामुळे त्या पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्यातील एकेरी नात्याच्या संबोधनात काही फरक पडला नाही. इतकेच नव्हे तर इंदिरा ही जरी नेहरूकन्या असली तरी तिची उपस्थिती मिलिटरी मीटिंगच्यावेळी ते खपवून घेत नसत. चीनी आक्रमणानंतर त्यांच्या ब्रिगेडच्या अधिपत्याखाली बोलाविलेल्या एका मीटिंगचे वेळी (सन १९६३) माणेकशॉ युनिट प्रमुख या नात्याने पंतप्रधान नेहरू आणि त्यावेळेचे संरक्षणमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण तसेच उच्च अधिकारी यांना अपडेट देत असतानाच इंदिरा गांधींनी मीटिंगमध्ये प्रवेश केला. त्या क्षणी सर्वासमक्ष माणेकशॉ यांनी त्याना तिथे हजर राहण्यास मज्जाव केला. लष्करी मीटिंगला हजर राहणार्यांनी रूममध्ये येण्यापूर्वी 'गुप्ततेची शपथ' घ्यायची असते असा नियम आहे. आणि तशी एकदा शपथ झाली आणि मीटिंग सुरू झाली की तिथे अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नाही. बेअरादेखील टी सर्व्हिससाठी आत येत नाही. पण आता या नेहरू कन्येला कोण अडविणार? पण ते काम सर्वासमक्ष माणेकशॉनी केले आणि इंदिरा गांधी तत्क्षणी रूममधून बाहेर पडल्या {{ हा किस्सा सविस्तरपणे श्री.राम प्रधान यांनी सांगितला आहे. ते त्यावेळी रक्षामंत्री सचिव या नात्याने मीटिंगला हजर होते }}. पण असे असले तरी इंदिरा गांधी जनरलसाहेबांचे लष्करी महत्व जाणून होत्याच. त्यामुळे त्यानीच पंतप्रधान झाल्यावर ८ जून १९६९ ला सॅम माणेकशॉ यांची 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' या सर्वोच्च पदी नियुक्ती केली. थोडक्यात कितीही ताणतणावाचे प्रसंग आले तरी दोघांचे नाते (त्या काळात तरी) मैत्रीपूर्ण राहिले होते. अगदी सरकारी कार्यक्रमात वा परदेशी पाहुण्यांच्यासमवेत आयोजित केलेल्या मेजवानीप्रसंगीदेखील ते इंदिरा गांधींना 'स्वीटी' म्हणून हाक मारत. एखाद्या पार्टीत इंदिरा गांधी ठेवणीतील साडी नेसून आल्या असतील तर 'वॉव, यू लूक प्रेटी टुडे..." असा उत्स्फूर्त शेराही देत. पण पुढे कुणीतरी इंदिरा गांधींचे 'त्या आणिबाणी फेमस धवन-शुक्ला' जोडीने "जनरल माणेकशॉ हे फिल्ड मार्शल पदाचा गैरफायदा घेऊन लोकशाही सरकार उलथविण्याच्या प्रयत्नात आहेत..." असे कान भरले व तो काळच (१९७३ ते ७७) बाईंच्या दृष्टीने नाजूक बनला असल्याने ते त्यांना बहुधा खरेही वाटले असेल. जवळकीच्या संबंधामुळे बाईंनी माणेकशॉना याबाबत छेडले असता, ते गंभीर झाले आणि शांतपणे म्हणाले, "मदाम प्राईम मिनिस्टर, एक शंका कधीही मनी आणू नका की, मी तुमची जागा घ्यायला पात्र नाही. तुमचे नाक जसे मोठे आहे, तसे माझेही आहेच, फरक इतकाच आहे की मी दुसर्यांच्या कामात नाक खुपसत नाही." ~ विषय तिथेच संपला.
मात्र हेही आता स्पष्ट दिसू लागले होते की, दिल्लीकरांना फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ नकोसे होऊ लागले होते....
(पुढे चालू......)

वाचने
25304
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
वाचतो आहे!
+
In reply to + by नितिन थत्ते
'पुढारी' आणि "पवार"
In reply to 'पुढारी' आणि "पवार" by इन्द्र्राज पवार
रामभाऊ
In reply to रामभाऊ by श्रावण मोडक
स्वाक्षरी संग्रह
एक अतिशय उत्कृष्ट मेजवानी.
In reply to एक अतिशय उत्कृष्ट मेजवानी. by गांधीवादी
प्रवास....
In reply to प्रवास.... by इन्द्र्राज पवार
>>श्री.गांधीवादी यांचा
In reply to >>श्री.गांधीवादी यांचा by नितिन थत्ते
नोप...नो विनोदी प्रतिसाद
In reply to >>श्री.गांधीवादी यांचा by नितिन थत्ते
तुम्हाला गांधीवादी यांची काही
पुढे
मस्त लेखमाला. आपल्याकडे
In reply to मस्त लेखमाला. आपल्याकडे by यशवंतकुलकर्णी
पॅटन
:)
सुरेख.
In reply to सुरेख. by पैसा
करेक्शन
In reply to करेक्शन by नितिन थत्ते
करेक्शन
In reply to करेक्शन by पैसा
थोडे थांबा...
वाचताना अगदी गुंग होऊन गेलो
In reply to वाचताना अगदी गुंग होऊन गेलो by अनिल २७
हेच म्हणतो
वाचतेय...
In reply to वाचतेय... by प्राजक्ता पवार
प्रतिक्रिया....
सॅम माणकेशाँचे बालपण..
In reply to सॅम माणकेशाँचे बालपण.. by अनिल २७
कौटुंबिक माहिती...
In reply to कौटुंबिक माहिती... by इन्द्र्राज पवार
ओ.के.
In reply to ओ.के. by अनिल २७
सवयीचा परिणाम
छान लेख
मस्त
उत्तम लेख
In reply to उत्तम लेख by विसुनाना
+
In reply to + by नितिन थत्ते
अंत्यसंस्कार
सुंदर
In reply to सुंदर by आंसमा शख्स
फोटोंची आवश्यकता...
In reply to फोटोंची आवश्यकता... by इन्द्र्राज पवार
आंसमा यांच्या विनंतीशी सहमत आहे.....
In reply to आंसमा यांच्या विनंतीशी सहमत आहे..... by मुशाफिर
मुशाफिरी
In reply to मुशाफिरी by अर्धवटराव
नाही हो, असं काही नाही....
In reply to आंसमा यांच्या विनंतीशी सहमत आहे..... by मुशाफिर
मुशाफिर साहेब.. बांगला देशचे युद्ध...
In reply to मुशाफिर साहेब.. बांगला देशचे युद्ध... by संजय अभ्यंकर
बरोबर! युद्ध १९७१ डिसेंबर मध्येच झालं होतं....
In reply to आंसमा यांच्या विनंतीशी सहमत आहे..... by मुशाफिर
हेरखातं आणि सैन्यदल या दोन्ही
In reply to हेरखातं आणि सैन्यदल या दोन्ही by पुष्करिणी
नक्किच!
In reply to नक्किच! by मुशाफिर
अभ्यास....
In reply to फोटोंची आवश्यकता... by इन्द्र्राज पवार
वाह !!
उत्कृष्ट लेख
उत्तम माहितीपुर्ण लेख..
थोडी निराशा
वाचतोय. उत्तम लेख.
ज. थोरात.
In reply to ज. थोरात. by जयंत कुलकर्णी
खरेच भारी आठवण आहे
In reply to खरेच भारी आठवण आहे by बेसनलाडू
अगदी हेच
In reply to खरेच भारी आठवण आहे by बेसनलाडू
असेच
In reply to ज. थोरात. by जयंत कुलकर्णी
ले.जन.थोरातसाहेब
In reply to ज. थोरात. by जयंत कुलकर्णी
लै भारी!!!
In reply to लै भारी!!! by बिपिन कार्यकर्ते
ख ल्ला स ! कुलकर्णी साहेबांनी
दोन्ही भाव आवडले
In reply to दोन्ही भाव आवडले by संदीप चित्रे
तहाची कलमे आणि सनावळ्या असल्या 'पकाऊ' इतिहासापेक्षा...
अप्रतिम लेख
एकदम दिलखेचक लेखन!
वाचते आहे.
पंखा...
लयी भारी सुरु आहे.
सॉलीड
अतिशय सुंदर व माहितीपुर्ण लेख.......