Skip to main content

मुका मार अनवरत झेलुनी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 05/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यतडागी जलपर्णीसम प्रतिभा पसरत असते पाहू न शकतो रवी, सकल ते कवीस दावुनी जाते कवी लेखणी सरसावून मग मांडी ठोकुनी बसतो इथे मोडुनी तिथे जोडुनी कविता पाडुनी जातो पामर रसिकांच्या तोंडावर कविता मग आदळते मुका मार अनवरत झेलुनी इथे तिथे हुळहुळते काव्यदेवते- एक विनंती ऐक जरा रसिकांचे काव्यप्रपाती बुडवू नको गे आवर कढ प्रतिभेचे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2062
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान.:)

धन्यवाद! बघतो, काव्यदेवतेस केलेली विनंती ती मनावर घेते की नाही ते!

मिपावरच्या कोणा कवीस उद्देशून ही कविता केलीत की काय. बाकी कविता मस्त जमलीय