मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाहिजे एकांत थोडा--

पुष्कराज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाहिजे एकांत थोडा पाहिजे थोडा अबोला पाहिजे पहाट थोडी पाहिजे निशब्द वारा होउनी मग एक तेव्हा अंतरी मिसळून जाउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ मिटूनी तू डोळे तुझे ग काहीशी हरवून जासी स्पर्शता लाभे दिलासा तू मला बिलगून जासी छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही त्रुप्ताता देहात ही त्रुप्ताता विश्वास सार्‍या त्रुप्ताता श्वासास ही संपता पहाट थोडी काहीशी हुरहुर व्हावी धुसरत्या तारकांना भेटीचे संकेत देउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ -पुष्कराज

वाचने 2433 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सूहास Fri, 03/06/2009 - 19:04
सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?

मराठमोळा Fri, 03/06/2009 - 19:56
छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ.. हे आवडले....

vasumati Fri, 03/06/2009 - 21:30
सुन्दर पद्य!!!!!!!!!खर्रच असा एकान्त हावा असतो कधितारि! .........vasumati.................. ..........वसुमति...................

हरकाम्या Fri, 03/06/2009 - 22:43
पहिल्या ४ ओळी वाचल्यावर असे वाटते की रात्रीची तर्रीबाज मिसळ खाल्ल्याने सकाळी सगळ्याच्या आधी जाण्याची झालेली घाई....