लावणी
लेखनविषय:
काव्यरस
लावणी
पदर ढळला खांद्यावरुनी लाजेने झाले मी चूर
नका रोखून पाहू मला धडधडे माझा ऊर ||१ ||
रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसे
इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ ||
पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लाली
सुगंधी गजरा शृंगार करुनि मी वाट पहाते रंगमहाली ||३ ||
स्पर्श होता तुमचा माझे अंगअंग शहारले
श्वास होती एकरूप आपले दुसरे विश्व न उरले |||४ ||
सहवासामध्ये तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
शृंगारक्रीडा करता करता तन मन भान हरपले ||५ ||
वर्षू दे तुमची प्रीती मजवरी सचैल आज मी न्हाले
रात्र सरली पहाट झाली आकंठ तृप्त मी झाले ||६ ||
--शब्दांकित (वैभव दातार)
वाचने
17232
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
टॅन मॅन भान हरपले
In reply to टॅन मॅन भान हरपले by चांदणे संदीप
आहा!!
टॅन, वाट पहाटे सारखे शब्द
In reply to टॅन, वाट पहाटे सारखे शब्द by सूड
असू द्या हो वैभवजी, छान आहे
तुमच्या सगळ्यांच्या
In reply to तुमच्या सगळ्यांच्या by वैभवदातार
लिहीत चला हो, आमचं फार मनावर
In reply to लिहीत चला हो, आमचं फार मनावर by सूड
हळव्या मनाचे नका राहू हो.
In reply to तुमच्या सगळ्यांच्या by वैभवदातार
वैभवजी यांना संक्रांतीच्या
लावणी आवडली. शृंगाराचे वर्णन
In reply to लावणी आवडली. शृंगाराचे वर्णन by एस
टंचनिका नाही का तिकडे?
वैभवदा,
In reply to वैभवदा, by चामुंडराय
|| चामुंडराय बोलीले..
In reply to || चामुंडराय बोलीले.. by पाषाणभेद
*.....उजाडे
In reply to *.....उजाडे by पाषाणभेद
=)) =))
हळवं राहिलं, सतत वाहवाच
In reply to हळवं राहिलं, सतत वाहवाच by पुंबा
हम्म...
आणखी एक.
@ वैभवदातार
In reply to @ वैभवदातार by डॉ सुहास म्हात्रे
सहमत आहे. किंबहुना केवळ छान
रात्र चढली पुनवेची आजि जवळ
रात्र चढली पुनवेची आजि जवळ कोणी नसेम्हणजे सगळे रात्री "आजी"ला एकटे सोडून गेलेले दिसताहेत.इश्कामध्ये या तुमच्या दाजी झाले मन वेडेपिसे ||२ || पान खाऊन आले दाजीबा ओठाला रंगली लालीम्हणजे धाकट्या बहिणीची आणि दाजीची भानगड दिसतीये. (हलकेच घ्या)वैभवजी
In reply to वैभवजी by नाखु
दुसर्याच्या घाग्यावर न फिरकणारी बरीच मंडळी
मी तुझी पाठ खाजवतो, तू माझी