जानेवारीची मस्त थंडी आणि त्यात आम्ही दोन दिवसांकरता का होईना पण अलिबागला गेलो होतो. आम्ही उतरलो होतो तो बंगला तर केवळ अप्रतिमच होता. एक मस्त तरण तलाव होता. मागच्या आवारात भरपूर नारळाची झाडं आणि हिरवं गार गवत. एकदम शांत वातावरण. फक्त पक्षांचे आवाज आणि आमच्या गपा-हसण्याचे. याहून छान आणि निवांत अस काही असूच शकत नाही; अस वाटत होत. दुपारच्या जेवणानंतर मस्त वामकुक्षी आटोपून मुलींबरोबर त्या तरण तलावाकाठी गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेत बसलो होतो. त्यावेळी बंगल्याचे caretaker विनोदजी आले. त्यांनी विचारले, "या सिझनला पोपटी करतात. तुम्हाला आवडणार असेल तर करतो." म्हंटल,"हे पोपटी काय असत? माहित नाही आम्हाला." ते म्हणाले,"मडक्यात भाजलेलं चिकन आणि भाज्या. बघा आवडेल नक्की." मी म्हणाले,"मी नॉनवेज नाही खात. बाकी हे तिघे सगळं खातात." ते म्हणाले,"वाहिनी, तुमच्यासाठी कणीस, बटाटा, वांगी असतील. खाऊन बघा. नक्की आवडेल." म्हंटल, "हे काहीतरी नवीन आहे. नक्की बघितलं पाहिजे. नक्की खाऊ आम्ही. कराच तुम्ही ही पोपटी."
मी हो म्हंटल्यावर ते तयारी करायला गेले. थोड्यावेळाने बघितलं तर २ किलो वालाच्या शेंगा, तितक्याच वाटाण्याच्या शेंगा, ४-५ बटाटे, वांगी, अंडी आणि चिकन घेऊन ते आले. बटाटा, वांगी आणि चिकन याला फक्त तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला आणि अख्खा लसूण लावून त्यांनी ते मुरायला ठेऊन दिल. दिवस मावळला तसं एक मोठस मडक घेऊन ते स्वच्छ धूतल. त्यात ते कोणतीतरी झुडपं घालत होते. मी विचारलं," हे काय आहे नक्की?" त्यांनी माहिती दिली,"हा भांभूर्डीचा पाला आहे. बघा याला वास कसा येतो." हातात घेऊन बघितलं त्याला मस्त ओव्याचा वास येत होता. खूप छान वाटला तो ताजा ओलसर झाडाचा ओव्यासारखा वास. त्यांनी पुढे माहिती दिली. "हा या मडक्यात घालायचा. त्यावर या गावठी वालाच्या शेंगा आणि वाटाणा शेंगा घालायच्या. त्यावर चिकन आणि अंडी. मग परत शेंगा. मग तुमची वांगी आणि बटाटे. परत शेंगा. आणि मग परत भांभूर्डीचा पाला."
एकूण हे सगळ त्यांनी त्या मडक्यात भरलं. मग आवारात एका कोपऱ्यात ते मडक त्यांनी उलट करून ठेवलं. त्यावर सुकलेल्या काथ्या रचल्या. मग सुकलेलं गवत निट रचून त्याला आग लावली चारी बाजूनी. गोल फिरून आग नीट लागली आहे की नाही ते पाहिलं. मी देखील त्यांच्या बरोबर तिथे उभी राहून बघत होते. ते म्हणाले,"वाहिनी, आता २० मिनिट बसा आरामात." साधारण २०-२५ मिनिटांनी त्यांनी काठीने त्या मडक्याच्या बाजूचा जाळ हलवायला सुरवात केली. मडक चांगलच लालसर गरम झालेलं दिसत होत. मी म्हंटल,"आता हे गार होईपर्यंत थांबावं लागेल." त्यावर विनोदजी म्हणाले, "अरे गार झाल्यावर खाण्यात काय मजा? आता ओल्या गोणपाटात मडक उचलून आणतो पुढे. चला तुम्ही." आणि खरच एक गोणपाट ओल करून ते त्या मडक्यावर टाकल. ते गरम मडक उचलून त्यांनी आम्ही बसलो होतो तिथे आणलं. त्या ओल्या गोणपाटानेच त्यांनी वरचा पाला काढला. तिथे एक परात तयार ठेवलेली होती. त्यात त्यांनी ते मडक उलटं केलं. आतून मस्त खरपूस भाजलेल्या शेंगा, बटाटा, वांगी, अंडी बाहेर आली. मग एक मोठा चिमटा घेऊन त्यांनी चिकनचे तुकडे बाहेर काढले आणि परात आमच्या समोर ठेवली. म्हणाले,"हे असंच गरम-गरम खाऊन बघा."
तो एकूण प्रकार बघून मुली काही फार उत्साही नव्हत्या ते खायला. पण त्यांची मेहेनत बघून त्यांनी एक एक चिकनचा तुकडा उचलला. खायला सुरवात केली मात्र... सर्वांचाच चेहेरा खुलला. भाजलेल्या भाज्या आणि चिकन-अंडी सगळ एकूणच इतक अप्रतिम चविष्ट होतं. भाजलेल्या शेंगा देखील अगदी मस्त लागत होत्या. 'मी काही फारस खाणार नाही ह....' अस म्हणणाऱ्या माझ्या लेकीनी अगदी मनापासून सगळ खाल्ल. नंतर शेंगांच्या सालींचा झालेला ढीग बघून आम्ही एकमेकांना चिडवत हसायला लागलो.
खरच! इतकं स्वादिष्ट... मस्त खरपूस भाजलेली... अत्यंत पौष्टिक आणि तेल-तूप किंवा फार काही मसाले नसलेली ती पोपटी आमची संध्याकाळ एकदम सप्तरंगी चविष्ट करून गेली.
वाचने
13882
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोपटी
गावठी शेंगा फेब्रुवारीत येतील
पिंगुशेठ
In reply to गावठी शेंगा फेब्रुवारीत येतील by पिंगू
मी मांडवा बीचवर पोपटीचा बेत
In reply to पिंगुशेठ by रुस्तम
अरे वा
In reply to मी मांडवा बीचवर पोपटीचा बेत by पिंगू
मला बी...
In reply to मी मांडवा बीचवर पोपटीचा बेत by पिंगू
या हो काका. तुम्ही आलात तर
In reply to मला बी... by सुधांशुनूलकर
यस्सर नक्की.
In reply to या हो काका. तुम्ही आलात तर by पिंगू
पिंगू, लेका मला नक्की सांग
In reply to गावठी शेंगा फेब्रुवारीत येतील by पिंगू
अरे भाई, तुझा रेशियाड मसाला
In reply to पिंगू, लेका मला नक्की सांग by केडी
ओके रे ...
In reply to अरे भाई, तुझा रेशियाड मसाला by पिंगू
पोपटी !!!!!!!! जुन्या आठवणी
एक 'पोपटी'ची संध्याकाळ
चित्रांना बहुतेक पब्लिक अ
In reply to एक 'पोपटी'ची संध्याकाळ by ज्योति अळवणी
पोपटी कधी खाल्लेली नाही
तुम्ही राहायला कुठे? मुंबई की
In reply to पोपटी कधी खाल्लेली नाही by चामुंडराय
पोपटी खाल्ली आहे दोनतीनदा
>>>वसईची वेलवांगी, राजेळी
साधारण तीन वर्षापूर्वी मी
भांबुर्डा
In reply to साधारण तीन वर्षापूर्वी मी by जागु
ही पोपटी खाण्याची इच्छा आहे.
अनेकांना पोपटी माहीत आहे आणि
या निमीत्ताने प्रथमच कळले .
In reply to अनेकांना पोपटी माहीत आहे आणि by ज्योति अळवणी
प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतोच
In reply to अनेकांना पोपटी माहीत आहे आणि by ज्योति अळवणी
एपिक चॅनेलवर, लॉस्ट रेसिपीज
ऊंबाडियुं
In reply to एपिक चॅनेलवर, लॉस्ट रेसिपीज by पगला गजोधर
पोपटीत मडकं उलटंच ठेवायचं
पोपटी खायची तर आहे, आता पिंगू
चिंता नको. डीटेल्स कळवेनच..
In reply to पोपटी खायची तर आहे, आता पिंगू by सूड
सगा ?
>>पोपटीचा विषय आणि सगा सर~~
>>पोपटीचा विषय आणि सगा सर~~
मस्त पोपटी लेख.
आपल्या व्यनिला उत्तर द्यायला
In reply to मस्त पोपटी लेख. by नूतन सावंत
तसं नको. एका पोपटी कट्टयाचं
गवि शेठ, या वेळेस मी पोपटी
In reply to तसं नको. एका पोपटी कट्टयाचं by गवि
पुण्याच्या आसपास कुठे मिळेल
चविष्ट नसते.
In reply to पुण्याच्या आसपास कुठे मिळेल by पिलीयन रायडर
नमस्कार
नमस्कार
पालघर जिल्ह्यात कोनफळ