भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा
In reply to तुमचा पर्याय बराच गंडलेला आहे by पिलीयन रायडर
पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते.तुम्हाला निरूपण करणं साधं सोपं वाटत असेल तर तुम्ही खूप अभ्यासू असणार, धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास केलेला असणार.तसं असेल तर मी मनापासून तुम्हाला नमस्कार करतो. निरूपण करायला प्रचंड अभ्यास आणि व्यासंग लागतो, निरूपण-कीर्तन ऐकायला जमलेल्या सर्व जातींच्या, विविध आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतुन आलेल्या लोकांच्या मनावर पकड घ्यायला खूप कौशल्य लागतं.भाषेवर प्रभुत्व लागतं, विविध ग्रंथातले माहिती-संदर्भ यांची एकमेकांशी सांगड घालावी लागते आणि ती निरूपणाच्या विषयाशी एकरूप होईल ह्या प्रकारे दाखले आणि उदाहरणे द्यावी लागतात, बरं हे सगळं ज्यांच्या समोर करायचे ते लोक वेगवेगळे देवदैवतं मानणारे. त्यांच्या भक्ती-उपासना परंपरेला धक्का न लावता त्यांना त्यांच्या वैचारिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्या संवादातून, मृदू, शांत शैलीतून आपलेसे करून शिकवण देणे ही माझ्या मते तरी सोप्पी गोष्ट नाही. बरं निरूपण ऐकण्याची सक्ती नाही, का निरूपण करणारे घराघरात जाऊन लोकांना गोळा करून आणत नाहीत. ज्याला ओढ असते तो येतोच. प्रसंगी अगदी ५-१० श्रोत्यांसमोर पण निरूपण-कीर्तन करावी लागतातच की. बरं कीर्तन/निरूपण करणारे फक्त ब्राह्मण नाहीत, इतर जातीतलीही लोक आहेत.माझ्या स्वतःच्या प्रत्यक्ष पाहण्यात आहेत.
पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का?स्वच्छ, स्पष्ट उच्चार, शुद्ध बोलणं ह्याला हसताना / टर उडवताना मी पाहिलेले आहे आणि अनुभवलेले पण आहे. पण मुळात तुम्हाला तुमचे उच्चार सवर्णांसारखे कशाला व्हायला हवे आहेत ? प्रत्येक बोलीभाषेचा एक लहेजा असतो आणि ते उच्चार तसेच शोभून दिसतात.
कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का?त्या तर सगळेच वापरतात.दलित त्याला अपवाद आहेत का ?
मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून?माझ्या मते ते चुकीचंच आहे.आणि ज्यांना ज्यांना मनातून ते निषेधार्ह वाटलं होतं/आहे त्याने संस्थळावर ते व्यक्त केलेच पाहिजे ही सक्ती करता येणार नाही.
सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल?तुमचा लेख वाचून मनात उमटलेले विचार आणि तुमच्या प्रतिक्रिया वाचून त्यात झालेला बदल तुमचा तुम्हीच ओळखा. तुमचे हे वरील वाक्य तुम्हाला पण लागू होते आणि ते प्रतिक्रियांमध्ये दिसत आहे.
राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.+१. आपण सगळ्यांनीच डोकं स्थिर ठेवायला हवे.
महार वतन चार जणांना मिळाली म्हणून महारांची स्थिती चांगली होती अस नाही पण ते उगाळून उगाळून त्याचे वळसे देत बसायचं.ज्या चार जणांना मिळाली त्यांनी त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा वापर त्यांच्या समाजाच्या उत्कर्षासाठी केला का हे कसं ठरवणार ? ह्याचप्रमाणे चार ब्राह्मण सुस्थितीत होते म्हणजे बाकीच्या सगळ्या ब्राह्मणांची स्थिती चांगली होती का ?ब्राह्मण समाजात प्रचंड दारिद्र्य आणि गरिबी होती.मराठ्यांना आरक्षण मागताना सगळे मराठा समाजाचे लोक सुस्थितीत नसून त्यांच्यात पण अतिशय मागास आणि गरीब लोक आहेत आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक उत्कर्षासाठी मराठ्यांना आरक्षण पाहिजे असा युक्तिवाद केलेला आहे.पेशवाई सोडली तर ब्राह्मण कधीही राज्यकर्ते नव्हते. काहींचे पूर्वज भीक मागून पोट भरत होते म्हणताय मग ब्राह्मणांना पण माधुकरी मागून पोट भरावे लागत असे हे माहित असेलच.
ही वाक्य माझ्या वाक्यांपेक्षा जास्त लागट होती. पण हा टिकेचा रोख थेट एका वर्गावर का? असं विचारलंत? त्या धाग्यावर कोणीही हे चुकीचं बोललं जातय असं म्हणताना दिसलं नाही. सगळेजणं जानवं कानावर ठेवून गेला होतात का?कोणी काय प्रतिक्रिया द्याव्यात ह्याबद्दल तुमच्या आग्रही अपेक्षा का ?बरं इकडे तुम्हाला जानवंच का लिहावंसं वाटलं? सगळेजण तलवारी/बंदुका खाली ठेवून गेलेला होतात का(क्षत्रिय) / सगळेजण चोपड्या बाजूला ठेवून गेला होतात का(व्यापारी) / सगळेजण नांगर सोडून गेला होतात का(शेतकरी) असं त्या त्या वर्गातल्या जातींना तुम्हाला धारेवर धरता आलं असतं. जानवं शौचाला जाताना जमिनीला स्पर्श होऊन खराब होऊ नये, त्याचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून कानावर अडकवले जाते.शौचाला आपण सगळ्याच जातीचे लोक जातो, मागास अथवा पुढारलेल्या जातीचे असलो तरी अपवाद नाही. त्यामुळे तुमचे हे वाक्य मला लागट वाटलं नाही अजिबात. मुळात वेळीअवेळी शौचाला जावे लागणे हे काही फारसे चांगले लक्षण नाही.
(१) दगडफेक करणारे कोण असतील ते त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. ( म्हणजे त्याचा निषेधही कोणी कराय्चा नाह)? करणारे थेट नक्षल्यांचे हस्तक? ) असं म्हणणारे भिडे समाजसेवा करत असल्याची सर्टीफिकेटं का वाटत सुटलेत? सरकार बघेल काय ते? प्रकाश आंबेडकरांनी कायद्याच्या चौकटीत मागणी केलीय. गौरक्षकांसारखं हातात कायदा तर घेतलेला नाहीय ना?दगडफेकीचा इथे प्रत्येकाने निषेधच केलेला आहे. आणि दगडफेक करून वातावरण चिघळवण्यामागे नक्षल्यांचा हात असल्याचा रिपोर्ट खुद्द तपास करणार्यांनी केलेला आहे. तपासकर्त्यानी कोठेही भिडे गुरुजी आणि एकबोटे यांचे नाव अजून तरी घेतलेले नाहीये. भिडे समाजसेवा करतातच आणि इकडचे एकदोन आयडी त्यांच्या कार्यात भाग घेऊन पण आले आहेत.तुम्ही म्हणताय ना सरकार बघेल काय ते, मग मी तरी काय वेगळे म्हणत होतो ? प्रकाश आंबेडकर जर पत्रकार परिषद घेऊन पुरावे न देता भिडेंना दोषी ठरवत असतील तर इकडे काहींनी पुरावे देता भिड्यांना चांगले म्हटले तर काय प्रॉब्लेम आहे ? पुरावे नसताना भिड्यांची सरळसरळ बदनामी केली जात आहे ह्याचा निषेध तुम्ही करताय का ?
In reply to Khobragade was born in by सुबोध खरे
In reply to जशी उद्योगपतींची, by arunjoshi123
In reply to "आरक्षण" हे गरिबीनिर्मूलनाचे by पगला गजोधर
In reply to "आरक्षण" हे गरिबीनिर्मूलनाचे by पगला गजोधर
In reply to अच्छा? मी लिहिलं आहे का तसं by arunjoshi123
| गॅरी ट्रुमनhttp://www.misalpav.com/comment/780012#comment-780012
राजकीय आघाडीवर ब्रिटिश येण्यापूर्वी भारत म्हणजे हे एक ओपन ग्राऊंड होते. कोणीही यावे आणि हात धुऊन न्यावेत अशीच भारतीयांची परिस्थिती होती. आणि ब्रिटिश म्हणजे कोणीतरी परके असे म्हणण्यापेक्षा तत्कालीन विविध राजेरजवाड्यांच्या रस्सीखेचीच्या राजकारणातील इतर खेळाडूंप्रमाणे एक खेळाडू असेच त्यांच्याकडेही बघितले जात होते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. अगदी नानासाहेब पेशव्यांनीही अंग्र्यांचे आरमार बुडवायला ब्रिटिशांचीच मदत घेतली होती. मागे एकदा याविषयी लिहिलेही होते. आपले भारतीय लोकच आपापसात इतके भांडत असतील तर ती परिस्थिती कोणीतरी परका येऊन आपल्यावर राज्य करायला अत्यंत अनुकूल होती.अशा परिस्थितीत पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांचे भारतावर राज्य न येता ब्रिटिशांचे राज्य आले ही गोष्ट त्यामानाने चांगलीच झाली. . . आपल्याकडे एक गोष्ट फार वाईट असते. हे असे काही लिहिले की काळा इंग्रज, मेकॉलेचे गुलाम इत्यादी इत्यादी विशेषणांची सरबत्ती ते लिहिणार्यावर सुरू होऊन जाते. असला प्रकार वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या दृष्टीने नक्कीच चांगला नाही.
In reply to | गॅरी ट्रुमन by पगला गजोधर
दुर्दैवाने ब्रिटिश राज्य म्हटले की एकतर ब्रिटिशांनी सगळे काही चांगले केले असे म्हणणारे लोक दिसतात नाहीतर ब्रिटिशांनी सगळे नुकसानच केले असे म्हणणारे लोक दिसतात. मला वाटते की याविषयी थोडा अधिक न्युअन्स्ड विचार व्हायला हवा....सध्या ब्रिटीश नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने कामगिरी केलेल्या Battle for Haifa चा उदो उदो सुरु आहे स्मृती प्रित्यर्थ दिल्लीतील तीन मुर्ती चौकाचे तीन मुर्ती हएफा चौक असे नामकरण केले गेले. आधी म्हटल्या प्रमाणे दुसर्या बाजीरावाने स्वतः च ब्रिटीशांची मदत घेतलेली असताना कोरेआव भीमाच्या नावाने बोटे मोडण्यात फार हशील रहात नाही. देशाचे परकीय चलन खर्ची पडत असताना भारतीयांचे न संपलेले सुवर्ण प्रेम हा काही देशप्रेमाचा सर्वोत्तम नमुना नाही. जे कोरेगाव भिमात उत्सव करतात देश त्यांचाही आहे परक्यांचे साहाय्य घेतलेले उत्सव किती प्रमाणात करायचे किती नाही त्यांचे त्यांना ही ठरवता येणे अधिक उत्तम . हा जाती वादाचा मुद्दा बाजूस ठेऊ. भाषिक प्रश्नावर मॅकोलेच्या गुलामांनी मराठीचे भाषेचे वस्त्रहरण अशातच पुन्हा एकदा मुकपणे अनुभवले आहे. भारतीयांचे देशप्रेम बहुतेकवेळा फिफ्टी फिफ्टी असते का असा संशय येतो, भारतीय मॅकोलेच्या गुलाम या विशेषणांना सार्थ ठरवण्यासारखे बर्याचदा वागतात हे निश्चित पण त्यात धार्मीक प्रांतिक भाषिक जातीय फरक नसावा, मॅकॉले भक्त सर्वगटात आढळतात .
In reply to मॅकॉले भक्त सर्वगटात आढळतात . by माहितगार
In reply to वेदोक्तबंदी {स्वतःच्या by पगला गजोधर
In reply to बाय द वे, ही पाहिले का?https: by आनन्दा
In reply to काहीतरीच काय! by गामा पैलवान
काहीतरीच काय! एखाद दोन शून्यं इकडून तिकडे जायची राहिली बहुतेक. ५ महारांनी २८ लाख मारले असणार. नीट संशोधन होत नाही हल्ली.गामाजी, तुमचंच बरोबर हो, म्हणूनच मी आधी प्रतिक्रिया दिलेली, की तुमच्या मता प्रमाणे कोरेगावच्या लढाईत पेशवाई विजयी झाली, पुढची शे दोनशे वर्षे , अखंड हिंदुस्तानवर त्यांनी एकछत्री अंमल केला, राज्य करूकरू ते शेवटी कंटाळले, शेवटी जवाहलाल नेहरूंच्या हाती स्वतंत्र भारताच्या किल्ल्या ठेवून ते परत आपल्या कोकेशस पर्वतराजीत आपल्या बरखट्सगार्डन या स्वगृही परतले.... पेशवाई विजयी झाल्यामुळे त्यानंतर 2 वर्षांनी विजयस्तंभ कोरेगाव येथे उभारला जाऊच शकत नाही... तो नक्कीच २०१४ नंतर गुपचूप एका रात्रीत उभारला गेला असणार.... आसेतुहिमाचल पेशवाईचा एक छत्री अंमल असल्याने, १८५७ चा उठाव हा नक्की कोणाविरुद्ध?, त्यामुळे १८५७ चा उठाव ही फेक-इतिहास असणारच तुमच्या मते , कारण पेशवाईचा एकछत्री राज्य होते नं....
In reply to बाय द वे, ही पाहिले का?https: by आनन्दा
In reply to आरक्षणबद्दलचे बरेच प्रश्न, by एमी
In reply to हायकोर्टाने एकबोटेचा अटकपूर्व by विशुमित
In reply to मोगलाई आहे by गामा पैलवान
In reply to हायकोर्टाने एकबोटेचा अटकपूर्व by विशुमित
मला साधारण हेच म्हणायचं होतं.