मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरवा साज

जयवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रिमझिम बरसतो सखा साजण पाऊस साज घेऊन हिरवा, येतो साजण पाऊस तिची प्रतिक्षा ओलेती अन सखा ही आतूर पानापानात शहारा, कणाकणात अंकूर हिरवाईचे डोहाळे तिचे पुरवतो सखा खुळावते राणी कशी साज लेऊन अनोखा मिरविते नवा शालू भरजरी तो हिरवा प्रेमसरीत भिजूनी चढे रंग गाली नवा मेघ दाटती नभात तिचे बघण्या कौतुक हलकेच उतरती, घेती चुंबन नाजुक तीट लावियतो गाली, वारा हळूच वाकून शेला फुलांचा रंगीत, धरा घेते पांघरुन जयश्री अंबासकर

वाचने 3353 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रभो 25/11/2009 - 21:41
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

jaypal 25/11/2009 - 21:58
धरेचा श्रुंगार ही आवडला. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भानस 26/11/2009 - 10:40
जयश्री कविता आवडली गं.... आणि स्फुर्तीकारणही......:)

जयवी 26/11/2009 - 20:27
मनापासून धन्यवाद लोक्स :) माझी कविता इतक्या माज, डास,खाजांना कारणीभूत ठरली ह्याचा विशेष आनंद वाटतोय ;)