भाव तेथे(च) देव:......यनावाला
In reply to आवडला लेख. by विशुमित
आता धर्ममार्तंडांच्या फैरी झडतील.हे अवांतर आवश्यकच आहे का? म्हणजे तुम्हाला नास्तिक लोकांच्या फैरी चालतात आणि आस्तिक लोकांची मते नको आहेत असा अर्थ घ्यायचं का? तुमची काही मते असतील तर ती मांडा!
In reply to आतापर्यंत वाचलेल्या तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणेश्रद्धा ठेवायला भावनेच्या आहारी जायची गरज नसते. श्रत् म्हणजे ऐकलेलं आणि धा म्हणजे धारण करणे. तर श्रद्धा म्हणजे ऐकलेलं मनात धारण करायची मनाची क्षमता होय. तुम्ही लेखात दिलेल्या मजकुरात देव या शब्दाऐवजी इलेक्ट्रॉन शब्द टाकून पाहू या.
"इलेक्ट्रॉनच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर इलेक्ट्रॉन नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे इलेक्ट्रॉनचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले.वरील विधान शंभर टक्के सत्य आहे. इलेक्ट्रॉन ही वस्तू मानण्यावर अवलंबून आहे. इलेक्ट्रॉन नामे वस्तू एखाद्या ठिकाणी अस्तित्वात आहे असं विधान करता येत नाही. हायझेनबर्गचं अनिश्चिततेचं तत्त्व इलेक्ट्रॉन विषयी ठोस विधाने करण्यास प्रतिबंध करतं. मग इलेक्ट्रॉन आहे अशी श्रद्धाच बाळगावी लागणार ना? तुम्ही म्हणता की :
एवंच काय तर "देव अस्तित्वात आहे." हे केवळ श्रद्धेनेच सत्य मानता येते. "आमची तशी श्रद्धा आहे." असे म्हटल्यावर पुढचे बोलणेच खुंटते.खरंतर श्रद्धा असल्यावरच खुंटलेला मार्ग मोकळा होतो. सर जोसेफ जॉन थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवली तेव्हा त्यांना विद्युतभाराचं वास्तुमानाशी गुणोत्तर (=चार्ज टू मास रेशो) काढता आलं. हे भौतिकशास्त्रातलं पथदर्शी संशोधन आहे. या अगोदर अणु अ अभेद्य आहे अशी कल्पना होती. आपल्या श्रद्धेच्या आधारे श्री. थॉमसन यांनी वैज्ञानिक संशोधन करून या कल्पनेस तडा दिला. आ.न., -गा.पै.
न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृत्तिके* । भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥( *खरे तर हे रूप "मृत्तिकायाम्।" असे हवे. पण मूळ श्लोकात मृत्तिके आहे.ते तसेच ठेवले आहे.)हा श्लोक अशा स्वरूपातहि आढळतो: न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये । भावेषु विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम् ॥ न काष्ठे विद्यते देवो न शिलायां न मृत्सु च। भावे हि विद्यते देवस्तस्माद् भावं समाचरेत्।। न काष्ठे विद्यते देवो न शिलायां न कांचने । यत्र भावस्तत्र हरिस्तस्माद्भावं हि कारयेत् ॥ हा श्लोक कोठून आला ह्याविषयी एकमत दिसत नाही. त्याचा उगम पुढील स्रोतांकडे दाखविलेला सापडतो. चाणक्यसूत्राणि ८ वा अध्याय, समयोचितपद्यरत्नमालिका, गरुडपुराण प्रेतकाण्ड, ३८:१३, श्रीगर्गसंहिता अश्वमेधखण्ड. चाणक्यसूत्रे आणि अर्थशास्त्राचा लेखक हे एकच का वेगवेगळे ह्याचीहि खात्री नाही. सुभाषितरत्नभाण्डागारामध्येहि हा श्लोक दिसतो पण तेथे कोणताच स्रोत दाखविलेला नाही.
In reply to टाळ्या! by चांदणे संदीप
" आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणालीआई देव मानायची की नाही? मूर्ती घरात आणली म्हणजे मानत असेल. तेव्हा मागच्या लेखांत वापरलेली सर्व विशेषणे तिला लागू असावीत.
" आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणालीआई देव मानायची की नाही? मूर्ती घरात आणली म्हणजे मानत असेल. तेव्हा मागच्या लेखांत वापरलेली सर्व विशेषणे तिला लागू असावीत.
देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.मूळात अस्तित्वाचा पुरावा काय प्रकरण असते? एखादी गोष्ट अस्तित्वात असायची बेसिक मिनिमम कसोटी काय?
समजा तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे पन्नास लक्ष रुपये किंमतीचा हिरा आहे. तर ते विधान मी तत्त्वत: सत्य मानणार.चुकुन कधी पाच मिनिटं मिळाले तर विज्ञानही वाचा. विज्ञानाला अशा प्रकारचे तत्त्वतः देवाचे अस्तित्व मान्य आहे. मिपावरचे लोक वाचत नाहीत म्हणून त्यांना मूर्खात काढू नका.
पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते.एखादे वेळेस परीस मिळेल पण या प्रमेयाच्या सिद्धतेला लागणार्या गोष्टी मिळणार नाहीत. पुन्हा लोकांना मूर्खात काढताय.
ती गोष्ट अस्तित्वात आहेच असे जे दावा करतात त्यांच्यावरच ते अस्तित्व सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) असते.हा नास्तिकांनी काढलेला एक मूर्खपणाचा नियम आहे. यनावाला भाऊ, हा नियम नैतिक आहे का वैज्ञानिक आहे? नैतिक असेल तर गेला गाढ.. ..त. कायदासंम्मत तरी नक्की नाही. असा कोणता अॅक्ट नाही. तेव्हा मला अनैतिकपणे पण नास्तिकाकडून देवाचे नसणे सिद्ध करून घ्यायला आवडेल. ================================== आणि हा नियम वैज्ञानिक असेल तर, बिफोर वी गो इनटू द कोर सब्जेक्ट, द एक्झिस्टंस ऑफ गॉड, मला नास्तिकांकडून या नियमाचा पुरावा घ्यायला आवडेल. भावड्यांनो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक सत्याचा पुरावा लागतो ना? उपरोक्त सिद्धतेच्या जब्बाबदारीचे विधान तुम्ही सत्य मानता ना? मग मला बघायचं आहे तुम्ही पुरावे, इ कसे देता असली विधानं सिद्ध करायला? ================================= आणि या विधानाच्या सत्यतेचा पुरावा देऊ शकला नाहीत तर गुमान देव मानायला चालू करा.
In reply to वेल, देव 'नसण्या'च्या by सस्नेह
In reply to वेल, देव 'नसण्या'च्या by सस्नेह
रसेल म्हणतात, "समजा पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्या मधे कुठेतरी एक किटली आहे. ती आपल्या विवक्षित कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. मला तसा साक्षात्कार झाला आहे." असे विधान कोणी केले तर ते खोटे आहे हे आपल्याला कॉमनसेन्सने कळते. पण अशी किटली नाहीच हे सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून ते विधान खरे मानायचे का ?मित्रहो, तुम्हाला कोणी सांगीतले कि भूतलावर उणे २५० डिग्रीचा फॉस्फेरिक अॅसिडचा समुद्र, त्याच्या शेजारी धन २०० डिग्री तापमानाला असलेला सल्फ्यूरिक अॅसिडचा समुद्र नि अजून एक असलाच एक नायट्रिक अॅसिडचा समुद्र असे तीन समुद्र होते. या तिन्ही समुद्रांचे पाणी कसेतरी ऊडून एकत्र येऊन एक सहज जळणारा, सहज विरघळणारा, सहज विघटन होणारा रेणू बनला. आणि हा रेणू पृष्ठभागावर ४६० कोटी वर्षे टिकला. तुम्ही खरं मानणार आहात का? नाही ना? पण स्वतःला एक चिमटी काढून बघा, आणि खरं मानायला चालू करा. असं झालं आहे!!! ===================== विश्वाच्या अनंत काळाच्या इतिहासात काय काय झालं, काय काय झालं नाही, काय काय होऊ शकतं, काय काय होऊ शकत नाही हे सांगणारा हा टोण्या रसेल कोण? ======================== त्या किटलीचं काय घेऊन बसलात, आपलं अख्खं विश्व (हे लैच मोठ्ठं आहे) शून्यातून स्फुरून (काय खरंय का यनावाला?) एका फोटॉन इतक्या (किंवा अजून लहान) पार्टिकलात बसलं होतं असं शास्त्रज्ञ सांगू लागले कि तुम्ही कॉन्फरन्स मधे मधेच उठून "नाय नाय यनावालांनी सांगीतलंय की हे कॉमन सेन्सला पटत नाही" म्हणणार का? का शास्त्रज्ञ म्हटले कि बुद्धी गहाण टाकून माना डोलावायच्या आणि तत्त्वज्ञ म्हटले कि बांबूचे फोक दाखवायचे? त्यातही लोकांना विज्ञानाचं एक्सपोजर नाही म्हणून देव मानतात म्हणावं तर लाखो महान शास्त्रज्ञ देव मानतात. उलट सर्वे असं सांगतात कि ज्या शास्त्रज्ञांना विश्वाच्या किचकटपणाचं एक्सपोजर आहे, ते जास्त देव मानतात. मंजे बोंबला. मग हे विज्ञानाचे ओ कि ठो माहित नसलेले तुणतुणेबाज नक्की कशाला बुद्धी - श्रद्धा - विवेक - ज्ञान - मेंदू - विद्नयान यांची समीकरणं मांडत बसतात?
एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येईलच असे नाही.हे ठीक आहे. पण तुमची (ज्याचे अस्तित्व मान्य नाही अशा) देवाची आयडिया काय आहे? देवाच्या व्याख्येत कोणते विशिष्ट शब्द घातले कि संकल्पना खारिज करता येते? तुमच्या लेखनमालेत तुम्ही (ऐकलेली) देवाकरिता अनेक विशेषणे वापरली आहेत. त्यातले कोणते विशीष्ट विशेषण वापरले कि संभावना शून्य होते? का कोणतेही एक विशेषण वापरले तर तसे होते?
In reply to मी आणि माझा देव by प्रकाश घाटपांडे
इतका दडून, दडून का राहातो ? याचे कारण कळत नाही. त्याला कसली अडचण आहे ? कोणती भीती आहे ?ईश्वराच्या स्वरुपाबद्दल आपल्या नक्की काय धारणा आहेत? ते जंगलातले एक जनावर आहे असे वाटते का? तुम्ही एखाद्या गोष्टीचे स्वरुप आजमावायला कशी सुरुवात करता?
आपण जाणताच की बुद्धी आणि भावना यांचा उद्भव माणसाच्या मेंदूत होतो.हे एक धांदात असत्य आहे. बुद्धी आणि भावना म्हणजे काय असतं हे देखिल अजून वैज्ञानिक पद्धतीने माहित नाही. ते कुठं उत्पन्न होतं ते जाऊच द्या.
"देवाच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे देवाचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले. आता, एखादी गोष्ट जर खरोखर प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर त्यासाठी कुठली अट असू शकते का ? आपण जाणतो की खरे अस्तित्व व्यक्तिनिरपेक्ष असते. तसेच ते अटनिरपेक्ष असले पाहिजे.हसून पुरेवाट. व्यक्ति नसेल तर सत्य दाखवणार कुणाला? =========================== अटनिरपेक्ष हा तर जोक ऑफ द "लाइफ ऑफ फिलॉसॉफी" आहे. कोणती सिद्धता म्हणे बिना अटींची आहे? ===================== हे जग अस्तित्वात आहे हे मान्य आहे का नाही? पण काही वैज्ञानिकांचे मते म्हणे हे जगच अस्तित्वात नाही. =============== कशाला हो असले फालतू रतीब घालता लेखांचे?
१) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे.भले एकच विधान सत्य असेल पण अनेकविध भूमिकांची मांडणी शक्य होते. आणि माझी भूमिका प्रत्येक क्षणाला वेगळी असण्याचा अधिकार जपणे मला व्यक्तिशः आवडते.
In reply to उरलेली बाजू by माहितगार
१) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे.एखादी गोष्ट अस्तीत्वात असते म्हणजे नेमकं काय हेच कळलं मला अजुनपर्यंत. 'असणे' म्हणजे काय याचाच उलगडा झालेला नाहि मला अजुन :( . शरीर कशाला म्हणावं, ते कुठे सुरु होतं, कुठे संपतं हे सुद्धा कळत नाहि. सगळेच लोचे आहे च्यायला...
In reply to :-) by जयंत कुलकर्णी
In reply to एकदा देव अस्तित्वात नाही, तो by सतिश गावडे
एकदा देव अस्तित्वात नाही, तो केवळ मानण्याचा हे स्वीकारले की या काल्पनिक देवाचा आपल्याला संकटाच्या प्रसंगी आधार वाटू शकेल का?होय. त्यावेळी होणार्या मेंदुतील केमिकल लोच्या मुळे एखाद्याला तस वाटू शकत.
हे एखाद्या जंगलातून जाताना सोबत खेळण्यातील बंदूक जायची आणि त्या बंदुकीच्या भरवशावर मार्गक्रमणा करायची असे झाले.बैलाच्या ताकदी पुढे दोरखंडाची ताकद काहीच नसते पण त्याला बांधल की तो स्वतःला मुक्त समजत नाही. मनाला कशाने उभारी वाटेल हे गणित अवघड असते. बुडत्याला काडीचा आधार यात काडीचा आधार बुडत्याला पुरणार आहे का? पण त्याला तो वाटतो. मनाची गणित इतकी सोपी नसतात. अंधश्रद्धांचीही उपयुक्तता असते म्हणून त्या टिकून आहेत. उपयुक्तता जशी कमी होत जाईल तसा आधार वाटेनासा होत जाईल
In reply to :-) by जयंत कुलकर्णी
In reply to :-) by जयंत कुलकर्णी
In reply to एक माणूस आयूष्यभर “देव by शाली
In reply to त्यावर तो माणूस शांतपणे by प्रकाश घाटपांडे
In reply to क्षमस्व ! by यनावाला
In reply to खर आहे. समोरच्याला पटतील अशी by प्रकाश घाटपांडे
In reply to क्षमस्व ! by यनावाला
इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.
"एखाद्या मुक्त माध्यमांतल्या लेखातल्या मजकूराला (मुद्दे / तर्क / विधाने / विश्लेषणे / निश्कर्ष / इत्यादींना) धरून कोणी प्रश्न विचारले / विवरण मगितले / प्रतिवाद केला तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी लेखकावर असते", असा सर्वसाधारण दंडक आहे. तुमच्यासारख्या विद्वान (व विशेषतः प्राध्यापक असलेल्या) व्यक्तीला हे सांगण्याची गरज आहे असे नाही.
विशेषतः, वादग्रस्त ठरू शकेल अश्या विषयावर लेखन करून, मग "एकतर पाय काढून गप्प बसणे किंवा असा वरच्यासारखा हात झटकाणारा प्रतिसाद टाकून बाजूला होणे" असे केल्याने लोकशिक्षणाच्या कामात फायदा तर निश्चितच होणार नाही. तसेच, ते काही शास्त्रिय अथवा न्याय्य वर्तनही ठरणार नाही, हे सांगायला नकोच. याशिवाय, त्या कृतीची तुलना कोणी "दगड मारून पळून जाणे" या कृतीशी केली तर ते असत्य होणार नाही, ते वेगळेच.
विशेषतः आपल्याबरोबर सहमत होत नाहीत त्यांचा, निर्बुद्ध, (अंध)श्रद्ध, अडाणी, अश्यासारख्या शेलक्या विशेषणांनी सत्कार करणार्या (पक्षी : स्वतः बुद्धीवान व तार्कीक असण्याचा दावा करणार्या) व्यक्तीने आपल्याला शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करता येणार नाहीत असे दावे करणे "कसे दिसते" हे सांगायलाच हवे का ?
हे वरचे "सर्वसामान्य माणसांना" सुचतील असे विचार मनात आले, ते इथे मांडले आहेत. बाकी, तुम्हाला आम्ही अज्ञ लोक काय सांगू शकणार म्हणा !In reply to क्षमस्व ! by यनावाला
In reply to क्षमस्व ! by यनावाला
इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.उगाच सर्कॅस्टीक कशाला बनताय. अहो, स्पष्ट लिहा ना कि बुवा अनेक मिपाकरांची विद्वत्ता, आकलनशक्ती माझे विचार पचवायच्या लायकीची नाहि म्हणुन.असले गुणगान ऐकायची सवय आहे मिपाला. एक अध्यात्मीक रेडीओ हि टेप नेहेमी वाजवायचे.
जोवर इथे काहीजण हे लेख वाचत आहेत, जोवर या संस्थळाचे प्रवर्तक मला प्रतिबंध करीत नाहीत आणि जोवर लिहावेसे वाटते आहे तोवर लिहिणार. धन्यवाद !कोडगेपणाची कमाल झाली.
In reply to हा शुद्ध पलायनवाद तरी आहे किंवा कोडगेपणा तरी by अर्धवटराव
कोडगेपणाची कमाल झाली.नाही याला चिकाटी म्हणतात. ते मिपाकर आहेत त्यांना त्यांची मते इथे सातत्याने मांडण्याचा अधिकार आहे. तसेच आपल्याला त्याचा प्रतिवाद करण्याचाही अधिकार आहे. वाचायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार वाचकालाही आहे.
In reply to कोडगेपणाची कमाल झाली. by प्रकाश घाटपांडे
In reply to हा शुद्ध पलायनवाद तरी आहे किंवा कोडगेपणा तरी by अर्धवटराव
In reply to क्षमस्व ! by यनावाला
थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सत्य असेल तर त्या अस्तित्वाला कोणतीही अट लागू असू शकत नाही.. साहेब, आपण सूक्ष्म असे रोगजंतू डोळ्यांनी पाहू शकता का? ते पाहायचे तर सूक्ष्मदर्शक वापरणे बंधनकारक आहे. अर्थातच आपण याला अटसमजू शकता. मग आपल्या मते विनाअट दिसत नाहीत तर सूक्ष्मजंतू अस्तित्वातच नाहीत. दूरचे ग्रह पाहायचे तर शक्तिशाली दुर्बिण वापरावी लागते. मग मी माळावर उभा राहून नुसता आकाशाकडे पाहून " काहीही दिसत नाहे तेव्हा हे खगोलशास्त्रद्न्य खोटे बोलतात" असे म्हणावे का? सगळा वाद बाजुला ठेवुन देव नाहीत हे समजा एकवार मान्य केले, तरी जर कुणाला देव आहे या भावनेने बरे वाटत असेल तर त्यात गैर काय? देवाचा व्यापार करणे, देवदेवतार्जनाच्या नावाखाली लोकांना फसवणे वा लुबाडणे वा देवावर भरवसा ठेवून काहीही न करता बसणे हे निश्चितह वाईट. पण सर्व नित्याची कामे करत असता देवावर विश्वास ठेवून हात जोडले तर कुणाचे काय नुकसान आहे? शारिरीक व्याधींपेक्शा मनोविकार भयंकर असतात असे ऐकतो. अनेक मनोविकारांवर उपचार करताना डॉक्टर कधीही रुग्णाला तो खोटे वा अतर्क्य बडबडत आहे असे म्हणत नाही उलट आपला रुग्णाच्या कथनावर पूर्ण विश्वास आहे असे सांगतो आणि उपचार करतो. अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होउन अनेक आजार उद्भवतात. मन मोकळे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मन मोकळे करायचे तर देव उत्तम. जर आपण अस्तिक असाल तर आपले गार्हाणे देव ऐकेल हे समाधान असेल व जर नास्तिक असला तरी आपण कुणाला तरी शल्य सांगितले आणि ज्याला सांगितले तो तर दगड म्हणजे ते तो आणखी कुणाला सांगणार नाही वा त्याचा गैरफायदा सुद्धा घेणार नाही हे समाधान. मग सांगा देवावर विश्वास ठेवण्यात गैर काय? विश्वास अत्यंत महत्वाचा. एका बँक दरोड्यात एका धाडसी तरुणाने एका दरोडेखोराला झेप घेउन पकडले. अर्थातच त्याचे बरेच कौतुक झाले. त्याला पोलिस अधिकार्याने जेव्हा असे विचारले की सशस्त्र दरोडेखोरावर झडप घालण्याची हिम्मत त्याला कशी झाली तेव्हा तो अगदी सहज म्हणाला की त्याने त्या दरोडेखोराला सहा गोळ्या झाडताना पाहिले होते तेव्हा आता याचे पिस्तुल रिकामे असणार म्हणुन उडी मारली. पोलिसांनी कपाळाला हात लावला, म्हणाले बाबा रे काही पिस्तुले आठ बारीही असतात! हे सांगण्यामागचा हेतू इतकाच की मनात हिंमत असेल तर सामान्य माणूसही असामान्य कार्य करु शकतो. आपण हाती घेतलेल्या कार्यात नेहमी यश मिळेलच असे नाही पण जर जिंकणारच या आत्मविश्वासाने गेलं तर कामगिरी अधिक चांगली होते आणि असा आत्मविश्वास सर्वांकडे नसतो तेव्हा बालपणापासून 'परिक्षेला जाताना देवाला व मोठ्या माणसांना नमस्कार करावा' असे संस्कार केले जातात जेणे करुन आपण करत असलेल्या कामात कुणीतरी पाठीशी आहे हा विश्वास असतो. यात गैर काय? कुणी परिक्षेला वा मुलाखतेला जात असेल तर आपण शुभेच्छा देतो. त्या दिल्याने काही फरक पडत नाही पण त्या व्यक्तिला बरे वाटते आणि तो आत्मविश्वासाने जे येत आहे ते पूर्णपणे व्यक्त करु शकतो. अनेकांना आपण पीत नाही तेव्हा पेला घेतलेले समस्त बेवडे आहेत असा समज असतो. आपली वैचारिकता तशी तर नाही ना?
In reply to लेखनाचा उद्देश काय? by सर्वसाक्षी
In reply to लेखनाचा उद्देश काय? by सर्वसाक्षी
अनेकांना आपण पीत नाही तेव्हा पेला घेतलेले समस्त बेवडे आहेत असा समज असतो. आपली वैचारिकता तशी तर नाही ना?एव्हढा एकच प्रश्न ह्या लेखाला (लेखमालेला ) धोबीपछाड घालायला पुरेसा आहे
In reply to लेखनाचा उद्देश काय? by सर्वसाक्षी
In reply to पुर्ण सहमत. by शाली
नास्तीकच देवाच्या जास्त जवळ पोहोचलेले असतात.
हे वाचून नास्तिकांना फीट येऊन त्यांच्या तोंडाला फेस आला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल ! ;) =)) =)) =))In reply to नास्तीकच देवाच्या जास्त जवळ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पुर्ण सहमत. by शाली
In reply to लेखनाचा उद्देश काय? by सर्वसाक्षी
In reply to ईश्वर या संकल्पनेमुळे by प्रकाश घाटपांडे
ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. १) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे.
आणि जोपर्यंत त्यातले कोणतेही एक विधान सिद्ध होत नाही तोपर्यंत, कोणत्याही एकाच विधानाचा "अंतीम सत्य" असा दुराग्रह धरणारी व्यक्ती भोंगळ ठरते, नाही का ?इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही.तुमची आकलनशक्ती कमी पडतेय हे कबूल केल्याबद्दल अभिनंदन. ती वाढवण्यासाठी काय उपाय चालू आहेत ते वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.
In reply to एक्का काका आणि अरुणजोशी यांचा by स्पा
In reply to एक्का काका आणि अरुणजोशी यांचा by स्पा
21 Dec 2017 - 9:00 am | स्पा एक्का काका आणि अरुणजोशी यांचा आपण फॅण झालोय :)››› अखेर पांडू आला! =))
In reply to गहन विषय, पण ऐकांगी विचार .. by ओरायन
In reply to गहन विषय, पण ऐकांगी विचार .. by ओरायन
छान लेख...