(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !
#मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा
धागा वर्गीकरण : #मीचीलाल
(संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे )
-------------
"हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे"
" च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला . मी म्हणलो , " थांब रे जरा , बघु तरी ह्यांचे मडके किती पक्के आहे ते "
मित्र हसत हसत म्हणाला - " तुला ना साल्या नुसती बोटं घालायची हौस आहे"
" ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . आमचे गुरुदेवच म्हणालेत - बेबी माय व्होल वर्क इज टु कन्फ्युज यु . ख्यॅ ख्यॅ ख्यॅ "
-------------
" हे पुस्तक तुमच्यासाठी "
गोर्याटंच युवतीने नेहमीचेच टिपिकल कृत्रीम स्मितहास्य करत माझ्या हातात " भगवद्गीता अॅज इट इज" पुस्तक चिकटवले !
" थॅन्क्यु " इतकेच म्हणुन तिच्या कृत्रिमहास्याकडे आणि इतर सुंदर गोष्टींकडे जमेल तितके दुर्लक्ष करत मी चालायला लागलो .
" तुम्ही फक्त ५ डॉलर डोनेशन द्या "
" मी तुम्हाला शष्प एक पेनी सुध्दा डोनेशन देणार नाही " इति अस्मादिक ! टोन : स्वराज्य माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि मी टरफलं उचलणार नाही.
" का बरे ?"
" मी ही पुस्तक वाचलं आहे , आणि भगवद्गीतेचे ह्याच्या इतके चुकीचे इन्टर्प्रिटेशन दुसरे कोणतेही नाही असे माझे स्पष्ट मत आहे"
" व्हॉट ?"
" तसेही तुम्ही म्हणाला ना की पुस्त्क तुमच्यासाठी मग डोनेशन कसलं मागताय ? मी तुम्हाला शुन्य डॉलर डोनेशन देतो. हे घ्या"
" नो नो तुम्हाला पाच डॉलर डोनेशन द्यावे लागेल "
" सांग माझ्या **** ला"
" जस्ट ५ डॉलर्स"
" एकतर तुम्ही डोनेशन म्हणु नका , स्पष्ट किंमत म्हणा ना , खोटारडेपणा कशाला करताय"
ही सारी चर्चा ऐकुन एक काळाशुभ्र साऊदिंडीयन असा माणुस तेच खोटारडे स्मित हास्य घेवुन बोलायला आला ! आता अॅव्हरेज जरा आपल्या कलर चे झाले ! दुत्त दुत्त !
" हॅरे क्रिश्ना ! बोला सर काय काय म्हणाताय ? "
" ॐ नमो नारायणाय "
" अं ?" आव्हरेजिंग वर्स हाल्फ धक्का बसल्यासारखा अविर्भाव !
" जर तुम्ही डोनेशन म्हणयताय तर सक्ती कसली करताय ? मी देईन तितके डोनेशन घ्या ना , शुन्य डॉलर ! नाही तर सरळ स्पष्ट बोला की किंमत आहे म्हणुन "
" नाही नाही सर ते डोनेशनच आहे , पण तुम्ही द्यावे असा आमचा आग्रह आहे , आपण कुठेही पैसे ऊडवतोच कि नै " सिगारेट पिण्याचा निर्देश करत !
ते पाहुन डोकेच सटकले - भेंचो साला इथे गेल्या ३ महिन्यात सिगारेट पिली नाहीये अन हा कोण शहाणा लागुन गेला मला संस्कार शिकवणारा ?
" तुम्ही बिजिनेस मांडलाय माझ्या धर्माचा . इतके चुकीचे आणि मिसलिडींग इंटर्प्रिटेशन मी आजवर वाचले नाहीये भगवद्गीतेचे"
आता समोरच्याचा काळ्याचा सात्विकतेचा क्वोटा संपुन तामसिक क्वोटा बाहेर येवु लागला होता . गोरीटंच अजुनही अवाक ! " तुम्ही कोणताही श्लोक सांगा मला संपुर्ण पाठ आहे "
अस्मादिक - " बाबा रे मी तुझ्या पाठांतराची परिक्षा घ्यायला नाही आलो , अर्थ कळलाय की नाही ह्याची परिक्षा घेतोय , आता सांग नायं आत्मा बलहीनेन लभ्यः ह्या उपनिषदातील श्लोकाचा अर्थ काय ?" गोरी टंच अवाक +२!
" बलहीन माणसाला आत्मतत्वाचे आकलन होणार नाही "
" तुमच्या श्रीकृष्ण ह्या पुस्तकात तुमच्या महामहीमांनी ह्याचा अर्थ बलरामाच्या कृपेशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही असा काहीच्या बाही रिडिक्युलस अर्थ काढलाय , आता बोला"
" नाही नाही त्यांचेच बरोबर आहे , तुम्ही पुस्तक घेणार आहे की नाही ते बोला "
" तु ते डोनेशन हा शब्द हटव अन स्पष्ट किंमत म्हण मग बोलु . बिजनेस करतोय तर बिजनेस म्हणावे , उगाच धर्माचा अविर्भाव कशाला ?"
गोरी टंच अवाक +३ अंगावर पाल झटकल्यासारखे "ह्यांना माझ्या पेक्षा जास्त माहीत आहे , हे सांगतील"
" हो आमचा बिजनेसच आहे "
" हां आता कसं स्पष्ट बोललास , ऐक गं टवळे , हा केवळ बिजनेस आहे , ह्यांना आमच्या सनातन वैदिक हिंदु धर्माशी काही घेणे देणे नाही , अब्राहमिक धर्मातल्या जमतील तितक्या वाईट प्रथा सनातन धर्मात घुसडुन तुम्हा लोकांना रुचेल असे बिजनेस मॉडेल उभे केले आहे ह्यांनी . बाकी काही नाही"
आता मात्र टवळी बावरली अन काळ्याकडे बघायला लागली .
" हो आमचा बिजनेसच आहे - तुमच्या आत्म्याला वाचवण्याच्या . पुढच्या जन्मात तुम्हाला कुत्रा व्ह्यायचंय की मांजर ? " आता सात्विकतेचा रंग जवळपास संपत आलेला ! लगेच आम्ही आमचा लाल डबा बाहेर काढला !
" मला फरक पडत नाही , मी पुढच्या जन्माचा विचारच करत नाही . कार्पे डियाम ! मार्कस ऑरेलियस काय म्हणाला - असे जगा की जणु आजचा दिवस शेवटचा आहे! "
" मग भोगा आपल्या कर्माची फळं "
" कसली आलीत कर्माची फळं ? मी कर्मफळाची चिंता न करता कर्म करतो: योगस्थ: कुरु कर्माणि संग त्यक्तवा धनंजय। सिद्धयसिद्धयो: समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।
आता अवाक व्ह्यायची वेळ वेळ काळ्यावर ! क्रोधातिरेकाने काही सुचेनाशी अवस्था !
गोर्या टंच पोरीने अलगद माझ्या हातातुन पुस्तक काढुन घेतले अन हातात एक चॉकलेट ठेवले
" धिस इज प्रसॅद फॉर यु "
" हा हा हा , मला कसला प्रसाद देतेस टवळे , मीच प्रसाद आहे ,
प्रसादे सर्व दुखानाम हानिरस्योपजायते । प्रसन्न चेतसो ह्यायुर्बुद्धि: पर्यवतिष्ठते
आता मात्र काळ्याच्या राग अनावर व्हायला लागलेला . खाऊ का गिळु असे अविर्भाव ! म्हणले अजुन जरा डिवचावे -
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ||
ह्याचा अर्थ सांगु का रे ह्या लोकांना ? बघु मग किती लोकं येताहेत तुझा बिजनेस करायला !!
आता मात्र काळ्या बिथरलाच. काहीही न बोलता फक्त " म्यॅव म्यॅव म्यॅव म्यॅव " असे करत तो दुर निघुन गेला ! मी आणि मित्र हसत राहिलो !
---------------
" यु नो व्हॉट , वी कॅन कॅचप ओव्हर अ ड्रिंक सम टाईम . आपण कधी तरी भेटुन वाईन पिवुयात का ? मी तुला कृष्ण राधेशी कशी रासक्रीडा करायचा ते समजाऊन सांगेन अगदी जयदेवाने सांगितले आहे ना गीतगोविंद मध्ये तसे -
प्रथम समागम लज्जितया, पटुचाटुशतै: अनुकूलम् |
मृदुमधुरस्मितभाषितया शिथिलीकृत जघन दुकूलम् ||
टवळीला डावा डोळा मिचकाऊन म्हणालो . अर्थात तिला शष्प काही कळले नसणार हे माहीत होते पण आपल्याला आपला लाल रंगाचा डबा संपवल्याचा आनंद !
टवळीने दिलेले चॉकलेट जाता जाता डस्टबीन मध्ये टाकले अन वाचवलेले ५ डॉलर मस्त वाईनहेन्स्टिफनर पिण्यात सत्कारणी लावले !
इत्यलम !
तळटीप :
१) लाल रंगाचा डबा संपला .
२) काही संवाद काल्पनिक.
३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!
४) उत्तरदायित्वास नका रं लागुIn reply to अरे चांगले प्रिंटिंग अस्ते by अभ्या..
In reply to अरे चांगले प्रिंटिंग अस्ते by अभ्या..
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतातत्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.
In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस
In reply to द्या द्या, तुम्हीच वाचायला by अभ्या..
In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस
In reply to दारु पिणारे पुढच्या जन्मी by प्रचेतस
खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =))))
इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373)
ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः।
अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374)
साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च।
भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः।
कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375)
मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप।
चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन
किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>>
उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो :
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४||
उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ |
स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५||
अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये |
अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७||
- कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर !
सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))In reply to त्या पेक्षा हे चालेल का ? by प्रसाद गोडबोले
In reply to त्या पेक्षा हे चालेल का ? by प्रसाद गोडबोले
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .
In reply to एक शंका by माहितगार
In reply to हां by प्रसाद गोडबोले
In reply to या दुव्यावर दिलेल्या हिंदी by माहितगार
In reply to एक दुवा by माहितगार
In reply to या दुव्यावर दिलेल्या हिंदी by माहितगार
In reply to हां by प्रसाद गोडबोले
In reply to इंग्रजी अनुवादात nor the by माहितगार
In reply to हां by प्रसाद गोडबोले
In reply to एक शंका by माहितगार
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.
In reply to ..नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस
In reply to अजून जराशी चिकित्सा by माहितगार
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेतमूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.
In reply to यमौ शब्द नकुल सहदेव याच by प्रचेतस
In reply to यन्तव्य चा http:/ by माहितगार
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.
In reply to नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस
In reply to नैवाभिमन्युर्न यमौ तं by प्रचेतस
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))
In reply to व्यास आणि गणपती संवाद :)) by माहितगार
In reply to काय ठरलं मग शेवटी? कोण होते by गणामास्तर
In reply to दुत्त दुत्त....! by प्रचेतस
In reply to दुत्त दुत्त....! by प्रचेतस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]In reply to अवांतर :- by मदनबाण
In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले
In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !आगदी सहमत.
In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]In reply to कितीही गोड बोलुन प्रवचंनं by मदनबाण
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव.
अगदी सहमत.
आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.In reply to जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव by गणामास्तर
In reply to साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष by प्रसाद गोडबोले
In reply to खिल्ली कोणाची उडवावी? by गामा पैलवान
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
:(
In reply to नमस्कार गा पै by प्रसाद गोडबोले
In reply to उत्तम खंडन. विवेचन आवडले. by एस
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्यांविषयी अतीव तिटकारा आहे .मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

In reply to अध्यात्मिक गोष्टींमध्ये by शब्दबम्बाळ
In reply to रेसिझम ? by गामा पैलवान
In reply to अच्छा. .शब्दबम्बाळ हा by गणामास्तर
In reply to आपला काहीतरी गैरसमज झालाय, by शब्दबम्बाळ
In reply to अच्छा. .शब्दबम्बाळ हा by गणामास्तर
In reply to :)) by माहितगार
In reply to वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू by गणामास्तर
In reply to गणा जेवण कर टेन्शन घेऊ नको by अभ्या..
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ by प्रसाद गोडबोले
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वरसनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .
In reply to वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू by गणामास्तर
In reply to रेसिझम ? by गामा पैलवान
In reply to अध्यात्मिक गोष्टींमध्ये by शब्दबम्बाळ
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! by प्रसाद गोडबोले
In reply to @ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे by माहितगार
शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
In reply to शब्द बंबाळच्या by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्ही सध्या हिरव्या देशात by प्रचेतस
In reply to शब्द बंबाळच्या by प्रसाद गोडबोले
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :Pतुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .
In reply to शब्द बंबाळच्या by प्रसाद गोडबोले
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाहीह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...
In reply to खी खी खी (उगाचच!) by शब्दबम्बाळ
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही !
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतोअत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !
In reply to नुकतीच NDTV वर Are Indians by प्रसाद गोडबोले
असल्या धर्माच्या व्यापार्यांना कसेही करुन झोडपुन काढावेसत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे.

In reply to नुकतीच NDTV वर Are Indians by प्रसाद गोडबोले
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असतीम्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D
In reply to हे खरंय का?(फॉरवर्डेड) by उपयोजक
In reply to नेमकं काय खटकलं? by स्वधर्म
...नेमकं काय खटकलं?..माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )
In reply to ...नेमकं काय खटकलं?.. by माहितगार
In reply to बाकी धागा लेखक अाल्यावर by स्वधर्म
In reply to ...नेमकं काय खटकलं?.. by माहितगार
अप्रतिम गुर्ध्येव