मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जसे छाटले मी मला येत गेले,धुमारे पुन्हा कळू लागले जीवनाचे फिरंगी,इशारे पुन्हा! कुण्या डोंगरी एक पणती सुखाने,जळू लागली तमाच्या तमेचे तिला येत गेले,पुकारे पुन्हा! कळ्या वेचल्या काल माझ्या करांनी,गुन्हा जाहला फुलू लागले श्वास-श्वासांत माझ्या,निखारे पुन्हा! पुन्हा लेखणीला नवा बाज चढला,लिहू लागलो तुला पाहिले अन् जुने स्वप्न झाले,कुंवारे पुन्हा! तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा! —सत्यजित

वाचने 4330 वाचनखूण प्रतिक्रिया 10

सानझरी 07/02/2018 - 02:46
सुंदर लिहीलीए गझल..
तुझी लाट झालो तसे वाटले की विरावे अता कुण्या वादळाने नको दाखवाया किनारे पुन्हा!
क्या बात!

Jayant Naik 08/02/2018 - 18:37
फार सुंदर . गझलेचा मूड फार मस्त सांभाळला आहे.

सत्यजित... 09/02/2018 - 16:35
सर्व प्रतिसादक रसिकांचे अनेक धन्यवाद!