दिवसातून छप्पन वेळा
लेखनविषय:
काव्यरस
दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
अस्थिर अचपळ पारा माझ्या
नसानसात दौडत असतो
दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
अचाट ऐकतो अफाट बघतो
तेव्हा चेहेरा कोकरू होतो
कोsहं प्रश्न छळतो तेव्हा
मुमुक्षूचा होतो भास
टपरी चहा भुरकताना
मीच टपोरी टाईमपास
जुनी गाणी, जुने छंद,
वार्यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा
तोच लोलक, तिरीप नवी
जुना पडदा, हुरहूर नवी
अनंतरंगी अद्भुत खेळ
बघायचा तर हीच वेळ
वाचने
1798
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
सुंदर !
मस्तच!
मस्त...
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
+1
प्रतिसाद देणार्या