हे म्हणजे कै च्या कैच

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
1 Aug 2010 - 12:30 pm

तुम्ही लोकांनी पार वैताग आणला आहे राव. हो तुम्हीच! अरे इथे मिसळपाववर छळता ते पुरे नाही का? सुखाने जगु द्या की एखाद्याला...

असे दचकु नका, आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या मनात आलेले प्रामाणिक विचार वर लिहले आहेत. खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत, अन तुम्ही दचकला तसेच मला दचकवुन उठवण्यास कारणीभुतही हेच विचार.

तर झाले आहे काय, तुम्ही लोक (जसे कोणाही एका मिपा कराला इथे सतत छळता तसेच) मला ही छळत आहात, पण माझ्या स्वप्नात. हसु नका! प्रकरण गंभीर आहे. अहो झोपेचं पार खोबरं झालंय हो. आजचच उदाहरण घ्यायचं तर मला चक्क संपादक मंडळाचा व्यनी आला हो! ( मध्यमवर्गीय माणसाला जशी पोलीसांची भीती तशीच आम्हाला संपादक मंडळाची) व्यनीत चक्क "अवांतर धागे काढु नयेत" असा दम भरला होता. खडबडुन जागा झालो अन निश्वास सोडला, पण मग नंतर मागील अनेक प्रसंग धडाधड नजरेसमोरुन गेले. म्हणलं तुम्हा दोषी लोकांना थोडे गिल्टी वगैरे वाटायलाच हवे अन लेखन करा वर टीचकी मारली...

हॉलीवुड नगरी! नंदन, पिडां काका, देवदत्त अन मी असे पिडां काकांच्या घरात. साहित्यावर काही तरी गहन चर्चा सुरु आहे. नंदनच्या हातात कुठलेसे भले मोठे पुस्तक आहे.नंदनने चष्मा का घातलाय कुणास ठावुक! समोर शिंडीचा फोटु टांगलेला आहे, तिच्या कडे बघताना पिडांकाका माझ्याकडेच बघताहेत असे का वाटतेय! तिच्या खाली सोनिया गांधीचा फोटु आहे की काय? समोर टेबलावर ग्लेनफिडीशची बाटली आहे तिच्या शेजारी शिवास रीगल आहे, चौथा ग्लास दिसत नसल्याने मी व्याकुळ झालेलो आहे. अश्या सगळ्या भेदरलेल्या वातावरणात अचानक नंदन मला काही तरी प्रश्न विचारतो, मला फक्त दोस्तोव्हस्की वगैरेच ऐकु येते.फे फे का काय म्हणतात तशी अवस्था...

पुण्यनगरी. टिळकरोडवरुन सारसबागेत मैत्रिणीला भेटायला चाललोय (दिसुन दिसुन सारसबाग!) खरं तर टिळकरोड नेहमीचाच पण इथे सगळ्या दुकानांवर, पाट्यांवर व इतरत्रही युयुत्सु का लिहले आहे काही कळत नाही! कुठल्यातरी पुस्तकाच्या दुकानात भांडण चालु आहे.कुठल्यातरी घरावरुन जाताना पाणी कपात अन वीज कपातीवर तावातावाने चाललेली चर्चा ऐकु येते आहे. कुणीतरी सिग्नल तोडुन चालले आहे. तेवढ्यात कोणीतरी हाका मारतेय असं वाटलं, आवाज ओळखीचा, हळु हळु मोठा होतोय, धोक्याची जाणिव येते तसा. "ए चोच्या!" जोरदार स्पष्ट हाक. दोन वेण्या, भिंगाचा चष्मा इतकेच दिसतेय. "हरे रामा हरे कृष्णा" असे काहीतरी सगळीकडे का दिसते आहे कुणास ठावुक! ह्या वेण्या म्हणजे जोजोकाकुच! काहीतरी अखंड बडबड चालु आहे मला काहीही कळत नाहीए. माझे सारखे लक्ष घडाळ्याकडे, काकु काही थांबायचं नावच घेत नाहीएत. कशी सुटका होते माहीत नाही, एकदम एसी लावल्यासारखं थंडगार वाटतं. बागेच पोहोचुन पाहतोत तर काय परा (एकटाच) बागेत कोण काय करतंय बघत हिंडतोय. ती मला पाहते, मी पराकडे पाहतो, ती हाक मारते, परा मला बघतो आणि एक छद्म्मी हास्य ...

मागे जेव्हा भुमिती शिकायला सुरुवात केली होती तेव्हा फार विचित्र स्वप्नं पडायची, रोजच दरदरुन घामेघाम उठायचो. वरती शुभ्र आकाश आहे अन त्यावर आडव्या तिडव्या काळ्या रेघा आहेत. त्या रेघा एकमेकांना छेदत नाहीत, कुठे सुरु होत आहेत कुठे संपताहेत हे दिसत नाही. मी वेड्यासारखा आकाशाखाली रेघांचा अंत, छेदनबिंदु शोधत पळतो आहे, पळतोच आहे. असे ते स्वप्न होते. तसेच काहीसे आता पडते. धनंजयांचा कुठलातरी प्रतिसाद वाचतो आहे, वरुन खाली-खालुन वर काहीही उजेड पडत नाहीए, प्रतिसाद संपतही नाहीए, मी कळेल म्हणुन वाचतोय, वाचतोच आहे. थोडासे विपरीत पडणारे म्हणजे मुसुंचा प्रतिसाद वाचतोय असे. प्रतिसाद केव्हा सुरु झाला अन केव्हा संपला कळतच नाही, पण एक अक्षर कळेल तर शपथ! मध्येच एखादा आख्खी ओळ लांबीचा शब्दच काय येतो. पनास वेळा मी प्रतिसाद वाचतो पण शब्दच कळत नाहीत. हे अनुभव वाटतात किरकोळ हो, पण आख्ख्या निर्जिव जगात एकट्या सजीवाला कसे वाटेल तसे वाटते.

मोडकगुर्जी तर आठवड्यातुन एकदा तरी येउन "मोठे व्हा" असे सांगुन जातातच. एकदा तर आमचे बंधुराज रुसुन बसले होते, का तर म्हणे श्रामो "मोठे व्हा" म्हणाले म्हणुन. त्यालाही इथे आणला पाहिजे म्हणजे सवय होईल त्यालाही. घासुगुर्जी येउन कविता लिहा म्हणुन गृहपाठ घालुन जातात. त्यापाठोपाठ, कविता अन साहित्य आयुष्यात कीती महत्त्वाचे आहे हे बिका सांगुन जातात! खरं तर काय सांगतात काहीही कळत नाही, पण खरं आहे शिवाय काही म्हणायची छातीच होत नाही तेव्हा. एकदा तर जी मेलावर "टपकवला तिच्यायला" असा विषय असलेला इमेल आला. छोटा डॉन ने पाठवला होता. हे भला मोठा इमेल, पण काय लिहले आहे हे कळेनाच म्हणुन मग बिकांना फॉरवर्ड केला. त्यांनी शुद्धलेखनाच्या चुकांची खाली हे भली मोठी यादी जोडुन पुन्हा पाठवला. एक ओळ सोडुन बाकीचे काहीही कळले नाही. ती ओळ होती, "गल्लत होते आहे काय?"बाकी काही ताजी ताजी स्वप्ने पण पडतात म्हणा, कालच मी कुठेतरी 'स्थळ' बघायला गेलेलो, कुणासाठी काही आठवेना, मी मुलीला "स्वैपाक येतो का" असे विचारता सगळे खो खो का हसले कुणास ठावुक!

तर हा असा लेख जसा च्या तसा स्वप्नातच सुचला, त्यावर दोन तीन भन्नाट प्रतिक्रीया आलेल्या पाहुन घाबरुन लेख लगेच उडवावा म्हणुन माझे लेखन वर गेलो तर संपादनाचे बटनच नाही!! पुढे काय होणार याने जीव कासावीस झाला अन जाग आली, तस्मात धाग्याचा शेवट कसा करावा हे दिसलेच नाही...

हे ठिकाणमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 12:40 pm | बिपिन कार्यकर्ते

घे मेल्या... माझी मापं काढतोस काय?

मागे जेव्हा भुमिती शुकायला सुरुवात

शुक शुक करायला येतोस काय इथे? आँ? पळ्ळ!!!

पहा तुम्हाला आनंद दिला का नाय? ;-) तेव्हढे संपादन करा ना राव प्लीज. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 1:08 pm | बिपिन कार्यकर्ते

केलं.

अवलिया's picture

1 Aug 2010 - 12:49 pm | अवलिया

हा हा हा

मस्त रे... नायल्या !

ऋषिकेश's picture

1 Aug 2010 - 1:07 pm | ऋषिकेश

हा हा हा.. हा नायल्या कधी स्वप्नात काय बघेल.. आणि बघेल तर बघेल वर सगळ्यांना सांगत सुटेल! :P

शानबा५१२'s picture

1 Aug 2010 - 1:10 pm | शानबा५१२

कधी नव्हे तो लेख लिहला तो असला,काय तर स्वप्नात काय बघितल!

च्यायला उद्या भलतच कायतरी स्वप्नात बघुन इथ लिहल नाही म्हणजे मिळवल!

च्यायला उद्या भलतच कायतरी स्वप्नात बघुन इथ लिहल नाही म्हणजे मिळवल!

जाउदे हां ग्यानबा, तसलं काही लिहलं तर वाचु नको हां. ते फक्त ठराविक वयाच्या पलिकडल्यांसाठीच असते.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Aug 2010 - 3:34 pm | llपुण्याचे पेशवेll

नायल्या स्वप्नात काय पाहीलं हे लिहीलंस, ठीक. नशीब काय झालं ते नाही लिहीलंस ते. ;)

काय झालं हे ही लिहलं आहे, ते तुम्हास न कळल्याबद्दल क्षमस्व!

पंगा's picture

2 Aug 2010 - 7:14 am | पंगा

कधी नव्हे तो लेख लिहला तो असला,काय तर स्वप्नात काय बघितल!

असे कसे? तुमच्या त्या केक्युलेसाह्यबाने तर त्यावरून आख्खा प्रबंध लिहिला! त्याचे तेवढे चालले वाटते?

च्यायला उद्या भलतच कायतरी स्वप्नात बघुन इथ लिहल नाही म्हणजे मिळवल!

'स्वतःचेच शेपूट चावणारा साप' म्हणजे 'भलतेच काहीतरी' नव्हते काय? (अवांतरः यावरून, कॉलेजात असताना तमिळभाषक मित्रांकडून ऐकलेले तिरुक्कुरलचे - हा जो काही प्रकार असेल तो - एक अश्लील विडंबन आठवले.)

हे बरे आहे... त्या कुठल्या त्या भलत्यासलत्या साहेबांनी स्वप्नात काय पाहिले यावरून लिहिलेले प्रबंधच्या प्रबंध बेमालूमपणे खपून जातात, आणि आपल्या नाइलसाहेबांनी स्वप्नात पाहून साधा लेख लिहिला, तर असल्या प्रतिक्रिया मिळतात!

'दुसर्‍याचा तो बाब्या, आपले ते कार्टे'??????

शानबा५१२'s picture

22 Aug 2010 - 12:21 pm | शानबा५१२

आता एक संदर्भ द्यायचा होता,म्हणुन काही लेख चाळत होतो,तेव्हा हे पाहीले,अहो,माझे वय आणि माझी व्रुती ह्याबाबतीत 'मी काय चीज आहे!' हे तुम्हाला काय माहीती?

आणि हो,पंगा ,तुम्ही कोणाला कोणाशी compare करता आहात?
ह्यांनी स्वप्नात कधी प्रयोगाला वापरतात ती test tube तरी पाहीली आहे का?

त्या कुठल्या त्या भलत्यासलत्या साहेबांनी

हो हे भलते सलते आणि हे बॉलीवुडवाले आपल्याला महान वाटतात की अजुन कोणी?

त्या कुठल्या त्या भलत्यासलत्या साहेबांनी स्वप्नात काय पाहिले यावरून लिहिलेले प्रबंधच्या प्रबंध बेमालूमपणे खपून जातात,

हो ना,का बरे खपवुन घेतात कुणास ठाउक?

he is KEKULE dear!
you know what is being Friedrich August Kekulé?
ITS SOMETHING MANY SCIENTIST SPEND THEIR WHOLE LIFE FOR!

तुमच्या सर्वांचा निषेध.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Aug 2010 - 1:13 pm | प्रकाश घाटपांडे

रामाच्या पारी उठल्यावर आसच व्हतय.

गणपा's picture

1 Aug 2010 - 1:26 pm | गणपा

हे हे हे , मस्त रे नायल्या.
कोपरखळ्या, चिमटे पेरुन मस्त सजवली आहे डिश ;)

पाषाणभेद's picture

1 Aug 2010 - 1:56 pm | पाषाणभेद

खरोखर हे म्हणजे कै च्या कैच!

विंजिनेर's picture

1 Aug 2010 - 1:58 pm | विंजिनेर

नायल्या, झोपायच्या आधी तसले पिच्चर बघणं सोड. सगळं निट होईल.

सगळं निट होईल.

निट की नीट हो ?

नी असावे असे वाटते. मराठीचे प्राध्यापक काय म्हणता?

प्रॉब्लेम बराबर वळकला पण उपाय चुकला. झोपायच्या आधी पिच्चर नाही तर इथंच मिसळपाव खात असतो.

स्वगतः झोप अर्धवटच तुटल्याने बरेच लोक राह्यले की!

श्रावण मोडक's picture

1 Aug 2010 - 2:16 pm | श्रावण मोडक

स्वप्नदोष रे बाबा, हा स्वप्नदोष! तू मोठा होऊ लागल्याचं (वयात येऊ लागल्याचं, असं कोण रे ते म्हणालं? आयला उगाच...) लक्षण हे. विंजिनेराचा सल्ला नीट ध्यानी घे आणि तसा वाग, म्हणजे हा त्रास नाही व्हायचा. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 2:25 pm | बिपिन कार्यकर्ते

तू मोठा होऊ लागल्याचं (वयात येऊ लागल्याचं, असं कोण रे ते म्हणालं? आयला उगाच...) लक्षण हे.

हे बेस झालं... आता म्हणजे नायल्याच्या मागची एक कटकट ('मोठे व्हा'ची) सुटणार लवकरच.

राजेश घासकडवी's picture

1 Aug 2010 - 2:17 pm | राजेश घासकडवी

गुर्मीत नायल्या स्वप्न पाहतो ऐसे
स्वप्नातही स्मरतो लोक हे कैसे कैसे
(मर्ढेकरांची क्षमा मागून)

एकदम बराबर. पण बिकाशेट इथे तेव्हढं शुद्धलेखन दुरुस्त करा हो पुन्हा एकदा प्लीज.

गर्मीत च्या ऐवजी गुर्मीत झालंय. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2010 - 8:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

का रे नायल्या, गर्मीत आं? मागच्याच आठवड्यात लांडोरींची कमतरता आहे म्हणून रडत होतास ना??

बाकी आमचं नाव असल्या लेखांमधे दिसायलाच पाहिजे!! आता अंमळ मोठा हो आणि चांगले नाव काढ हो!

गर्मी म्हणजे उकाडा गं. बाकी तु म्हणतेस ती कमतरता नेहमीच जाणवते. ;-)

असुर's picture

1 Aug 2010 - 3:43 pm | असुर

आवरा! लै भ्भारी! जबरा लेखन! डोळे पाणावले!
एक तलवार, एक स्वप्न, बरीचशी मुंडकी आणि सटासट सटासट सटासट...
"आपल्याला कोणी हाणणार तर नाही ना" हे टेन्शन आणि "पाकृ" मुळे होणारं अजीर्ण यामुळे असं होतं असे एक जालिय डॉक्टर सांगत होते.
यावर एक रामबाण उपाय म्हणजे ए-पिल्स च्या गोळ्या कायमचूर्णासोबत रोज रात्री घेणे! माझ्या मित्राला गुण आलाय हो!

--असुर

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Aug 2010 - 3:55 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

..... मी तीन वेळा वाचला....माझं वाचण्यात काही चुकत असेल म्हणुन खालुन वर सुद्धा दोन दा वाचले... पण फारसा अर्थबोध झाला नाही.....कदाचित हा काढा मू.मि.पा. (मुरलेल्या मि.पा.) करां साठी उकळलेला असावा. म्हणुन आम्हा नवख्यां च्या गळ्याखाली उतरत नसावा.... पण काही काढलेली मापे,काही शालजोडीतले ...झालंच तर काही सूड्....कोणाचा तरी काढलेला वचपा..... अस्सेच शब्द माझ्या मनात का येऊ आहेत लागले देव जाणे!
....काही चुकिचे बोलले असेन तर क्षमा असावी.....
...माफीची चुकी असावी....

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2010 - 8:45 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!! असो.

जाओ माफ किया, सबकोच.

पण काही काढलेली मापे,काही शालजोडीतले ...झालंच तर काही सूड्....कोणाचा तरी काढलेला वचपा..... अस्सेच शब्द माझ्या मनात का येऊ आहेत लागले देव जाणे!

पण फारसा अर्थबोध झाला नाही

तुम्हास काहीच अर्थबोध झालेला दिसत नाही. असो, इथे असणार्‍या सगळ्यांना माहित असलेल्या गोष्टीच आहेत, कळतील तुम्हालाही हळु हळु, शुभेच्छा.

मराठमोळा's picture

1 Aug 2010 - 4:16 pm | मराठमोळा

हॅहॅहॅहॅ.....
नाईल,
मोठा क्रिकेटर झालास म्हणे... चौकार षटकार मारु लागलाहेस.. आणी आज तर सेंचुरी.
नामांकीत गोलंदाजांना टारगेट केलेस. फक्त अजहरुद्दीन होणार नाहीस याची काळजी घे हो. ;)
अजुन २०-२० चे धावती खेळीवाले प्रतिसादक आले नाहीत वाटत? :?

( अवांतरः चावलाय पक्का ) =)) =))

मी-सौरभ's picture

2 Aug 2010 - 1:28 am | मी-सौरभ

तुला तुझी स्वप्न भारी आठवतात. मी तर सकाळी जागा झालो कि विसरून जातो :(

विकास's picture

2 Aug 2010 - 8:49 am | विकास

मला एकदम खालील ओळी आठवल्या:

"काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
- - - -
आता सांगू कशी, बोलू कशी, नाव कुणाचं घेऊ कशी मी?"

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2010 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते

नायल्याच्या बाबतीत हे थोडं वेगळं आहे...

"काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न भाऊ मी डबडबलो..." ;)

दत्ता काळे's picture

2 Aug 2010 - 11:05 am | दत्ता काळे

धनंजयांचा कुठलातरी प्रतिसाद वाचतो आहे, वरुन खाली-खालुन वर काहीही उजेड पडत नाहीए, प्रतिसाद संपतही नाहीए, मी कळेल म्हणुन वाचतोय, वाचतोच आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

खरं तर सकाळी उठण्याचे कारणच वरील विचार आहेत,

हे वाक्य काळजात घर करुन गेले.

बाकी लेख लैच भारी रे. एकदम पॉपकॉर्नीय लेख, तडतडीत.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 1:06 pm | मिसळभोक्ता

मिपावर मिपाकरांचा उल्लेख करणारे लेख म्हणजे हिटच जातात.

आपला लेख ह्याला अपवाद नसावा.

आणखी काही लिहायला जमले, तर बघा. :-)

परा मला बघतो आणि एक छद्म्मी हास्य ...

हा हा हा.

हे मात्र नक्कीच समजले. बाकीचे फारसे कळले नाही.

पिवळा डांबिस's picture

23 Aug 2010 - 10:21 am | पिवळा डांबिस

हॉलीवुड नगरी! नंदन, पिडां काका, देवदत्त अन मी असे पिडां काकांच्या घरात.
ठीक आहे, तु आता इतका गळ्यात पडतच असशील तर तुला घेऊया मैफिलीत!!!!:)
साहित्यावर काही तरी गहन चर्चा सुरु आहे.
पयले छूटच चुकलास!! आमच्या कुठल्याच कट्ट्यात आम्ही असा अरसिकपणा करत नाही!! आमच्या मैफिलीत साहित्यविषयक चर्चा व्हायला हा काय इस्ट्-कोस्टावरचा कट्टा समजलास?
नंदनच्या हातात कुठलेसे भले मोठे पुस्तक आहे.नंदनने चष्मा का घातलाय कुणास ठावुक!
विचारवंत, हो, अस्सल विचारवंत!! मराठीत "इंटलेक्च्युअल" म्हणायचं बघा!!!!
समोर शिंडीचा फोटु टांगलेला आहे, तिच्या कडे बघताना पिडांकाका माझ्याकडेच बघताहेत असे का वाटतेय!
पुन्हा चूक!! तुला तात्याच्या घरातल्या तुझ्या आठवणी इथे मिक्स कराव्याश्या वाटताहेत!! "क्रॉफर्ड सिंन्ड्रोम" म्हणतात त्याला!!
समोर टेबलावर ग्लेनफिडीशची बाटली आहे तिच्या शेजारी शिवास रीगल आहे, चौथा ग्लास दिसत नसल्याने मी व्याकुळ झालेलो आहे.
फोटोआयडी सोबत नाय घेऊन आलं की मग असंच होतं!!! मागे त्या घाटावरच्या भटाला काय जराशी पाजली तर "अंडरएज, अंडरएज" म्हणुन जेष्ठ मिपाकरांनी बोंबाबोंब केली!!!! तेंव्हापासून फोटोआयडी इज अ मस्ट!!!
अश्या सगळ्या भेदरलेल्या वातावरणात अचानक नंदन मला काही तरी प्रश्न विचारतो, मला फक्त दोस्तोव्हस्की वगैरेच ऐकु येते....
दोस्तोव्हिस्की हं!!! सांभाळून रहा, तो नंद्या तसलाच आहे!!! आधी दोस्त दोस्त म्हणतो आणि मग हळूच तुमच्या पुढ्यातली व्हिस्की फस्त करतो!!!!
:)