साधले तर वार कर ...
लेखनविषय:
काव्यरस
कोण जाणे रोज ओझे जीव कसले वाहतो
बंद डोळ्यांनी सुखाचे भोग फसवे भोगतो
वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी
मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो
अंबराची सांगता महती मला का सारखी
मी इथे मातीतुनी दररोज इमले बांधतो
सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे
प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो
साधले तर वार कर या काळजावरती सखे
अन्यथा मी पाठ फिरवुन नयन हलके झाकतो
© विशाल विजय कुलकर्णी
वाचने
3199
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
आगमनाची सुरुवात ऐसी, तर सांगतेची काय तमा ... काळजाचा ठाव घेते , कडव्याची प्रत्येक सीमा ...
सिद्धेश्वर
सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे
प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो.. जबर्दस्त....
क्या बात!
इमले आणि शेवटचा शेर खासंच!
क्या बात है विशाल...
मस्तच
आवडली
वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी
मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो
हे विषेश आवडले.
पैजारबुवा,
धन्यवाद मंडळी !
क्या बात है !!
धन्यवाद शार्दुल !
सुंदर रचना!
छान कविता आहे ...