तिथे ओठंगून उभी...
लेखनविषय:
काव्यरस
रानपाखरांची घरे अंगीखांदी जे माळते
असे झाड फुलताना पान पान किल्बिलते
क्षितीजाशी विझताना चांदणे जे उसासते
त्याचे पहाटे पहाटे जीवघेणे गीत होते
रानावनातून नदी जेव्हा खळाळत जाते
ऐलपैलतीरी तिचे पाण-पैंजण वाजते
फुफाटल्या मातीवर मृग शिंपण घालते
तेव्हा अत्तराची कुपी आसमंती ओसंडते
नाद-शब्द-ताल-गंध जिथे काळजा भिडते
तिथे ओठंगून उभी..
...एक कविता असते
वाचने
2466
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
विशेष काही टाळक्यात शिरले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanatiक्या बात है!
प्रतिसाद देणार्या
ओठंगून
ओठंगणे=
सुंदर !