राष्ट्रभूल जर कुठे जराशी
शोधून काढा शेजारी
इथे महोदय कारक वृष्टी
विचित्र पुष्कळ अंधारी
गगनी होता उच्च विनवणी
प्रचंड घोडा आवडतो
ग्रीक आणखी रोमन असुनी
खुळा कोंबडा आरवतो
धूर्त महाली रुष्ट होऊनी
राणी मग शेंगा खाते
घडेल कधीही असली घटना
जोगेश्वरिला ती जाते
सतत बावरे नेत्र दुपारी
रिमझिम संध्या राग पहा
नयन लागले दूरदर्शनी
कपात पडतो गोड चहा
बोल्शेव्हिक तो सुमार थोडा
मेन्शेव्हिक मग मवाळ हा ?
मार्क्सही करतो आर्त विनवणी
पटपट शेअर विकाल का
भविष्य सांगा अति-भराभर
राहू केतू पिसाटले
ग्रहणालाही ग्रहणच उत्तर
इंद्र चंद्र त्यां विचारले
आम्हा नसे का अशी अनुज्ञा
खंत दाटते रोजच ही
विचित्र असती आपुले दिसती
माने म्हणती कधीतरी
इति.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2206
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
भरदिनीकाव्य.
तप
In reply to भरदिनीकाव्य. by एस
वा! कविता , प्रतिसाद
In reply to तप by भृशुंडी
मस्त...गदर्भगान वाचता वाचता भुतकाळात हरवलो
आभार भार र
In reply to मस्त...गदर्भगान वाचता वाचता भुतकाळात हरवलो by ज्ञानोबाचे पैजार
@ पैंबुकाका :D:D:D:D
जबर कविता जबर शब्दांवरील हुकुमत !
कविता आवडल्याबद्दल धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो
In reply to जबर कविता जबर शब्दांवरील हुकुमत ! by मारवा