मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला
९ फ्लॅट ची अपार्टमेंट
अग्रीमेंट तो sale झाली होती फक्त
२०१४ मध्ये अपार्टमेंट डीड
पण २०१२ पासून चैर्मन महिना मेन्टेन्स घेत आहेत ,पावती देत नाहीत ,काय करावे ?
खरड वहीच्या चर्चेतून धागा बनत आहे
कृपया डॉक्टर साहेब व बाकी साहेब यांनी मार्ग दर्शन करावे
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13684
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
देखभाल रक्कम रोख देत आहात की
रोख
In reply to देखभाल रक्कम रोख देत आहात की by श्रीगुरुजी
रोख देणे थांबवा आणि
In reply to रोख by एकुलता एक डॉन
बाकी सभासद निष्कीरिया आहेत
In reply to रोख देणे थांबवा आणि by श्रीगुरुजी
देखभाल खर्च देण्याची
नोंद कुठेच नाही
In reply to देखभाल खर्च देण्याची by श्रीगुरुजी
सोसायटी तयार न केल्याची
In reply to नोंद कुठेच नाही by एकुलता एक डॉन
अहो ९ फ्लॅट ची सोसायटी होत
In reply to सोसायटी तयार न केल्याची by श्रीगुरुजी
बय्राच/काही लोकांना ही
ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला
व्यवहार थोडा रोख थोडा धनादेश
In reply to ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला by Nitin Palkar
याने काही फरक पडत नाही.
In reply to व्यवहार थोडा रोख थोडा धनादेश by एकुलता एक डॉन
हा विषय लेखकाने खरडफळ्यावर
सोसायटीने जुनी इमारत पाडून रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय बहुमताने घेतला तर तो देखील सर्व सदस्यांवर बंधनकारक असतो का?इमारत खूप जुनी असेल आणि ती पाडावी अशी सरकारी नोटीस आली असेल तर प्रत्येक मेंबरच्या मताला फारशी किंमत राहत नाही. तरीही रिडेव्हलपमेंटचा खर्च न भरून मेंबर अडचणी आणू शकतो आणि प्रकरण कोर्टात जाऊ शकते. इमातर जुनी नसेल किंवा सरकारी कायद्यानुसार राहण्यास असुरक्षित नसेल तर मात्र १००% मेंबर्सची अनुमती असणे जास्त चांगले. कारण, अल्पसंख्य मेंबर्सनी विरोध केला आणि केस कोर्टात गेली, अश्या अनेक परिस्थितींत एकमेकास विरोधी (काँट्रॅडिक्टरी) निकाल लागलेले आहेत ! http://www.chsguru.com/2011/12/minority-members-obstructing.html ===========================असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स अससोसिएशन झालीच नाही चैर्मन फक्त महिना मैनेटेन्स घायला तोंड दाखवतो ५ वर्षे झालीत फ्लॅट विकायचा तर NOC लागेल असे म्हणालाहे सगळेच, बिनकायदेशीर / खाजगी व्यवस्था / अवैध / अजून काही, आहे. यामुळे अपार्टमेंट ओनर्सना त्रास होण्याची दाट शक्यता आहे. अश्या परिस्थितीत जमिनीचे हस्तांतरण होणे शक्य नसते (जमीन कोणाच्या नावे करणार ?) जे फार धोकादायक असते. जेव्हा नवीनिकरण करण्याची वेळ येईल तेव्हा, (ज्यांच्यावर अपार्टमेंट ओनर्सचा हक्क होता त्या) इमारती तोडल्या जातील व त्यांचा हक्क संपेल. मात्र, जमीनीचा हक्क मूळ मालकाकडेच असल्याने, (अ) अपार्टमेंट ओनर्सना ती जमीन त्यावेळच्या किंमतीत परत विकत/लीजवर घ्यावी लागेल किंवा (आ) जमीन मालकने विकणे/लीज नाकारले तर ते अजूनच गोत्यात येतील. ===========================२०१२ मध्ये agreemtn to sale झाली .२०१४ मध्ये सेल्स डीड अससोकेशन अजून नाही मी लोकअदालत आणि सहकारात संकुल दोन्ही कडे गेलो पण त्यांच्या कार्यकक्षे च्या बाहेर आहे कमी खर्चिक उपाय कोणता ?तुमचे प्रकरण बरेच गुंतागुंतीचे वाटते आहे. त्यासाठी "संकुल रजिस्ट्रेशन आणि व्यवस्थापन" या विषयात तज्ज्ञ असलेल्या वकिलाचा सल्ला घेणे सर्वोत्तम असेल. काही वकील केवळ या विषयातच प्रॅक्टीस करतात, तसा एखादा शोधावा. काही जुजुबी माहिती अशी: १. सर्वात प्रथम बहुसंख्य "प्रस्तावित मेंबर्सना" एकत्र करून रजिस्ट्रेशन (सोसायटी/असोसिएशन जे बहुमताने व कायदेशीर सल्ल्याने मान्य योग्य असेल ते) करावे, तरच तुमच्या संघटनेला (मॅनेजिंग बॉडी व तिचे पदाधिकारी यांना) वैधता मिळेल. रजिस्ट्रेशन करण्याने संकुलाचे व्यवस्थापन व्यवस्थित व कायदेशीर पद्धतीने होण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही वर सांगितलेल्या व इतर कोणतीही सरकारी संस्था तुमची दखल घेणे कठीण आहे. २. सोसायटी/असोसिएशनच्या नावे जमिनीचे "डिम्ड कन्व्हेयन्स" करून घ्यावे. त्यामुळे, तुम्हाला सर्वाधिकार मिळत नसले तरी सोसायटी/असोसिएशनचा जमिनीवरचा हक्क सरकारदरबारी नोंदला जातो व त्यामुळे बर्यापैकी कायदेशीर सुरक्षा मिळते. ३. हे सगळे वर वर सोपे वाटले तरी बरेच किचकट (विशेषतः मेंबर्सचे सहकार्य जरूर असल्याने) आहे आणि वेळखाऊ सुद्धा आहे... "लष्कराच्या भाकर्या भाजण्यास कंबर बांधून तयार असलेले" दोनचार प्रस्तावित मेंबर्स असल्याशिवाय हे जमणे कठीण असते... अर्थातच, त्याशिवाय, वर सांगितलेल्याप्रमाणे या विषयात तज्ज्ञ व विश्वासू वकिलाच्या सल्ल्यानेच तुम्ही सर्व कारवाई करावी, हे नक्की. ===========================म्हात्रे सर
बाकी सदस्य निष्क्रिय आहेत
In reply to म्हात्रे सर by एकुलता एक डॉन
बाकी सदस्य निष्क्रिय आहेतहे प्रत्येक सोसायटीच्या बाबतीत खरे आहे. म्हणूनच मी "लष्करच्या भाकर्या भाजण्याची" तयारी असलेल्या मेंबर्सची संकल्पना वरच्या मुद्दा क्र ३ मध्ये सांगितली आहे... आमची सोसायटी बिल्डरने करून दिली, पण बाकीची दुखणी आमची आम्हीच काढली होती, त्या (आणि इतर अनेकांच्या तश्याच) अनुभवावरून ते लिहिले आहे. :) अपार्टमेंट डीड फक्त झालीये अपार्टमेंट डीड तुम्हाला तुमच्या गाळ्याच्या दगडमातीच्या आत तुम्हाला गाळ्याचा वैयक्तीक उपभोग घेण्याचा परवाना आहे... तोही जर त्याचे कंप्लिशन सर्टीफिकेट घेतलेले असले व तुमच्याकडे असले तरच. केवळ, तुम्ही त्या गाळ्याचा प्रॉपर्टी कर भरता आहात याचा अर्थ या सगळ्या गोष्टी झालेल्याच असतील असे नाही... त्या झाल्या नसल्यास तुम्ही तेथे अवैधपणे राहत आहात (प्रॉपर्टी कर भरत असला तरीसुद्धा !).कंप्लिशन सर्टीफिकेट आहे
In reply to बाकी सदस्य निष्क्रिय आहेत by डॉ सुहास म्हात्रे
इथे पहा.
In reply to कंप्लिशन सर्टीफिकेट आहे by एकुलता एक डॉन
>>त्या झाल्या नसल्यास तुम्ही
शिवाय अपार्टमेंट डीड फक्त
रेजिस्ट्रेशन ओफिसात
In reply to शिवाय अपार्टमेंट डीड फक्त by कंजूस
ओके सध्या तुमच्याकडे एक
मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये
मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला ९ फ्लॅट ची अपार्टमेंटतुमचा मूळ मुद्दा परत एकदा वाचला आणि ध्यानात आले की तुमच्या संकुलात केवळ ९च अपार्टमेंट्स आहेत असे दिसते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियमांप्रमाणे, अशी सोसायटी स्थापन करायला कमीत कमी १० सभासद लागतात. (http://dcfs.gov.jm/Forms/Registration%20&%20Application%20forms%20_Co-o…). अर्थातच हा मार्ग तुम्हाला उपलब्ध नाही. परंतु, तुम्हाला "असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापित करता येणे शक्य आहे, कारण त्यासाठी कमीत कमी ७ सभासद लागतात, जे तुमच्याकडे आहेत (http://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/-1618515.html). अजून "असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापन झालेली नाही असेच तुम्ही दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. आता, सोसायटी होऊ शकत नाही आणि असोशिएशन केली नाही... यामुळे, तुम्ही ज्याला "चेअरमन" म्हणत आहात, ती व्यक्ती वैध/अधिकृत अधिकारी नसून, ती, त्या व्यक्तीने स्वतःच किंवा काही/सर्व सभासदांनी "मानलेली", केवळ एक सोय आहे. त्या सोईला कायदेशीर बैठक नाही. अश्या परिथितीत, तथाकथित चेअरमनला कोणतेच कायदेशीर अधिकार नाहीत. अजून सोसायटी अथवा असोशिएशन न झाल्यामुळे, तुमची सदनिका विकताना (रजिस्ट्रेशन आणि/अथवा कंप्लिशन सर्टीफिकेशन आणि/अथवा हस्तांतरण झालेले असले/नसले तरी) पुर्नविक्रिच्या कृतीत बिल्डर/विकासकाला सामील करून घ्यावे लागेल. तथाकथित चेअरमन अडथळे आणू लागला तर त्याला वकिलातर्फे कायदा वाचून दाखवावा, तितके पुरे ठरेल असे वाटते... असे किंवा तसे, योग्य वकिलाच्या सल्ल्यानेच हे काम करावे लागेल, हे आधी सांगितले आहेच. आता, बिल्डर/विकासक जरी पुनर्विक्रिला सहकार्य करायला तयार झाला तरी, एक महत्वाचा मुद्दा राहतोच. तो म्हणजे, सदनिकेसंदर्भात आतापर्यंत आलेल्या/असलेल्या सगळ्या समस्या तुम्ही खरेदीदाराला सांगणे आवश्यक असेल, त्या ऐकून त्याचे खरेदीसाठी सकारात्मक मत होईल याबद्दल संशय आहे. :( असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स स्थापन होऊ शकली तर मात्र (इतर काही समस्या नाहीत हे गृहीत धरून) सगळे कायदेशीर होणे शक्य आहे. मग तुमचे सदनिकेत राहणे अथवा ती विकणे, दोन्ही, सुकर होईल असे वाटते. थोडक्यात, याबाबतीतल्या एखाद्या तज्ज्ञ व विश्वासू वकिलाला या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती देऊन त्याचे मत घ्यावे, याला पर्याय नाही... कारण, अश्या प्रकरणांत, तपशिलातील छोट्या-मोठ्या फरकामुळे, कायदेशीर कारवाईच्या प्रकारात फार मोठे बदल संभवतात.असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स"
आता तुमच्या हातात, वरच्या
In reply to असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" by एकुलता एक डॉन
अर्थात खर्च करावा लागेल
In reply to आता तुमच्या हातात, वरच्या by डॉ सुहास म्हात्रे
अगदी थेट प्रश्न असा की
तिकडे भाडेकरू राहतो
In reply to अगदी थेट प्रश्न असा की by कंजूस
अपार्टमेंट डीड नंतर