मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोया चंक्स आणि खजुराचे पौष्टीक लाडू

श्वेता२४ · · पाककृती
सोया चंक्स आणि खजुराचे लाडू मुलाला डब्यात देण्यासाठी एखैदा पौष्टीक पाककृती शोधत होते. घरात सोयाबीन चंक्सचे पीठ व खजूर शिल्लक होते. त्याचा वापर करायचे ठरविले . साहित्य - 1 मोठी वाटी सोया चंक्स चे पीठ (मी हे चक्कीतून दळून आणते) 1 नेहमीची वाटी कणीक 1 वाटी तूप (फोटोमध्ये कमी दिसत असले तरी मी नंतर वरुन घातले आहे.) 12-15 खजूर बीया काढून 1 वाटी चिरलेला गूळ अर्धी वाटी पीठीसाखर 10-12 काजू पाकळ्या 10-12 बदाम अर्धा चमचा वेलची पावडर साहित्य प्रथम खजूर, काजू, बदाम व गूळ मिक्सर मधून फिरवून घ्यावे थोडे भरडसर राहिले तरी चालेल. निम्मे तप घालून कढईत घालून पीठे खरपूस भाजून घ्यावीत. पीठ मध्यम आचेवर भाजावे. साधारण 15-20 मि. नंतर पीठाचा रंग गडद होईल व खरपूस वास सुटला की बंद करावे. गरम असतानाच त्यात खजूराचे मिश्रण, पीठी साखर व वेलची पावडर घालावी. उरलेले निम्मे तूप घालून कालवून घ्यावे. कोमटसर असतानाच लाडू वळायला घ्यावेत. या मिश्रणात माझे छोट्या आकाराचे 30 लाडू झाले. हे लाडू चवीलाही खमंग लागतात व पौष्टीकही आहेत. लाडू

वाचने 8841 वाचनखूण प्रतिक्रिया 11

जेम्स वांड Fri, 03/23/2018 - 17:35
कसली रिच पाककृती आहे, थोडं टायमिंग हुकले, हिवाळ्याच्या तोंडावर टाकली असती तर डबाभर करूनच ठेवले असते! उन्हाळ्यात इतकं रिच खायची हिम्मत नाही होणार, पण तरी बुकमार्क आहेच!

manguu@mail.com Sun, 03/25/2018 - 22:07
K सोया चंक्सच्या पिठाऐवजी फुटाणे डाळीचे पीठ आणि नाचणीचे पीठ घेतले. लाडू फारसे बांधता आले नाहीत. पीठदेखील चमच्याने खाता येइल.

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com Mon, 03/26/2018 - 06:30
थोडे पीनट बटरही घातले आहे. पीठ भाजताना तेल - तूप थोडेच घातले. त्यामुळे लाडू बांधता येत नाही आहेत. पण चव मस्त आहे. हाच ऐवज पाण्यात शिजवला तर सांजा होईल का ?

In reply to by manguu@mail.com

श्वेता२४ Mon, 03/26/2018 - 10:40
हा पण प्रयोग भारी आहे. खरं म्हणजे वेगवेगळी पीठे घालून अशाप्रकारे लाडवाच्या कीतीही पाककृती बनवता येतील

एस Mon, 03/26/2018 - 12:47
मला वाटते बदाम आणि काजू वाटण्याआधी थोडेसे भाजून घ्यावेत. त्याने चव अधिकच छान लागेल. बाकी लाडू भारी दिसत आहेत. तोंपासु.