मी इकडून आलो
ती तिकडून आली
मी बघताच थांबलो
पण ती निघून गेली
सुस्कारा सोडत वर बघितले
हळूच इकडेतिकडे बघितले
दुसरी मटकत येतच होती
ती पण न बघताच निघून गेली
कैक आल्या वाटेवरती
अशाच गेल्या वाटेवरुनी
अजून एक दुरुन येत होती
चालता चालता लाजत होती
काय होतंय ते काहीच कळेना
उगाच छाती धडधडत होती
गजरा सुंदर माळलेला
चेहरा कोमल उजळलेला
लटके झटके बघुनी सारे
भाव मनातील पिसाळलेला
जवळ येऊनि मला म्हणाली
काका, घड्याळात वाजले किती ?
गेली दीडफूट आत खोल गेली
ताणलेली छाती पार गळून गेली
उगाच वणवा भडकलेला
गजरेवालीने त्यात टाकली माती
कितीतरी गेल्या वाटेवरून देवा
एकतरी माझ्यासाठी मिळायला हवी होती
सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस
वाचने
6539
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
धन्यवाद टका साहेब . हि सरांची
सखू
In reply to धन्यवाद टका साहेब . हि सरांची by खिलजि
उघडत नाही आहे साहेब हि लिंक .
याचे उत्तर काय दिलेत ?
हीच का ती गजरेवाली ?