हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
लेखनविषय:
काव्यरस
हाॅकिंगे जे प्रेडिक्टले
ते म्यां चक्षुर्वै पाहिले
कृष्णविवरासी भेदिले
आरपार म्यां आजची
कृष्णविवराचा चव्हाटा
तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा
चारी मितींचा उफराटा
कोलाहल माजला
कार्यकारणाची तर्कटे
उलटी पालटी पडती येथे
आधी कळस मग पायथे
हाची लोच्या येथला
कवाडे विभिन्न विश्वांची
ठोठाविता उघडती साची
अनवट रूपे तयांची
जाणे केवळ हाॅकिंग
वाचने
2629
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
भारी !
मस्त.. वाचताक्षणीच आवडली
शॉलिट्ट्ट्ट्ट्ट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबनअनादी अनंत काळाची महती
प्रतिसाद देणार्या
नाव
In reply to नाव by नाखु
"नाखु पत्री" पुढे
In reply to नाव by नाखु
नाखु,