मस्त हा मधुमास आहे!
काय हाही भास आहे ?
पँन अन आधार जोडा
काय कटकट त्रास आहे
छान! सुंदर! लोक म्हणती
मत तुझे मज खास आहे
धीर थोडा धर जरा तू
अंत आरंभास आहे
लालसा, अविचार, फितुरी
आपुला इतिहास आहे
चांगली असतेच कविता
पण गझल फर्मास आहे
एकदा मिळतो म्हणे, पण
जन्म मनुचा त्रास आहे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3870
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळाच आभास आहे.
पण कविता त्यांची खास आहे
In reply to सगळाच आभास आहे. by एस
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडूसरकारी कृपा सारी म्हणून हा