ये रे ये रे पावसा
लेखनविषय:
काव्यरस
मोरांपासून बेडकांपर्यंत सारे आकाशाकडे डोळे लावून बसलेयत
तुझ्या वर्षावात चिंब व्हायला
अभिजात कवींपासून र ट फ शब्दजुळार्यांपर्यंत सगळे टपलेयत तुझी रिमझिम अन् आपापल्या उबळी
शब्दात कोंबायला
बकाल महानगरातली पाताळधुंडी माणूसगिळी मॅनहोलं कचरतायत
तुझ्या ढगफुटीत तुंबायला.
यंदा तरी भरभरून येशील?
बघ, तुझ्या आशेवर तर पार भेगाळलेला शेतकरी तयार आहे पुढच्या दुष्काळापर्यंत
आत्महत्या लांबवायला.
वाचने
4414
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा..!
In reply to पहिल्या पावसाच्या शुभेच्छा..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा वा!
In reply to पहिल्या पावसाच्या शुभेच्छा..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त.. आवडली कविता आणि बिरुटे सरांचा चॅलेंजही
In reply to पहिल्या पावसाच्या शुभेच्छा..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'भाव अत्तराचे आज पार कोसळले'
"ये रे ये रे *सा" असे एक लैच
सर इथे न मागता मुभा घेतोय ,
रोजचा
पाऊसगाणी व प्रतिसाद
येरे येरे पावसा
In reply to येरे येरे पावसा by अविनाशकुलकर्णी
डीझल
येरे येरे पावसा
नवविवाहित पत्नीने स्नान