मोह
लेखनविषय:
काव्यरस
मंद धुंद ही हवा...
सहवास तुझा हवा हवा..
नितळ कांतीवरील दवातून..
ओघळू दे गंध नवा!
पहाट वारा... सरसर काटा..
नयन पुष्पे अर्धोन्मलीत ती..
कोकीळ कंठी माळ अडकली;
युगुल कबुतरे मूक होती!
मोहक कटीवर घट्ट मिठी अन्..
कुंतलात त्या मन बहकले!
नव यौवना तू.. मोहक.. सुंदर..
सूर्य किरणांनाही मोह पडे!
वाचने
1678
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
वर्णनात्मक रचना छान.
In reply to वर्णनात्मक रचना छान. by राघव
धन्यवाद. आपल्या सूचना