मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रानभेदी..!!

विशुमित · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रानभेदी वाहतो वारा सांजवेळी सुन्न उंबरा..!! परसात आली गाई वासरू फोडते हंबराई कुशीत घेते त्याला कुशीत घेते त्याला दूध पिण्या करते इशारा रानभेदी वाहतो वारा सांजवेळी सुन्न उंबरा..1 झोप लागत नाही सल काळजात बाई दरवळली दारी जाई दरवळली दारी जाई मातीचा गंध बरा रानभेदी वाहतो वारा सांजवेळी सुन्न उंबरा...2 दुःखाचा डोंगर कळकटलेला पाझर रीत-रिवाजाची वाघर रीत-रिवाजाची वाघर वरून नियतीचा मारा रानभेदी वाहतो वारा सांजवेळी सुन्न उंबरा...३ ===================================

वाचने 2479 वाचनखूण प्रतिक्रिया 6

नाखु 03/05/2018 - 07:35
दिसांनी अस्सल मराठी शब्द वाचले, शब्दकळा अचूक मांडले आहे नितवाचक नाखु