मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भावगीत

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
( धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.. ह्या भावगीताच्या चालीवर म्हणता येते.) दोन जीवांची इथे भेट झाली रात्र सारी आज चांदण्यात न्हाली ||धृ || तुला पाहता मन हे मोहरले तुझे माझे नेत्री शब्द अश्रूरूप झाले शब्दावीण संवाद अंतर्यामी झाला तुझे माझे मनी आज अनुराग झाला ||१ || तुझे लाजणे ते अन् हसून बघणे मोग-यांचे गजरे केसांत गं माळणे तुझ्या स्पर्शाने तनु रोमांचित होई तुझा आणि माझा श्वास एकरूप होई ||२ || तुझे माझे नाते चिरंतन राहो प्रेमभाव आपुल्या मनी वृद्धिंगत होवो एकमेका साथीने जीवन जगणे शरीरे वेगळी मन एकरूप होणे ||३ || कवी आणि गीतकार : वैभव दातार भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२

वाचने 1336 वाचनखूण प्रतिक्रिया 3

नाखु 18/12/2017 - 19:45
हिमाचल विजय-पराजय यावर काव्य सुमन यावे अखिल मिपा खफ चा धागा आणि धाग्याची धुळवड, कब्बडी वजा चर्चा केली संघाच्या नियमित हुकुमी सदस्यांनी केलेली एकमुखी मागणी