मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
जर विशालची तरही तर आमची जरही (जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला, कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती? दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी? करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही, पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला, पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला पैजारबुवा,

वाचने 5449 वाचनखूण प्रतिक्रिया 9

नाखु 19/01/2018 - 23:52
भेंडी कंपनीतून लग्नसमारंभात गेलो आणि परत हाफीसात आलो की असली बिलामत येऊ शकते जबरा काव्य

प्राची अश्विनी 20/01/2018 - 11:15
:):)

manguu@mail.com 20/01/2018 - 20:02
छान पोटातल्या कळेकडे लक्ष असल्याने काही अक्षरे कमीजास्त झालीत, तरीही जरही छान आहे.

विशाल कुलकर्णी 23/01/2018 - 11:07
बॉसच्या प्रेमळ शिव्या त्या ऐकणे आता नको बोल कुजकट ते पुन्हा ऐकायचे नव्हते मला ;) आता जमलं वृत्ताबरहुक़ूम !