डंकर्क
ब्रिट्नच ७५ % सैन्य फ़्रेंच हद्दीत अड्कून पडलय आणि जर हिटलरची ब्रिटन्वर हल्ला करण्याची योजना सफ़ल झालीच तर लढायला सैन्यच नाही अशी अत्यंत आणीबाणीची परिस्तिथी पंतप्रधान्पद हाती घेतल्यावर पहिल्या आठवड्यांतच चर्चिल समोर आ वासून उभी ठाकली.जर जर्मनीनं फ़्रान्सची बंदरं ताब्यात घेतली तर समुद्रकिनायावरून सैन्याची सुटका करायच्या आपत्कालीन योजनेवर इकडे लंडन मध्ये १४ तारखेपासूनच पर्यायी उपाययोजनांवर तर्क वितर्क चालू झाले, व्हाइस एड्मिरल रामसेंच्या नेतृत्वाखाली ह्या योजनेला आकार द्यायला चालू झाला, अर्थातच वेळ खूप कमी. समुद्रकिनार्यावरून सैन्याची सुटका करायची हा एकमेव मार्ग पण समुद्रकिनार्याजवळ उथळ पाण्यात युद्धनौका नेणं तेही वरून बॉम्बफेक होत असताना पराकोटीच अशक्य होत. जनतेला सगळ्या वैयक्तिक मालकीच्या नावांची ची माहिती सरकारजमा करायच आवाहन केलं गेलं.
याचदरम्यान जनरल गोर्ट ( फ्रेंच हद्दीतल्या ब्रिटीश फौजेचे कमांडर ) ना फ़्रेंचांनी मोर्चा दक्षिणेकडे वळविण्याची विनंती केली पण ह्यात पूर्ण मित्रसैन्य जर्मन फ़ौजांनी वेढलं जाउन घात होण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून जनरल गोर्टनी आपल्या सैन्याला २३ मे ला डंकर्क कडे मोर्चा वळ्वायची आज्ञा दिली आणि चर्चिल कडे तत्काळ मदतीची मागणी केली, चर्चिलचा माघार घ्यायला जोरदार विरोध होता पण जनरल गोर्ट् वास्तवाची जाणीव करून देउन निर्णयावर ठाम राहिला ...
पण हा परतीचा प्रवास अत्यंत अवघड होउन बसला, ब्रिटीश वायुदळ जर्मन सैन्याला कूच करायला अवघड जावं म्हणून पूल, रेल्वेलाइन उडवत होते पण आता त्यामुळं मित्रसैनिकांचा मागं येण्याचा मार्ग अजूनच खडतर झाला.
जर्मन वायुदळाची मात्र प्रचंड बॉम्बफेक चालू होती, आणि डंकर्क कडे जाण्याचा मार्ग तासागणिक दुष्कर होत चालला. पण २४ मे ला हिटलरनी नाझींच्या घोडदौडीला लगाम घातला आणि थांबायला सांगितलं( हा एक कलाटणी देणारा क्षण आणि वादाचा मुद्दा ).
या सगळ्या भानगडीत ब्रिटीश संसदेत आपण हिटलरशी बोलणी करून हे सगळ मिटवून घेउ असा सूरही दिसायला लागला, पण चर्चिलन व्हाइस ऎड्मिरल रामसे ना त्यांची योजना कार्यरत करायची प्रवानगी दिली, पुढच्या ३ दिवसांत जनतेच्या मालकीच्या (हौशी, लाइफ बोट्स, मासेमारीच्या नावा ) नावा ताब्यात घेउन त्यावरील अनावश्यक असं सगळं सामान काढून घेतल गेलं ( तितके जास्त सैनिक वाचतील म्हणून), योजना ४५००० सैनिकांची सुट्का समुद्रकिनायावरून छोट्या नावांतून खोल पाण्यात असणाया युद्धनौकेपर्य़ंत करणे अशी; अगदी टॅक्सी सर्व्हिस सारखी. शेकडो नावांची चाचणी घेण्यात आली आणि सुयोग्य अशा ( मच्च्छिमार बोटी, हौशी बोटी इ.) बोटी तयार करण्यात आल्या. पण सैन्यदलानं सामान्य नागरिकांना युद्धभूमीवर कायदेशिर रित्या घेउन जाता येत नाही म्हणून जागच्या जागी बोट्मालकांना नौदलात नोकरी दिली गेली. आंणि २६ मे ला, पंतप्रधानपद हाती घेतल्याच्या १६ व्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला ऑपरेशन डायनॅमोचा 'आर या पार' असा चर्चिलनं श्रीगणेशा केला, नौदलाच्या नेतृत्वाखाली या छोट्या नावा सैन्याला वाचवायला रवाना झाल्या..
२ दिवसांत ४५००० जवानांची सुटका असं टार्गेट ठरलं गेल पण खाडीच्या पलीकडे साडेतीन लाखांनी अगोदरच मोर्चा डंकर्क कडे वळवला होता.सैनिकांकडं नकाशे नाहित, काही तुकड्या चुकून उलट्या दिशेकडे निघाल्या..प्रचंड गोंधळाच वातावरण पसरलं. सैनिकांजवळ्ची शस्रास्र्त जागे अभावी आणि जर्मनांच्या कामी येउ नयेत म्हणून परतीपूर्वी निकामी करण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान जर्मनांनी सगळा बेत ओळ्खला आणि धुवांधार बॉम्ब्फ़ेक चालू झाली..प्रथमदर्शनी ठरवलेला मार्ग ( शॉर्ट्कट )बदलण्यात आला आणि लांबच्या मार्गान मोहिम रवाना करण्यात आली..
अन्नपाण्याविना २-३ दिवस चालून, वरून जर्मन विमानं बॉम्बिंग करतायत अशा अवस्थेत सैनिक या छोट्या बोटींची रांगेत वाट डोळ्यांत जीव आणून पहातायत, अशा वेळी शिस्त पाळली जावी म्हणून रांग मोडणार्याला जागीच गोळ्या मारण्याचे आदेश दिले गेले...
जर्मन फौजा घडोघडी पुढं सरकत होत्या, अशात अडीच लाखांवर ब्रिटीश सैनिक्म्ची सुटका झाली. यात बर्याच छोट्या नावा,वाट पहाणारे सैनिक जर्मन बाँम्ब ना बळी पडले..व्हाइअस अॅडमिरल रामसेच्या अंदाजानुसार ४ दिवसानंतर छोट्या नावा पाठवण अत्यंत अवघड होत पण फ़्रेंच सैनिकांसाठी आजून १ दिवस मोहिम चालवली आणि एकून जवळ जवळ साडेतीन लाख सैनिक सोडवले गेले. ४ जून ला पहाटे मोहिम संपली आणि सकाळी ९ ला जर्मनांनी डंकर्क ताब्यात घेतलं.
या सगळ्यात जवळजवळ ६५००० सैनिक मारले गेले, बरेच युद्धकैदी झाले, पण जे साडेतीन लाख सुटले त्यांच्या सुटकेत या छोट्या नावांचा सिंहाचा वाटा होता. बर्याच नावांनी आणि नाव चालक धारातीर्थी पडले. या सुटकेशिवाय ब्रिटनची ७५% आर्मीच सफाचट झाली होती.
सामान्य नागरिकांनी देशाच्या हाकेला ओ देउन केलेली खरी हिरोगेरी, परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेला आजही म्हणूनच डंकर्क स्पिरीट म्हणतात.
* सगळ्यांच्या माहितीचा इतिहास आहे पण माझी 'वन ऑफ द फेवरेट' आहे ही घटना म्हणून लिहितेय..
* संदर्भः डॉक्युमेंट्री : 'बॅटल ऑफ ब्रिटन', 'लिटील शिप्स'
चित्र : आंतरजालावरून साभार,
In reply to छान लेख. by सहज
In reply to रहस्य....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to छानच आहे by अप्पा जोगळेकर
In reply to "कणव...." by इन्द्र्राज पवार
In reply to उत्तम लेख! by मन
In reply to उत्तम लेख! by मन
In reply to उत्तम लेख! by मन
In reply to मन by Pain
In reply to उत्तम! by विकास
In reply to लेख आवडला..... by वेताळ
In reply to पेना...स्वातंत्र्य मिळाले पण तुकड्या तुकड्याने.... by वेताळ
In reply to पेना...स्वातंत्र्य मिळाले पण तुकड्या तुकड्याने.... by वेताळ
In reply to चतुरंग, डॉ. दाढे by Pain
पहिल्या महायुद्धातील हानी भरून काढून कोणतीही वसाहत नसताना स्वतःच्या जीवावर इतका पराक्रम गाजवला.जर्मनीच्या प्रगतीबाबत शाळेच्या इतिहासाचे सर म्हणाले होते की 'दुसरं महायुद्ध केवळ जर्मनी करत होती...दोस्त राष्ट्रे अजुन पहिलंच महायुद्ध केल्यागत करत होती' जय हिंद जय ब्राझील
In reply to चतुरंग, डॉ. दाढे by Pain
In reply to ज्यू ~~ जर्मनी आणि ब्रिटन...!! by इन्द्र्राज पवार
त्याच्या काळापासुनच्या जवळजवळ ब्रिटिश लेखकांनी आपल्या लिखाणातील "ज्यू" हे पात्र "काळे"च रंगविले आहे.फार कशाला, आपल्याकडे मारवाडी-बनिया-शेठची जनमानसातली सर्वसाधारण प्रतिमा याहून वेगळी नेमकी काय आहे? घाऊक पातळीवर "दुसर्या"चा द्वेष करण्याची माणसाची वृत्ती तशी जागतिक असावी. (हे योग्य अर्थातच नाही, पण हे होते.) पण हिटलरने तिचा राष्ट्रीय धोरणाचा पाया म्हणून अवलंब केला आणि त्यावरून कृती घडवून आणली, घाऊक नरसंहार घडवून आणला. फरक तेथे आहे. जलियांवाला बाग हत्याकांडाचे हे अर्थातच समर्थन नाही. (बाकी 'काळी प्रतिमा', 'त्या दुसर्या' समाजाबद्दलची हीनत्वभावना किंवा तिरस्कार वगैरेंबद्दल बोलायचे झाले तर या भावना उभयपक्षी होत्या, असे तत्कालीन किंवा त्याच्या थोड्या आधीच्या काळातल्या युरोपीय ज्यू लेखकांचे साहित्य थोडेसे जरी वाचले असेल तरी लक्षात यावे. शोलोम अलैखेम या झारशाही रशियातील ज्यू लेखकाने आपल्या विविध लेखनातून केलेले रशियातील ज्यूंच्या जीवनाचे आणि वृत्तीचे वर्णन या दृष्टीने उद्बोधक ठरावे. किमानपक्षी, ते एके काळी वाचून माझी तरी तशी धारणा झाली होती. हिटलरपूर्व युरोपात ज्यूंना मिळालेल्या वागणुकीचे, त्यांच्यावर वेगळ्या वस्तीत राहण्याकरिता झालेल्या जबरदस्तीचे, हीनत्वाच्या वागणुकीचे आणि एकंदरीतच छळाचे समर्थन करण्याचा हेतू अर्थातच नाही. हिटलरच्या कृतींचेही हे समर्थन नाही. या सगळ्याचे समर्थन होऊच शकत नाही. केवळ "आम्ही-श्रेष्ठ-ते-तुच्छ", "आमचे-नाक-वर" अशा प्रकारच्या भावना उभयपक्षी होत्या, मग ते ज्यू असोत किंवा जेन्टाइल, एवढेच मांडायचे आहे. दोन विभिन्न समाज एका जागी आले, की त्यांच्यात हेवेदावे, उच्चनीचत्वाच्या भावना, प्रसंगी अगदी टोकाचा द्वेषसुद्धा, हे सर्व होणे हे नैसर्गिक असावे. अर्थात हे सर्व झालेच पाहिजे असे नाही, पण झाल्यास नवल नसावे. आणि अनेकदा होतेही. अशा वेळी परस्परसामंजस्यासाठी प्रयत्न करणे हे दोन्ही समाजांच्या हिताचे हे खरेच, पण हे दर वेळेस तातडीने होऊ शकतेच किंवा होतेच, असे नाही. ही स्थिती आदर्श जरी नसली, तरी जोपर्यंत परिस्थिती याहून अधिक चिघळत नाही, तोपर्यंत दोन्ही समाज त्या ठिकाणी सुखाने नाही तरी किमानपक्षी आपापले अस्तित्व टिकवून राहू शकतात. अशा परिस्थितीत अशा द्वेषभावना योग्य प्रकारे हाताळून त्यांचा मर्यादेबाहेर उद्रेक होऊ न देणे एवढे किमान करता येते, आणि जोपर्यंत ते होत असते तोपर्यंत पुढेमागे कधी परिस्थिती सुधारल्यास सामंजस्यासाठी प्रयत्न होण्याची आशाही बाळगता येते. प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा एक समाज दुसर्याचे (किंवा दोन्ही समाज एकमेकांचे) अस्तित्व पद्धतशीरपणे नष्ट करण्याचे प्रयत्न राबवू लागतो (किंवा लागतात). आणि त्यापेक्षाही वाईट म्हणजे अशा प्रयत्नांना जेव्हा प्रतिष्ठा किंवा सरकारमान्यता मिळते तेव्हा, किंवा खुद्द सरकार आपल्या अधिपत्याखालील एखाद्या समाजाचा नायनाट करू लागते तेव्हा. परंतु जोपर्यंत असे टोकाचे काही होत नाही, तोपर्यंत केवळ द्वेषभावना असणे हे आम असावे. योग्य जरी नसले, तरी विशेषही नसावे. अतिअवांतर आणि डिस्क्लेमर: शोलोम अलैखेमच्या 'तेव्या द डेअरीमन' या कथेवर 'फिडलर ऑन द रूफ' हा प्रसिद्ध चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट मी पाहिलेला नाही. मात्र ही कथा असलेला एक कथासंग्रह फारा वर्षांपूर्वी वाचलेला आहे. तपशील आता फारसे आठवत नाहीत, आणि तो कथासंग्रह आता माझ्या संग्रहीही नाही. केवळ वीसबावीस वर्षांपूर्वी जे काही वाचले होते त्यावरून ज्या धारणा झालेल्या आठवतात, त्याच्या आधारावर हे सर्व लिहिले आहे. चुका असू शकतात. अभ्यासाचा कोणताही दावा नाही. इतरांची मते याहून पूर्णपणे भिन्न असू शकतात. असोत. ही सर्व माझी मते आहेत. (फॉर व्हॉटेवर दे आर वर्थ.) मांडावीशी वाटली, मांडली. या विषयावर याहून अधिक चर्चा माझ्याशी करून काही पदरी पडणे नाही, आणि यावर याहून अधिक चर्चा माझ्याकडून होणेही नाही. धन्यवाद.) - पंडित गागाभट्ट.
In reply to अवांतरः द मर्चंट ऑफ व्हेनिस, काळी प्रतिमा वगैरे... by पंगा
In reply to ज्यू ~~ जर्मनी आणि ब्रिटन...!! by इन्द्र्राज पवार
In reply to शिवाय by II विकास II
In reply to जगातले by अप्पा जोगळेकर
In reply to ब्रिटिशां by डॉ.प्रसाद दाढे
In reply to + १ डॉ.साहेब माझ्या मनातले बोललात! by चतुरंग
In reply to चतुरंग by Pain
In reply to चितपट नव्हे, शह by धनंजय
In reply to ब्रिटिशां by डॉ.प्रसाद दाढे
In reply to डॉ. दाढे by Pain
In reply to उणीपुरी नाहीत तर जगाच्या इतिहासातली सर्वात भीषण ८ वर्षे! by डॉ.प्रसाद दाढे
In reply to डॉ. दाढे by Pain
In reply to तुलना? by मैत्र
In reply to मैत्र by Pain
In reply to Pain by मैत्र
In reply to Pain by मैत्र
In reply to डॉ. दाढे by Pain
In reply to तुम्ही जर्मनांचे पक्षपाती आहात काय? by डॉ.प्रसाद दाढे
In reply to डॉ. दाढे by Pain
In reply to मी by पुष्करिणी
In reply to पुष्करिणी by Pain
In reply to मी by पुष्करिणी
In reply to उणीपुरी नाहीत तर जगाच्या इतिहासातली सर्वात भीषण ८ वर्षे! by डॉ.प्रसाद दाढे
In reply to डॉ. by पुष्करिणी
In reply to सहमत by विकास
In reply to >>हे मी by II विकास II
In reply to डॉ. by पुष्करिणी
In reply to वाचलेल्या by पुष्करिणी
In reply to उत्तम ले़ख by दिपक
तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल.आंद्रे वायदा या विख्यात पोलिश दिग्दर्शकाचा यावर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, तो जरूर पाहावा. पोलंडच्या अभिज्ञ वर्गाची एक सबंध पिढी यात मारली गेली. हत्याकांड जिथे घडले तिथे श्रध्दांजली वाहायला जाणारे पोलंडचे राष्ट्रप्रमुख, सेनाप्रमुख, राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष वगैरे नुकतेच विमान अपघातात मरण पावले, हा आणखी एक विलक्षण हृदयद्रावक योगायोग! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to उत्तम ले़ख by दिपक
In reply to चर्चिल आणि हिटलर....!! by इन्द्र्राज पवार
असे जर होते तर चर्चिलच काय अग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता?हिटलर काय्/चर्चिल काय दुसर्या देशांवर आपला हक्क आहे असे म्हणणारे साम्राज्यवादी होते.ब्रिटिशांनी भारताला लुटले हे खरे पण त्यांच्या साम्राज्यवादी धोरणांत माणसांना सरळ ठार मारणे,माणसे नाहिशी करणे,concentration camp वगैरे प्रकार नव्हते.थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता. क्रांतिकारक असोत वा टिळक्,गांधी ,बोस असोत, त्यांच्यावर खटले ब्रिटिश सरकारने रीतसरच त्यांच्या कायद्यानुसार भरले(त्यांना खटला लढण्याचे स्वातंत्र्यही दिले) आणि मगच निकाल दिला्. हिटलर/जर्मनीने भारतावर राज्य केले असते तर खरोखर असे झाले असते का हा प्रश्न निश्चित उभा राहतो. P = NP
In reply to बहुदा by चिरोटा
- गांधी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांना गोळ्या घाला, असा सल्ला हिटलरने ब्रिटिशांना दिला होता.
- 'आम्ही जर भारताचे राज्यकर्ते बनलो, तर लवकरच भारतीयांना आधीचे ब्रिटिश राज्य बरे वाटू लागेल', अशी धमकीही हिटलरने दिली होती.
In reply to मिपा क्लासिक -७ by मारवा
उत्तम !