विठ्ठलाचा बाजार

Manoj Katwe's picture
Manoj Katwe in काथ्याकूट
22 Jul 2010 - 6:36 pm
गाभा: 

http://www.esakal.com/esakal/20100722/5722669071799675150.htm
http://www.esakal.com/esakal/20100722/5556652452577345971.htm
सकाळ मध्य प्रसिद्ध झालेले हे वृत्त वाचले, आणि राजकरण्यांनी विठ्ठलाचा मांडलेला बाजार पाहून मन विषण्ण झाले.
ह्या विठ्ठल मंदिराच्या कार्यकार्णीचा निषेध.
जोपर्यंत मंदिराचे समिती सदस्य राजकारन्यांचे तळवे चाटायचे बंद करीत नाही तो पर्यंत विठ्ठलाला लांबूनच राम राम
१५ दिवस वारी करून आलेले वारकर्यांना जेव्हा महापूजेचा मान मिळेल तो दिन सोन्याचा आणि त्याच दिवशी मी विठ्ठल मंदिराची पायरी चढीन.
मी काय कोण पुंडलिक वगेरे नाही, पण हे असं केल्याशिवाय मंदिर समिती सदस्य ताळ्यावर येणार नाही.

भक्ताची गरज देवाला असते. विठ्ठल नाहीतर त्याच्या नावावर वारकरी समाधान मानून घेतील.
जर सर्व वारकर्यांनी हे अंमलात आणले तर एका दिवसांत हे मंदिर समिती सदस्य जागेवर येतील.

खरंतर विठ्ठल कोणाचा ?
तो सर्वांचाच आहे, माझा, तुमचा, वारकर्यांचा, आणि तसेच राजकारण्यांचा देखील
खरा प्रश्न आहे कि हे मंदिर समिती यांनी किती व कोणाचे तळवे चाटायचे.

अजून कोणाकडे काही उपाय असाल तर नक्कीच सुचवावेत.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Jul 2010 - 9:19 pm | विसोबा खेचर

१५ दिवस वारी करून आलेले वारकर्यांनाच जेव्हा महापूजेचा मान मिळेल तो दिन सोन्याचा

सहमत..

अर्थात, दरवर्षी एका जुन्याजाणत्या वारक-याला हा मान मिळतोच आणि त्याचा सत्कारही होतो..

परंतु या पवित्र अश्या मानल्या गेलेल्या दिवशी कोणत्याही राजकारण्याला पांडुरंगाच्या गाभा-यात प्रवेश निषिद्धच केला पाहिजे..

या राजकारण्यांच्या पूजेमुळे आमचा काळतोंड्या बाटतो असं माझं मत आहे..

(हभप) तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

अशोक पतिल's picture

24 Jul 2010 - 6:34 pm | अशोक पतिल

१५ दिवस वारी करून आलेले वारकर्यांनाच जेव्हा महापूजेचा मान मिळेल तो दिन सोन्याचा

अहो आमच्या खानदेशातुन / वर्‍हाडातुन महिना भर दिन्डी चालत असते.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Jul 2010 - 9:42 pm | अविनाशकुलकर्णी

हे नवे बडवे आहेत..बहुसंख्य जमातितले..त्यांना सारे माफ.

विदुषक's picture

23 Jul 2010 - 11:49 am | विदुषक

विठ्ठला अजब तुझे 'सरकार' !!!
मजेदार विदुषक

भारतीय's picture

23 Jul 2010 - 11:59 am | भारतीय

एक्-दोघांनी रोष व्यक्त करून कही होणार नाही.. इथे (हभप) बंड्यातात्या कराडकरांसारखे लोक गप्प का आहेत हे समजू शकत नही.. याविरुद्ध संघटीत प्रयत्न गरजेचे..

http://anildaily.blogspot.com

राघव's picture

23 Jul 2010 - 1:07 pm | राघव

प्रयत्न.. एकत्रीत प्रयत्न झाला तर उत्तमच आहे. पण होईल असे फारसे वाटत नाही.

तसाही पंढरपूर म्हणजे राजकारणाचा आखाडा झालाय.
सकाळ मधे पांडुरंगाचा फोटो आलेला. मुख्यमंत्री, पुजारी सगळे आहेत तिथे. त्यात पांडुरंग किती दिसतो ते बघीतले म्हणजे सगळे कळते!!

मंदीरातले पुजारी स्वतःच निर्लज्ज आहेत. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सगळे वारकरी इतक्या लांबून प्रेमानं येतात, त्याच विठ्ठलाच्या सेवेत दिवसरात्र राहण्याची संधी मिळालेले हे लोक. पण पिकतं तिथं विकत नाही हेच खरं. अहो, जिथं दोनशे रुपये मोजले तर पांडुरंगाच्या गळ्यातला हार तुमच्या गळ्यात पडतो अन् नाही मोजलेत तर तुम्हास ढकलून बाहेर काढल्या जाते, तिथे कसला आलाय भक्तीभाव?

जाऊं देत.. हे बघीतले की टाळके सटकते. हे असले वांझोटे आस्तिक असण्यापेक्षा नास्तिक तरी बरे, ते सरळच देवाला दगड म्हणतात.

राघव

शानबा५१२'s picture

23 Jul 2010 - 8:41 pm | शानबा५१२

मस्त लिहलय.
-------------------------------------------------------------------------
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

प्रकाश घाटपांडे's picture

23 Jul 2010 - 1:57 pm | प्रकाश घाटपांडे

रामाच्या नावाने बाजार. पहा आनंद पटवर्धनांचा लघुपट राम के नाम
वेगवेगळ्या देवीच्या नावाने बाजार
साईबाबा च्या नावाने बाजार
तिरुपतीच्या नावाने बाजार
गणपतीच्या नावाने बाजार
मरी आईच्या नावाने बाजार
काळुबाईच्या नावाने बाजार
यल्लमाच्या नावाने बाजार
.
.
.
.
तीर्थे धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी॥ हे तुकोबांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगितले
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मितभाषी's picture

23 Jul 2010 - 6:42 pm | मितभाषी

मी काय कोण पुंडलिक वगेरे नाही, पण हे असं केल्याशिवाय मंदिर समिती सदस्य ताळ्यावर येणार नाही.
>>>>>
याने ह्या गेंड्याच्या कातडीच्या 'बडव्यांना' काय फरक पडणार आहे??

भारतीय's picture

23 Jul 2010 - 7:22 pm | भारतीय

ह्या पंढरपूरच्या बडव्यांची 'वॉक ईन' वगैरे द्वारे निवड होते का हो?
http://anildaily.blogspot.com

छोटा डॉन's picture

24 Jul 2010 - 1:27 am | छोटा डॉन

लिलाव असतो दिवसाचा.
भरताय का निविदा, आम्ही शब्द टाकु हवा तर, एखादा दिवस मिळण्याइतकी नक्कीच पोच आहे आमची.
हां, मात्र नियमाप्रमाणे एखादा परंपरागत पुजारी पार्टनर म्हणुन घ्यावा लागेल ;)

------
छोटा डॉन

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jul 2010 - 7:33 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा.. सगळे बडव्यांनाच दोष देत आहेत हे पाहून आश्चर्य वाटले. ते लोक जे वशिल्याने दर्शन घेऊन आले त्यांच काय. ते ही तुमच्या आमच्यातलेच लोक आहेत ना? मग ते दोषी नाहीत. याला सुरुवात तुमच्या आमच्या सारख्या लोकांनीच केली ना!
बडवे विठोबाच्या गळ्यातली माळ काढून द्यायला २०० रु घेतात ना. मग तुम्ही नका घेऊ ना माळ. एका बाजूने सर्वस्व विठुरायाला द्यायच्या बाता करायच्या आणि वर या माळा मागून घ्यायचा नाटकीपणा करायचा?
बाकी त्या इसकाळवर 'स्वच्छतेच्या' बाता करणारे स्वतः किती स्वच्छ आहेत हो?
असो.
बाकी, त्या इसकाळवर पण एक नाना चमकून गेला. :)
त्याची प्रतिक्रिया बघा
'मला महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल अभिमान वाटू दे. मी पुन्हा कधी दिल्लीतील हायकमांडपुढे झुकणार नाही. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, भले माझी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तरी चालेल,'' अशी प्रार्थना विठ्ठलाच्या पायी डोके ठेवून करावी, असा सल्ला नाना या नावाने एका वाचकाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

छोटा डॉन's picture

24 Jul 2010 - 1:20 am | छोटा डॉन

पेशव्यांशी सहमत ...

>>बडवे विठोबाच्या गळ्यातली माळ काढून द्यायला २०० रु घेतात ना. मग तुम्ही नका घेऊ ना माळ. एका बाजूने सर्वस्व विठुरायाला द्यायच्या बाता करायच्या आणि वर या माळा मागून घ्यायचा नाटकीपणा करायचा?
=)) =)) =))
खरं आहे पुपेशेठ, अगदी खरं आहे तुमचे.
आम्ही असे नाटकीपणाचे एक से एक किस्से बघितले आहेत, पण ती काय पद्धत आहे ना बडव्यांच्या नावाने बोंब मारायची, मग चालु द्यात.
बाकी आम्हाला अगदी करेक्ट माहित आहे की बडवे "नक्की कुणाच्या गळ्यात माळ घालतात ते", कारण साफ आहे, गाभार्‍यात प्रवेश करतात त्या पुण्यवान माणसाच्या हालचालीच अशा असतात की बडव्यांना बरोबर कळते की याला काय हवे आहे ते.

अजुन काही प्रश्न ?
१. एखादी नविन लग्न झालेले जोडपे दर्शनाला गेले तर रुक्मिणीआईचा आशिर्वाद म्हणुन काही ना काही मिळायची अपेक्षा कोण ठेवतं ?
२. विठ्ठलाच्या गळ्यात घातलेला हार कुणाला हवा असतो ?
३. विठ्ठलाच्या पायापाशी काही काळ ठेवलेले "पवित्र पेढे' कुणाला हवे असतात ?
४. गरुड खांबापाशी बसुन आपल्या पुर्वजांबद्दल व त्यांना मिळालेल्या मोक्षाबद्दल ऐकण्यात रुची कुणाला असते ?
५. बाजीराव पडसाळीत असणारा 'शाळिग्राम' हलवुन पाहण्याची व त्याआधारे आपले पुण्य मोजण्याची हौस कुणाला असते ?
६. रांग मोडुन बाकीच्यांच्या आधी दर्शन कुणाला हवे असते ?
७. विठ्ठलाच्या मस्तकी लागलेल्या चंदनाच्या लेपाचा अंश कुणाला हवा असतो ?
८. तासनतास रांगेत उभा राहणारे लोक कुतुहलाने पहात असताना गाभार्‍यासमोरच्या मोकळ्या जागेत एखाद्या पुजार्‍याला पकडुन काही कृत्ये करुन घेण्याच्या मोठेपणा कुणाला हवा असतो ?

साहेब, ह्यातली एकही गोष्ट "मैलोनमैल उन्ह, पाऊस, वारा याची तमा न बाळगता चालत येणार्‍या वारकर्‍याला" अजिबात महत्वाची वाटत नाही, तो यासाठी येतच नाही मुळी.

ह्या गोष्टी महत्वाच्या त्या तुमच्याआमच्यासारख्या सुशिक्षित, पांढरपेशी, उच्चभ्रु लोकांना.
ही जमात अशी की तिकडे सगळे कौतुक करुन घेईल, मोठ्ठ्या आनंदात बडव्याच्या हातात ५०० ची नोट सरकावेल आणि नंतर एकदा परत आले की मग लेख वगैरे लिहुन 'अन्यायाचा टाहो फोडेल'.
जाऊ द्या, लै पाहिले आहेत असे लोक आणि सज्जन वारकरीही...

उगाच कशाला जास्त बोलायचे नाही का, भावना महत्वाच्या.
बाकी असो.

------
(लै देवळं जवळुन पाहिलेला) डॉन्या उत्पात

राघव's picture

26 Jul 2010 - 4:09 am | राघव

उशीर झाला. गेले काही दिवस मिपावर आलोच नाही त्याचा परिणाम.
जी चीड मी वर लिहिलेल्या प्रतिसादात दिसते ना, ती त्या पवित्र जागेचा बाजार मांडलेला दिसतो म्हणून उपजते. अन् ती चीड मला वाटणार्‍या भावनांमधून उपजलीये. इतर कुणाला काय वाटते त्याचा हिशेब त्यांनीच करावा. असो.
तुमचे प्रश्न रोचक आहेत.
निदान मी तरी भगवंताचे दर्शन सोडून कसलीही अपेक्षा ठेवून जात नाही मंदिरात. मी जातो तो दर्शन घ्यायला. भेटायची ईच्छा होते म्हणून जातो. तीर्थक्षेत्री गेलेच पाहिजे असा हट्टही नाही. जाऊन दर्शन मिळाले नाही तरीही हरकत नाही. प्रयत्न करून बघायचा सफल झाला तर चांगलेच. खरा भाव असायला हवा तो मनात. तो नसला तर १००० लोटांगणं घातलीत तरीही उपयोग नाही अन् तो असला (अन् या असण्याचीही स्वतःला जाणिव नसली) तर त्याच्यासारखा कुणी नशीबवान नाही. आपले मन काही अजून तेवढे मोठे नाही. आपले आपणाला सुधारत न्यायचा प्रयत्न करायचा एवढेच काय ते आपल्या हातात. नाही?

राघव

मला फक्त इथेच नव्हे तर अजून बर्याच बाबतीत प्रयत्न करावेसे वाटतात (आणि मी करतो देखील.)
पण संघटीत प्रयत्न करणे हे खूप महा जिकरीचे काम आहे.
आपल्या इथे ( भारतात ) कोणताही एखादा मुद्द्दा लोकांना समजून सांगणं म्हणजे निव्वळ अशक्य असत.
इतके मतभेद होतात कि शेवटी सगळे प्रयत्न केरात जातात.

तरी देखील अजून तरी प्रयत्न करायचे सोडलेले नाही.
बघू काय निष्पन्न होतेय ते.

बाकी हे मात्र खरे
कि चर्चेच्या फेर्या झाडणारे बरेच असतात, पण कृत्य करायला फार थोडेच पुढे सरावितात.

धमाल मुलगा's picture

23 Jul 2010 - 9:06 pm | धमाल मुलगा

लाख मोलाची बात बोललात मनोजराव. अगदी लाखमोलाची.
उंटावरुन शेळया हाकायला बरेच असतात. कामं करायची म्हणलं की एकेकाला अचानक महत्वाची 'अर्जंट कामं' आठवतात हे खरं.

बाकी, त्या विठोबाच्या बाजाराचं काय बोलावं? त्या माऊली, विठुराया, इट्टल ह्याच्या ओढीनं वयाचा कोणताही अडथळा न जुमानता कधी फाटक्या चपला तर कधी अनवाणी, पाय सोलवटलेले, डोळे तळावलेले असा तो सामान्य वारकरी फक्त चंद्रभागेत एक बुडी मारुन बाहेर येतो अन कळसाला नमस्कार करुन आत दर्शनाला जाउन आलेल्या एखाद्याच्या पाया पडुन त्याला मिठी मारुन माऊली भेटल्याचं समाधान घेऊन घरी परततो.
तर, निरनिराळ्या दिव्यांच्या गाड्यांतुन 'हॅलीचाप्टर'मधुन इकडतिकड्चे चाप्टर येतात आणि ह्या सामान्य वारकर्‍याचा इट्टल बाटवतात.
पैसा बोलता है! दुसरं काय हो?

कार्लोस's picture

23 Jul 2010 - 9:52 pm | कार्लोस

मला काय त्यात नाहि कलत

छोटा डॉन's picture

24 Jul 2010 - 1:01 am | छोटा डॉन

>>मला काय त्यात नाहि कलत
नशिबवान आहात ...

बाकी आम्ही पण जेव्हा इच्छा होईल तेव्हा बिनधास्त रांग वगैरे तोडुन बिनधास्त दांडगाई करत आत घुसतो, जनरली आम्हाला कोण आडवत नाही, मोठ्ठा यखांदा उत्सव वगैरे असेल तर आधीच फोनाफोनी करुन "दर्शनाचा पास" घेऊन ठेवत असतो.
बाकी चालु द्यात ...

------
(वशिलेबाज) छोटा डॉन पंढरपुरकर

Nile's picture

24 Jul 2010 - 1:04 am | Nile

आम्ही तर बुवा लोकांना त्रास नको म्हणुन तिथे गर्दी करायला जातच नाही. ;) पण आमची दखल कोण घेतो? ;)

(समजुतदार) शेळीवाला

-Nile

चित्रा's picture

24 Jul 2010 - 12:55 am | चित्रा

खरंतर विठ्ठल कोणाचा ?

=))
बाकी कोणाचा माहिती नाही, माझा मात्र नक्कीच :P

राजेश घासकडवी's picture

24 Jul 2010 - 3:28 am | राजेश घासकडवी

हा प्रश्न तुम्ही विठ्ठलाबद्दल विचारता आहात की विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल? एकदा विठ्ठलाची मूर्ती झाली, की बाजार आलाच. मंदीर आणि त्याच्या वाऱ्या यांनाच महत्त्व आलं की त्या दर्शनाचं तळं राखणारे पाणी चाखणारच. त्याबद्दल तक्रार का?

मनातला विठ्ठल खरा, त्याचं दर्शन हवं तेव्हा फुकटात मिळतं. त्याचा बाजार करायचा की नाही हे जो तो ठरवतो.

या सगळ्यावरून कोलटकरांचा बळवंतबुवा आठवला, पण त्याच्याविषयी लवकरच कधीतरी...

बेभान's picture

24 Jul 2010 - 9:46 pm | बेभान

मी तर सोडलं आहे तिर्थक्षेत्रांना जाणं..च्या आयला एवढं सगळं देवाच्या स्वत:च्या गाभा-यात चालतं.देव कधीचा गेला असेल तिकडून. या तिर्थक्षेत्रापेक्षा कोकणातल्या किंवा निसर्गरम्य, शांत परिसरातील एखाद्या मंदीरात देव भेटेल. पण इथे..अंहं.. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात देवीसमोर १०० किंवा ५०० रूपये टाकुन बघा..भले तुम्ही मनोभावे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ठेवले असतील, पुजारी लगेचच तुम्हाला आख्खा नारळ देवीजवळचे पेढे आणि काय आणि काय देतो.. प्रसाद म्हणुन..तुम्ही तिथे पाहिजे तितक्या वेळ थांबु शकता. दुस-या भक्तांना (१०० ५०० न टाकलेल्या) ते लोक जास्त वेळ थांबू पण देत नाहीत. जरी "आपण आणि देव बस्स..काय करायचाय पुजारी काय करतो? "असा विचार करुन जरी गेलो तरी हे लोक चिरीमिरी धंदे करून /दाखवुन सगळ्या भक्तीभावाची वाट लावतात. सगळं वातावरण भ्रष्ट केलयं यांनी.

मुळात लोकांच्या भावनाच भ्रष्ट झालेल्या आहेत. दगडात देव शोधायचा आणि जिवंत माणसांसोबत मत्सर, द्वेश राग बाळगायचा. हिंदुंनी हिंदुत्वाचे आचरण करणेच सोडले आहे . अगदी पुजा-यांनी ही.

मंदिरात अंतरात तोच नांदत आहे ।
नाना देही, नाना रुपी, तुझा देव आहे. ॥धृ॥

तोच मंगलाची मुर्ती, तोच विठ्ठलाची किर्ती ।
तोच शाम, तोच राम, दत्तधाम आहे ॥१॥

संताचिया किर्तनात, साधकांच्या चिंतनात ।
तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे ॥२॥

तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही ।
तोच ऐल, तोच पैल, आदिअंत आहे ॥ ३ ॥

देव नाही देव्हा-यात हेच खरे.

विनायक प्रभू's picture

24 Jul 2010 - 9:59 pm | विनायक प्रभू

मला स्पेलींग मधे मिश्टेक वाट्टे. भ ने सुरु व्हाय्ला पाय्जेल.

छोटा डॉन's picture

24 Jul 2010 - 10:07 pm | छोटा डॉन

>>मला स्पेलींग मधे मिश्टेक वाट्टे. भ ने सुरु व्हाय्ला पाय्जेल.
नाय काका, असे अजिबात नाही.
उगाच काही कुजक्या दाण्यांसाठी आख्ख्या बडवे समाजाला बदनाम नका करु, निदान तुम्हीतरी असे नका म्हणु.

आजही कित्येक चांगले, सज्जन आणि खरोखर प्रामाणिक बडवे आहेत. अगदी माझ्या पाहण्यात आणि ओळखीत आहेत, तुमची जेव्हा इच्छा असेल, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ह्यांची भेट घडवण्याची जबाबदारी माझी. :)
अर्थात काही हरामखोर बडव्यांनाही मी तितकेच ओळखतो.
पण सर्वच बडव्यांना बदनाम नका करु प्लीज ...

( अर्थात आमचे प्रभुकाका आहेत म्हणुन हे एवढ्या सभ्य शब्दात, बाकी असो )

------
(पोहचलेला) छोटा डॉन

Nile's picture

25 Jul 2010 - 12:11 am | Nile

डान्याशी +१ म्हंतो. आजपर्यंत सर्वात प्रामाणिक बडवा(विचारा पुन्हा स्पेलिंग मिष्टेक आहे का ते) म्हणजे डान्याच. या उप्पर काय बोलणे??

-Nile

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jul 2010 - 8:40 am | प्रकाश घाटपांडे

विठ्ठल तो आला आला! हे पुलंची एकांकिका / नाटक होते. प्रत्यक्ष विठ्ठल बोलू लागला आहे अशी कल्पना झकास मांडली आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

कवितानागेश's picture

26 Jul 2010 - 8:50 am | कवितानागेश

ईथे महाराष्ट्रात देव दिसतो तरी निदान,..
दक्षिणेत सगळे देव अन्धारात!
कुठेही मिण्मिण्तादेखिल दिवा नाही.
आणी बाहेरच्या मूर्तीना भयानक 'रॉ' रंग - जर्द हिरवे, निळे, लाल, गुलाबी. वगरै लवून विचित्र केलेल्या...
कळतच नाही, देव पाह्तोय, शिल्पकला पाह्तोय कि विदूषक?
मी रामेश्वर, मीनाक्षी, कामाक्षी, कन्याकुमारी, रंगनाथस्वामी... यांचे सगळ्यांचे मिट्ट अम्धारात 'दर्शन' घेतलय...
..ईथे चाललेले प्रकार वाईट आहे हे खरे,
पण मी कधी कुठल्या वारकर्‍याला त्याबद्दल तक्रार करताना ऐकले नही, त्यंची श्रद्धा इतकी पक्की असते की एकदा पंढरपुरात पोचले की कळसाचे दर्शन झाले तरी त्याला आनंद होतो!
...एरवी गेले की दर्शन होते, हे मत्र खरे...