तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
लेखनविषय:
काव्यरस
आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल !
ताईने दिलेली ओळ होती...
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
*********************
नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला
चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला
तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे
बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला
रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो
चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला
थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे
भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला
बा निसर्गा का असा छळवाद तू रे मांडला?
बरसणे त्या पावसाचे फक्त आठवते मला
ओळखीचा चोर कोणी मान अलगद कापतो
त्याच खांद्यावर कधी मी स्फुन्दलो गमते मला
संपला रस्ता विशाला चल नव्या वाटा धरू
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
© विशाल कुलकर्णी
वाचने
7886
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सुरेख!!
खूप छान! आवडली..
वा!
In reply to वा! by प्राची अश्विनी
चांगली कल्पना आहे
In reply to वा! by प्राची अश्विनी
खरोखर चांगली कल्पना आहे. मजा
मस्त रे! सकाळी सकाळी वाचून मन
In reply to मस्त रे! सकाळी सकाळी वाचून मन by विनिता००२
धन्यवाद विनीता !
In reply to धन्यवाद विनीता ! by विशाल कुलकर्णी
काही मोजक्या मित्रमैत्रिणींना
येक नंबर!
मस्त
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद बुवा !
मस्त
नव्यानेच कळला हा काव्य प्रकार..
मस्त!
अप्रतीम.
क्रमशः लिहायला विसरले का हो
सुंदर, आवडली
मनःपूर्वक आभार मंडळी !
या दिशेला एकदाही यायचे नव्हते